Friday, 7 October 2022

देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’

 देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन मिळणार आहेया वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

 ही ट्रेन गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.

 यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश उपस्थित राहणार आहेत.

 भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ही असणार आहे.

ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधा पाहता अनेक बदल करण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये एकूण 1 हजार 128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे.

या ट्रेन मध्ये काय सुविधा असणार आहेत?

 ही ट्रेन अवघ्या 52 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठते.ही ट्रेन पूर्णपणे एसीअसणार आहे.

 याशिवाय ट्रेनमध्ये जागोजागी चार्जिंग पॉईंट, स्लाईडिंग विंडो, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, अटेंडेंट कॉल बटन, स्वयंचलित दरवाजे, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही, या ट्रेनमध्ये असणार आहेत.

 ट्रेनमध्ये स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे तसेच टच फ्री स्लाइडिंग दरवाजे बसवले आहेत.

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन :

1. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली.
2. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली.
3. आज तिसरी वंदे भारत ट्रेन गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.

चालू घडामोडी

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे गुरुवारी भव्य उद्घाटन करण्यात आले.

मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या भव्य सोहळय़ात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते. त्यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पीव्ही सिंधू, नेमबाज गगन नारंग यांचीही या सोहळय़ाला उपस्थिती होती.

महाराष्ट्राची विजयी घोडदौड :

 महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी, रग्बी, टेनिस या खेळांमध्ये विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी रग्बी सेव्हन्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी विजयी सुरुवात केली. नेमबाजीमध्ये रुद्रांक्ष पाटील आणि आर्या बोरसे यांनी सुवर्णपदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

पहिल्यांदाच जे Combine गट ब पूर्व परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी..

MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या...

आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..

1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE 012
(हॉलतिकीट वर उल्लेख असतोच पाहून जा.)
6. तुमची सही..
candidate signature
7. invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.. (पुढे प्रॉब्लेम नको )
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे.. शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात..

OMR वर कोणत्या चुका झाल्या तरी पेपर चेक होतो हे आधीच आयोगाने सांगितल आहे.. तरीही OMR वर कसलीच चूक होणार नाही याची काळजी घ्या..

परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये परीक्षाचा कालावधी जरी प्रत्यक्ष 11 ते 12 असला तरीही, केंद्रावर उपस्थिती चा वेळ सकाळी 9:30 आहे त्यामुळं पाऊस किंवा इतर करणामुळे लवकर जा..
हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..

सर्वात महत्वाचे हॉलटिकिट, पेन,ओरिजिनल ID, id Xerox, घड्याळ आणी मास्क, सोबतीला राहूद्या..

परीक्षा साठी शुभेच्छा.. तब्बेतीची काळजी घ्या..

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...