30 September 2025

चालू घडामोडी :- 29 सप्टेंबर 2025

◆ कर्नाटकातील बिदर जिल्ह्याला जल शक्ती अभियान: कॅच द रेन अंतर्गत जल संचय जन भागिदारी (JSJB) पुरस्कार मिळाला.

◆ बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय आणि पश्चिम चंपारणमधील उदयपूर तलाव यांना रामसर यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

◆ गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावासहित भारतात आता एकूण 93 रामसर स्थळे झाली आहेत.

◆ सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय हवाई दलाने मिग-21 लढाऊ विमान अधिकृतपणे सेवेतून निवृत्त केले आहे. 

◆ दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. [हा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेचा (UNWTO) एक उपक्रम आहे, जो 1980 मध्ये सुरू झाला होता.]

◆ जागतिक पर्यटन दिन 2025 ची थीम "पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन" ही आहे. 

◆ जागतिक पर्यटन दिन 2021 ची थीम "पर्यटन आणि शांतता" ही होती.

◆ मलेशियात 27 ते 29 सप्टेंबर 2025 या काळात जागतिक पर्यटन दिन आणि जागतिक पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली होती. 

◆ राजस्थान केंद्रीय विद्यापीठ संस्थेने 'मातीकरण' तंत्रज्ञानाचा वापर करून थारच्या वाळवंटात गहू लागवडीचा पहिला यशस्वी प्रयोग केला.

◆ 12 वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद (SMDS-XII) देहरादून येथील दून विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती.

◆ ओडिशातील भुवनेश्वर येथे दुसरी राष्ट्रीय मध्यस्थी परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती.

◆ दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो.

◆ जागतिक हृदय दिन 2025 ची थीम “एक ठोकाही चुकवू नका" (Don't Miss a Beat) ही आहे.

◆ जागतिक हृदय दिन 2024 ची थीम "कृतीसाठी हृदय वापरा" (Use heart for action) अशी होती.