Wednesday 20 January 2021

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न१२१) कोणत्या शहरात विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मुख्यालय आहे?

उत्तर :- कॅलिफोर्निया


प्रश्न१२२) कोणत्या देशात ‘सेमेरू ज्वालामुखी’ आहे?

उत्तर :- इंडोनेशिया


प्रश्न१२३) कोणत्या कवीच्या स्मृतीत बसवाकल्याण येथे ‘न्यू अनुभवा मंतपा’ उभारले जात आहे?

उत्तर :- बसवेश्वरा


प्रश्न१२४) जल्लीकट्टू  हा खेळ कोणत्या राज्यात खेळण्यात येतो ?

उत्तर :- तामिळनाडू


प्रश्न१२५) कोणत्या संस्थेने ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ नामक संकेतस्थळ-आधारित व्यासपीठ तयार केले? Topper9 चालू घडामोडी

उत्तर :- नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया


प्रश्न१२६) कोणत्या राज्यात ‘हरिके आर्द्रभूमी’ हे ठिकाण आहे?

उत्तर :- पंजाब


प्रश्न१२७) कोणत्या राज्यात ‘फुरफुरा’ तीर्थक्षेत्र आहे?

उत्तर :- पश्चिम बंगाल


प्रश्न१२८) 'नागी-नक्ती पक्षी अभयारण्य’ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम राज्यस्तरीय पक्षी उत्सवाचे नाव काय आहे?

उत्तर :- कलरव


प्रश्न१२९) कोणत्या साली आफ्रिका खंडात ‘ग्रेट ग्रीन वॉल’ नामक उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली?

उत्तर :- २००७


प्रश्न१३०) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?

उत्तर :- निकोलाई स्नेसारेव

भारतीय महिला हॉकी संघाची अर्जेटिनाशी बरोबरी.


🧿शर्मिला देवी आणि दीप ग्रेस इक्का यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने अर्जेटिनाच्या कनिष्ठ संघाविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली.


🧿अर्जेटिना दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. भारताची युवा आघाडीवीर शर्मिला हिने २२व्या मिनिटाला खाते खोलल्यानंतर पावला सान्तामारिना हिने २८व्या मिनिटाला अर्जेटिनाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर तीन मिनिटांनी दीप ग्रेस हिने भारताला पुन्हा आघाडीवर आणले. पण ब्रिसा ब्रगसेर हिने ४८व्या मिनिटाला अर्जेटिनासाठी दुसरा गोल करत हा सामना बरोबरीत राखला.


🧿करोनामुळे वर्षभरानंतर मैदानात उतरून चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक शोएर्ड मरिन यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘‘बऱ्याच कालावधीनंतर आम्ही पहिला सामना खेळलो. सर्वानाच प्रतिस्पध्र्याशी दोन हात करण्याचा सराव व्हावा म्हणून आम्ही २३ खेळाडूंना मैदानावर उतरवले.’’

मुलींना वसतिगृहासाठी मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान💥जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहासाठी सात हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी दहा हजार रुपये एक रकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.


💥याशिवाय मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासाठी प्रशिक्षण या योजनेमध्ये जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण यासाठी आता प्रति प्रशिक्षणार्थी ६०० रुपयांऐवजी १ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. इयत्ता सातवी ते बारावी पास मुलीना संगणकाबाबतचे ज्ञान, कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न ५० हजार रुपये असलेल्या कुटुंबातील मुलींना देण्यात येत होता. आता कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.


💥तसेच, महिला व बालकल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बालकल्याण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात या समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाचे १० टक्के निधीतून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत काही नवीन बाबी तसेच काही बाबींची दर्जान्नत्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

राज्यात आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण.


🧬राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


🧬‘वर्षा’ येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. शनिवारी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.


🧬बठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.


🧬लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘या’ दोन देशांपासून भारताने सावध रहावे; जाता जाता ट्रम्प प्रशासनाचा मैत्रीपूर्ण सल्ला🔶अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. अवघ्या काही तासांनंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी मावळते राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणामध्ये अमेरिकेतील जनतेला संबोधित केलं.


🔶यामध्ये त्यांनी ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या राजधानीमध्ये कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसेच ट्रम्प सरकारने चीनलाही इशारा दिला. याचवेळी ट्रम्प प्रशासनाने मित्रदेश असणाऱ्या भारताला दोन देशांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.


🔶टरम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम करणाऱ्या माइक पोम्पिओ यांनी भारतासाठी एक खास ट्विट केलं आहे. यामध्ये पोम्पिओ यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे आभार मानले आहे.


🔶“ब्रिक्स लक्षात आहे का?,” असा प्रश्न विचारत या ट्विटला पोम्पिओ यांनी सुरुवात केलीय. ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद आहे. या ट्विटमध्ये पोम्पिओ यांनी ‘बी’ आणि ‘आय’च्या लोकांना ‘सी’ आणि ‘आर’पासून धोका आहे असं म्हटलं आहे. म्हणजेच ब्राझील आणि इंडिया म्हणजेच भारतीय नागरिकांना चीन आणि रशियापासून धोका असल्याचं पोम्पिओ म्हणाले आहेत. ट्र्म्प प्रशासनाच्या काळात भारत आणि अमेरिकेच्या संबंध कायमच मैत्रीपूर्ण राहिले. अनेकदा ट्रम्प आणि मोदी यांनी एकमेकांचे भरभरुन कौतुक केल्याचंही पहायला मिळाल.

इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ याची द्वितीय आवृत्ती नीती आयोगाकडून प्रकाशित


🎍नीती आयोगाने 20 जानेवारी 2021 रोजी एका आभासी कार्यक्रमात ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ याची द्वितीय आवृत्ती प्रकाशित केली.


🌹मानांकन यादीनुसार निष्कर्ष


🎍कर्नाटकने मोठ्या राज्यांच्या गटात पहिले स्थान कायम राखले. महाराष्ट्र एका स्थानाने वर आला आणि द्वितीय क्रमांकावर आहे, तर तामिळनाडू तिसर्‍या क्रमांकावर आहे.


🎍ईशान्य आणि डोंगराळ राज्यांच्या गटात, हिमाचल प्रदेश प्रथम क्रमांकावर असून त्याच्यापाठोपाठ उत्तराखंड व मणीपूर या राज्यांचा क्रमांक लागतो.


🎍कद्रशासित प्रदेश व छोट्या राज्यांच्या गटात, दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे, तर चंदीगडने द्वितीय क्रमांक कायम राखला आहे.


🌼निर्देशांकाविषयी


🎍हा निर्देशांक देशाला नावीन्यपूर्ण अर्थव्यवस्थेत परिवर्तित करण्याप्रति सरकारची वचनबद्धता दर्शवते.


🎍‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ नाविन्यपूर्ण संशोधनाला हातभार लावण्याच्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीच्या आधारे त्यांची क्रमवारी ठरवते आणि त्यांची ताकद व त्रुटी अधोरेखित करुन अभिनवता धोरण सुधारण्यासाठी त्यांना सक्षम बनवते.


🎍कामगिरीची प्रभावीपणे तुलना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 17 ‘प्रमुख राज्ये’, 10 ‘ईशान्य आणि पर्वतीय राज्ये’ आणि 9 ‘शहर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश’ अश्या गटांमध्ये विभागले आहे.


🎍राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परिणाम आणि प्रशासन या दोन व्यापक श्रेणींच्या आधारे मानांकन देण्यात आले आहे. एकूणच, निर्देशांकाच्या चौकटीत 36 निर्देशकांचा समावेश आहे.


🎍निर्देशांक कल स्वीकारून देश, राज्य आणि जिल्हा पातळीवर नवसंशोधनाला प्रेरक विविध घटकांचे तपशीलवार विश्लेषण प्रदान करतो. ही विश्लेषणे राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय स्तरावर नवसंशोधनाचे उत्प्रेरक आणि प्रतिबंधकांना ओळखण्यात धोरणकर्त्यांना मदत करतील, अशी अपेक्षा आहे.

दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी भारतात “पराक्रम दिन” साजरा करण्यात येणार

\

🍄भारत सरकारने येत्या 23 जानेवारी 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयोग्य पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.


🍄नताजींनी देशासाठी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांची जयंती अर्थात 23 जानेवारी हा दिवस “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.


🍄दशातल्या नागरिकांना आणि विशेषत: तरुणांना संकट काळात नेताजींप्रमाणे धैर्याने वागण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


🍁इतर ठळक बाबी


🍄नताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण वर्षभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची औपचारिक सुरुवात 23 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. कोलकता येथे आयोजित केलेल्या उत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत.


🍄पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे या स्मरणोत्सव कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. याप्रसंगी एका सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर, नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित कायमस्वरुपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंग प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.

नेताजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीट यांचे विमोचन केले जाणार आहे.


🍄ओडीशाच्या कटक येथे नेताजींच्या जन्मस्थळी देखील संस्कृती मंत्रालय एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.


🍁नताजी सुभाषचंद्र बोस (23 जानेवारी 1897 – 18 ऑगस्ट 1945 ?)


🍄सभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी आहे. त्यांचा जन्म कटकला (ओडीशा) येथे झाला.


🍄1927 साली ते सक्रिय राजकारणात पडले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी मिळून 1928 साली इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली.


🍄21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्टप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. जपानने अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा या सरकारकडे सोपविला. ब्रह्मदेशामधून आझाद हिंद सेना  भारताच्या दिशेने पुढे गेल्या.


🍄सायगावहून 17 ऑगस्ट 1945 रोजी त्यांनी प्रयाण केले. मार्गावर 18 ऑगस्ट रोजी तैपे (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले, असे समजण्यात येते.

Online Test Series

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...