Sunday 30 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ३० जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
३० जून २०१९ .

● ३० जून : International Day Of Parliamentarism

● ३० जून : International Asteroid Day 

● ०१ जुलै : जीएसटी दिन

● ०१ जुलै : राष्ट्रीय डॉक्टर दिन

● संकल्पना २०१९ : " Zero Tolerance To Violence Against Doctors Clinical Establishment "

● विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ट न्युझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे

● २०१९ विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ट दुसरा खेळाडू ठरला आहे

● विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ट अकरावा खेळाडू ठरला आहे

● २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ३ गडी राखून मात केली

● २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने न्युझीलंडवर ८६ धावांनी विजय मिळवला

● मर्सरच्या सर्वेनुसार आशियातल्या टाॅप २० महाग शहरांमध्ये मुंबईचं स्थान १२ वं आहे

● मर्सरच्या सर्वेनुसार जगातील सर्वात महाग शहरांमध्ये हाँगकाँग अव्वल स्थानी आहे

● " एक देश - एक रेशन कार्ड " योजना जून २०२० पासून सुरु करण्यात येणार आहे

● राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली

● एसएफसी एनवायरमेंटल टेक्नॉलॉजी कंपनीला असोकॅम इंडीयाचा वॉटर मॅनेजमेंट एक्सलेंस पुरस्कार प्रदान

● भूपेंद्र सिंह यांची राजस्थानचे पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● केरळमधील पहिले इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन एडापल्ली येथे सुरू करण्यात आले

● डीडी न्यूजचे कॅमरामन अच्युतानंद साहू यांना मरणोत्तर " नारद सन्मान " जाहीर

● उत्तर प्रदेश सरकाराने अनुसूचित जाति सूचीमध्ये १७ अति मागास जातींचा समावेश केला

● राष्ट्रीय ग्रीन मेन्टर कॉन्फरन्स २०१९ गांधीनगर , गुजरात येथे आयोजित करण्यात आली

● नेदरलँड्स संघाने फिफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

● ३ रा सीएसआर हेल्थ इंपॅक्ट पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे पार पडला

● हिंदुस्तान झिंकला महिला व बालकल्याण क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल सीएसआर हेल्थ इंपॅक्ट पुरस्कार प्रदान

● ६ वी राष्ट्रीय व्हीलचेयर बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा मोहाली , पंजाब येथे आयोजित करण्यात आली

● ६ व्या राष्ट्रीय व्हीलचेयर बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी विजेतेपद पटकावले

● आशियाई जूनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा मकाऊ येथे आयोजित करण्यात आली

● करोलिना प्लिस्कोवाने २०१९ ईस्टबॉर्न आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● भारत - फ्रान्स संयुक्त हवाई अभ्यास " गरुड VI " उद्यापासून फ्रांन्समध्ये सुरु होणार

● ३० वी जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स २०१९  इटली येथे आयोजित करण्यात येणार

● ३० व्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स २०१९ स्पर्धेसाठी ध्वजवाहक म्हणून द्युती चंदला नामांकित करण्यात आले

● वार्षिक भारत - युके पुरस्कार सोहळा लंडन येथे आयोजित करण्यात आला

● यूके-भारत संबंधासाठी केलेल्या कामाबद्दल पत्रकार मार्क टुली यांना लाईफटाइम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● अभिनेता कुणाल नायर यांना ' ग्लोबल इंडियन आयकन ऑफ द ईयर ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● श्री श्री रवी शंकर यांना रशियास्थित युरल फेडरल विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

● फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष म्हणून के के सराफ यांची नियुक्ती करण्यात आली

● बीएसईएस यमुना पॉवर लिमिटेड ने " Susthome " ऊर्जा बचत अॅपचे अनावरण केले

● क्रिकेटपटू श्याम सुंदर मित्रा यांचे निधन झाले , ते ८२ वर्षांचे होते

● पेरुने उरुग्वेला ५-४ ने पराभूत करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

● जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला ' द बेस्ट पोर्ट ऑफ द ईयर - कंटेनरलाइज्ड ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी बिहार सरकारने " सेवा समाधान " पोर्टलचे अनावरण केले

● ३२ वी आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धा इजिप्तमध्ये सुरु

● प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत सरकाराने २.५ लाख अधिक घरांना मंजूरी दिली

● तेलंगाना सरकार लवकरच प्रवासासाठी ' वन तेलंगाना कार्ड ' लॉन्च करणार आहे

● टी के राजेंद्रन यांची तमिळनाडुचे मुख्यमंत्री यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली

● गुजरात सरकारने महागाई भत्ता (डीए) मध्ये ३ टक्क्यांने वाढ केली

● पश्चिम बंगाल सरकार पर्यंटनामध्ये वाढ करण्यासाठी हेरिटेज स्थळांचे हाॅटेल्समध्ये रुपांतर करणार

● पाकिस्तान संघाने भारताला पराभूत करत एशियन टीम स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● डॉ. सुभ्रा शंकर धर यांना सी आर राव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...