Saturday 20 November 2021

महाराष्ट्रातील प्रमुख घाट


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

 24) थळ घाट - नाशिक - ठाणे 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर 


पिंपरी चिंचवड विशेष.


🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या शासन निर्णय.....?

👉 10 एप्रिल 2018


🔹 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ची स्थापना कधी झाली .....?

👉 15 ऑगस्ट 2018


🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे पहिले आयुक्त......?

👉 R.K. पद्मनाभन


🔹 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे सध्याचे पोलीस आयुक्त.......?

👉 शरी. कृष्णप्रकाश 


🎯वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पहिले सरकारी अधिकारी तसेच आयर्नमॅन किताब मिळालेला आहे....


🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे सध्याचे अप्पर पोलीस आयुक्त.....?

👉 डॉ. संजय शिढे


🔹 पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची स्थापना......?

👉 11 ऑक्टोंबर 1982


🎯 मख्यालय - पिंपरी येथे आहे


🎯 आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ओळखली जाते......


🔸 पणे महानगरपालिका चे पहिले महापौर......?

👉 बाबाराव सणस


🔹 पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे सध्याचे महापौर......?

👉 उषा उर्फ माई मनोहर ढोरे


🎯 उपमहापौर - राहुल जाधव


🔸 पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे सध्याचे आयुक्त.....?

👉 शरी. राजेश पाटील


🔹 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी आहे.......?

👉 निगडी

                                  

🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे किती परिमंडळ आहेत.....?

👉 तीन


🔹 पिंपरी चिंचवड चे पालकमंत्री....?

👉 अजितदादा पवार


🔸 पिंपरी चिंचवड लोकसंख्या 2011 नुसार........?

👉 17.29 लाख


🔹 पिपंरी चिंचवड साक्षरता दर 2011 नुसार.......?

👉 87.19%


🔸 पिंपरी चिंचवड शहराचे  एकूण क्षेत्रफळ किती आहे.....?

👉 181 चौ.की.मी.


🔹 पिंपरी चिंचवड शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे......?

👉 पवना


🔸 पिंपरी चिंचवड शहराचा पिनकोड काय आहे.....?

👉 411017


🔹 पिंपरी चिंचवड शहराचा आरटीओ कोड काय आहे.....?

👉 MH-14


🎯 MH-12 पुणे तसेच MH-42 बारामती...


🔸 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सदस्य संख्या किती आहे....?

👉 128


🔹 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे एकूण किती झोन आहेत.....?

👉 आठ .....A to F


🔸 पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथे कोणती संस्था आहे......?

👉 राष्ट्रीय एड्स संशोधन 


🔹भोसरी चे जुने नाव काय होते.....?

👉 भोजापुरी ( राजा भोज ची राजधानी)


🔸 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर.....?

👉 फरांदे


🎯 पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रभाग संख्या 32 असून प्रत्येक प्रभागातून 4 नगरसेवक निवडले जातात....


🔹 पिंपरी चिंचवड हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे.....?

👉 पणे


🔸 पिंपरी चिंचवड येथे कोणता कारखाना आहे....?

👉 पनिसिलीन


🔹 पिंपरी चिंचवड येथील पर्यटन स्थळे.....?

👉 1) निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय

👉 2) दुर्गा देवी हिल पार्क

👉 3) पिंपरी चिंचवड सायन्स सेंटर

👉 4) मोरया गोसावी मंदिर


🔸चिंचवड येथे कोणत्या महा साधूची समाधी आहे ...?

👉 मोरया गोसावी


🔹 चिंचवड हे कोणत्या क्रांतिकारकांचे जन्मस्थान आहे......?

👉 चाफेकर बंधू


🔸 पिंपरी-चिंचवड शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची किती आहे .....?

👉 530 मीटर


🔹 सटॅलाइट ऑफ पुणे म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते.....?

👉 पिंपरी चिंचवड


महत्वपूर्ण क्लुप्त्या


💐महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या


✅कलुप्ती : विन सातसा गोहभी मकृ

वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


💐भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?


✅कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते

✅कलूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”

गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


💐भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार


✅कलूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


💐हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके


✅कलूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


💐 बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा


✅कलूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


💐दवीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.


✅कलुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""

अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


💐भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत


✅कलुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


💐भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?


✅कलुप्ती : "MIM BSP"

M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


💐आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


✅कलुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


💐सदिश राशी कशा लक्षात ठेवाल. 


✅कलुप्ती : "सविता वेग वजन बग "

स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


💐दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने


✅कलुप्ती : ऑबिलीपी


ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


💐महाराष्ट्रातील घाट


✅आबा कोर -

आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

✅माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

✅बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

✅कभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

✅खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

✅फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

✅मना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


💐सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


✅कलूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


💐सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


✅कलूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


💐महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा


✅कलूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’


सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


💐महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम


✅कलूप्त्या : 'गोभीकृतान '

गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा

पोलीस दल विशेष

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ ऑगस्ट 


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ 


▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
✓ दिलीप वळसे पाटिल

▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?
✓ गृहमंत्रालय

▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
✓ राज्यसूची

▪️राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 
✓ दक्षता

▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
✓ तेलंगणा

▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 
✓ हैदराबाद

▪️महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
✓ संजय पांडे

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
✓ सदरक्षणाय खलनिग्रहणाय

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?
✓ पोलीस महासंचालक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
✓ मुंबई

▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?
✓ सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट
 
▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?
✓ पंचकोणी तारा

▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?
✓ 21 ऑक्टोबर

▪️सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? 
✓ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स

▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
✓ पुणे

▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?
✓ शिपाई

▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?
✓ काटोल, जि. नागपूर

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? 
✓ हाताचा पंजा

▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?
✓ पोलीस अधीक्षक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?
✓ गडद निळा

▪️मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
✓ हेमंत नगराळे

▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?
✓ राज्यशासन

▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?
✓ महानिरीक्षक

▪️FIR चा फुल फॉर्म काय ?
✓ first information report

▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?
✓ देवेन भारती

▪️गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?
✓ गृहरक्षक दल , तुरुंग

▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?
 ✓ पुणे

▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?
✓ केपी-बोट

▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?
✓ 1948

▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 
✓ जनरल बिपिन रावत

▪️दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?
 ✓ राजनाथ सिंह

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)


आंबोली (सिंधुदुर्ग)


खंडाळा (पुणे)


लोणावळा (पुणे)


भिमाशंकर (पुणे)


चिखलदरा-गाविलगड (अमरावती)


जव्हार (पालघर)


तोरणमाळ (नंदुरबार)


पन्हाळा (कोल्हापूर)


महाबळेश्वर (सातारा)


पाचगणी (सातारा)


कोयनानगर (सातारा)


माथेरान (रायगड)


मोखाडा(ठाणे)


सूर्यामाळ (ठाणे)


म्हैसमाळ (औरंगाबाद)


येडशी (उस्मानाबाद)


रामटेक (नागपूर)

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 १).कोणत्या  केंद्रशासित प्रदेशात राज्यपाल महिलांना विधानसभेसाठी नामांकित करत होते?

१) पोंडीचेरी

२) महाराष्ट्र

३) गुजरात

४)जम्मू काश्मीर ✅


२)."बीटिंग रिट्रीट" नावाचा सोहळा कधी पार पाडतो?


१) २६ जानेवारी

२)२९ जानेवारी ✅

३) १५ ऑगस्ट 

४) १८ ऑगस्ट


३).पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रध्वज कोठे फडकवले?


१) संसदेत

२) राष्ट्रपती भवन

३) लाल किल्ला

४)एर्वीन स्टेडियम ✅


४).प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज कोण फडकवतो?

१)राज्यसभेचे अध्यक्ष

२) पंतप्रधान

३)राष्ट्रपती ✅

४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश


५).कोणत्या राज्यातील खादी ग्राम उद्योगाला राष्ट्रीय उत्पादन करण्याचा अधिकार आहे?

१)महाराष्ट्र

२) गुजरात

३)आंध्रप्रदेश

४)कर्नाटक ✅


६).पहिल्यांदा स्वतंत्र सेनानी पिंगली वेंकय्या यांनी भारताचा राष्ट्रध्वज कधी तयार केला?

१)१९२१ ✅

२) १९२२

३)१९२४

४) १९२७


७).पहिल्यांदा राष्ट्रध्वज कोठे फडकविण्यात आला?

१)कोलकत्ता ✅

२)बर्लिन

३) नवी दिल्ली

४) पुणे


८). कोणत्या राज्यात "ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळ" चे उद्धाटन केले?

१) गुजरात

२) कर्नाटक

३) तामिळनाडू

४)केरळ✅


९).विभाजन भयस्मुर्ती दिन कधी साजरी करण्यात येणार आहे?

१) ७ जुलै

२)१४ ऑगस्ट ✅

३)२१ सप्टेंबर 

४) १६ ऑक्टोबर


 १०).रामसार हे शहर कोणत्या देशात आहे?

१) भारत 

२) पाकिस्थान

३)इराण ✅

४) इराक


११).सर्वात जास्त काळ भारतीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

१) सुकुमार सेन

2)के. वी. सुंदरम ✅

३) एस. पी. सेन वर्मा

४) वी. एस. रामदेव


१२).महाराष्ट्रात पहिले कुटुंब न्यायालय कोठे स्थापित करण्यात आले?

१) मुंबई

२)पुणे ✅

३) नाशिक

४) अमरावती


१३).महाराष्ट्रात किती लघुवाद न्यायालय आहे?

१) १

२) २

३)३ ✅

४) ४ 


१४).कनिष्ठ न्यायालायावर नियंत्रण कोणाचे असते?

१) मुख्यमंत्री

२) सर्वोच्च न्यायालय

३)केंद्रीय कायदा मंत्री

४)उच्च न्यायालय ✅


१५).जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोणत्या कलमानुसार केले जाते?

१)२३३ ✅

२) २३४

३) २३६

४) २३७


१६).न्यायव्यवस्थेने तयार केलेल्या कायद्याला काय म्हणतात?

१)सामान्य कायदा

२) प्रशासकीय कायदा

३) विशेष कायदा

४)केस लॉ✅


१७).कोणत्याही सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष नसतात?

 १)राष्ट्रपती ✅

२) राज्यसभेचा अध्यक्ष

३) पंतप्रधान

४) लोकसभेचा अध्यक्ष


सीबीआय आणि ईडीच्या प्रमुखांसंबंधी मोदी सरकारचा मोठा निर्णय🔰सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा अध्यादेश सरकारने आणला आहे. या केंद्रीय तपास यंत्रणाच्या प्रमुखांचा कार्यकाळ सध्या दोन वर्षांचा आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दोन्ही अध्यादेशांवर स्वाक्षरी केली आहे. या अध्यादेशानुसार सर्वोच्च संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी तीन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.


🔰नयायमूर्ती एलएन राव यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक एस के मिश्रा यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीसंदर्भातील एका खटल्यात निकाल दिला. यावेळी, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की कार्यकाळ वाढवण्याची परवानगी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच आहे.


🔰या अध्यादेशानुसार, अंमलबजावणी संचलनालयाचे संचालक ज्या कालावधीसाठी आपले पदग्रहण करतो, तो कालावधी सेक्शन (अ) नुसार समितीच्या शिफारशीनुसार आणि लिखित स्वरूपात दिल्या गेलेल्या कारणांनुसार एका वेळी एका वर्षासाठी वाढवण्यात येऊ शकतो. अर्थात, हे केवळ पाच वर्षांपर्यंतच करता येते. पाच वर्षांची सेवा झाल्यानंतर संचालकाचा कालावधी वाढवता येत नाही. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ होता आणि १७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

पुढील दशकभरात भारतात तीन विश्वचषक🔰भारताला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ श्रीलंकेसह संयुक्तरीत्या २०२६चा ट्वेन्टी२० विश्वचषक आणि बांगलादेशसह संयुक्तरीत्या २०३१चा एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.


🔰आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जागतिक स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. भारतात २०२९ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल.


🔰तसेच पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून २०२५च्या चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद भूषवण्याची त्यांना संधी मिळेल.


🔰पाकिस्तानाने भारत आणि श्रीलंकेसह संयुक्तरीत्या १९९६चा एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला होता. तसेच अमेरिका, वेस्ट इंडिजला संयुक्तरीत्या २०२४ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाची संधी लाभणार आहे.

मराठी न शिकवल्यास शाळांना दंड ; राज्यातील सर्व शिक्षणसंस्थांना अनिवार्य; कारवाईची रक्कम एक लाखापर्यंत🔰राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व परीक्षा मंडळाच्या पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करूनही मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. दरम्यान शाळांमध्ये शिकवण्याचा आढावा घेण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाचे मराठी भाषा, साहित्य, शिक्षण क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.


🔰राज्यात २०२०-२१ पासून राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. त्यात २०२०-२१ मध्ये पहिली आणि सहावी, २०२१-२२ मध्ये दुसरी आणि सातवी, २०२२-२३ मध्ये तिसरी आणि आठवी, २०२-२४ मध्ये चौथी आणि नववी, २०२४-२५मध्ये पाचवी आणि दहावी या पद्धतीने हा निर्णय लागू होणार आहे. मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत शासन स्तरावरून वारंवार आढावा घेण्यात येत आहे.


🔰मराठी शिकवत नसलेल्या संबंधित शाळा आणि व्यवस्थापनास एक लाख रुपयांपर्यंत दंड का करू नये, अशी नोटिस देण्यात यावी. त्यानंतर शाळांकडून खुलासा घ्यावा. खुलासा समाधानकारक नसल्यास किंवा विशेष करून मराठी भाषा विषयी संबंधित वर्ग सुरू न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी स्तरावरून संस्था किंवा शाळा यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय पारित करावा. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालकांकडे दंडाच्या वसुलीचा प्रस्ताव सादर करावा, असे टेमकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...