Sunday 12 January 2020

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतून योग्य ते उत्तर सांगा? ‘ईश्वरनिर्मित’

   1) नत्रतत्पुरुष समास    2) तृतीया तत्पुरुष समास
   3) प्रादी समास      4) कर्मधारय समास

उत्तर :- 2

2) बोलणा-याच्या तोंडचे शब्द सूचित करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात ?

   1) एकेरी अवतरण (´    ´)    2) दुहेरी अवतरण (“   ”)
   3) उद्गार चिन्ह ( ! )    4) स्वल्प विराम ( , )

उत्तर :- 2

3) ‘अणूरेणूहून थोकडा | तुका आकाशा एवढा’ यातील अलंकार ओळखा.

   1) चेतनगुणोक्ती    2) भ्रांतिमान    3) विरोधाभास    4) सार

उत्तर :- 3

4) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) बारीक सारीक  2) बारकुडा    3) बारकावा    4) बारावा

उत्तर :- 1

5) ‘गंगेत गवळयांची वसती’ या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?

   1) अभिधा    2) लक्षणा    3) व्यंजना    4) योगरूढ

उत्तर :- 2

6) ‘देवाज्ञा होणे’ – म्हणजे

   1) साक्षात्कार होणे    2) देव पावणे   
   3) अवतार घेणे      4) मृत्यू पावणे

उत्तर :- 4

7) ‘गर्भ गळीत होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

   1) भयभीत होणे      2) गर्भ गळणे   
   3) गर्भ पाडणे      4) घाबरून जाणे

उत्तर :- 4

8) खालील शब्द समूहाचा समूह दर्शक शब्द लिहा.
     ‘जाणून घेण्याची इच्छा असणारा’

   अ) हुशार    ब) जिज्ञासू    क) अभ्यासू    ड) जागृत
   1) अ आणि ब बरोबर इतर सर्व चूक      2) ब बरोबर इतर सर्व चूक
   3) ब आणि क बरोबर इतर सर्व चूक      4) ड बरोबर इतर सर्व चूक

उत्तर :- 2

9) पुढीलपैकी अशुध्द शब्द कोणता ?

   1) प्रतीक    2) बंदूक     
   3) कुराड    4) गूढ

उत्तर :- 3

10) खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही ?
   1) न      2) ण      3) ड्.      4) ज्ञ

उत्तर :- 4

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला

◾️भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

◾️या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

✍होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी

◾️पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे.

◾️होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे.

◾️ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

◾️या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत.

◾️कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.

व्हिडीओ केवायसी करणारा भारत जगातील एकमेव देश

मोबाइल व्हिडीओ संवादाद्वारे ‘नो युवर कस्टमर’  अर्थात केवायसी प्रक्रिया mi राबविण्यास बँका व फिनटेक कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियमांत बदल केले आहेत.तर आधार व इतर ई-दस्तावेजांआधारे ई-केवायसी व डिजिटल केवायसी राबविण्यासही रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.

सरकारने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली असून, बँकेने केवायसीविषयक नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे भारत व्हिडीओ केवायसीची परवानगी असलेला जगातील एकमेव देश ठरला आहे.
बँका नवे ग्राहक जोडण्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे, तसेच आधार व पॅन प्राप्त करून केवायसी प्रक्रिया राबवू शकतील.

संस्थांना ई-केवायसीची परवानगी नाही. मात्र, प्रत्यक्ष आधार व क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांना केवायसी प्रक्रिया राबविता येईल. आधारद्वारे ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यास कोर्टाने मनाई केल्यानंतर नवीन ग्राहक जोडणे मोबाइल वॉलेट कंपन्यांना कठीण झाले होते.

आरबीआयने म्हटले की, डिजिटल केवायसी म्हणजे ग्राहकाचा लाइव्ह फोटो घेणे व आधार असल्याचा वैध अधिकृत पुरावा घेणे. जिथे ऑफलाइन पडताळणी शक्य नाही, तिथे व्हिडीओ केवायसी राबविता येईल. अधिकृत अधिकारी लाइव्ह फोटो घेतील. जेथे फोटो घेतला, त्या स्थानाची अक्षांश-रेखांशासह नोंद घेतली जाईल.

Current affairs question

📍 कोणत्या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन होणार आहे?

(A) कटक
(B) भुवनेश्वर✅✅
(C) भोपाळ
(D) गुवाहाटी

📍 पद्मभूषण अकबर पदमसी ह्यांचे कोयंबटूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते एक ____ होते.

(A) पत्रकार
(B) कलाकार✅✅
(C) अभियंता
(D) लेखक

📍 ISRO या संस्थेनी _ येथे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)’ उभारण्यासाठी 2,700 कोटी रूपये खर्च असलेल्या योजनेचा आराखडा तयार केला आहे?

(A) तिरुवनंतपुरम
(B) बेंगळुरू
(C) छल्लाकेरे✅✅
(D) कोची

📍 __ राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करतो.

(A) नागालँड
(B) मिझोरम✅✅
(C) मणीपूर
(D) अरुणाचल प्रदेश

खार्‍या पाण्यातल्या मत्स्यपालनाचा पहिला वैज्ञानिक प्रयोग भारतात यशस्वी

केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्थेनी (CMFRI) कृत्रिम तलावांमध्ये इंडियन पोम्पेनो (पामलेट) या मत्स्यप्रजातीचे पालन करण्यासाठी एक संभाव्य वैज्ञानिक पद्धत विकसित केली आहे.

पोम्पेनो ही मत्स्यप्रजाती समुद्राच्या खार्‍या पाण्यात आढळते. या माश्याला सर्वाधिक मागणी आहे. तलावांमध्ये इंडियन पोम्पेनोचे पालन हे कोळंबीला एक चांगला पर्याय ठरतो.

ठळक बाबी

🔸वैज्ञानिक पद्धतीच्या यशस्वी शोधानंतर विशाखापट्टणम येथे तलावांमध्ये अधिकृतपणे मत्स्यपालन केले जाणार आहे. पोम्पेनो या मत्स्यप्रजातीच्या पालनासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित करण्याचा हा भारतातला पहिलाच प्रयोग आहे.

🔸या पद्धतीमध्ये जवळपास 95 टक्के मासे जिवंत राहतात, असे आढळून आले आहे.

🔸या पद्धतीनुसार एकरामागे 3 टनचे उत्पादन होते आणि एकरामागे होणार्‍या उत्पादन खर्चाच्या 25-30 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो.

🔸या शोधकार्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाने (NFDB) आर्थिक मदत केली.

भूगोल प्रश्नसंच

1) भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ......................... वाढली आहे.
   1) पाणथळ जमिनी    2) भूमिगत उच्चतम पाणी पातळी
   3) क्षारयुक्त जमीन    4) वरील सर्व
उत्तर :- 4

2) झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ....................... पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.
   1) नत्र      2) स्फुदर     
   3) पालाश    4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 2

3) काही वनस्पतीमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरूपात पाण्याचा –हास होतो. या प्रक्रियेला
     ................... म्हणतात.
   1) ॲबसॉर्पशन (शोषण)      2) ॲडसॉपर्शन
   3) ऑसमॉसीस (परासरण)    4) गटेशन
उत्तर :- 4

4) वनस्पतीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याचा क्षमता ........................ मुळे येते.
   अ) पाणी ग्रहण करणे    ब) पाण्याचे नुकसान कमी करणे
   क) जलसंचय      ड) वरीलपैकी कोणतेही नाही
   1) अ व ब फक्त    2) ब व क फक्त    3) अ, ब व क    4) ड फक्त
उत्तर :- 3

5) पाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते .......................... दर्शविते.
   1) पाणी देण्याची कार्यक्षमता    2) पाणी वाटप कार्यक्षमता
   3) पाणी वाहन कार्यक्षमता      4) पाणी साठवण कार्यक्षमता
उत्तर :- 2

अस्मी आणि मानसला सुवर्णपदक

📌 खेलो इंडिया यूथ गेम्सच्या तिसऱया पर्वात महाराष्ट्राच्या अस्मी बडदे हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये तर मानस मनकवले याने पॉमेल हॉर्स प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.

📌 महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे व सिद्धी हात्तेकर यांनी रौप्य पदकाला गवसणी घातली असून महाराष्ट्राच्याच मेघ रॉय व सलोनी दादरकर यांनीही कास्यपदकावर आपले नाव कोरले.

📌 सर्वसाधारण विभागात 17 वर्षांखालील गटात अस्मीने 43.80 गुणांची कमाई केली तर श्रेयाला 40.80 गुण मिळाले.

📌 दरम्यान, या दोन्ही खेळाडूंनी चेंडू व दोरीच्या सहाय्याने अप्रतिम कसरती सादर करत असतानाच उत्तम प्रकारे तोलही सांभाळला.

भारताची परकीय चलनाची गंगाजळी वाढली

📌 भारताची परकीय चलनाची गंगाजळी या महिन्याच्या पहिल्या सप्तांहात ३ पूर्णांक ६८९ अब्ज अमेरिकी डॉलर ने वाढून ४६१ पूर्णांक १५७ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे. आर. बी आय. ने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. 

📌 परकीय चलन हे एकूण ठेवीचा महत्त्वाचा भाग असतो. तो ३ पूर्णांक १३ अब्ज अमेरिकी डॉलरने वाढून ४२७ पूर्णांक ९४९ अब्ज अमेरिकी डॉलर एवढा झाला आहे.

📌 आंतरराष्ट्रीय नाणे निधी मधून पैसे काढण्याचा भारताचा हक्क ७ दशलक्ष अमेरिकी डॉलर ने वाढून १ पूर्णांक ४४७ अब्ज अमेरिकी डॉलर झाला आहे. 

📌 भारताची एकूण राखीव ठेव ३ दशलक्ष अमेरिकी डॉलर ने वाढून ३.७०३ अब्ज अमेरिकी डॉलर ने वाढली आहे.    

महानोर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

👉 ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

👉ठिकाण:उस्मानाबाद.

👉कालावधी:10, 11, 12 जानेवारी दरम्यान.

👉 संमेलनाचे उद्घाटक: पद्मश्री रानकवी ना. धों. महानोर .

👉९३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष: फादर फ्रान्सिस दिब्रिटो.

👉९२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष: डॉ. अरुणा ढेरे.

👉९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: यवतमाळ

👉93 व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह: संत  गोरा कुंभार यांची हाती चिपळ्या घेऊन भक्तीरसात तल्लीन झालेली प्रतिमा.

👉वाद:संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राह्मण महासंघ आणि हिंदुत्ववादी संघटनांचा सुरुवातीपासून विरोध.

👉अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष: प्रा. कौतिकराव ठाले- पाटील.

👉२००४ नंतर मराठवाड्याला साहित्य संमेलनाचा मान.

प्रवासी भारतीय दिन

◾️मागील 17 वर्षांपासून दरवर्षी 'प्रवासी भारतीय दिन' 9 जानेवारीला साजरा करण्यात येत आहे.

◾️या दिवसाची खास गोष्ट म्हणजे भारताबरोबरच परदेशात राहणारे भारतीय नागरिक देखील या दिवसाची खास वाट पाहत असतात. कारण बाहेर राहून देखील हे लोक देशाचे नाव उज्जवल करू शकतात

◾️. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेवरून मायदेशात परतल्याच्या दिनाचे औचित्य साधून 2003 पासून दरवर्षी 9 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येत आहे

◾️. याच दिवशी 1915 ला महात्मा गांधी आफ्रिकेवरून भारतात परतले होते.

◾️महात्मा गांधी जेव्हा 1893 ला दक्षिण आफ्रिकेच्या नटाल प्रांतात पोहचले, तेव्हा तेथे त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला.

◾️महात्मा गांधी हे यावेळी गप्प न बसता त्यांनी याविषयी आवाज उठवला.

◾️गांधीजींना यात यश देखील आले. अखेर 22 वर्षानंतर ते 9 जानेवारी 1915 ला भारतात परतले. याच दिनानिमित्ताने 2003 पासून दरवर्षी प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो.

◾️ 2003 साली सर्वात प्रथम प्रवासी भारतीय दिवस हा नवी दिल्लीत साजरा करण्यात आला होता.

◾️ तर 2019 मध्ये हा दिवस काशी येथे साजरा करण्यात आला होता.

◾️2016 मध्ये काही कारणास्तव या दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

◾️हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हा असतो की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.

◾️ त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे. जगभरातील भारतीय प्रवाशांचे नेटवर्क तयार करणे व गुंतवणूक वाढवणे.
   

इंटरनेटचा वापर हा मूलभूत अधिकार आहे: सर्वोच्च न्यायालय

'राज्यघटनेच्या कलम 19 नुसार इंटरनेट वापर हा मूलभूत अधिकार आहे,' अशी स्पष्टोक्ती देत जम्मू व काश्मीरमधले इंटरनेटवरचे निर्बंध हटविण्याबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारी 2020 रोजी दिला.

हा निर्णय न्या. एन. व्ही. रमण, न्या. बी. आर. गवई आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने दिला आहे.

खंडपीठाचे निर्णय

🔸काश्मीर खोऱ्यात गेले पाच महिने इंटरनेट सेवा बंद आहे. फौजदारी दंड संहितेमधले 'कलम 144' अन्वये प्रतिबंधात्मक आदेश मनमानी पद्धतीने नागरिकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मतभिन्नता व्यक्त करण्याचा अधिकार दडपण्यासाठी करता येणार नाही, असे स्पष्ट केले गेले.

🔸प्रतिबंधात्मक आदेश लागू करताना न्यायदंडाधिकाऱ्यांनी (जिल्हाधिकारी) सारासार विवेक आणि प्रमाण (डॉक्टरीन ऑफ प्रपोर्शनलिटी) यांचा वापर करावा.

🔸हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था अशा ठिकाणी तातडीने इंटरनेट सेवा सुरू करावी.

🔸इतर क्षेत्रे, तसेच सामान्य नागरिकांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा न्यायालयाने निश्चित केलेली नाही.

🔸माध्यमांचे स्वातंत्र्य अमूल्य आणि पवित्र आहे.

प्रकरण

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू व काश्मीर आणि लडाखचे विभाजन करून दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात अनेक निर्बंध लागू केले होते. त्यांना विरोध करणाऱ्या विविध याचिकांवरील एकत्र सुनावणी सध्या सुरू आहे.

इंटरनेटअभावी व्यापारी, व्यवसायिक, विद्यार्थी यांचे अतोनात नुकसान झाले. ही सेवा पूर्ववत झाल्यास राज्यातला तणाव निवळण्यास मदत होणार, अशी अपेक्षा आहे.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...