Thursday 5 January 2023

भारत व अधिकारी याबद्दल ऐतिहासिक प्रसिद्ध वक्तव्ये/ मते


♦️मरियट:-

◾️डपले ने यशाची किल्ली मद्रास मध्ये शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केले.क्लाइव्ह ने ही किल्ली बंगाल मध्ये यशस्वी शोधली.


♦️जॉर्ज बारलो:-

◾️कोणतेही भारतीय राज्य असे राहू नये जे इंग्रज सत्तेवर अवलंबून नाही.


♦️मलेसन:-

◾️पलासीच्या लढाई इतकी इतिहास ला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल.


♦️ज आर सिली:-

◾️राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत.


♦️पी ई रोबर्ट्स:-

◾️लॉर्ड लिटन यास जितक्या कठोर टिकेस तोंड द्यावे लागले तितकी कठोर टीका आधुनिक काळातील कोणत्याही व्हॉइसरॉय वर झाली नाही.


♦️लॉर्ड कर्झन:-

◾️भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ होय.


इतिहास प्रश्नसंच



1).डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

जुलै १९५१

मे १९५३

मे १९५५

ऑक्टोबर १९५६✅


2).इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख✅

न्यायमूर्ती रानडे


3).दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?

रामदास✅

चांगदेव

संत तुकाराम

संत सावता माळी


4).गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?

सरदार वल्लभभाई पटेल

अरुणा असफअली

राम मनोहर लोहिया✅

नानासाहेब गोरे

    

5).गुरू जनार्दन स्वामींच्या आदेशानुसार संत एकनाथांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली?

चतु:श्लोकी भागवत✅

ज्ञानेश्वरीची शुध्द पत्रे

रूक्मिणी स्वयंवर

भावार्थ रामायण


6).सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?

नारायण स्वामी

नारायण गुरु✅

दयानंद सरस्वती

राधाकृष्णन


7).अनहॅपी इंडिया हे पुस्तक कुणी लिहिले?

बिपिनचंद्र पॉल

लाला लजपतरॉय✅

सुरेंद्रनाथ बॅनजा

न्यायमूता तेलंग


8).भारताची नाईटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते?

विजयालक्ष्मी पंडित

कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन

सरोजिनी नायडू✅

डॉ. अॅनी बेझंट

    

9).वाराणसी येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात स्त्र वसाहतीचे स्वराज्य मिळविणे काँग्रेसचे अंतिम ध्येय आहे असे उद्गार कोणी काढले होते?

गोपाळ कृष्ण गोखले✅

दादाभाई नवरोजी

फिरोझशहा मेहता

सुरेंद्रनाथ बॅनार्जी


10).महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात?

लोकमान्य टिळक

महात्मा जोतीराव फुले✅

आचार्य बाळशास्त्री जांबेकर

गोपाळ गणेश आगरकर

राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धत

📌 उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत

🔘 बाजारभावला मोजले जाते

🔘 वस्तू उत्पादक क्षेत्र साठी वापर

🔘 परत्यक्ष पद्धत आहे


📌 उत्पन्न पद्धत

🔘 घटक किंमती ला मोजले जाते

🔘 सवा क्षेत्र साठी वापर

🔘 अप्रत्यक्ष पद्धत आहे


📌 खर्च पद्धत

🔘 वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी च्या खर्च ची मोजणी

🔘 गरामीण बांधकाम क्षेत्र साठी मोजले जाते

अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार :

तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७


०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.


०२. कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.


०३. कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.


०४. कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला

---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.

---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.


०४. कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.

'पृथ्वीचे अंतरंग'

 🎆 'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.


🎆 पथ्वीच्या अंतरंगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत. 


🎆 पष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.



🎆 अतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते.


🎆 भकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.


प्राथमिक लहरी (P Waves)

दुय्यम लहरी (S Waves)

पृष्ठीय लहरी (L Waves)

या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.


✅ पराथमिक लहरींची वैशिष्ट्ये:


🎆 भकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.


🎆 पराथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात. 


🎆 पराथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.


✅ दय्यम लहरींची वैशिष्ट्ये:


🎆 पराथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते. प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात. 


🎆 दय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. माध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.


✅ पष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:


🎆 पथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात. या लहरींचा वेग कमी असतो. या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते. या लहरी अतिशय विध्वंसख असतात.


🌍 पथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष :-


🎆 पथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.


🎆 भगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.


🎆 बाह्यर्गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.


🎆 कठीण घन पदार्थाचा आंतर्गाभा:- अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा. कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- 'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.

वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे


 प्र.१ हवामान बदल कमी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून 'पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय' ठेवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्याने नुकतेच मान्यता दिली?

1.महाराष्ट्र ✔️
2.उत्तर प्रदेश
3.गुजरात
4.मध्य प्रदेश

 प्र.२ हवामान, पाऊस, पूर यावर वास्तविक-वेळ माहिती आणि सतर्कतेसाठी कोणत्या राज्याने मेघासंदेश अॅप व वरुणमित्र वेब पोर्टल सुरू केले?

१.मध्य प्रदेश
२.कर्नाटक ✔️
३.ओडिशा  ‌‌
४. पश्चिम बंगाल


 प्र३. संरक्षण मंत्रालयाने "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देण्यासाठी स्थानिक पुरवठादारांकडून किती वस्तू खरेदी करण्यास मान्यता दिली?

१.12
२.16
३.26 ✔️
४. 22



प्र.४ नेव्हीमध्ये महिला अधिकार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी किती महिन्यांत कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत?

१.8 महिने
२.3 महिने ✔️
३.6 महिने
४.12 महिने


 प्र.५ ड्रायव्हिंग लायसन्स अॅपला नाव द्या, जे सरकारने नुकतेच सादर केले आहे?

१.जी-यात्रा
२.सारथी ✔️
३.स्पॉटिफाई
४.मी-परिवाहन

 प्र.६ जपानच्या मदतीने पूर्ण केलेला पैठण (जयकवाडी) जलविद्युत प्रकल्प नदीवर आहे ?

१. गंगा
२. कावेरी
३.नर्मदा
४.गोदावरी ✔️


प्र.७  रेडक्लिफ लाइन ही एक सीमा आहे ?

१.भारत आणि पाकिस्तान ✔️
२.भारत आणि चीन
३.भारत आणि म्यानमार
४.भारत आणि अफगाणिस्तान


 प्र.८. त्रिपिताक ही पवित्र पुस्तके आहेत ?

१.बौद्ध ✔️
२.हिंदू
३.जैन
४.वरीलपैकी नहीं


 प्र.९ तुलसीदास, रामचरितमानस यांचे लेखक खालील पैकी कोणत्या शासकाचे समकालीन होते?

१.अकबर ✔️
२.हुमायूं
३.शाहजहां
४. शेरशाह सुरी



 प्र. १० हसणारा गॅस म्हणजे काय?

१. नायट्रस ऑक्साईड ✔️
२.कार्बन मोनॉक्साईड
३.सल्फर डाय ऑक्साईड ४.हायड्रोजन पेरोक्साइड





 प्र.११ सिनेमाच्या विकासातल्या सेवांसाठी सर्वोच्च पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो?

१.राज कपूर
२.दादा साहेब ✔️
३.मीना कुमारी
४.अमिताभ बच्चन


स्पष्टीकरण:- 1969 या वर्षीपासून या पुरस्काराला सुरुवात झाली आहे. पहिलं पुरस्कार देवकी राणी यांना देण्यात आले आहे


 प्र.१२जगातील पहिला बायनरी अंक संगणक कोणी बनविला: झेड 1 ...?

१.कोनराड झुसे ✔️
२.केन थॉम्पसन
३.लन ट्यूरिंग
४.जॉर्ज बुले



 प्र.१३ खालीलपैकी कोणती जागा चिकनकारी कार्यासाठी प्रसिद्ध आहे, जी भरतकामाची पारंपारिक कला आहे?

१.लखनौ ✔️
२.हैदराबाद
३.जयपूर
४.म्हैसूर



 प्र.१४ पुढीलपैकी कोणता इंग्रजी चित्रपट हिंदीमध्ये डब केला गेला?

१.अलादीन ✔️
२.युनिव्हर्सल सोल्जर
३.वेग
४.लोह माणूस

कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे


🔹1. खाडी : भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.


     ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे


मुंबई उपनगर : मालाड, माहीम


मुंबई : माहीम


रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट


रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग


सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल


🔹2. पुळनी : समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना ‘पुळन’ असे म्हणतात.


मुंबई उपनगर : जिहू बीच


मुंबई शहर


दादर, गिरगाव


रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर


सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा


रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन


🔹3. वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर ‘वाळूचे दांडे’ तयार होतात.


खरदांडा(रायगड)


🔹4. बेटे : मुंबई : मुंबई बेट


रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)


अलिबाग : खांदेरी, उंदेरी


सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)


मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव


🔹5. बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.


मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),


रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,


सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी


🔹6. खनिजे : बॉक्साईट = ठाणे,


म्यंगेणीज = सिंधदुर्ग,


क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व


जिप्सम = रत्नागिरी


🔹7. नद्या : ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,


मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री


दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.


जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्‍यास समांतर. कारण, ‘डोंगरांच्या रांगा’


🔹8. किल्ले : जिल्हे डोंगरी किल्ले व  सागरी किल्ले


ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा


रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा


रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग


सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग


भारतगड, पधगड सजैकोत

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नमंजुषा


 भारताची राजधाधी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ?

1) लाँर्ड हार्डिग्ज 📚📚

2) लाँर्ड रिपन 

3) लाँर्ड चेम्सफोर्ड 

4) लाँर्ड लिटन




दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते ?

 A) पुरोहित व विश्वामित्र 

 B) विश्वामित्र व भरत जमात 📚📚

 C) सुदास व वशिष्ठ 

 D) पुरु व विश्वामित् 



भौगोलिक, राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण * 

 A) संवाद तंत्रज्ञान 

 B) नवी संवाद क्रांती 📚📚

 C) माहिती संप्रेषण तंत्रज्ञान 

 D) डिजिटल टूल्स 


 


पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

  1.कमला शिरीन 

 2. कमला हॅरीस 📚📚

  3.राधा नारायण 

  4.मृणालिनी रॉय




विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते ?

 A) व्यापाराची दिशा 

 B) आयात व्यापार 

 C) व्यापाराचे आकारमान 📚📚

 D) वरीलपैकी एकही नाही 



संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले

 A) वस्तू व सेवा 

 B) मानवी साधन संपत्ती 

 C) नैसिर्गिक साधन संपत्ती  

 D) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलन 📚




जेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते ?

 A) परागीकरण 📚📚📚

 B) फलन 

 C) पुनरुत्पादन 

 D) वरीलपैकी सर्व  




परिच्छेदास सुयोग्य नावं निवडा. 

 A) निर्यात प्रोत्साहन 

 B) संवाद तंत्रज्ञान 

 C) संवादक्रांती 

 D) परकीय व्यापार आणि आर्थिक विकास 📚📚




9.भारतातील ताजमहल ह्यावर कशाने परिणाम झाला

 A) तीव्र पर्जन्य 

 B) आम्ल पर्जन्य 📚📚

 C) सतत पर्जन्य 

 D) सूक्ष्म पर्जन्य 




.कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन _______ हे बनते

 A) HCO3 (aq) 

 B) H2CO3 (aq) 📚📚

 C) H2CO2 (aq) 

 D) H3CO3 (aq) 




लैंगिक पुनरुत्पादन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल, जेव्हा 

 A) परागकण अचूकपणे कुक्षीवर पडतील 

 B) परागनलिका बीजकोषात पोहचेल 

 C) फळांमध्ये बीजधारणा होईल 📚📚

 D) जैविक घटक परागीकरणात सहभागी असेल 



टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे ___ च्या कार्याशी संबंधित आहेत. 

 A) वारा 

 B) सागरी लाटा 📚📚

 C) हिमनदी  

 D) भूमिगत पाणी

संयुगांची निर्मिती

व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात.


1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी


1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण


इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण धातू आणि अधातू यामध्ये होते.


धातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातूंच्या  बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन कमावतात


2) इलेक्ट्रॉनची भागीदारी


समान किंवा भिन्न अधातूमध्येच इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. समांतर धातूमध्ये भागीदारी झाल्यास रेणू तयार होतात तर भिन्न अधातूमध्ये भागीदारी झाल्यास  संयुगे तयार होतात.


अधातूमध्ये भागीदारी होताना त्यांच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात. त्यानंतर प्रत्येक अधातू बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉंन भागीदारीमध्ये वापरतात आणि ते इलेक्ट्रॉन दोन्ही मूलद्रव्यासाठी सामाईक असतात.

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...