Thursday 29 June 2023

प्रश्न मंजुषा


कोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला?

 A) आयकिया सेकी 

 B) हेलीस 

 C) टेम्पेल 

 D) आयसॉन ✅
योग्य कथन/कथने ओळखा.(a) महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत.(b) खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही.पर्यायी उत्तरे :

 A) कथन (a) बरोबर, कथन (b) चुकीचे 

 B) कथन (a) व कथन (b) दोन्ही बरोबर ✅

 C) कथन (a) व कथन (b) दोन्ही चुकीची 

 D) कथन (a) चुकीचे, कथन (b) बरोबर 
जो अल्गोरिदम माहिती साठा/भंडारातील माहिती किंवा संक्रमित माहिती क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरुन कुटबद्ध करतो आणि लपवुन ठेवतो, त्याला काय म्हणतात?

 A) फायरवॉल 

 B) रुटकिट 

 C) सायफर  ✅

 D) पिवर टेक्स्ट 'लखिना' काय भूषविते ?

 A) स्त्रियांच्या क्रीडास्पर्धात लक्षणीय काम करणा-या स्त्रीला मिळणारे पारितोषिक.  

 B) भारताची सर्वात अलीकडील सॅटेलाइट मोहीम.  

 C) लेह-लडाख मधील संरक्षण विभागाचे अधिष्ठापन. 

 D) महाराष्ट्रात रूजू केलेली प्रशासकीय पद्धत.  ✅


कोणत्या  राज्यात  100% विद्दुतीकरणं  ( ग्रामीण भाग ) झालेला आहे? 

1) कर्नाटक ✅

2)  महाराष्ट्र 

3)  पंजाब 

4) हरियाणा 


भंडारदरा  धरणास......... नावाने  ओळखले  जाते?. 

1) विल्सन  बंधारा  2) येसाजी कंक  3) यशवन्त  सागर  जलाशय  4) लाइड  धरण. 


1)  फक्त  2 

2)  फक्त  4

3) फक्त   3

4)  फक्त  A✅


सन  2011 च्या  लोकसंख्या  जनगणने नुसार   महाराष्टत  साक्षरते ची  टक्के वारी  किती  होती?. 

1)  0.478  2) 0.743  3) 0.8291 4) 0.7981.


1) केवळ  2 बरोबर 

2) केवळ  4 बरोबर 

3) केवळ  1 बरोबर 

4)  केवळ  3 बरोबर ✅


 भारतामध्ये   सर्वाधिक  दूध  उत्पादनाचे  राज्य  आहे?. 

1) ओरिसा  2) हिमाचल  प्रदेश  3) उत्तर प्रदेश  4)  अरुणाचल  प्रदेश. 


1)  1 किंवा 2 बरोबर 

2) फक्त 2 बरोबर ✅

3)  1, 2, 3 बरोबर 

4) फक्त  4 


गरमसुर  डोंगर  कोणत्या  जिल्हात आहे?. 

1) चंद्रपूर  2)  वर्धा  3) अमरावती  4)  नागपूर


1)  फक्त  2 

2) फक्त  3 बरोबर 

3)  फक्त  1 बरोबर 

4)  फक्त  4 बरोबर ✅


खलीलपैकी  कोणता  राष्ट्रीय  मार्ग  महाराष्ट्र  राज्यात  सुरु  होऊन  महाराष्ट्र  राज्यात संपतो?. 

1)  राष्ट्रीय  महामार्ग  क्र.  16 

2) राष्ट्रीय  महामार्ग  क्र.  17

3) राष्ट्रीय महामार्ग  क्र.  50 

4) राष्ट्रीय महामार्ग  क्र.  43 


1)   फक्त  2 ✅

2) फक्त  4

3) फक्त  3

4)  फक्त  1


.2019चा जनस्थान पुरस्कार कोणाला मिळाला आहे

१.डॉ विजय राज्याध्यक्ष

२.अरूण साधू

३.वसंत डहाके📚📚

४.यापैकी सर्व भारताची राजधाधी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ?*

1) लाँर्ड हार्डिग्ज 📚📚

2) लाँर्ड रिपन 

3) लाँर्ड चेम्सफोर्ड 

4) लाँर्ड लिटन
दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते ?

 A) पुरोहित व विश्वामित्र 

 B) विश्वामित्र व भरत जमात 📚📚

 C) सुदास व वशिष्ठ 

 D) पुरु व विश्वामित् भौगोलिक, राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण 

 A) संवाद तंत्रज्ञान 

 B) नवी संवाद क्रांती 📚📚

 C) माहिती संप्रेषण तंत्रज्ञान 

 D) डिजिटल टूल्स 


 


पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

  1.कमला शिरीन 

 2. कमला हॅरीस 📚📚

  3.राधा नारायण 

  4.मृणालिनी रॉय
विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते ?

 A) व्यापाराची दिशा 

 B) आयात व्यापार 

 C) व्यापाराचे आकारमान 📚📚

 D) वरीलपैकी एकही नाही संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले

 A) वस्तू व सेवा 

 B) मानवी साधन संपत्ती 

 C) नैसिर्गिक साधन संपत्ती  

 D) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलन 📚
जेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते ?

 A) परागीकरण 📚📚📚

 B) फलन 

 C) पुनरुत्पादन 

 D) वरीलपैकी सर्व  
परिच्छेदास सुयोग्य नावं निवडा. * 

 A) निर्यात प्रोत्साहन 

 B) संवाद तंत्रज्ञान 

 C) संवादक्रांती 

 D) परकीय व्यापार आणि आर्थिक विकास 📚📚9.भारतातील ताजमहल ह्यावर कशाने परिणाम झाला

 A) तीव्र पर्जन्य 

 B) आम्ल पर्जन्य 📚📚

 C) सतत पर्जन्य 

 D) सूक्ष्म पर्जन्य 
.कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन _______ हे बनते

 A) HCO3 (aq) 

 B) H2CO3 (aq) 📚📚

 C) H2CO2 (aq) 

 D) H3CO3 (aq) 
लैंगिक पुनरुत्पादन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल, जेव्हा

 A) परागकण अचूकपणे कुक्षीवर पडतील 

 B) परागनलिका बीजकोषात पोहचेल 

 C) फळांमध्ये बीजधारणा होईल 📚📚

 D) जैविक घटक परागीकरणात सहभागी असेल टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे ___ च्या कार्याशी संबंधित आहेत. 

 A) वारा 

 B) सागरी लाटा 📚📚

 C) हिमनदी  

 D) भूमिगत पाणी


सिरॉसिस हा विकार अतिमधप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो?

1) फुफ्फुस

2)यकृत

3)लघुआंत्र✅

4)जठर


रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला.............ही संज्ञा आहे.

1)सॅनीटेशन

2)हायजीन

3)पूर्वप्रतिरक्षा (Prophylaxis)✅

4)यापैकी नाही.............ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.

1)लालोत्पादक ग्रंथी

2)स्वादुपिंड

3)जठरग्रंथी

4)यकृत✅


खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X-गुणसूत्रामुळे होतो?

1)गलगंड

2)रंगअंधत्व✅

3)हाशीमोटो आजार

4)यापैकी नाहीआहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते?

1)कर्बोदके✅

2)प्रथिने

3)मेद

4)जीवनसत्वेखालीलपैकी...........हे स्नायू ऊतींचे महत्वाचे कार्य गणले जाते.

1)हालचाल✅

2)समन्वय

3)इंद्रिय समन्वय

4)स्त्रवन*मानवी मूत्राचा (Urine) pH किती असतो?*

1)4 - 4.5

2)7.5 - 9

3)9 -10

4)5.5 - 7✅रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्तिथी म्हणजे.........

1)धमणिकाठिण्यता

2)परिहृदयरोग

3)अतीलठ्ठपणा

4)उच्चताण✅
धमनिकाठिण्यता हा रोग.........मुळे उद्दभवतो.

1)कुपोषण

2)अतिपोषण✅

3)अधोपोषण

4)यापैकी नाही

अन्नपचन प्रक्रिया

🌿सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.

🌿अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.

🌿या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.

🌿या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.

🌿खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.  1. अंग पदार्थ – मुख व गुहा

👉सत्राव – लाळ  

👉विकर – टायलिन

👉माध्यम – अल्पांशाने

👉मळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  

👉करिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)


2. अंग पदार्थ – जठर

👉सत्राव – हायड्रोक्लोरिक

👉माध्यम – आम्ल, अॅसिड  

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने  

👉करिया आणि अंतिम – जंतुनाशक


3. अंग पदार्थ – जठररस  

👉सत्राव – पेप्सीन,रेनीन

👉माध्यम – आम्ल

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध

👉करिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर


4. अंग पदार्थ – लहान आतडे

👉सत्राव – पित्तरस

👉माध्यम – अल्कली

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद

👉करिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.


5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  

👉विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ

👉माध्यम – अल्कली, अल्कली

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद

👉करिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल


6. अंग पदार्थ – आंत्ररस

👉विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ

👉माध्यम – अल्कली

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  

👉करिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

वाचा :- सविस्तरपणे⚔️ आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)
▪️गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला
▪️बतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.
▪️शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
▪️शवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

⚔️ हटकरांचा उठाव – मराठवाड्यात
▪️नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या काळात.
▪️नता – नौसोजी नाईक
▪️परमुख ठाणे – नोव्हा
▪️बरिटीशांनी उठाव मोडून काढला. 

⚔️ खानदेशातील भिल्लाचा उठाव
▪️भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
▪️नते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल
▪️भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

⚔️ खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:
▪️1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.
▪️भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या. 
▪️बडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

⚔️ काजरसिंग नाईकचा उठाव:
▪️1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.
▪️पर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
▪️बरिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

खोती पद्धत


🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.


🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.


🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.


🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.


🔹खोती पद्धत बहुतांशी 

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि 

सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती. 


🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. 


🔹कळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.


🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.


🔸 तयांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. 


🔹तयानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.


🔸शतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. 


🔹शतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. 

त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.


📚 खोतांचे अधिकार 📚


🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. 


🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. 


🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.


🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.


🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.


➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.


हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव


 🔺हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.


📚१८५७ च्या उठावाची विविध कारणे


१. राजकीय,सामाजिक,धार्मिक कारणे , राजकीय कारणे 


* तैनाती फौजेची पद्धतीचे दुष्परिणाम - आपले साम्राज्य उभे करताना इंग्रजांनी फोडा व झोडा या तत्वाचा नेहमीच अवलंब केला. क्लाइव्ह, हेस्टिंग, अधिकारयाची नीती - अनीती याचा फारसा विधिनिषेध पाळला नाही. त्यातच इंग्रजांची भेदनिती, त्यांचा व्यापारी साम्राज्यवाद, त्यांची शस्त्रास्त्रे व संस्कृतीचे सामर्थ्य यांचे रहस्य अनेक हिंदी राजेराजवाड्यांना उमजूनच आले नाही.

* डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण

सामाजिक कारणे 

* हिंदी लोकांना रानटी समजले जाई

* हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना

* हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले.

धार्मिक कारणे 

* तिसरे संकट धर्मावर आले.

* समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया


२. आर्थिक, लष्करी कारणे 


आर्थिक कारणे


* हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली.

* इंग्रजी भांडवलाकडून होणारी पिळवणूक

* शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी


लष्करी कारणे 


* हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक - लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज आघाडीवर धाडत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की, मग गोरी फौज पुढे सरकत असे त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई व शेवटी विजयश्रीची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.

* हिंदी शिपायाविरुध जाचक निर्बंध - १८०६ साली मद्रास आर्मीतील हिंदू शिपायावर गंध न लावण्याची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. १८२४ साली बर्मी आर्मीतील हिंदू शिपायावर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. जातीत येण्यासाठी त्यांना अनेक धार्मिक विधी करावे लागले होते. अपुरा पगार, व भत्ता याबद्दल बंडाळ्या केल्या होत्या.


३. तात्कालिक कारण


हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात त्यांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते. हि बातमी १८५७ च्या उठावास तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. व गाईला हिंदू पवित्र मानत असत. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १० मे १८५७ रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.


राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.


♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.


♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.


♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.


♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी :
1 Joule = 107 अर्ग

फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.

कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट

माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.

यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)

ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.

ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.

प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.

ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.

प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.

वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.

प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.

SONAR- Sound Navigation And Ranging System

पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.

नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.

पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.

निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.

दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.

अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.

वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.

बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.

जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.

साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.

संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.

अपवर्तन होताना पांढर्या  प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.

वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.

दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.


आजमितीस ११९ मूलद्रव्ये ज्ञात आहेत, त्यापैकी ९२ निसर्गात आढळतात.

१८६९ मध्ये दिमित्री इव्हानोविच मेंडेलिव्ह या रशियन रसायनशास्त्रज्ञाने आवर्त सारणी मांडली.

त्याच्या मतानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म तसेच त्यांच्या संयुगाची रेणुसूत्रे व गुणधर्म त्याचे अणु भाराचे आवर्तीफल असतात.

१९१३ मध्ये हेंरी मोस्ले याने असे शोधून काढले की मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म त्याचे अणुवस्तुमान हा नसून त्याचा अणु Z हा आहे.

आधुनिक आवर्तसारणीलाच आवर्तसारणीचे दीर्घरूप असे म्हणतात.

आधुनिक आवर्तसारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात. आठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात.

मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणाआधारे आवर्तसारणीची विभागणी एस-खंड, पी-खंड, दी-खंड आणि एक-खंड अशा चार खंडामध्ये केली जाते.

इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे मूलद्रव्याचे प्रसामान्य, निष्क्रिय, संक्रमण आणि अंतस्थ संक्रमण मूलद्रव्ये असे चार प्रकार होतात.

पॅराफीनमेण हे विधूत दुर्वाहक आहे. विधुत वहनासाठी चांदी ही मेणापेक्षा १०२४ पटीने अधिक परिणामकारक आहे.

अणू व रेणू विधुतदृष्टया उदासिन असतात.

ज्या पदार्थाचे जलीय द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकते त्याला विधुत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. जे द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकत नाही त्याला विधुत अनपघटनी पदार्थ असे म्हणतात.

ग्लुकोज, युरिया, साखर, अल्कोहोल हे अपघटनी आहेत.

धनाग्रीकरण (Anodizing) प्रक्रिया ही विधुत अपघटनाचे उपयोजन आहे. या प्रक्रियेचा उपयोग अॅल्युमिनिअमचा पृष्टभाग गंजरोधक आणि क्षरणरोधक करण्यासाठी होतो.

दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांग मिश्रणाला द्रावण असे म्हणतात.

‘पार्याअमध्ये तांबे’ हे द्रवामध्ये स्थायू या प्रकारचे द्रावण आहे.

शुद्ध पाणी हे नैसर्गिक द्रावक आहे.

लिंबाचा रस चवीला आंबट असून त्याने तिला निळा लिटमस कागद तांबडा होतो.

सोडबायकार्बनचे द्रावण हाताला गुळगुळीत लागते. त्याने तांबडया रंगाचा लिटमस कागद निळा होतो कारण हे द्रावण अल्कधर्मी (Basic) आहे.

जो पदार्थ पाण्यात विरघळला असता H+ आयन देतो त्याला आम्ल म्हणतात.

जो पदार्थ पाण्यात विरघळला असता OH- आयन देतो त्याला आम्लारी म्हणतात.

रेणुवस्तुमान म्हणजे 12c हा संदर्भ अणू धरून व्यक्त केलेले सापेक्ष वस्तुमान होय.

पदार्थाचे वस्तुमान ग्रॉममध्ये व्यक्त केल्यास त्याची अंकीय किंमत पदार्थाच्या रेणूवस्तुमानएवढी असते. त्याला ग्रॅम मोल म्हणतात.

पदार्थाचे जे वजन हायड्रोजनच्या १.००८ वजनी, ऑक्सीजनच्या ८ भाग वजनी किंवा क्लोरीनच्या ३५.५ भाग वजनी या प्रमाणात संयोग पावते त्याळा पदार्थाचा सममूल्यभार म्हणतात.

HCL चा सममूल्यभार ३६.५u आहे.

आम्लारीचे जे वजन एक सममूल्यभार हायड्रोक्झिल गट विस्थापित करतो. त्या वजनास आम्लारीचा सममूल्यभार असे म्हणतात.

धातू संयुगाची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन धातूंची हायड्रोक्साइडस तयार होतात. प्रथम गटाच्या धातूच्या हायड्रोक्साइडच्या जलीय द्रावणाला अल्कली आणि इतर धातूच्या हायड्रोक्साइडला आम्लारी म्हणतात.

ज्या द्रवणाची संहती अचूक माहीत असते त्या द्रावणाला प्रमाणित द्रावण म्हणतात.

एक लीटर द्रावणामध्ये किती ग्रॅम सममूल्यभार द्राव्य विरघळले आहे हे दर्शविणारी संख्या म्हणजे त्या द्रावणाची प्रसामान्यता होय.

HCI च्या एक लीटर द्रावणात ३६.५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 1N असते. HCI च्या एक लीटर द्रावणात ३.६५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 0.1 N होईल.

प्रसामान्यता (N) = द्राव्याचे ग्रॅममधील वजन /ग्रॅम सममूल्य भार × लीटर मधील आकारमान

दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांग मिश्रणाला द्रावण म्हणतात.


कुलोमचा नियम: होण प्रभारीत पदार्थांच्या दरम्यान निर्माण होणारे विधुतबल (F) हे त्या दोन प्रभारांच्या (Q1 Q2 ) गुणाकाराच्या सामानुपाती असून त्यांच्यातील अंतराच्या ® वर्गाशी व्यस्तानूपूर्ती असते.

स्थिर प्रभारामुळे घडणार्याच भौतिक परिणामाला स्थितीक विधुत असे म्हणतात, तर गतिमान प्रभारामुळे घडणार्याि भौतिक परिणामाला धारा विधुत असे म्हणतात.

धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्याने ते सुवाहक आहेत.

काही पदार्थाच्या बाबतीत मूळ केंद्रकाशी इलेक्ट्रॉन भक्कम बलाने बद्ध असल्याने त्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. त्यांना विसंवाहक म्हणतात.

काही पदार्थ सर्वसाधारण परिस्थितीत विसंवाहक असतात. परंतु विशिष्ठ परिस्थितीत ते सुवाहक बनतात. अशा पदार्थांना आर्धवाहक म्हणतात. जर्मेंनिअम, गॅलीअम, इ.

इलेक्ट्रॉनची धातुमधील गती एखाधा रेणुच्या गतीप्रमाणे यादृच्छिक असते.

जेव्हा प्रभार कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरीत होतो तेव्हा विधुत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागते. या दोन्ही पातळीवरील विभवातील फरकास विभवांतर असे म्हणतात.

कूलोम हे विधूतप्रभाराचे SI एकक आहे. हे ‘C’ या चिन्हाने दर्शवितात.

व्होल्ट हे विभवांतराचे SI एकक आहे. V ने दर्शवितात.

‘अॅम्पियर’ हे विधुतधारा मोजण्याचे SI एकक आहे. ‘A’ ने दर्शवितात.

वाहकाची लांबी जितकी जास्त तितका त्याचा रोध जास्त असतो.

तांबे हा धातू सुवाहक असतो तसेच नायक्रोम व कान्स्टन्टन धातूच्या संमिश्रांचा रोध जास्त असल्याने विधुत इस्त्रीमध्ये तांब्याऐवजी नायक्रोमचे कुंडल वापरतात.

डायोड व थर्मिस्टर ओहोमच्या नियमाचे पालन करीत आहे.

पारा या धातूचा रोध 4.2k तापमानास शुन्यापर्यंत कमी होतो.

अशा पदार्थांना अतिवाहक असे म्हणतात. अतिवाहकाच्या बाबतीत जसजसे तापमान कमी कमी होत जाते तस तसा रोधही कमी होत जातो. एका विशिष्ट तापमानास हा रोध शून्य होतो. या तापमानास क्रांतिक तापमान असे म्हणतात. (TC)

परिपथामधील रोध जर एकसर पद्धतीने जोडले असतील तर परिपथातील प्रत्येक भागातून सारखी विधूतधारा जाईल.

तारेमधून निर्माण होणारी उष्णता – 1) तारेमधुन वाहणारी विधूतधारा, 2) तारेचा रोध. 3) तारेतून विधुतधारा वाहाण्याचा कालावधी या बाबींवर अवलंबून असते.

४.१८ ज्युल = १ कॅलरी.

विधूत ऊर्जा निर्मितीच्या दारांस विधुत शक्ति असे म्हणतात.

शक्ति हे ज्युल/सेकंद या एककात मोजतात यालाच वॅट (w) म्हणतात.   

विधूतधारेच्या औष्मिक परिणामाचे अनेक व्यावहारिक प्रयोग आहेत. उदा. विधुत दिवा, विजेची शेगडी, इस्त्री, गिझर, इ.

वितळतार ही शिशासारख्या कमी द्रवनांक असलेल्या संमिश्राची बनविलेली असते.

‘लोडस्टोन’ नैसर्गिक चुंबक या नावाने ओळखले जाते.

जी विधुतधारा आपले परिमाण व दिश ठराविक समान कालावधीनंतर बदलते. त्यास प्रत्यापूर्वी धारा (AC) असे म्हणतात. ती दोलयमान (oscillating) आहे.

विधुत घटापासून तयार होणार्या  अदोलयमान धारेस दिष्ट धारा किंवा D.C. म्हणतात.

दिष्ट धारा एकाच दिशेने वाहते तर प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एकाच चक्रात उलट दिशेने वाहते.

भारतात AC ची प्रत्येक 1/100 सेकंदामद्धे दिशा बदलते. म्हणजेच त्यांची वारंवारिता ५० चक्रे प्रति सेकंद असते.

प्रत्यावर्ती धारेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विधुत शक्तीचे लांब अंतरापर्यंत फार घट न होता पारेषण करता येते.

भारतामध्ये धनाग्र तार व ऋणग्र तार यामधील विधुत विभवांवर २२० व्होल्ट असते.

विधुत ऊर्जा व चुंबकत्व यांमधील परस्पर संबंध एच.सी. ओरस्टेड या शास्त्रज्ञाने प्रथम दर्शविला.

अनेक गोलाकार वेढयांचे कुंडल गुंडाळून तयार होणार्याव चितीस नालकुंतल असे म्हणतात.

जे उर्जास्त्रोत एकदा वापर केल्यानंतर नष्ट होतात व पुनर्वापारसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यांना ‘नवीकरण अयोग्य’ उर्जा स्त्रोत म्हणतात. उदा. लाकूड, गोवर्याअ, लकडी कोळसा, दगडी कोळसा, केरोसीन, गॅस, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायु इंधने या प्रकारात मोडतात.

ज्या ऊर्जास्त्रोताचे त्यांच्या अंगभूत क्षमतेने नवीकरण होते आणि चक्रीय क्रमाने थोडया कलावधीत ज्यांचे पुनरुत्पादन होऊ शकते अशा ऊर्जा स्त्रोतांना नवीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात. उदा. पवन ऊर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, भूगर्भ औष्मिक ऊर्जा, वाहत्या पाण्यापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा, जैविक वस्तूसंचय ऊर्जा हे नवीकरणक्षम ऊर्जा स्त्रोत आहे.

पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील गुरुत्वाकर्षनामुळे लाटांची निर्मिती होते.

काही विशिष्ट परिस्थितीत भूगर्भाच्या अंतर्गत भागातील उष्णता ऊर्जेचा स्त्रोत होऊ शकते या उर्जेस भूगर्भ-औष्मिक उर्जा असे म्हणतात. 

वितळणार्या् खडकांना मॅग्मा असे म्हणतात.

दार्जिलिंग मध्ये १८९७ साली उभारलेले व १३० केव्ही वीज देणारे विधुत संयंत्र हे भारतातील पहिले जलविधुत केंद्र आहे.


सूर्याचा अंतर्भागातील अनिशय तप्त असून तेथील तापमान सुमारे २×१०७ ०C इतके असते. अंतर्भागातील तापमानामुळे हायड्रोजन केंद्राकचे तेहे सतत हेलियम केंद्रात एकत्रीकरण होत असते. या प्रक्रियेला केन्द्रकिय सम्मीलन प्रक्रिया असे म्हणतात.

सूर्यापासून पृथ्वीला 1.8 × 1011 mw इतकी उर्जा मिळते

सौर कुकर सौर बंब, सौर शुष्कक, सौरपंप आणि सौर घट  यांना और उर्जा उपकरणे असे म्हणतात.

भांडयाचा बाहयपृष्ठभाग काळ्या रंगाने रंगविला जातो. सौर कुकरच्या अंतर्भागात 1000 से. ते 1400 से इकडे तापमान वाढू शकते.

आधुनिक सौर घट सिलिकॉनपासून बनविलेले असतात.

नैसर्गिकरित्या आढळानार्यान युरेनियमची तीन समस्थनिके आहेत. 234U,235U, 238U यापैकी युरेनियम -238 हे ९९% पेक्षा जास्त प्रमाणात आढळते.

भारतामध्ये जलद प्रजनक क्रियाधानी (fast breeder reactor) कल्पक्कम येथे उभारली आहे.


केंद्रकीय एकत्रीकरण (Nuclear fusion) प्रक्रियेत दोन लहान केंद्रकाच्या एकत्रीकरणामुळे ऊर्जा निर्माण होते.

निसर्गात: समुद्राच्या पाण्यात ड्युटेरॉन सापडते. समुद्राच्या एक घनमीटर पाण्यातील सर्व ड्युटेरॉन एकत्र झाले तर 12 x 109 k. Joule एवढी ऊर्जा  तयार होते.

जैविक रूपांतर प्रक्रियेत आंबवणे या प्रक्रियेचा समावेश होतो. याला किन्वन असेही म्हणतात.

प्रणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थाचे विनोक्सिश्वसन करणारे सूक्ष्मजीव पाण्याच्या सानिध्यात सहज विघटन घडवून आणतात व वायूंचे मिश्रण तयार  होते. त्या वायूस जैवायू असे म्हणतात.

जैववायुमध्ये मिथेन, कार्बनडायॉक्साईड, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाईड यांचे मिश्रण असते.

जैववायुमध्ये मिथेनचे प्रमाण 80% असल्याने ते एक उत्तम इंधन असून धूर न करता जळते.

इथेनॉल, जैवडिझेल, जैवायू यांचा जैव इंधनामध्ये समावेश होतो.

बायोडिझेल सोयाबीन व मका यांच्या बियांपासून बनविले जाते. भारतामध्ये जाथ्रोफा (वन एरंड). करंजा व नागचंपा या वनस्पतींच्या बियांपासून मिळविलेल्या तेलाचा बायोडिझेल निर्मितीसाठी उपयोग होतो.

कोळसा, पेट्रोलियम नैसर्गिक वायू हि जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत.

नैसर्गिक वायूंमध्ये मुख्यत: मिथेन वायू आढळतो.

लाकडामध्ये सेल्युलोज (C6H10O5)n हा मुख्य घटक आहे.

कार्बन उपलब्धतेच्या चढत्या श्रेणीनुसार पीट, लीग्राईट, बीट्यूमिनस, अॅन्थ्रेसाईट हे कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत.

गॅसोलीन, केरोसीन, डिझेल, फ्यूएल ऑइल इ. द्रव इंधनाचे प्रमुख प्रकार आहेत.

कृत्रिम वायु इंधनामध्ये कोल गॅस, ऑइल गॅस, पेट्रोल गॅस, वॉटर गॅस आणि प्रोड्यूसर गॅस यांचा समावेश होतो.

प्रोड्यूसर गॅस कार्बनमोनक्साईड (३०%) नायट्रोजन (६०%) व अन्य वायू (१०%) यांचे मिश्रण असते.

इंधनाचे कॅलरीमूल्य व प्रज्वलनांक हे दोन वैशिष्टपूर्ण गुणधर्म आहेत.

हायड्रोजनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे. हायड्रोकार्बनपैकी मिथेनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे.

लाकूड हे कार्बोहायड्रेटचे जटिल संयुग आहे.

एल.पी.जी. मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन्ही द्रवरूप स्वरुपात असतात.

कार्य करण्यासाठी साठविलेली क्षमता म्हणजे ऊर्जा होय.

एखादी वस्तु तिच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा संरूपणामुळे कार्य करू शकते, तेव्हा तिच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे असे म्हंटले जाते.

गुरुत्व स्थितीज ऊर्जा आणि प्रत्यास्थी स्थितीज ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेची दोन  रुपे आहत.

एखाधा चल वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा म्हणजेच गतीज ऊर्जा होय.

ही गतीज ऊर्जा KE = ½ mv2 या सूत्राणे दर्शवितात.

SI पद्धतीत ऊर्जेचे एकक न्यूटन मिटर आहे. याला ज्युल असे म्हटले जाते.

CGS पद्धतीत डाईन सेमी म्हणजेच अर्ग हे एकक वापरतात.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 [प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर

२] २८०-३१५ nm 

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच 

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स 

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ 

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे 

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

उत्तर

१] म.गो.रानडे 

४] मुकुंदराव पाटील


---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ

अभयारण्य/राष्ट्रीय उद्यान व जिल्हे ..


🔰 अबाबरवा अभयारण्य : बुलढाणा

🔰 अधारी अभयारण्य : चंद्रपूर

🔰 अनेर डॅम अभयारण्य : धुळे

🔰 भामरागड अभयारण्य : गडचिरोली

🔰 भीमाशंकर अभयारण्य : पुणे-ठाणे

🔰 बोर अभयारण्य : वर्धा-नागपूर

🔰 चपराळा अभयारण्य : गडचिरोली

🔰 दऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य : अहमदनगर

🔰 जञानगंगा अभयारण्य : बुलढाणा

🔰 गगामल राष्ट्रीय उद्यान : अमरावती

🔰 जायकवाडी पक्षी अभयारण्य : औ'बाद-नगर

🔰 कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : अ'नगर

🔰 कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य : अकोला

🔰 कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य : रायगड

🔰 काटेपूर्णा अभयारण्य : अकोला

🔰 कोयना अभयारण्य : सातारा

🔰 लोणार अभयारण्य : बुलढाणा

🔰 मालवण सागरी अभयारण्य : सिंधुदुर्ग

🔰 मयुरेश्वर सुपे अभयारण्य : पुणे

🔰 मळघाट अभयारण्य : अमरावती

🔰 नायगाव मयूर अभयारण्य : बीड

🔰 नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य : नाशिक

🔰 नरनाळा अभयारण्य : अकोला

🔰 नवेगाव राष्ट्रीय उद्यान : गोंदिया .


🔰 नागझिरा अभयारण्य : भंडारा-गोंदिया

🔰 पनगंगा अभयारण्य : यवतमाळ-नांदेड

🔰 पच राष्ट्रीय उद्यान : नागपूर

🔰 फणसाड अभयारण्य : रायगड 

🔰 राधानगरी अभयारण्य : कोल्हापूर

🔰 सागरेश्वर अभयारण्य : सांगली 

🔰 सजय गांधी राष्ट्रीय उद्यान : मुंबई( ठाणे)

🔰 ताडोबा राष्ट्रीय उद्यान : चंद्रपूर

🔰 तानसा अभयारण्य : ठाणे 

🔰 टिपेश्वर अभयारण्य : यवतमाळ 

🔰 तगारेश्वर अभयारण्य : ठाणे 

🔰 वान अभयारण्य : अमरावती 

🔰 यावल अभयारण्य : जळगाव 

🔰 ऐडशी रामलिंगघाट अभयारण्य : उस्मानाबाद 

🔰 मानसिंगदेव अभयारण्य : नागपूर 

🔰 नवीन नागझिरा अभयारण्य : गोंदिया-भंडारा 

🔰 नवेगाव अभयारण्य : गोंदिया 

🔰 नवीन बोर अभयारण्य : नागपूर 🔰 नवीन माळढोक पक्षी अभयारण्य : उस्मानाबाद 

🔰 भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र : नाशिक

🔰 उमरेड करांडला अभयारण्य :  नागपूर-भंडारा 

🔰 कोलामार्का संवर्धन राखीव : गडचिरोली

🔰 ताम्हिनी अभयारण्य : पुणे-रायगड 

🔰 कोका अभयारण्य : भंडारा

🔰 मक्ताई भवानी अभयारण्य : जळगाव 

🔰 नयू बोर विस्तारित अभयारण्य : वर्धा 

🔰 मामडापूर संवर्धन राखीव : नाशिक

🔰 पराणहिता अभयारण्य : गडचिरोली 

🔰 सधागड अभयारण्य : रायगड-पुणे 

🔰 ईसापूर अभयारण्य : यवतमाळ-हिंगोली .

सामान्य ज्ञान


गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.


गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.


गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.


गोविंद – बुटक्या तांदळाची जात.


ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.


ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.


ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.


ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.


ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.


ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.


घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.


घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.


घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.


घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.


घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.


चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.


चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.


चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.


Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...