▪️ 1 पंचवर्षीय योजना (1951-56) - कृषि की प्राथमिकता।
▪️ 2 पंचवर्षीय योजना (1956-61) - उद्योग क्षेत्र की प्राथमिकता।
▪️ 3 पंचवर्षीय योजना (1961-66) - कृषि और उद्योग।
▪️ 4 पंचवर्षीय योजना (1969-74) - न्याय के साथ गरीबी के विकास को हटाया।
▪️ 5 वीं पंचवर्षीय योजना (1974-79) - गरीबी और आत्म निर्भरता को हटाया।
▪️ 6 पंचवर्षीय योजना (1980-85) - पाँचवीं योजना के रूप में ही जोर दिया।
▪️ 7 वीं पंचवर्षीय योजना (1985-90) - फूड प्रोडक्शन, रोजगार, उत्पादकता
▪️ 8 वीं पंचवर्षीय योजना (1992-97) - रोजगार सृजन, जनसंख्या का नियंत्रण।
▪️ 9 वीं पंचवर्षीय योजना (1997-02) -7 प्रतिशत की विकास दर.
▪️ 10 वीं पंचवर्षीय योजना (2002-07) - स्व रोजगार और संसाधनों का विकास।
▪️ 11 वीं पंचवर्षीय योजना (2007-12) - व्यापक और तेजी से विकास।
▪️ 12 वीं पंचवर्षीय योजना (2012-17) -स्वास्थ्य, शिक्षा और स्वच्छता (समग्र विकास) का सुधार।
Friday, 31 December 2021
पंचवर्षीय योजनाओं में प्राथमिकता के प्रमुख क्षेत्र
Thursday, 30 December 2021
बाबर
मुघल सत्तेचा संस्थापक बाबर होय
🍀 मुघल साम्राज्य हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली.
🌷 पुढे बाबराने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले.पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले. नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मूलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला.
🍀 इ.. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते.
🌷 १७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १८५८ साली ब्रिटिशांनी मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃
🌺 बाबर 🌺
🍀 जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील (वर्तमानकालीन उझबेकिस्तानात) आंदिजान शहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा होते.
🌷 उमरशेख मिर्झा पराक्रमी तुर्क सम्राट तैमूरलंग याचा पाचवा वारस होता.
🌷 बाबराच्या आईचे नाव कुल्लघ निगार खानुम होते. बाबरची आई ही मंगोलियन सम्राट चंगीझ खान याच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे शासक होते.
🍀 बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबराला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते . किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.
🌷🌷🌷🍃🍃🍃🍃🌷🌷🌷🌷🍃🍃🍃
जहांगीर : (३० ऑगस्ट १५६९–२८ ऑक्टोबर १६२७).
सुरुवातीस त्याने आपला वडील मुलगा खुसरौ (खुस्रव) याचे बंड मोडून काढले व त्यास साह्य करणारा शीख गुरू अर्जुनसिंग यास छळ करून ठार मारले.
१६११ साली त्याने शेर अफगनला ठार करून त्याची सौंदर्यसंपन्न स्त्री नूरजहान हिच्याशी विवाह केला. त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर फार झाला.
त्याने बंगालमधील बंडखोर अफगाणांना (१६१२) व मेवाडचा राणा अमरसिंह (१६१४) यांना शरण आणले.
त्याच साली अहमदनगर व १६१६ मध्ये कांग्डाचा अजिंक्य किल्ला ही ठिकाणे जिंकली. मात्र कंदाहार १६२२ मध्ये त्यास गमवावे लागले.
याच सुमारास राजपुत्र खुर्रमने केलेले बंड महाबतखानाच्या साहाय्याने त्याने मोडून काढले, पण १६२४ मधील भातवडीच्या लढाईत मलिकंबरने मोगल व विजापुरकर यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला.
पुढे महाबतखानाने स्वतःच बंड करून जहांगीरला कैद केले. नूरजहानने धैर्याने व युक्तीने हे बंड मोडून जहांगीरला सोडविले.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
🔺 मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५)
🔺 हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात.
🔺 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर चा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात.
🔺 राजकारणाला आध्यात्मिकरणाचा विचार त्यांनी मांडला. एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात.
🔺 भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्त्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली.
🔺 महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले.
🍃🍃🍃🌸🍃🍃🍃🌸🍃🍃🍃🌸🍃🍃🍃
गोपाळ कृष्ण गोखले : बालपण
रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील बंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या पत्नीने स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे गोपाळ कृष्ण गोखल्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले.
🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🌷
गोपाळ कृष्ण गोखले : शिक्षण
🔺 १८८४ मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी १८८५ मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
🔺 पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले
🍀 शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक कार्यांत त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.
🍀🍀🍀🍀🔺🍀🍀🍀🍀🔺🍀🍀🍀🍀🔺
राजकीय प्रवास : गोपाळ कृष्ण गोखले
🍀 बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला.
🌷 त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.
🍀 इ.स. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली, आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले.
🌷 इ.स. १८८९ मध्ये कॉंग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा कॉंग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले.
🍀 कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. १९०५ सालच्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. कॉंग्रेसचे कार्य त्यांनी भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Societyची) स्थापना केली.
🌷 मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते
🍀 त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले.
🌷 न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत
🍀 भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत.
🌷 गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत.
🍀 राजकारणाचे अध्यात्मीकरण ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले.
🌷 संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी निधन झाले.
🍀 गोपाळ कृष्ण गोखले यांचे 'अंकगणित' हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात असे . हे पुस्तक अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले होते. ज्यांनी गोखल्यांच्या अंकगणितातली गणिते सोडवली त्याला कुठलेही गणित अवघड वाटणार नाही असी मान्यता होती.
चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य
मौर्य साम्राज्याची स्थापना साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्य या तक्षशिला येथील त्याच्या शिक्षकाच्या मदतीने केली.
आख्यायिकांनुसार, चाणक्य मगध प्रांतात गेला.
मगधामध्ये नंद घराण्यातील धनानंद हा जुलमी राजा राज्य करीत होता. त्याने चाणक्याला अपमानित केले. सूड घेण्याच्या निर्धाराने चाणक्याने ही जुलमी सत्ता मोडून काढण्याची प्रतिज्ञा केली.
दरम्यान, अलेक्झांडर या ग्रीक सम्राटाने बियास नदी ओलांडून भारतावर स्वारी केली होती. अलेक्झांडर बॅबिलोनला परत गेला तिथेच त्याचा इ.स.पू. ३२३ साली मृत्यू झाला.
त्यानंतर त्याच्या साम्राज्यात फूट पडली व त्याच्या क्षत्रपांनी (प्रांतशासक) आपापली अनेक वेगवेगळी विखुरलेली राज्ये तयार केली.
खुदाई खिदमतगार
🍀 खान अब्दुल गफारखान यांना आझाद आणि धर्मनिरपेक्ष असा भारत देश पाहिजे होता, हे लक्ष पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९२९ मध्ये ' १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती.
🍀 ही संघटना "सुर्ख पोश" या नावाने देखील ओळखली जात होती.' नावाची संघटना उभारली होती.
ही संघटना "सुर्ख पोश" या नावाने देखील ओळखली जात होती.
🍀 खुदाई खिदमतगारची स्थापना महात्मा गॉंधींचा अहिंसा आणि सत्याग्रह सारख्या सिद्धांतावरून प्रेरित होऊन केली गेली होती. ह्या संघटनेमध्ये साधारणतः १,००,००० सदस्य सामील झाले. आणि त्यांनी शांततापूर्वक इंग्रज पुलिसांचा विरोध केला.
हडप्पा संस्कृतीची नगररचना
🍀 हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते.
🍀 प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती. असे कोणतेही पुरावे मिळाले नाही.
🍃🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃
मोहेंजोदडो
🍀 मोहेंजोदडो(मृतांचा डाेंगर)' हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील गाव आहे.
🍀 येथे केल्या गेलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एकावरएक ७ गावांचे थर आढळले आहेत.
🍀 मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे.
🍀 याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. या खोल्यांजवळ एक विहिरही होती.
🍀 या स्नानगृहात वापरलेले सांडपाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. याच्या भिंती जलरोघक बनवलेल्या होत्या.
🍃🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃
MPSC विरु्द्ध सोशल मीडियावर लिहाल तर परीक्षेला बसू देणार नाही, आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांचा संताप
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराबाबत असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात कारवाईचा बडगा आयोगाकडून उगारण्यात आला आहे. आयोगाच्या कार्यशैलीबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल असा इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवल्या जात असलेल्या भरती प्रक्रियांबाबत अनेकदा प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे आणि सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांकडून चुकीच्या भाषेचा वापर करण्यात येत असल्याचे असे आयोगाचे म्हणणे आहे. अशा भाषेमुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला बाधा येत असून अशा उमेदवारांविरूद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. तसेच आयोगाच्या स्वतःच्या अधिकारांचा वापर करून अशा उमेदवारांना परीक्षा देण्यापासून देखील वंचित ठेवण्यात येईल असं आयोगाने एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी देखील आयोगाने असभ्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना कारवाईचा इशारा दिला होता.
आयोगाच्या या भूमीकेवर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत असून विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत.
एमपीएससीच्या या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे स्वप्नील नावाच्या एका परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. वेळेवर परीक्षा न घेणे, एकच एमपीएससी सदस्य नियुक्त असल्यामुळे विविध परीक्षांच्या वेळेवर मुलाखती न होणे, यूपीएससीच्या धर्तीवर अनुकरण आणि आधुनिकीकरण न करणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी नवीन पद्धतीचा अवलंब न करणे या गोष्टी कारणीभूत आहेत. एमपीएससी संविधानात्मक संस्था असून देखील राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराची शिकार होते .
यूपीएससीला जे जमतं ते एमपीएससीला का जमत नाही? वेगवेगळ्या डिफेन्सच्या परीक्षा होतात, त्या यंत्रणेला जमतं ते एमपीएससीला का जमत नाही? सरकार आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठपर्यंत खेळणार आहे? विधानसभेत सांगून सुद्धा जर वचनाची पूर्तता होत नसेल तर त्या नेत्यांवर हक्कभंग नका आणू नये? हे सगळे प्रश्न आता रात्रीचा दिवस करुन एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे मुलं विचारत आहेत.
Tuesday, 28 December 2021
आजार आणि त्याचे विषाणू
●गोवर (मिझल) : गोवर विषाणू
● इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) : Influenza virus (A,B,C)
● कावीळ : Antaro virus (A,B,C,D,E,G)
● पोलिओ : पोलिओ विषाणू
● जापनीज मेंदूज्वर : Arbo-virus
● रेबिज : लासा व्हायरस
● डेंग्यू : Arbo-virus
●चिकुनगुन्या : Arbo-virus
● अतिसार : Rata virus
●एड्स : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)
●देवी : Variola Virus
●कांजण्या : Varicella zoas
● सर्दी : सर्दीचे विषाणू
● गालफुगी : Paramixo virus
● जर्मन गोवर : Toza virus
आंतरराष्ट्रीय चर्चेतील ठिकाणे
१) गितेगा - 'बुरुंडी' देशाची नवी राजकीय राजधानी. 'बुजुम्बुरा' ही पूर्वीची राजधानी (सध्या आर्थिक राजधानी)
२) नुरसुलतान - कझाकिस्तानच्या राजधानीचे नवे नाव – पूर्वीचे नाव अस्ताना – नुरसुलतान हे तेथील पहिल्या राष्ट्रपतीचे नाव होते.
३) कॉलिमन्टन - इंडोनेशियाची नवी राजधानी (सध्याची जकार्ता) - जकार्ता येथे सध्या १ कोटी पेक्षा अधिक लोक राहतात. त्यामुळे वायू प्रदुषण, वाहतूक समस्येमूळे स्थलांतरित
४) प्युअर्टो विल्यम्स - जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर (चिली देशातील) - पूवीचे सर्वात दक्षिणेकडील शहर उशुआया (अर्जेंटिना)
५) नोत्र दाम कॅथेड्रल - फ्रान्समधील गौथिक शैलीची इमारत (आग लागल्याने नष्ट) -११६३ मध्ये सातवा लईच्या काळात बांधकाम सरु
६) मलहम - जगातील सर्वात मोठी मिठाची गुहा (लांबी १० किमी) - ईस्त्रालयच्या पर्वत रांगेमध्ये सापडली
७) समजियोन - उ.कोरिया मधील 'आधुनिक सभ्यतेचे प्रतीक' असलेले शहर - ३ डिसे २०१९ रोजी किम जोग उन च्या हस्ते उद्घाटन
८) बौगेनव्हिले - ब्रिटन व मॉरिशसचा या बेटावरुन बाद सुरु झाला. पापुआ न्यु गिनीपासून स्वतंत्र झाला.
९) चागोस बेट - ब्रिटन व मॉरिशसचा या बेटापासून वाद सुरु होता. संयुक्त राष्ट्रांनी हे बेट 'मॉरिशसला' परत करण्याचा ठराव मंजूर केला.
भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)
⚜️ बरेवी : तमिळनाडू
नाव दिले : मालदीव
⚜️ निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश
नाव दिले : इराण
⚜️ फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
नाव दिले : बांग्लादेश
⚜️ वायु : भारत , पाकिस्तान
नाव दिले : भारत
⚜️ हिक्का : गुजरात
नाव दिले : मालदीव
⚜️ महा : ओमान , श्रीलंका , भारत
नाव दिले : ओमान
⚜️ बलबुल : बांग्लादेश , भारत
नाव दिले : पाकिस्तान
⚜️ कयार : सोमालिया , भारत , येमन
नाव दिले : म्यानमार
⚜️ पवन : सोमालिया , भारत
नाव दिले : श्रीलंका
⚜️ अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
नाव दिले : थायलंड
⚜️ निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात
नाव दिले : बांग्लादेश .
केंद्र सरकारच्या समित्या
१. व्ही. के. सरस्वत:-
हायपरपूल तंत्रज्ञानाची तांत्रिक आणि व्यावसायिक व्यवहार्यता शोधण्यासाठी उच्च स्तरीय समिती
२. शशी हेम्प्ती:-
मुंबईत उघडकीस आलेल्या पार्श्वभूमीवर दुरचित्रवाणी गुणांक पद्धतीचा फेरआढावा घेणे
३. न्या. मदन बी लोकुर :-
पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये काडीकचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याच्या हेतूने उपाय सुचविणे
४. के. एन. दीक्षित :-
भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास यांचा भ्यास करण्यासाठीची उच्च समिती
५. राजीव महर्षी :-
कर्ज माफीचे आणि कोव्हीड-१९शीसंबधीत कर्जाच्या स्थगीतीवरील व्याजाचे आर्थिक परिणाम यांचे मोजमाप करणे
६. डॉ. प्रसन्न कुमार मोहंती :-
देशातील खासगी क्षेत्रातील बँकांचा प्रचलीत मालकी हक्क आणि त्यांची सरंचना यांचा आढावा घेण्यासाठी नेमलेला कार्यगट
७. डी. पी. सिंग:-
अधिकाधिक विद्यार्थीनी भारतात रहावे आणि त्यांचे उच्च शिक्षण चालू ठेवावे यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करणे
८. डॉ. व्ही. के. पाॅल:-
भारतसाठी कोणती कोरोना लस खरेदी करावी, तिचे वितरण कसे करावे यासाठी किती निधी लागेल याचा अभ्यास करणे
९. के. व्ही कामत :-
कोव्हीड;-१९ मुळे प्रभावीत झालेल्या कर्जाच्या पुर्नरचनेसाठी आर्थिक मापदंड ठरविणे
१०. व्ही. रामगोपाल राव:-
भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेची भूमिका आणि उत्तरदायीत्वाची पुनर व्याख्या तयार करणे
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा
१) मध्य प्रदेश (8)
- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक (7)
- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) तेलंगणा (4)
- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात (4)
- पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा नगर-हवेली (1)
- पालघर.
६) छत्तीसगड (2)
- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा (1)
- सिंधुदुर्ग.
चर्चित स्थळ
📌 हैदराबाद
4 फेब्रुवारी 2021 रोजी हैदराबाद या शहराला'ट्री सिटी ऑफ वर्ल्ड' म्हणून मान्यता देण्यात आली.
📌 राउरकेला
4 फेब्रुवारी, 2021 मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राउरकेला येथे भारतातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमची पायाभरणी केली. या स्टेडियममध्ये प्रेक्षकांची क्षमता 20,000 इतकी असेल. प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या नावाने या स्टेडियमचे नाव देण्यात येणार आहे.
📌 भिंड
मध्य प्रदेशातील भिंड येथील पोलिस मुख्यालयात दरोडेखोरावरती एक अद्वितीय संग्रहालय स्थापित केले जाणार आहे. या संग्रहालयात फुलन देवी आणि निर्भय गुर्जर या सारख्या दरोडेखोराच्या वस्तूंसह अनेक अनोख्या वस्तू प्रदर्शित केल्या जाणार आहे.
📌 ओडिशा
8 फेब्रुवारी 2021 रोजी ओडिशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने भुवनेश्वरमध्ये कोविड -१ वॉरियर मेमोरियल स्थापन करण्याची घोषणा केली.
📌 अंदमान आणि निकोबार
अंदमान आणि निकोबार बेटांवर कोविड १९ च्या सक्रिय प्रकरणांची संख्या फेब्रुवारी २०२१ मध्ये शून्य झाल्यामुळे हा देशाचा पहिला कोरोना मुक्त केंद्र शासित प्रदेश ठरला.
📌 लेह
29 डिसेंबर, 2020 रोजी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लेह येथील हवामान केंद्राचे उद्घाटन केले.
3500 मीटर उंचीवर असलेले हे हवामान केंद्र देशातील सर्वात उंच हवामान केंद्र असणार आहे .
📌 लक्षद्वीप
डिसेंबर २०२० मध्ये कृषी मंत्रालयाने केंद्र लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाला ला सेंद्रिय शेती म्हणून घोषित केले. २०१६ मध्ये सिक्किम राज्याला हा दर्जा मिळाण्यापूर्वी, 100 टक्के सेंद्रिय क्षेत्राचा दर्जा मिळविणारा हा भारतातील पहिला केंद्र शासित प्रदेश आहे
📌 दिल्ली
भारताचे पहिले सार्वजनिक ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग प्लाझा नवी दिल्ली येथे स्थापन.
📌 चीन
16 एप्रिल 2020 रोजी चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगझूशहरामध्ये १० लाख जागांच्या क्षमतेसह जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियमचे बांधकाम सुरू
📌 मेरठ
देशातील पहिलेच प्राणी युद्ध स्मारक बांधले जात आहे.
📌 झरिया
ग्रीन पीस इंडियाच्या अहवालानुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर
📌 कुशीनगर
देवरियाचे खासदार डॉ. रामपाठी राम त्रिपाठी यांनी भारताच्या पहिल्या तृतीयपंथी साठी प्राथमिक मध्यवर्ती विद्यापीठाची पायाभरणी केली.
जगातील विविध निर्देशांक/अहवाल
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
१) मानव विकास निर्देशांक २०२०:-
प्रथम क्रमांक :- नॉर्वे
भारतचा क्रमांक :- १३१
२) भ्रष्टाचार निर्देशांक २०१९:-
प्रथम क्रमांक :- न्युझीलंड डेन्मार्क
भारतचा क्रमांक :- ८०
३) सर्वसमावेशक इंटरनेट अहवाल २०२० :-
प्रथम क्रमांक :- स्विडन
भारतचा क्रमांक :- ४६
४) जागतिक लोकशाही निर्देशांक २०१९:-
प्रथम क्रमांक :- नॉर्वे
भारतचा क्रमांक :- ५१
५) जागतिक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- स्वित्झर्लंड
भारतचा क्रमांक :- ७२
६) जागतिक लौगिंक असमानता निर्देशांक २०२० :-
प्रथम क्रमांक :- आईसलॅड
भारतचा क्रमांक :- ११२
७) जागतिक स्पर्धात्मता निर्देशांक २०१९:-
प्रथम क्रमांक :- सिंगापूर
भारतचा क्रमांक :- ६८
८) जागतिक उपासमार निर्देशांक २०२० :-
प्रथम क्रमांक :- १७ देश प्रथमस्थानी (शेवटचा देश :- छाद)
भारतचा क्रमांक :- ९४
९) इझी ऑफ डोइंग २०२० :-
प्रथम क्रमांक :- न्युजीलंड
भारतचा क्रमांक :- ६३
१०) मानवी भांडवल निर्देशांक२०२० :-
प्रथम क्रमांक :- सिंगापूर
भारतचा क्रमांक :- ११६
११) हेन्त्री पारपत्र निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- न्युझीलंड
भारतचा क्रमांक :- ८४
१२) SDG लौंगिक समानता निर्देशांक २०१९
प्रथम क्रमांक :- डेन्मार्क
भारतचा क्रमांक :- ९५
१३) जागतिक उर्जा निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- स्वीडन
भारतचा क्रमांक :- ७४
१४) जागतिक नाविन्यता नवोन्मेष निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- स्वित्झर्लंड
भारतचा क्रमांक :-४८
१५) जागतिक आनंद अहवाल २०२०
प्रथम क्रमांक :- फिनलंड
भारतचा क्रमांक :- १४४
१६) जागतिक शांतता निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- आईसलॅड
भारतचा क्रमांक :- १३९
१७) जागतिक स्वातंत्र निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- सिंगापूर
भारतचा क्रमांक :- १२०
१८) आंतराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक २०२० :-
प्रथम क्रमांक :- अमेरिका
भारतचा क्रमांक :- ४०
१९) शाश्वत विकास निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- स्वीडन
भारतचा क्रमांक :- ११७
२०) जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- नॉर्वे
भारतचा क्रमांक :- १४२
२१) उर्जा संक्रमण निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- स्वीडन
भारतचा क्रमांक :- ७४
२२) जागतिक प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक २०१९:-
प्रथम क्रमांक :-स्पेन
भारतचा क्रमांक :- ३४
२३) सुरक्षित शहरे निर्देशांक २०१९:-
प्रथम क्रमांक :- टोकीयो
भारतचा क्रमांक :- ६० शहरांत भारतातील मुंबई व नवी दिल्ली ही दोन शहरे
२४) जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :-अफगणिस्थान
भारतचा क्रमांक :- ८
२५) हवामान बदल कामगिरी निर्देशांक २०२०:-
प्रथम क्रमांक :- पहिले ३ क्रमांक रिक्त ४ था स्वीडन
भारतचा क्रमांक :- १०
२६) हवामान कामगिरी निर्देशांक २०२०
प्रथम क्रमांक :- डेन्मार्क
भारतचा क्रमांक :- १६८
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
🔸अमरावती जिल्हा:
ऊर्ध्व वर्धा धरण
🔸अहमदनगर जिल्हा :
आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)
🔸 औरंगाबाद जिल्हा :
गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे
🔸 उस्मानाबाद जिल्हा :
तेरणा धरण
🔸 कोल्हापूर जिल्हा :
रंकाळा तलाव
🔸 गडचिरोली जिल्हा :
दिना
🔸 गोंदिया जिल्हा :
इटियाडोह
🔸चंद्रपूर जिल्हा :
पेंच आसोलामेंढा
🔸जळगाव जिल्हा :
अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)
🔸 ठाणे जिल्हा :
भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे
🔸धुळे जिल्हा :
अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव
🔸 नंदुरबार जिल्हा :
यशवंत तलाव,
🔸 नागपूर जिल्हा :
उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.
🔸 नांदेड जिल्हा :
इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण
🔸नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण
🔸 परभणी जिल्हा :
कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण
🔸 पुणे जिल्हा :
आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)
🔸 बुलढाणा जिल्हा :
खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी
🔸 बीड जिल्हा :
माजलगाव धरण,मांजरा धरण
🔸 भंडारा जिल्हा :
इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप
🔸मुंबई जिल्हा :
मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी
🔸 यवतमाळ जिल्हा:
पूस ,अरुणावती ,बेंबळा
🔸 वर्धा जिल्हा :
ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)
🔸 सातारा जिल्हा :
उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)
🔸 सिंधुदुर्ग जिल्हा :
तिलारी धरण,देवधर धरण
🔸 सोलापूर जिल्हा :
आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)
🔸 हिंगोली जिल्हा :
येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.
ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार
⚜️ मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
⚜️ तयांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
⚜️१५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.
⚜️ दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो.
⚜️ दशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो.
⚜️ याआधी १९९३ मध्ये विजय तेंडुलकर व २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता.
⚜️ १९९१ मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
⚜️ शरणकुमार लिंबाळे यांची ४० पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच, अक्करमाशी हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले.
राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या
▪️371 :- महाराष्ट्र
👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.
▪️371 :- गुजरात
👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.
▪️371(A) :- नागालँड
13 (घटनादुरुस्ती ) 1962
👉 नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.
▪️371(B) :- आसाम
(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).
👉 आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.
▪️371(B) :- :-मणिपूर
(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)
👉 राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.
▪️371(F) :- सिक्कीम
(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)
👉 शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.
▪️371(H) :-अरुणाचल प्रदेश
(55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)
👉 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.
▪️371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी
▪️371(G) :- मिझोरमसाठी
👉 (53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)
▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी
👉 (56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)
▪️371(j) :-कर्नाटक - हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.
👉 (98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट).
महत्वाच्या आदिवासी जमाती.
1) आसाम- गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर
2) गुजरात- भिल्ल
3) झारखंड- गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुखत्रिपुराचकमा, लुसाई
4) उत्तरांचल-
भुतिया
5) केरळ- मोपला, उरली
6) छत्तीसगड-
कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब
7) नागालँड-
नागा, खासी, गारो, आओ, अंगामी
8) आंध्र प्रदेश - कोळम, चेंचू
9) पश्चिम बंगाल -संथाल, ओरान
10) महाराष्ट्र-
भिल्ल, गोंड, वारली
11) मेघालय-
गारो, खासी, जैतिया
12) सिक्कीम -लेपचा
13) तामिळनाडू- तोडा, कोट, बदगा
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
- डेक्कन रयत समाज, मराठा राष्ट्रीय संघ, ऑल इंडिया मराठा लीग. 🌼 डक्कन रयत समाज १) ऑगस्ट 1916 मध्ये महाराष्ट्रात डेक्कन रयत समाज नावाची...
-
◾️ स्पष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात ◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात ◾️या पेशीतील क...