Saturday 16 March 2024

चालू घडामोडी :- 16 मार्च 2024

◆ किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावाची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

◆ 'राष्ट्रीय लसीकरण दिन' दरवर्षी 16 मार्च रोजी साजरा केला जातो.

◆ 16 मार्च 1955 पासून राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात येतो आहे.

◆ ‘मोहम्मद मुस्तफा’ पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान झाले आहेत.

◆ गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा कायदा, 2019 अंतर्गत अर्ज करण्यासाठी ‘CAA-2019’ मोबाइल ॲप लाँच केले आहे.

◆ पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत 'पर्यायी ऑटो फ्युएल इथेनॉल 100' लाँच केले आहे.

◆ मीडिया फाउंडेशनने स्वतंत्र पत्रकार ग्रिष्मा कुठार आणि इंडियन एक्स्प्रेसची रितिका चोप्रा यांना 2024 साठी 'चमेली देवी जैन पत्रकारिता पुरस्कार' देऊन संयुक्तपणे सन्मानित केले आहे.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) 'स्पेशल डिजिटल केस मॅनेजमेंट सिस्टम' (CCMS) चे उद्घाटन केले.

◆ राजस्थान सरकारने बाजरीच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बाजरी आणि भरड धान्याचे मोफत बियाणे वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ भारत सरकारने ‘फिनटेक इको सिस्टीम’ मजबूत करण्यासाठी आशियाई विकास बँकेसोबत (ADB) कर्जसाठी करार केला आहे.

◆ ‘बी साईराम’ यांची NCL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज 'मॅथ्यू वेड' याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

◆ देशभर सात टप्प्यांत 18 व्या लोकसभेसाठी मतदान होणार आहेत.

◆ 18 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच टप्प्यांत महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान होणार आहे.

◆ समाजसेवेतील अमूल्य योगदानासाठी रतन टाटांचा पी. व्ही नरसिंह राव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये



◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले


◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन


◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️सवामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता


◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम


◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह


◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.


◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.


◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष


◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन


◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय


◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी


◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर


◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार


◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.


◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु


◾️करांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.


◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.


◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.


◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे


◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.


◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही.
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक


◾️इग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक


◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना


◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स


लोकमान्य बाळ गंगाधर :-


🔸भारतीय असंतोषाचे जनक

 (व्हॅलेंटाईन चिरोल द्वारे उपमा)

🔸भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार...

🔸तल्या तांबोळ्यांचे पुढारी...

🔸महाराष्ट्र केसरी-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती...

🔸1 जानेवारी 1880 रोजी 'न्यू इंग्लिश स्कूल,पुणे' ची स्थापना संस्थापक-टिळक,आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर...

🔸 कसरी व मराठा वृत्तपञांची सुरुवात

2Jan1881-मराठा(इं):-संपादक-टिळक

4Jan1881-केसरी(म):-संपादक-आगरकर

🔸जलै 1882-कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक व आगरकर 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगात कैद...

🔸24 ऑक्टोबर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना (टिळक व आगरकर)...

🔸दादाजी विरुद्ध पत्नी रखमाबाई प्रकरण...

🔸महाविद्यालयीन मित्र असणाऱ्या टिळक व आगरकर यांच्यात 'आधी सामाजिक की राजकीय सुधारणा' यावरून वितुष्ट...

🔸1893-मुस्लिमांच्या मोहर्रम सणावरून प्रेरणा घेत सार्वजनिक गणेश उत्सव सुरुवात...

🔸1895-सार्व. शिवजयंती उत्सव सुरुवात...

🔸1896-97 मधील साराबंदी मोहिम...

🔸1897-चाफेकर बंधूंनी केलेल्या प्लेग कमिशनर रँड हत्तेच्या समर्थनात केलेल्या लिखनाबद्दल दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

🔸1901-'आर्टिक होम इन वेदाज' ग्रंथ...

🔸1901 ते 1904 -ताई महाराज प्रकरण...

🔸1905-बंगालच्या फाळणीनंतर जहालवादाचा जोरदार पुरस्कार...

🔸''स्वदेशी,स्वराज्य,राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार'' या चतु:सुञीचा पुरस्कार...

🔸किंग्जफोर्ड प्रकरणानंतर केसरीत ''देशाचे दुर्दैव" या अग्रलेखा मुळे 6 वर्षे मंडाले येथे काळ्या पाण्याची शिक्षा...

🔸 1911-मंडालेच्या तुरुंगात 'गीतारहस्य' ग्रंथ पूर्ण..

🔸28 एप्रिल 1916-टिळकप्रणित होमरूल लीगची स्थापना...

🔸1916-टिळकांच्या मध्यस्थीने मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यात येथे होऊन लखनौ अधिवेशन संपन्न...

🔸डिसेंबर 1916- बेळगाव येथे होमरूल लीगच्या प्रचारादरम्यान "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच" ही घोषणा...

🔸मार्च 1918- मुंबईतील अस्पृश्यता निवारण परिषदेत भाषण-"जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही"...

🔸जानेवारी 1919- व्हॅलेंटाईन चिरोल विरोधात अब्रुनुकसानीचा खटला...

🔸1919 च्या माँटेग्यू-चेम्सफर्ड कायद्यावर 'हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे','उजाडले पण सूर्य कोठे आहे','दिल्ली तो बहुत दूर आहे' अशा शब्दात लोकमान्यांची टीका...

🔸1920-गांधीजी व टिळकांची सिंहगडावर भेट...

 🔸फब्रुवारी 1920 टिळकांचा काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष...

🔸1 ऑगस्ट 1920-टिळकांचे मुंबई येथे निधन...


👉टिळकांविषयी शब्दगौरव:-

🔸"असे महापुरुष मरत नसतात.त्यांच्या कार्याच्या रुपाने ते अमर झालेले असतात"- महात्मा गांधी...

🔸"राष्ट्रीय चळवळीचा मनू"-न.र.फाटक...

 🔸"लोकमान्य" ही पदवी तसेच "टिळक हे भारतीय नेपोलियनच"-शिवराम परांजपे

🔸"टिळक म्हणजे सूर्याचे पिल्लू"-केरूनाना छत्रे (टिळकांचे शिक्षक).

टिळक युगातील महत्वाच्या घटना :

1. प्लेगची साथ व टिळकांना झालेली अटक :

सन 1896 ते 1899 या काळात पुण्यात ब्युबानिक प्लेगची भयंकर साथ आली होती.

शासनाने प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता रॅंड या इंग्रज अधिकार्‍याची नियुक्ती केली.

रॅंडने उपाय योजनेच्या नावाखाली जनतेवर आतोनात अत्याचार केले. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅंड व आयर्स्ट यांचा गोळ्या घालून वध केला.

ब्रिटिश शासनाने टिळकांचा रॅंडच्या खुनाशी संबंध जोडून त्यांना अटक केली.

न्यायालयाने टिळकांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली.

भारतीय जनतेने टिळकांच्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारत बंद पाळला. हा भारतीय जनतेने पाळलेला पहिला बंद होय.


2. बंगालची फाळणी (1905) :

लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.

बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले.

बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.

आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली.

टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.

सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.


3. टिळकांना शिक्षा :

ब्रिटिश सरकारच्या विरोधात केसरीमध्ये जनतेच्या भावना भडकविणारे लेखन केल्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला व त्यांना 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावून मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले.


4. होमरूल लीग चळवळ :

डॉ. अॅनी. बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.

थिऑसॉफीकल सोसायटीच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली.

सन 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आले.

लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरू केली.

बॅरिस्टर जोसेफ बाप्टिस्टा हे या चळवळीचे अध्यक्ष होते. न.ची. केळकर हे सचिव होते.


5. टिळकांचे निधन :

लोकमान्य टिळकांनी. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याचा स्विकार करण्याच्या उद्देशाने प्रतीयोगिता सहकारिता हे धोरण जाहीर केले. ॰

या कायद्यानुसार घेण्यात येणार्‍या निवदणुकीत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती.

एप्रिल 1920 मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.

भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर गांधी युगाचा उदय झाला.

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947



- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपविली जाईल असे २० फेब्रुवारी, १९४७ रोजी घोषित केले.
- माउंटबॅटन योजना: 3 जून 1947 भारताचा व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याने फाळणीची योजना सादर केली. योजना काँग्रेस व मुस्लिम लीम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (१९४७ संमत करून योजना लगेच अमलात आणली गेली.

- भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट, १९४७ पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले.
- भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला.
- व्हाइसरॉय हे पद रद्द करण्यात आले
- आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभाना देण्यात आले.
- नवीन राज्यघटना तयार करून अमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचे अधिकार दोनी देशांच्या सविधान सभांना देण्यात आले.
- भारतमंत्री हे पद रद्द करण्यात आले.
- भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली.
- नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशातील व त्याच्या प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा १९३५ नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली.
- इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”


🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. 


🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.


🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते - 


१) ध्वज समिती

२) मुलभूत हक्क उपसमिती

३) अल्पसंख्यांक उपसमिती

४) संघ राज्य घटना समिती

५) घटना सुधारणा उपसमिती

६) नागरिकत्व तदर्थ समिती

७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती

८) सल्लागार समिती

९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती

१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)


🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता. 


🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.


🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.


भारताचे तीन तुकडे करणाऱ्या रॅडक्लिफ लाइनबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?



17 ऑगस्ट 1947 रोजी दोन्ही देशांमध्ये रॅडक्लिफ लाइन आखून दोन वेगळे देश निर्माण करण्यात आले. सर सिरील रॅडक्लिफ यांनी भारत व पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा निश्चित केली. ते सीमा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी आखलेल्या रेषेमुळे पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि भारत असे तीन भाग करण्यात आले. नंतर पश्चिम पाकिस्तानच्या जुलमी राजवटीला आणि अत्याचारांना कंटाळून पूर्व पाकिस्तानने लढा देऊन 1971 साली स्वतंत्र बांगलादेश मिळवला

रॅडक्लिफ यांनी फाळणीची रेषा आखण्यासाठी भारतात येण्यापूर्वी कधीही भारत पाहिलेला नव्हता. येथील सामाजिक घटकांची त्यांना काहीही माहिती नव्हती. भारताच्या समाजरचनेचा, भौगोलिक स्थितीचा, लोकसंख्येचा कोणताही अभ्यास त्यांनी केला नव्हता

रॅडक्लिफ यांना अशी घाई-गडबडीत सीमारेषा आखण्याची कल्पना आवडलेली नव्हती. त्यामध्ये अनेक त्रूटी असल्याचे त्यांनी मान्य केले होते. मात्र तत्कालीन परिस्थितीत काम पूर्ण करण्यापलिकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.

16 ऑगस्ट रोजी फाळणीच्या रेषेचा अहवाल वाचण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना केवळ दोन तास देण्यात आले

 तर लाहोर भारतात आले असते

रॅडक्लिफ यांना लाहोर शहर भारतामध्ये देण्याची इच्छा होती. मात्र तसे करण्याने पाकिस्तानला कोणतेही मोठे शहर मिळाले नसते. भारताच्या वाट्याला कोलकाता शहर गेल्यामुळे त्यांनी लाहोर शहर पाकिस्तानच्या बाजूला देण्याचे निश्चित केले

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? 

✔️ लार्ड कँनिंग


2) 1857 च्या उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ति कोण ? 

✔️ मगल पांडे


3) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण  ? 

✔️ विनोबा भावे


4) " आझाद हिंद सेने " ची स्थापना कोणी केली ? 

✔️ रासबिहार बोस


5) मायकेल ओडवायरीची हत्या कोणत्या क्रांतिकारकांनी केली ?  

✔️ उधमसिंग


6) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता ? 

✔️  लार्ड कर्झन


7) भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ति कोण  ? 

✔️ राजा राममोहन रॉय


8) " पुणे करार " कोणाकोणामंध्ये झाला ? 

✔️  महात्मा गांधी - डॉ. आंबेडकर


9) जहाल गटातील तीन प्रसिद्ध नेत्यांची ( त्रिमूर्ती ) नावे सांगा  ? 

✔️ लाल - बाल  - पाल


10) इ.स. 1930 मंध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले ? 

✔️ रम्से मँक्डोनाँल्ड


11) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ? 

गो. कृ.  गोखले


12) जुन्या मुबंई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर -----------होता

✔️ एलफिन्स्टन


13) इ.स. 1829 मंध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला ? 

✔️ बटिग विल्यम


14) " शिवजयंती उत्सव " महाराष्ट्रात सुरू करणारे राष्ट्रवादी व्यक्ती कोण ? 

✔️ बा.ग.टिळक


15) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते ? 

✔️ सर ए. ओ.ह्युम


16) भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची पहिली महिला अध्यक्ष ----------------

✔️ अनी बेझंट


17) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? 

✔️ वयोमेशचंद्र बँनर्जी


18) डाँ.  पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी "गदर " ही गुप्त क्रांतिकारक संघटना ----------या देशामंध्ये सुरू केली ? 

✔️ अमेरिका


19) काँग्रेसचे पहिले अधिवेशन ------------या शहरात घडून आले ? 

✔️ मबंई


20)  कलेक्टर जँक्सनचा वध करणारा क्रांतिकारक -------------

✔️ अनंत लक्ष्मण कान्हेरे


21) " अभिनव भारत संघटनेचे " संस्थापक कोण ? 

✔️ वि.दा.सावरकर


22) आद्य क्रांतिकारक ? 

✔️ वासुदेवन बळवंत फडके


23) ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कदी झाला ? 

✔️ 1858


24) हैदराबाद मुक्ती संग्रामात अनुकूल पाश्र्वभूमी कोणी तयार केली ? 

✔️ सवामी रामानंद तीर्थ


25) भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराँय कोण  ? 

✔️ लार्ड कँनिंग


26) "व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट "रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण ? 

✔️ लार्ड रिपन


27) लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मोगल सम्राटा बरोबर केली जाते ? 

✔️ औरंगजेब


29) 1929 मंध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या आध्यक्षेखाली पास झाला ? 

✔️  पडित नेहरू


30) "गदर पार्टीचे " पुणे जिल्ह्यातील कार्यकरते कोण ? 

✔️ विष्णू गणेश पिगंळे


32) विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक ------------

✔️ धोंडो केशव कर्वे


31) भारकाचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण ?  

✔️ सी.  राजगोपालाचारी


33) होमरुल लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाली  ? 

✔️ मबंई


34) "असहकार चळवळ " कोणी केली ? 

✔️ महात्मा गांधी


35) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरूध्द----------- यांनी आवाज उठविला ? 

✔️ वि.रा.शिदें


36) वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही ------------

✔️ पडित नेहरू


37) मुंबई येथे थिआँसाँफिकल सोसायटी शाखा इ.स.-----------या वर्षी झाली  ? 

✔️ इ.स.1897


38) भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना "राणीचा जाहिरणामा " प्रस्तुत करणार्‍या साम्राद्नीचे नाव -----------?

राणी व्हिक्टोरिया 

✔️


39) भारतातील" स्वतंत्र " हा शब्द ब्रिटिश राजकर्त्यानी ---------------मंध्ये वापरला ? 

✔️ अटलीच्या घोषणेत


40) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात।? 

✔️ लार्ड रिपन

इग्रजांचे बंगालवर वर्चस्व

 


🔹 बगाल हा मोगली साम्राज्यातील एक सधन व मोठा प्रांत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या काळात ठिकठिकाणी सुभेदार जसे स्वतंत्र बनले होते. तसा बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान हाही स्वतंत्र बनला होता. त्याच्यावर मोगल बादशहाचे नाममात्र वर्चस्व होते. तो १७५६ साली मृत्यू पावल्यावर त्याचा पुत्र सिराजउद्दोला हा बंगालच्या सुभेदारीवर आला. याच्यात कारकिर्दीत बंगालमध्ये इंग्रजांनी बाजी मारून इंग्रजी साम्राज्याचा पाया रचला.


* लवकरच प्लासीच्या रणमैदानावर सिराज उद्दोला लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. युद्धाला सुरुवात होताच सेनापती मीर जाफर प्रथम तटस्थ राहिला व नंतर इंग्रजांना जाऊन मिळाला. २३ जून १७५७ पुढे मीर जाफरचा पुत्र मिराण याने पकडून ठार केले. प्लासीच्या विजयानंतर इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब केला.


* मीर कासीम हा बंगालचा नाममात्र सुभेदार बनू इच्छीत नव्हता. इंग्रजांना हि न आवडणारी गोष्ट होती. त्यांनी मीर कासीम विरुद्ध युद्ध पुकारून त्याचा अनेक लढायात पराभव केला १७६३ आणि मीर जाफर यास पुन्हा बंगालचा सुभेदार म्हणून जाहीर केले.


* १ मे मध्ये क्लाइव्ह दुसऱ्यांदा बंगालचा गवर्नर म्हणून आला. त्याने आल्याबरोबर शहा अलम बादशाही व अयोध्येच्या नवाबाशी करार करून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले. याच वेळी त्याने बादशहापासून बंगालच्या सुभ्याची दिवाणी मिळविली. त्यातूनच बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण झाली. त्याच्या जागी त्याचा पुत्र नजमुद्दोला याला इंग्रजांनी बसविले. तोही पूर्णपणे इंग्रजांच्या वर्चस्वाखाली राहिला.


📚दहेरी राज्यव्यवस्था


* १२ आगष्ट १७६५ रोजी मोगल बादशहा शहा आलम याने कंपनीस बंगालच्या दिवाणीचे फर्मान दिले. या फर्मानानुसार कंपनीस बंगालच्या सुभ्यातील महसूल गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. परंतु सुभ्याच्या राज्यकारभारातली व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या सुभेदारावारच राहिली. याचाच अर्थ बंगालवर इंग्रजांचे सर्वार्धाने वर्चस्व झाले.


* १७६९ - ७० मध्ये या वर्षी दुष्काळात १ कोटी माणसे अन्नान्न करून तडफडून मेली. कंपनीच्या अवघ्या तेरा वर्षाच्या कारकिर्दीत शेती बुडाली. शेवटी विलायत सरकारला कंपनीच्या गैरकारभाराची चौकशी करून तिच्यावर बंधने टाकणारा रेग्युलेटिंग अक्ट [१७६९ - ७० ] पास करावा लागला

लॉर्ड कर्झन (1899 - 1905).


●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.

मुघल साम्राज्य TRICK


⚔️🛡 मघल साम्राज्य सुरवात हे पानिपत युद्धापासून  झाली


⚔️🛡 बाबर(1526 -1530)

   मुघल साम्राज्याचा पहिला राजा  याचे वडील फरगणा(ताशकंद) चे शासक होते ताशकंद हे आताच्या उजबेकिस्तान ची राजधानी आहे


   ⚔️🛡वाडीलानंतर बाबर हा शासक बनला त्याने भारतावर 5 आक्रमण केली 

   

⚔️🛡 21एप्रिल 1526 इब्राहिम लोधी vs बाबर असे पानीपत पहीले युद्ध झाले यामध्ये बाबर ने लोधी चा पराभव  केला आणि भारतात मुघल साम्राज्य सुरवात झाली.


⚔️🛡हुमायून - बाबर चा मुलगा शासक बनला.


⚔️🛡 अकबर(1556 1605)- हुमायून चा मोठा मुलगा याच्या वेळी दुसरे पानिपत युद्ध झाले मोहमद अली सहा आणि अकबर(14 वर्षे वय) मध्ये अकबर ने जिंकले.


⚔️🛡जहांगीर (1605-1627)अकबर मृत्यू नंतर  त्याने बांगला चे फारशी शेक अफगाण यांच्या विधवा पत्नी सोबत विवाह केला


⚔️🛡शाहजहान-  जहांगीर पुत्र


⚔️🛡पत्नी अंजुमन बानो(मुमताज) मृत्यू नंतर ताजमहाल ची निर्मिती केली(20 वर्षे)


⚔️🛡तयाने दख्खन 4 प्रांत निर्माण केले   ...1) खानदेश 2)बेरार 3)तेलंगाणा 4)दोलताबाद  आणि दख्खन शाशक म्हणून पुत्र औरंगजेब ला नेमले.


⚔️🛡औरंगजेब(1658-1707)

या काळातच शिवाजीमहाराज यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले 


⚔️🛡डान्स, दारू ,गाणे यावर त्याने बंदी घातली.


⚔️🛡बहादुर शहा जाफर(1707-1712)

वय 70 वर्षे होते यामुळेच शासन करणे जमले नाही आणि यापासून मुगल साम्राज्य लयास जाऊ लागले 


⚔️🛡Trick - भाईसाब (BHAISAB)🛡⚔️

 

    🏝 "I "बद्दल फ़क्त "J "हे अक्षर वापरा🏝

राणी लक्ष्मीबाई


महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
टोपणनाव:मनू
जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५
काशी, भारत
मृत्यू:जून १७, इ.स. १८५८
झाशी, मध्य प्रदेश
चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर
धर्म:हिंदू
वडील:मोरोपंत तांबे
आई:भागीरथीबाई तांबे
पती:गंगाधरराव नेवाळकर
अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)

लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

बालपण

लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.

व्यक्तिमत्त्व

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

वैवाहिक जीवन

इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.

दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.

गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.

झाशी संस्थान खालसा

पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.

परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.

झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.

इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध

इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार
सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.

अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.

दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.

शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’

या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

अलंकारिक शब्द


🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस


🌷 अकलेचा कांदा : मूर्ख


🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य


🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार


🌷 अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला


🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे


🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस


🌷 अडीपिल्ली : गुप्त गोष्ट


🌷 अधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार


🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात


🌷 उटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा


🌷 उबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू


🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस


🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा


🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा


🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस


🌷 कभकर्ण : झोपाळू माणूस


🌷 कपमंडूक : संकुचित वृत्तीचा 


🌷 ककयी/मन्थरा : द्रुष्ट स्री


🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी


🌷 खडास्टक : भांडण


🌷 खशालचंद : अतिशय चैनखोर


🌷 खटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे


🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा


🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत


🌷 गगा यमुना : अश्रू


🌷 गडांतर : भीतीदायक संकट


🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 


🌷 गाढव : बेअकली माणूस


🌷 गरुकिल्ली : मर्म, रहस्य


🌷 गळाचा गणपती : मंद बुद्धीचा


🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर


🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य


🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा


🌷 घोरपड : चिकाटी धरणारा


🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड


🌷 चालता काळ : वैभवाचा काळ


🌷चौदावे रत्न : मार


🌷 छत्तीसचा आकडा : शत्रूत्व


🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस


🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे


🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा


🌷 थडा फराळ : उपवास


🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे


🌷 दपारची सावली : अल्पकाळ टिकनारे


🌷 दवमाणूस : साधाभोळा माणूस


🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा


🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग


🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत


🌷 नदीबैल : मंदबुद्धीचा


🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग


🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा


🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू


🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य


🌷 बहस्पती : बुद्धिमान व्यक्ती


🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य


🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन


🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न


🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी


🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा


🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू 


🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम


🌷 मगजळ : केवळ आभास


🌷 मषपात्र : बावळट मनुष्य


🌷 लबकर्ण : बेअकली / बेअकल


🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार


🌷 वाहती गंगा : आलेली संधी


🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य


🌷 सिकंदर : भाग्यवान


🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब


🌷 शदाड शिपाई : भित्रा मनुष्य


🌷 शरीगणेशा : आरंभ करणे


🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य


🌷 समशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य


🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य


🌷 सळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम


🌷 सर्यवंशी : उशिरा उठणारा


🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस


🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी 

महाराष्ट्रातील खडक प्रणाली



अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.


ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.


क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.


ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.


इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला ‘गोंडवना खडक‘ असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

जिल्हाधिकारी 🎯

निवड :-- upsc 

नेमणूक :-- राज्यशासन

1) म. हा.  जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7 नुसार   प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्लाधिकाऱ्याची तरतूद आहे.

2) वोरेन हेस्टिंग्स  यांनी 1792 मध्ये या पदाची निर्मिती केली.

3) जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेतील  IAS  अधिकारी असतो.

4) जिल्हाधिकारी हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव असतो.

5) शान्तता व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी म्हणून काम पाहतो.

6) जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्ह्यातील जनगणना व मतदान याद्या बनविणे.

7) दुष्काळ व अवर्षण काळात सरकारच्या परवानगीने शेतसारा माफ करणे.

8) जिल्हास्तरावर स्वस्त धान्याची दुकानें उघडण्यास परवानगी देणे.

9) जिल्हा आमसभेच्या सचिव असतो.

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )


1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे 

समानतेचा हक्क

स्वातंत्र्याचा हक्क

घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

धार्मिक स्वांत्र्याचा हक्क


● उत्तर - घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क


2. कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

३२ साव्या

३९ साव्या

४२ साव्या

४४ साव्या


● उत्तर - ४२ साव्या


3. राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

महाभियोग

पदच्युत

अविश्र्वास ठराव

निलंबन


● उत्तर - महाभियोग


4. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?

३०

२५

४०

३५


● उत्तर - ३५


5. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?

मार्गदर्शक तत्वे

शिक्षण

पैसा

मुलभूत हक्क


● उत्तर - मुलभूत हक्क


6. मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?

दिवाणी न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

उच्च न्यायालय

फौजदारी न्यायालस


● उत्तर - सर्वोच्च न्यायालय


7. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?

सर्वोच्च न्यायालयात

फक्त लोकसभेत

फक्त राज्यसभेत

संसदेत


● उत्तर - फक्त राज्यसभेत


8. खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?

अर्थविधेयक मंजूर करणे

सामान्य विधेयक मंजूर करणे

मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेणे


● उत्तर - मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे


9. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?

स्वातंत्र्य

समता

न्याय

बंधुभाव


● उत्तर - न्याय


10. महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?

५५

६५

७८

८७


● उत्तर - ७८


.......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

सोडियम✅




पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Jp⤵️



गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

🌈🌈🌈🌈🌈

राँजर बेकन


बहुमताचे प्रकार


* साधे बहुमत (Simple Majority)

उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत 


* पूर्ण बहुमत किंवा निरपेक्ष बहुमत (Absolute Majority)

सभाग्रहातील एकूण सदस्य संख्येचे बहुमत (उदा. 545 सदस्यांच्या लोकसभेचे 273 एवढे बहुमत). 


* प्रभावी बहुमत (Effective Majority)

सभाग्रहाच्या एकूण सदस्य संख्येतून गैरहजर आणि रिक्त जागांची संख्या वजा करून उर्वरित उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत म्हणजे प्रभावी बहुमत होय. उपराष्ट्रपती, राज्यसभा उपसभापती, लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्यासाठी प्रभावी बहुमताची आवश्यकता असते. 


* विशेष बहुमत (Special Majority)

साधे, पूर्ण, प्रभावी बहुमत सोडून इतर सर्व बहुमतांना विशेष बहुमत म्हणतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:

•  सभागृहाचे दोन तृतीयांश बहुमत 

•  हजर व मतदानात भाग घेणार्‍या सदस्यांचे दोन तृतीयांश बहुमत 

•  पूर्ण बहुमत + उपस्थित व मतदान करणार्‍या दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत

  

ग्रामीण प्रशासन प्रश्न व उत्तरे.

1)पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो??

1)सभापती

2)विस्तार अधिकारी

3)राज्य शासन

4)जिल्हा अधिकारी✅


2)सरपंच समितीचा सचिव कोण असतो?

1)सरपंच

2)उपसरपंच

3)विस्तार अधिकारी

4)ग्रामसेवक ✅


3)वित्त आयोगाची मुदत किती वर्षाची असते??

1)3

2)4

3)5 ✅

4)6


4)महाराष्ट्रात जिल्हापरिषद केव्हा स्थापन करण्यात आली?

1)1958

2)1968

3)1962✅

4)1661


5)ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो???

1)सरपंच

2)गटविकास अधिकारी

3)ग्रामसेवक ✅

4)उपसरपंच


6)GST चे दर किती प्रकारचे असतात?

1)2

2)4

3)5 ✅

4)6


7)ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद संख्या असते??

1)5

2)11

3)9

4)7✅


8)राजा केळकर हे प्रसिद्ध संग्रहालय कोठे आहे??

1)नांदेड

2)पिंपरी

3)पुणे ✅

4)नाशिक


9)झिरो माईल  स्थान कोणत्या शहरात आहे??

1)मुंबई

2)पुणे

3)नागपूर✅

4)नाशिक


10) सातारा आणि सांगली ता दोन जिल्ह्यांत ------हे मसाल्याचे पीक जास्त होते???

1)मिरची

2)हळद ✅

3)धणे

4)लसुण


1) कायद्याचा कच्च्या मसुद्याला --------- म्हणतात. ( पूर्व PSI 2008) 

1) ठराव 

2) विधेयक ✅

3) अध्यादेश 

4) मसूदा 



2) दुहेरी शासन संस्था असलेल्या पध्दतीला------------ म्हणतात.( PSI पूर्व 2008 ) 

1) संघराज्य ✅

2) एकात्म 

3) घटनात्मक 

4) दुहेरी 



3) राज्यसभेमंध्ये एकूण --------- सदस्य असतात. ( PSI पूर्व 2008 ) 

1) 550

2) 350

3) 250✅

4) 238



4) डिसेंबर 1929 च्या लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ? ( PSI पूर्व 2008 ) 

1) सुभाष चंद्र बोस 

2) पंडित जवाहरलाल नेहरू ✅

3) लाला लाजपत राय 

4) आचार्य नरेंद्र देव 



5) विसंगत घटक ओळखा ( PSI पूर्व 2008 ) 

1) नगरपालिका 

2) नगरपंचायत 

3) महानगरपालिका 

4) केंद्र सरकार ✅



6) एकाच विषयावर केलेल्या केंद्र आणि राज्य यांच्या कायद्यात विसंगत असेल तर ---------- कायदा रद्द होतो. ( PSI पूर्व 2008 ) 

1) केंद्रशासनाचा 

2) राज्यशासनाचा✅

3) स्थानिक स्वराज्य शासनाचा 

4) केंद्र व राज्य दोहोंचा 



7) ----------- ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडनारा दुवा मानला जातो. ( PSI  पूर्व 2008 ) 

1) नगरपंचायत 

2) पंचायतसमिती ✅

3) ग्रामपंचायत 

4) ग्रामसभा 


लोकअंदाज समिती

▪️ सथापना- 1950 (जॉन मथाईं समितीच्या शिफारशी नुसार)

▪️ सदस्य-30.

▪️ सर्व सदस्य लोकसभेतून.

▪️ लोकसभा अध्यक्ष 30 पैकी एकाची अध्यक्षपदी निवड करतात.

▪️कार्यकाळ 1 वर्ष.


 ♦️कार्ये:


1)अर्थसंकल्पीय अंदाजाचे वेळोवेळी परीक्षण.

2) काटकसर, कार्यक्षमता, प्रशासकीय व संस्थात्मक सुधारणा या विषयी अहवाल देणे

3)धोरणे व अर्थ संकल्पीय तरतूद यांचे परीक्षण करणे.


🔴 लोकलेखा समिती.

▪️सथापना-1921

▪️ सदस्य-22- 

(राज्यसभा-7,लोकसभा-15).

▪️22 पैकी एकाची अध्यक्षपदी निवड लोकसभा सभापतीद्वारा

▪️ 1966-67 पासून अध्यक्ष विरोधी पक्षाचा.

▪️कार्यकाळ- 1 वर्ष 

.

♦️कार्ये:

1)CAG च्या अहवालांची तपासणी करणे.

2महालेखा परिक्षकाला या समितीचे कान वडोळे म्हणतात.


🔵सार्वजनिक उपक्रम समिती.

🔸स्थापना-1964

▪️ कष्ण मेनन समिती शिफारशीवरून.

▪️सदस्य- 22- (राज्यसभा-7,लोकसभा-15).


♦️कार्ये:

1)सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेखे तपासणे.

2)सार्वजनिक उपक्र मांवरील महालेखापालाचे अहवाल तपासणे.


ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती


कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)

कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सभासद व त्यांची विभागणी - कमीत-कमी 7 व जास्तीत जास्त 17



लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

लोकसंख्या :


1. 600 ते 1500 - 7 सभासद

2. 1501 ते 3000 - 9 सभासद

3. 3001 ते 4500 - 11 सभासद

4. 4501 ते 6000 - 13 सभासद

5. 6001 ते 7500 - 15 सभासद

6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद


निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

कार्यकाल - 5 वर्ष

विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.


आरक्षण :

1. महिलांना - 50%

2. अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

3. इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)



ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.


ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.


राजीनामा :

सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

उपसरपंच - सरपंचाकडे

निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :


सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.


अविश्वासाचा ठराव :

सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.



ग्रामसेवक / सचिव :

निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी

नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी

कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा


कामे :


1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.


ग्रामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन


ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

गांधी युगाचा उदय :





सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.

आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.

जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.

1. भारतातील चळवळी :
भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -

चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.

साराबंधी चळवळ (सन 1918) -

1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.

गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.

शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

हा गांधीजीचा दूसरा विजय होता.

रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.

या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.

या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.

या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.

फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.

या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.

या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.

असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.

काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.

4. सायमन कमिशन (1928) :



भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले.

या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते.

या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते.

या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.

5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले.

राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.

नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.

6. सविनय कायदेभंग आंदोलन :

1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते.

या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :
सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला.

12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली.

385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली.

यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले.

महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.

सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली.

6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले.

आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.
8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :
सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली.

महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली.

विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.
9. भारत छोडो आंदोलन (1942) :
क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला.

14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला.

8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली.

प्रति सरकारे -

इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले.

प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.
चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले.

महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली.

सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -

सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.

या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले.

भारतीय सैनिकाचा उठाव -

चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.
या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला.

नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला.

सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.
10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :
सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता.

मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली.

त्रिमंत्री योजना (सन 1946) -

या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले.

या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे.

हंगामी सरकार -

त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली.

माऊंट बॅटन योजना -

24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले.

भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली.

3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली.

मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

भारतीय निवडणूक आयोग



ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.


▪️राज्यसभा

- संसदेचे उच्च सभागृह

- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त

- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा


▪️लोकसभा

- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014


▪️लोकसभा निवडणूक 2014

- 16 वी लोकसभा निवडणूक

- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान

- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

- एकूण मतदारसंघ: 543

- एकूण मतदान केंद्र: 927553

- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)

राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)


▪️ पक्षीय बलाबल

- भारतीय जनता पक्ष: 282

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06

- कम्युनिस्ट पक्ष: 01

- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09

- राज्यस्तीय पक्ष: 182

- नोंदणीकृत पक्ष: 16

- अपक्ष: 03


▪️ वैशिष्ट्ये

- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला. 

- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला

- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. 

- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये

--------------------------------------

• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014

- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे. 

- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले. 

- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला

ब्रिटीशाना लुटता न आलेले भारतातील रहस्यमयी खजाने




    *एक काळ होता जेव्हा भारतातुन सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे. हा धूर पाहूनच किंवा त्याच्याबद्दल ऐकूनच अनेक परदेशी लोकांनी भारतात येऊन कधी तलवारीच्या तर कधी बंदुकीच्या जोरावर आपले खजिने लुटले.*
 भारतातला खजिना चोरून आपापल्या देशात श्रीमंती आणि प्रतिष्ठा मिळवली. परंतु आजही भारतात असे अनेक खजिने आहेत जे ब्रिटिशांनाही लुटता आले नाहीत.
त्याकाळचे अनेक राजे, संस्थानिक किंवा शासक आपले खजिने वाचवण्यासाठी त्याबद्दलची माहिती गुप्त ठेवत असत किंवा त्यांच्याबद्दल दंतकथा पसरवत असत. पाहूया त्यापैकी काही गुप्त खजिने आणि दंतकथांबद्दल…

◾️ नादीरशहाचा खजिना

नादिरशाहने १७३९ मध्ये भारतावर आक्रमण करून दिल्लीवर ताबा मिळवला होता त्यावेळी त्याने संपूर्ण दिल्ली लुटली होती. त्या लुटीमध्ये प्रसिद्ध मयूरसिंहासन आणि कोहिनुर हिऱ्यासोबतच मोठ्या प्रमाणावर सोने, नाणी आणि दागिन्यांचा समावेश होता. तेव्हा युद्धपरिस्थी असल्याने नादिरशहा आपल्या खजिन्यावर लक्ष ठेऊ शकला नाही. परत जाताना त्याच्या सैन्यातील मोठ्या सरदार आणि सैनिकांनी त्या लुटीतला मोठा खजिना लपवून ठेवला होता अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. हा खजिना अद्याप कुणाला सापडला नाही.

◾️ कष्णा नदीचा खजिना

आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील कृष्णा नदीचा किनारी प्रदेश बऱ्याच काळापासून हिऱ्यांसाठी प्रसिद्ध होता. एकेकाळी हा प्रदेश गोवळकोंडा राज्यात समाविष्ट होता. जगप्रसिद्ध कोहिनुर हिरा इथल्याच खाणीतून काढण्यात आला होता.

◾️ बिंबीसारचा खजिना

इ.स.पूर्व पाचव्या शतकातील मगधचा राजा (बिहार) बिंबिसार याला मौर्य साम्राज्याचा जनक मानले जाते. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की बिहारच्या राजगीर येथे बिंबिसाराचा खजिना लपविण्यात आला होता. एकाच दगडात कोरलेल्या सोनभांडार गुहांमध्ये पुरातन लिपीमध्ये लिहलेले शब्द अद्याप कुणाला वाचता आले नाहीत. असे मानले जाते की त्या लिपीतच खजिन्याशी संबंधित नकाशाचे रहस्य लपले आहेत. ब्रिटिशांनी खजिना शोधण्यासाठी तोफा लावल्या परंतु त्यांनाही खजिना सापडला नाही.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,

◾️ जहांगीर बादशहाचा खजिना

मुघल बादशाह जहांगीरला सत्तेतून पायउतार केल्यानंतर तो दिल्लीपासून १५० किमी अंतरावर असणाऱ्या राजस्थानमधील अलवर किल्ल्यात आश्रयाला गेला होता. दंतकथेनुसार जहांगीरने अलवरच्या किल्ल्यात राहायला येताना आणलेली प्रचंड संपत्ती त्याने किल्ल्यात लपवली. ही संपत्ती अद्याप कुणाला सापडली नाही.

◾️शरी मोक्काम्बिका मंदिर खजिना

कर्नाटकच्या पश्चिम घाटात कोलूर येथे श्री मोक्काम्बिका मंदिर आहे. इथल्या पुजाऱ्यांच्या सांगण्यांनुसार मंदिरात सापाचे खास चिन्ह बनवलेले आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,प्राचीन काळापासून नागदेवता लपवलेल्या खजिन्याचे रक्षण करतात असे भारतात मानले जाते. या मंदिराच्या तळघरात प्रचंड संपत्ती असल्याचे बोलले जाते. त्यांच्या रक्षणासाठीच सापाचे चिन्ह तिथे कोरण्यात आले आहे. मात्र या संपत्तीचा शोध किंवा किती संपत्ती आहे याचा कुणालाही अंदाज लागला नाही.

◾️ राजा मानसिंहाचा खजिना

जयपूरचा राजा मानसिंह हा मुघल सम्राट अकबराचा सरसेनापती होता. १५८० मध्ये त्याने अफगाणिस्तानवर विजय मिळवला होता. त्यावेळी त्या विजयानंतर मिळालेली लूट मानसिंहाने सरकारदरबारी जमा न करता गुप्त ठिकाणी लपवली होती अशी दंतकथा आहे. या दंतकथेचा किती तथ्य आहे याचा अंदाज यावरून होतो की, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी हा खजिना शोधण्याचे आदेश दिले होते. पण हा खजिना काय सापडला नाही.

◾️ मीर उस्मान अलीचा खजिना

हैद्राबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली त्याकाळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. १९३७ मध्ये प्रतिष्ठित अशा टाईम मॅगझीनमध्ये त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितले होते. आपल्या शासनकाळात त्याने भरपूर प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की, किंग पॅलेसच्या तळघरात त्याने आपली सगळी संपत्ती लपवली होती. त्यात महागडे हिरे, दागिने, रत्ने समाविष्ट होती. मीर उस्मान अलीच्या मृत्युसोबतच त्याच्या खजिन्याचे रहस्य गडप झाले.



महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती

 केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांचे हिशोब तपासण्यासाठी उद्देशाने भारतीय घटना कलम 148 ते 151 नुसार महालेखा परीक्षकाचे पद निर्माण केलेले आहे. 


· या महालेखापालाचे पद देखील महत्वाचे व जबाबदारीचे पद असते.



1. नेमणूक

· महालेखापरीक्षकाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात. 

· महालेखापरीक्षकाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते. 

· राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महालेखापालासाठी केली जाते.



2. कार्यकाल

· भारतीय राज्यघटनेत महालेखापालाचा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही. 

· परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महालेखापाल वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकते असे असले तरी महालेखापाल मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. 

· याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकतात.



3. वेतन व भत्ते

· महालेखापालाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. 

· शासकीय कामासाठी देशीविदेशी प्रवास त्याला मोफत असतो. 

· एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु आणीबाणी लागू केली तर मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

· महालेखापालाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते. 

· निवृत्त झाल्यांनंतर निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.



4. अधिकार व कार्ये


1. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या जमाखर्चाचे हिशेब तपासणे.

2. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या लेखा पुस्तकाच्या नोंदी कशा ठेवाव्यात हे ठरविणे.

3. शासनामार्फत खर्च होणार्‍या रकमा नियमानुसार खर्च होत आहे किंवा नाही हे पाहणे.

4. घटक राज्य सरकारच्या लेखा संबंधीचा अहवाल घटक राज्याच्या राज्यपालाला पाठविणे.

5. शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांचे हिशोब तपासणे.

6. राष्ट्रपतीचे आर्थिक बाबीसंबंधी माहिती मागविल्यास ती पुरविणे.

7. एखदया खात्याचा अनाठायी अथवा जास्तीचा खर्च झाला असेल तर तो वसूल करणे.

1935 चा कायदा.


▪️ त्यात 321 कलम, 14 भाग व 10 परिशिष्ट होती.


▪️अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती पण अस्तित्वात आले नाही कारण संस्थानिकांना संघराज्यात सामील होणे ऐच्छिक होते ते सामील न झाल्याने संघराज्य या कायद्यानुसार कधीच अस्तित्वात आले नाही.


▪️ तीन सूची होत्या: संघ सूची, प्रांतिक सूची, समवर्ती सूची.


▪️ या कायद्यानुसार शेषाधिकार गव्हर्नर जनरल कडे होते 1919 च्या कायद्यानुसार मात्र केंद्र सरकारला होते.


 ▪️1919 च्या कायद्यानुसार  प्रांतिक स्तरावर dyarchy व्यवस्था निर्माण करण्यात आली होती ती आता केंद्र पातळीवर निर्माण करण्यात आली.


▪️ प्रांतिक स्तरावर 1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता लागू करण्यात आली ते 1937 ते 1939 पर्यंत होती.


▪️ संघराज्य कायदेमंडळ द्विग्रहीच ठेवण्यात आलं जे की 1919 च्या कायद्यामध्ये प्रथमतः निर्माण करण्यात आले होते.


▪️ सहा प्रांतात द्विगृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं: बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार, आसाम.


 ▪️ फेडरल कोर्टाची स्थापना  1 आक्टोंबर 1937 रोजी 1935 च्या कायद्यानुसारच करण्यात आली पुढे 26 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्टात त्याचे रूपांतरण झाले.


 ▪️फेडरल रेल्वे ऑथोरिटी निर्माण करण्यात आली.


 ▪️केंद्राकडून राज्यांना निर्देशाची कल्पनाही याच कायद्यानुसार घेण्यात आली.


 ▪️केंद्र व राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध 1935 च्या कायद्यातून घेण्यात आलेले आहेत.


▪️ आणीबाणी विषयक तरतुदी


 ▪️Advocate General हे पद गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी स्थापन.


 ▪️रिझर्व बँक स्थापनेची तरतूद होती पण स्थापना RBI ACT 1934 नुसार 1935 ला RBI ची स्थापना झाली. 


▪️या कायद्याने भारत मंत्र्याची इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली.


 ▪️या कायद्यावरील मत :


 पंडित नेहरू. : एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिनच नसलेले मशीन असे म्हणाले.


 बॅरिस्टर जिना म्हणाले: संपूर्णपणे कुजलेला मूलभूतरित्या आयोग्य आणि पूर्णपणे अस्विकाराह्य असे ते म्हणाले.


 श्री राजगोपालचारी म्हणाले: द्विशासनापेक्षा खराब कायदा होता.


 पंडित मदन मोहन मालवी म्हणाले: हा नवीन कायदा आपल्यावर लादला जात आहे तो वर्करणी काहीसा लोकशाहीवादी वाटत असला तरी आतून पूर्णपणे पोकळ आहे.

42वी घटनादुरुस्ती 1976



या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.


एमपीएससी म्हणजे नेमके काय ???

आज महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र यात ग्रामीण व शहरी भागाची दरी स्पष्टपणे दिसते.

आज महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र यात ग्रामीण व शहरी भागाची दरी स्पष्टपणे दिसते. एम.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, मुंबई या शहरांमध्ये अभ्यासिकांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. खरेतर या परीक्षेचे स्वरूप अभ्यासासाठी लागणारे अभ्याससाहित्य व योग्य नियोजन केल्यास आपण आहे तेथून देखील या परीक्षेची तयारी करू शकतो.

दरवर्षी एम.पी.एस.सी.द्वारे नागरी प्रशासनाचा गट अ व गट ब या श्रेणीच्या पदांसाठी एक साधारण परीक्षा घेतली जाते. विक्रीकर निरीक्षक सहायक, पोलीस निरीक्षक या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शिक्षण क्षेत्रातील विशेष पदांसाठी एम.पी.एस.सी. वेगवेगळय़ा परीक्षांचे आयोजन करते. राज्यसेवा परीक्षांद्वारे उपजिल्हाधिकारी गट अ तसेच पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त गट अ, याबरोबरच प्रशासनातील जवळजवळ १६ ते १७ पदांसाठी परीक्षा घेत असतात.

एम.पी.एस.सी.द्वारा भरली जाणारी पदे – १) उपजिल्हाधिकारी, गट अ  २) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त – गट अ, ३) सहायक विक्रीकर आयुक्त- गट अ, ४) उपनिबंधक सहकारी संस्था- गट अ,  ५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)- गट अ , ६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ), ७) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, ८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट अ, ९) तहसीलदार-गट अ, १०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- गट ब,  ११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा-गट ब, १२) कक्ष अधिकारी- गट ब, १३) गटविकास अधिकारी- गट ब १४) मुख्याधिकारी नगरपालिका, १५) सहायक निबंधक सहकारी संस्था- गट ब, १६) उपअधीक्षक, भूमिअभिलेख- गट ब, १७) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, १८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- गट ब  १९) नायब तहसीलदार- गट ब.

एम.पी.एस.सी. परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यांत होते हे आपणास माहीत आहेच. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वेळोवेळी जाहीर केला जातो. दरवर्षी ३ ते ४ लाख विद्यार्थी प्रशासनात येण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात, मात्र यांपकी काहींनाच यात यश प्राप्त होते मग ही परीक्षा अवघड असते का? उत्तर हे नकारार्थी आहे. या परीक्षेबद्दल योग्य माहिती करून घेतली व अभ्यासाचे नियोजन करून घेतले तर या परीक्षेत आपण नक्कीच यश प्राप्त करू शकतो.

परीक्षेच्या तयारीला सुरुवात कधी करावी- शक्यतो पदवी परीक्षेच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांपासून तयारी सुरुवात केल्यास जास्त चांगले असते, कारण अभ्यासक्रमात नमूद केलेल्या सर्व घटकांची सखोल तयारी करायला मोठा वेळ मिळतो. मात्र ग्रामीण व शहरी भागातील काही विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल माहिती उशिरा मिळते, मिळाली तरी ती योग्यप्रकारे मिळत नाही त्यामुळे वेगवेगळय़ा गरसमजुती पसरवल्या जातात. जर आपण पदवीधारक असणार व पदवी धारण करून काही वर्षे झाली असली तरी निराश होण्याचे काही कारण नाही. एक योग्य नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केल्यास आपण या परीक्षेची तयारी उत्तमपणे करू शकते. सर्वात आवश्यक अशी बाब म्हणजे सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतची महाराष्ट्र शासनाची शालेय पाठय़क्रमातील पुस्तके वाचून काढावीत. कारण या पुस्तकांच्या वाचनाने पुढचा अभ्यासक्रम समजणे सोपे होते.

गेल्या काही वर्षांपासून खूप सारे प्रश्न या पुस्तकातून विचारले जातात. विशेषत: इतिहास, भूगोल व विज्ञान ही पुस्तके वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

वयोमर्यादा – साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वष्रे व कमाल ३३ वष्रे वयोमर्यादा निर्धारित केली आहे. कमाल वयोमर्यादा खालील बाबतींत शिथिलक्षम करण्यात आली आहे.

१) शासनाने मान्यता दिलेल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षांपर्यंत म्हणजे कमाल वयोमर्यादा ३८ वष्रे.

२) अपंग उमेदवारांच्या बाबतीत १० वष्रे शिथिलक्षम म्हणजे ४५ वर्षांपर्यंत.

३) पात्र खेळाडूंच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत (कमाल ३८ वष्रे).

४) माजी सनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षांपर्यंत. (३८ वष्रे).

परीक्षेचा अर्ज भरण्याची पद्धत- परीक्षेचा अर्ज भरताना शांत डोक्याने व योग्य सव्‍‌र्हरचा वापर करून अर्ज भरण्याची सुरुवात करावी.

१) प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत.

२) उमेदवाराला अर्ज www.mahaonline.gov.in  या वेबसाईटद्वारे आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत सादर करणे आवश्यक असते.

३) विहित पद्धतीने आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षाशुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जात नाही.

४) अर्जाचे शुल्क हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे तसेच ऑनलाइन डेबिट कार्डद्वारे देखील जमा करता येते. परीक्षाशुल्क जमा झाल्यानंतर दोन दिवसांनी परीक्षा केंद्राची निवड करणे देखील गरजेचे असते.

५) परीक्षेपूर्वी ७ दिवसांअगोदर उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र त्याच्या प्रोफाइलद्वारे उपलब्ध करून देण्यात येते. ती प्रत डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.


संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आय.ए.एस.,आय.पी.एस.,आय.एफ.एस. यांसारख्या किमान १६ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रीय तरुण मागे पडतात. याबाबत बऱ्याच वेळा चर्चा होताना दिसते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे, की गेल्या काही वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. २०११ मध्ये संघ लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षाप्रणालीत मोठा बदल केला. २०११ पूर्वी परीक्षार्थीला सामान्य अध्ययन पेपरबरोबर एक ऐच्छिक विषयाचा पेपर द्यावा लागत असे. २०११ मध्ये हा पूर्वपरीक्षांचे ऐच्छिक पेपर काढून टाकण्यात आला व त्यासाठी सी सॅटचा पेपर ठेवण्यात आला म्हणजे आता पूर्वपरीक्षेत पेपर १ (२०० गुण) आणि पेपर २ (२०० गुण) हे दोन वेगवेगळे पेपर असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा व संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम तंतोतंत सारखा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन परीक्षांसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागत नाही. एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षांची तयारी बरोबरच सुरू केली तर या परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे होते.

१) अभ्यासाची सुरुवात :  पदवी परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच   या परीक्षेची तयारी सुरू केल्यास फायदेशीर ठरते. मात्र काही कारणांमुळे या काळात अभ्यास करणे शक्य झाले नसल्यास  निराश होण्याचे कारण नाही. पदवीनंतर किमान एक वर्ष काही न करता फक्त या परीक्षेची तयारी करावी.

२) तयारी करताना सर्वप्रथम इ. ५ वी ते १० वी पर्यंत एन.सी.आर.टी.ची पुस्तके व्यवस्थित दोन ते तीन वेळेला वाचून टाकावीत. हा तयारीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

३) अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत – बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल – माजिद हुसन,  जिऑग्री थ्रु मॅप – के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान – विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशात्रासाठी सर्वप्रथम अर्थशात्राच्या संकल्पना समजून दत्ता आणि सुंदरम किंवा रमेशसिंग यांची पुस्तके वाचावीत. मूलभूत पुस्तकांचेच वाचन तीन ते चार वेळा केल्यास जास्त फायदा होतो.

४) यूपीएससी  व एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षेसाठी सी सॅट पेपर २ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे किंबहुना आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार किंवा नाही, हे ठरविणारा हा पेपर आहे. या पेपरच्या बाबतीत मोठा विरोधाभास दिसून येतो. तो म्हणजे जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील, इंजिनीअरिंग शाखेतील आहेत, त्यांना या पेपरची तयारी करणे सोपे जाते. या पेपरमध्ये हे विद्यार्थी सहजतेने पास होताना दिसतात. मात्र जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहे, त्यांना या पेपरची तयारी करणे अवघड जाते. या पेपरच्या संदर्भात त्यांच्या मनात मोठा न्यूनगंड दिसतो म्हणून अशा विद्यार्थ्यांनी वर्षांच्या सुरुवातीपासूनच दिवसांतील काही वेळ या पेपरच्या तयारीस दिल्यास हा पेपर त्यांच्यासाठी देखील सोपा होऊ शकतो. ज्यांच्या मनात गणिताबद्दल भीती बसलेली आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे, की सी-सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर नव्हे. मात्र गणित, बुद्धिमत्ता यांचे योग्य नियोजन व तयारी केल्यास ती तयारी या पेपरसाठी उपयोगी ठरते.

६) २०१३ च्या मुख्य परीक्षेत जे विद्यार्थी नियमित वृत्तपत्रांचे वाचन करत होते; तसेच ज्यांना आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या घटनांबद्दल योग्य ज्ञान होते, त्यांनाच मुख्य परीक्षेचे पेपर सोपे गेले.(२०१३ मध्ये मुख्य परीक्षेसाठी संघ लोकसेवा आयोगाने बदल केला होता तो आपण पुढील भागात पाहणार आहोत.), या परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर मध्ये (मुख्य) अडीचशे गुणांसाठी २५ प्रश्न विचारलेले होते. प्रत्येक प्रश्न १० गुणांसाठी होता व १० गुणांसाठी २०० शब्दांची शब्दमर्यादा दिलेली होती म्हणजेच थोडक्यात तीन तासांत ५ हजार शब्द लिहावयाचे होते. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव मोठय़ा प्रमाणात करावा. हस्ताक्षर मात्र वाचनीय असावे.

७) परीक्षा मराठी माध्यमातून की इंग्रजी माध्यमातून द्यावी: मुख्य परीक्षा व मुलाखत आपण मराठी माध्यमात देऊ शकतो. फक्त एक इंग्रजीचा अनिवार्य ३०० गुणांचा पेपर इंग्रजीत लिहायचा असतो. या पेपरचे गुण अंतिम गुणांमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र हा पेपर पास होणे आवश्यक असते. मुख्य परीक्षा ही मराठी माध्यामातून द्यावी की इंग्रजी माध्यमातून द्यावी हा एक नेहमीचा प्रश्न आहे. जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील आहेत व ज्यांना इंग्रजी बोलताना थोडी अडचण येते, ते मात्र शेवटपर्यंत गोंधळात असतात की पेपर मराठी माध्यमातून लिहावा की इंग्रजी माध्यमातून. जर मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असेल, तर अभ्यास साहित्य मराठीतून वाचावे की इंग्रजीतून वाचावे येथून प्रश्नांना सुरुवात होते. खरंतर माध्यमाचा प्रश्न पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर येणार असतो.   जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहेत व ज्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असाल, तर मुख्य परीक्षेतील विज्ञान संदर्भात घटकांची तयारी करताना तो घटक मराठीत सांगणे अवघड जाते.  आता मराठी भाषेतून चांगली पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. थोडक्यात पेपर मराठीतून किंवा इंग्रजीतून लिहावा याबाबत जास्त खल न करता सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून त्यातील प्रत्येक उपघटकांवर आपली व्यवस्थित पकड निर्माण करावी. एकदा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे ठरविणे जास्त सोपे होते की माध्यम कोणते निवडावे.

आणीबाणी म्हणजे काय ? आणीबाणीचे प्रकार आणीबाणीचा कालावधी किती असतो ? आणीबाणी संपते कशी ? (Provocation of Emergency) – 

आणीबाणी म्हणजे काय ? आणीबाणीचे प्रकार 3

आणीबाणी म्हणजे काय ?
महत्वाचे मुद्दे
आणीबाणी म्हणजे काय ?
आणीबाणीचे प्रकार
आणीबाणीचा कालावधी किती असतो ?
आणीबाणी संपते कशी ? (Provocation of Emergency) – 

मूलभूत हक्क आणीबाणी वेळी असतात का?
आणीबाणी म्हणजे काय ? आणीबाणी म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये प्रस्थापित शासकीय यंत्रणा  चालवणे अवघड होते.  काही कारणामुळे ही यंत्रणा कोलमडून लागते आणि सर्वाधिकार भारतासारख्या विस्तृत देशामध्ये केंद्र सरकार कडे किंबहुना राष्ट्रपतीकडे जातात. अशा परिस्थितीला आणीबाणी म्हणतात.  आणीबाणी म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये राज्याला तात्काळ लगेचच कृती करणे आवश्यक असते. 

देशाची सुरक्षा अखंडता व स्थैर्य राज्य शासनाचे प्रभावी कामकाज यांच्या संरक्षणासाठी घटनेमध्ये काही आणीबाणी विषयक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या. यातीलच एक तरतूद आणीबाणी म्हणजे काय.

आणीबाणी दरम्यान केंद्रशासन शक्तिशाली बनते घटक राज्य व केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात. आणीबाणी मुळे संघराज्य संरचना एकात्मक संरचनेत परावर्तित होते. आणीबाणी म्हणजे काय ? भारताच्या घटनेत भाग 18 मधील कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणी विषयक तरतुदी आहेत.

आणीबाणीचे प्रकार
आणीबाणी म्हणजे काय
आणीबाणीचे प्रकार

भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणीचे तीन प्रकार दिलेले आहेत. राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी व आर्थिक आणीबाणी.

१) राष्ट्रीय आणीबाणी – किंवा राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय ?

राष्ट्रीय आणीबाणी युद्ध परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे पुकारले जाते. या आणीबाणीला भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची उद्घोषणा असे म्हटले आहे. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार अमलात आणली जाते

२) राज्य आणीबाणी

राज्य आणीबाणी ला राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणूनही ओळखले जाते. राज्यातील शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याने राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी भारतीय राज्यघटनेतील कलम 356 नुसार लावली जाते.

३) आर्थिक आणीबाणी-

देशातील आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्यास आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते. आर्थिक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कलम 307 मध्ये दिली आहे.

राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय?

युद्ध किंवा परकीय आक्रमण याच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यास तिला बाह्य आणीबाणी असे संबोधले जाते. सशस्त्र उठाव या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली असता तिला अंतर्गत आणीबाणी असे संबोधले जाते. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संपूर्ण भारतासाठी किंवा एखाद्या भागासाठी करता येऊ शकते.

42 वी घटनादुरुस्ती 1976 नुसार राष्ट्रपतींना आणीबाणीची घोषणा भारताचे एखाद्या भागासाठी ही करण्याचा अधिकार दिला. मूळ घटनेमध्ये आणीबाणीच्या घोषणेचा तिसरा आधार अंतर्गत अशांतता हा होता.

मात्र अंतर्गत शांतता या शब्दांमध्ये संदिग्धता असल्याने 44 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1978 मध्ये अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र उठाव हा शब्द वापरण्यात आला. त्यामुळे 1975 च्या राष्ट्रीय आणीबाणी प्रमाणे अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येणार नाही.

राष्ट्रीय आणीबाणी साठी पंतप्रधानांच्या सह केंद्रीय कॅबिनेटची लेखी मान्यता आवश्यक असते. 44 वी घटनादुरुस्ती 1978 नुसार कॅबिनेटच्या लेखी निर्णयाची तरतूद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय आणीबाणी ला दुष्प्रवृत्ती च्या आधारावर आणि विवेकशून्य व विकृत परिस्थितीवर अशा आणीबाणीला न्यायालयात आव्हान देता येते.

आणीबाणीचा कालावधी किती असतो ?
राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या आणीबाणीला संसदेची संमती घ्यावी लागते यानुसार आणीबाणीचा कालावधी ठरतो.

राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणे आवश्यक असते.

लोकसभेच्या विसर्जनाच्या कालावधीत आणीबाणीची घोषणा केलेली असल्यास नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यापासून 30 दिवसाच्या आत मान्यता होणे आवश्यक असते.

एका महिन्याच्या आत संसदेने मान्यता दिल्यास आणीबाणीचा अंमल सहा महिन्यापर्यंत असतो.

यानंतर संसदीय ठरावाद्वारे पुढे एकावेळी सहा महिन्यासाठी आणीबाणीचा कालावधी वाढवता येतो असा तो कितीही वेळा वाढवता येतो

आणीबाणीचे सहा महिने संपण्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यापासून 30 दिवसाच्या आत आणीबाणीचा अंमल चालू राहण्यासाठी ठराव पारित होणे गरजेचे असते.
आणीबाणीच्या घोषणेचा ठराव किंवा आणीबाणीचा कालावधी वाढविण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने पारित होणे आवश्यक असते. (एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या २/३ बहुमताने)

आणीबाणी संपते कशी ? (Provocation of Emergency) – 
राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा केव्हाही संपुष्टात आणू शकतात. यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते.

राष्ट्रीय आणीबाणी चे परिणाम –

राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान राज्य सरकार केंद्र सरकारच्या कार्यकारी नियंत्रणाखाली येतात.
आणीबाणी दरम्यान संसदेने राज्य सूचीतील विषयावर केलेल्या कायद्यांचा अंमल आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर सहा महिन्यानंतर संपुष्टात येतो.
कलम 354 अन्वये राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना राष्ट्रपती अध्यादेशाद्वारे केंद्र व राज्यांच्या घटनात्मक महसूल विभागणी मध्ये फेरबदल करू शकता.
लोकसभेचा कार्यकाल संसदीय कायद्याद्वारे एकावेळी एक वर्षाने वाढवता येतो असा तो कितीही वेळा वाढवता येतो.
आणीबाणी संपल्यानंतर सहा महिन्यापेक्षा अधिक काळासाठी लोकसभा-विधानसभा यांचा कार्यकाळ वाढवता येत नाही.
मूलभूत हक्क आणीबाणी वेळी असतात का?
राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 19 अंतर्गत असणारे सर्व प्रकारचे स्वातंत्र्याचे अधिकार निलंबित होतात. आणीबाणीचा अंमल संपल्यानंतर कलम 19 मधील सर्व अधिकार आपोआप पूर्ववत होतात.
कलम 359 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क निलंबित होत नाहीत तर ते बजावण्याचा हक्क निलंबित होतो.
आणीबाणी दरम्यान कलम 20 व 21 मधील हक्क अबाधित असतात. (कलम 20 अपराधाच्या दोष सिद्धी बाबत संरक्षण आणि कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण.)

भारतीय संघराज्यात राष्ट्रपती मार्फत राष्ट्रीय आणीबाणी आजपर्यंत तीन वेळा घोषित करण्यात आली आहे. (1962, 1971 व 1975) यातील 1975 मधील आणीबाणी अंतर्गत शांतता या कारणावरून करण्यात आली होती.

राज्य आणीबाणी म्हणजे काय ? राष्ट्रपती राजवट (State Emergency)-

कलम 355 नुसार राज्य शासनाचे परकीय आक्रमण व अंतर्गत अशांतता पासून संरक्षण करण्याचे व राज्यांचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवण्याची सुनिश्चित करणे हे केंद्र शासनाचे कर्तव्य आहे.

कलम 356 नुसार राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवण्याचे अशक्य झाले याची खात्री राष्ट्रपतींना झाल्यास राष्ट्रपती राज्यशासन आपल्या हाती घेतात यालाच राष्ट्रपती राजवट/राज्य आणीबाणी घटनात्मक/आणीबाणी असे संबोधले जाते.

राष्ट्रपती राजवट (State Emergency)लागू करण्याचे घटनात्मक आधार

१) कलम 356 नुसार राज्यातील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास आणि
२) कलम 365 नुसार राज्य शासनाने केंद्राच्या निर्देशांचे पालन करण्यात कसूर केल्यास राष्ट्रपती राजवट लावली जाते.

राष्ट्रपती राजवट कालावधी

राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजीव गांधी ची घोषणा केल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला मान्यता देणे गरजेचे असते.
दोन महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाल्यास नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते.
संसदेची मान्यता मिळाल्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिने अस्तित्वात असतो पुढे एका वेळी सहा महिन्यासाठी वाढवता येतो.
राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेचा ठराव किंवा पुढे ढकलण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात मार्फत साध्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते.
राष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती राजवटीची उद्घोषणा दुसऱ्या योजनेद्वारे समाप्त करू शकता यासाठी संसदेची संमती आवश्यक नसते.
State Emergency/राष्ट्रपती राजवट लागू झालेल्या राज्याचे राज्यपाल, विधानमंडळ वगळता इतर संस्था व प्राधिकारी यांचे सर्व किंवा काही अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेतात.
38 व्या घटना दुरुस्ती कायद्याने अशी तरतूद केली की, कलम 356 चा वापर करण्याबद्दल राष्ट्रपतींची खात्री अंतिम व निर्णायक असून तिला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.

44 व्या घटना दुरुस्ती कायद्याने ही तरतूद वगळण्यात आली. म्हणजे राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकन  या आधारे आव्हान देता येते.

वित्तीय/ आर्थिक आणीबाणी म्हणजे काय?

कलम 360 नुसार देशाची आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्यास राष्ट्रपती वित्त आणीबाणीची घोषणा करू शकतात.

कालावधी
वित्तीय आणीबाणी संदर्भात संसदेची संमती घ्यावी लागते. मात्र आणीबाणी ला मान्यता मिळाल्यापासून तिचा अंमल महत्तम कालावधी दिलेल्या नाही.

वित्तीय आणीबाणी राष्ट्रपतींच्या दुसर्‍या उद्घोषणा द्वारे समाप्त होऊ शकते.
भारतात आजपर्यंत एकदाही वित्तीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही.

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...