Wednesday 28 July 2021

उत्तराखंडमध्ये १ ऑगस्टपासून शाळेची घंटा वाजणार; ६ वी ते १२ वीपर्यंत वर्ग सुरु करण्याची परवानगी.



🔰करोनामुळे शिक्षणक्षेत्राचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. देशात सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. दहावी, बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. तसेच अंतर्गत मूल्यांकनावर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी शाळा कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. आता देशातील अनेक राज्यात शाळा सुरु करण्यासाठी पावलं उचलली जात आहे. आता उत्तराखंड सरकारने निर्णय घेत १ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.


🔰सहावी ते बारावीच्या वर्ग सुरु करण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. १ जुलैपासून राज्यातील सर्व शाळा ऑनलाइन सुरु करण्याचे आदेश सरकारने दिले होते. शाळांना ३० जूनपर्यंतची उन्हाळी सुट्टी होती. दुसरीकडे उत्तराखंड विधानसभेचं पावसाळी अधिवेशन २३ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे.


🔰उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलं आहे. यूपीएससी, एनडीए, सीडीएसची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात प्रवास करणाऱ्या नागरिकांवर ‘हा’ देश घालणार तीन वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा.



🔰करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाकडून महत्वाची पावलं उचलली जात असून काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. या देशांमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सौदी अरेबियाने दिला आहे. या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर तीन वर्षांसाठी प्रवासाची बंदी घालण्यात येणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.


🔰परराष्ट मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, काही सौदी नागरिक ज्यांना मे महिन्यात प्रशासनाने कोणत्याही परवानगीशिवाय परदेशात प्रवास करण्याची परवानगी दिली होती त्यांनी प्रवासी नियमांचं उल्लंघन केलं आहे. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच ही परवानगी देण्यात आली होती.


🔰“जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसंच मोठा दंड ठोठावला जाईल. याशिवाय त्यांच्यावर तीन वर्षांसाठी प्रवासबंदी घालण्यात येईल,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. सौदी अरेबियाने ज्या देशांमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.


🔰सौदी अरेबियाने अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त. इथोपिया, भारत. इंडोनेशिया, लेबॅनन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करु नये असा आदेश आपल्या नागरिकांना दिला आहे. “नागरिकांना ज्या देशांनी अद्याप करोनावर नियंत्रण मिळवलेलं नाही किंवा क्या देशांमध्ये नवे विषाणू फैलावत आहेत तिथे थेट किंवा दुसऱ्या देशांमधून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे”.

अकरावीच्या सीईटीसाठी नोंदणीस मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म

 


🔰राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी (FYJC CET 2021) सुरू झाली आहे. मात्र, नोंदणी करताना विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. जवळपास तीन ते चार दिवस वेबसाईटच सुरु होत नसल्याने नोंदणी कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर होता.


🔰दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पुरजन्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अकरावी सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २६ जुलै पर्यंत होती.


🔰दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे ते विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करु शकणार आहेत. मात्र, अद्यापही वेबसाईट बंद असल्याचं समोर आलं आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर: भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ..



🔰भारतामधील काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर याचा UNESCO संस्थेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यातील पालमपेठ येथे हे मंदिर आहे. यासह ते भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.


🔰रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारी एक अद्भुत वास्तुकला आहे.


🔴भारतातील जागतिक वारसा स्थळे...


🔰सयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.


🔰आता, भारतात एकूण 39 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 31 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

कोविंद यांच्याकडून चार वर्षांत ६३ विधेयकांना मंजुरी.



🔰राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कार्यकालातील चार वर्षे पूर्ण केली असून त्यांनी आतापर्यंत ६३ विधेयकांना मान्यता दिली आहे. त्यांनी करोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या करोना योद्ध्यांचे कौतुक केले होते. कोविंद हे ७६ वर्षांचे असून त्यांचा शपथविधी २५ जुलै २०१७ रोजी झाला होता.


🔰राष्ट्रपती भवनने म्हटले आहे की, ते पदाची चार वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या कामांची इ पुस्तिकाही यावेळी जारी करण्यात आली आहे. कोविंद यांनी १३ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली असून ७८० लोकांची भेट वेगवेगळ्या निमित्ताने घेतली आहे. राज्यघटनेचे रक्षणकर्ते म्हणूनही त्यांनी भूमिका पार पाडली. केंद्र सरकारची ४३ व राज्य सरकारांची २० विधेयके त्यांनी मंजूर केली आहेत.


🔰करोना योद्ध्यांना स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती भवनात बोलावून त्यांचा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करीत त्यांचे धैर्य व समर्पण याला मोलाची साथ दिली होती असे इ पुस्तिकेत म्हटले आहेत. परिचारिका संघटना, लष्करी परिचर संघटना, राष्ट्रपती आस्थापना दवाखाना परिचर यांच्यासमवेत त्यांनी रक्षाबंधन साजरे केले होते. 


🔰एकूण २३ परदेशी राजदूतांची अधिकारपत्रे त्यांनी स्वीकारली तसेच अनेकदा राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. कर्नाटकातील जनरल थिमय्या म्युझियमचे उद्घाटन त्यांनी केले होते. अंदमान निकोबार कमांडच्या स्वराज दीप संचलनाची सलामी त्यांनी स्वीकारली होती.

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश...



*‘एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा;विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून पद भरतीसाठी सूट*


 *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय*


           


मुंबई, दि. २८ जुलै - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 


मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 


बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते. 


‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे ‘एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सामान्य ज्ञान | Generl Knowldge |



● कोणत्या खेळाडूने ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेत ७३ किलोग्राम गटाचे सुवर्ण पदक जिंकले?

उत्तर : प्रिया मलिक


● कोणत्या राज्यात अमित शहा यांच्या हस्ते ग्रीन सोहरा वनीकरण मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला?

उत्तर : मेघालय


● 

कोणत्या दिवशी  ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात येतो?

उत्तर : २६ जुलै


● कोणती व्यक्ती ‘अ‍ॅन ऑर्डिनरी लाइफ: पोर्ट्रेट ऑफ अॅन इंडियन जनरेशन’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

उत्तर : अमृता प्रीतम


● कोणत्या मंत्रालयाने “pmcaresforchildren.in” हे संकेतस्थळ सक्रिय केले?

उत्तर : महिला व बाल विकास मंत्रालय


● कोणत्या बँकेला इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) यांच्याकडून हरित गृहनिर्माणसाठी 250 दशलक्ष डॉलरचे कर्ज प्राप्त झाले?

उत्तर : एचडीएफसी लिमिटेड


● कोणता देश फेसबुक याला एक पर्याय म्हणून ‘जोगाजोग’ नामक सोशल मीडिया मंच तयार करीत आहे?

उत्तर : बांगलादेश


● कोणत्या दिवशी ‘जागतिक जलसमाधी दिवस’ साजरा करतात?

उत्तर : २५ जुलै


● कोणत्या दिवशी २०२१ साली ‘आषाढ पौर्णिमा-धम्म चक्र दिवस’ साजरा करण्यात आला?

उत्तर : २४ जुलै


● कोणत्या खेळाडूला ‘एआयएफएफ फुटबॉलर ऑफ द इयर २०२०-२१’ घोषित करण्यात आले?

उत्तर : बाला देवी आणि संदेश झिंगन


● अकामाई टेक्नोलॉजीज कंपनी हे जागतिक डिजिटल सामुग्री वितरण करणारे एक जाळे असून त्याचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर : मॅसेच्युसेट्स, अमेरिका


● ‘मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स’ या कंपनीने स्वत:चे नाव बदलून काय ठेवले आहे?

उत्तर : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स


● कोणत्या दिवशी १६१ वा “प्राप्तिकर दिवस” साजरा करण्यात आला?

उत्तर : २४ जुलै


● जागतिक आरोग्य संस्थेच्या पहिल्या ‘जलसमाधी प्रतिबंधक उपाय विषयक प्रादेशिक स्थिती’ या अहवालानुसार, कोणत्या प्रदेशात जलसमाधीमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही एकूण जागतिक मृत्यूंपैकी जवळजवळ दोन तृतीयांश आहे?

उत्तर : आशिया-प्रशांत


● कोणत्या दिवशी “जागतिक मेंदू दिवस” साजरा करतात?

उत्तर : २२ जुलै


● कोणत्या व्यक्तीला ब्रिटीश उच्चायुक्त यांच्यावतीने दिल्या गेलेल्या ‘अलेक्झांडर डलरीम्पल पुरस्कार’ प्राप्त झाला?

उत्तर : व्हाइस अ‍ॅडमिरल विनय बधवार

युनेस्को - जागतिक वारसा स्थळ



👉 सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला जातो. 

👉 जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर त्या स्थळाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी 'युनेस्को'कडून अनुदान दिले जाते.

👉 जागतिक वारसा स्थळांचे नैसर्गिक, सांस्कृतिक व मिश्र अशा तीन गटात वर्गीकरण केले जाते.

👉 जलै 2021 अखेर जगभरातील 167 देशांमध्ये 1120 जागतिक वारसा स्थळे आहेत. (यामध्ये 868 सांस्कृतिक, 213 नैसर्गिक व 39 मिश्र स्थळांचा समावेश) 


🔘 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारे पहिले पाच देश :

1. इटली (57)

2. चीन (55)

3. स्पेन (49)

4. जर्मनी (46)

5. फ्रान्स (45)


👉 भारत (39) या यादीत सहाव्या स्थानी आहे.


🔘 UNESCO बाबत : 


👉 सयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.

👉 सथापना : 16 नोव्हेंबर 1945

👉 सथळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. 

👉 भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.


धोलावीरा (हडप्पाकालीन शहर): भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ..



🎭गजरातच्या कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलाविरा या स्थळाला जुलै 2021 महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.


🎭याव्यतिरिक्त अलीकडेच, तेलंगाना राज्यात मुलुगु जिल्ह्यात पालमपेट येथील रुद्रेश्वर मंदिराला (ज्याला रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते) भारतातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाली आहे.


🎭भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एका संमिश्र स्थळांचा समावेश आहे.


🎗धोलावीरा शहराविषयी...


🎭हडप्पा संस्कृतीतील हे शहर दक्षिण आशियातील अगदी मोजक्या उत्तम पद्धतीने जतन केलेल्या प्राचीन नागरी वसाहतींपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व काळात, तिसऱ्या सहस्त्रकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या सहस्त्रकापर्यंतच्या काळात इथे मानवी संस्कृती असल्याच्या खुणा सापडतात. धोलाविरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते.


🎭आशियात सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या 1000 प्राचीन जागांमध्ये हे स्थळ सहाव्या स्थानी असून, या ठिकाणी सुमारे 1500 वर्षे मानवी वस्ती असावी, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मानवी जीवनाच्या या प्राचीन, अत्यंत सुरुवातीच्या काळातील,नागर संस्कृतीचा उदय आणि अस्त या दोन्हीचे धोलावीरा हे साक्षीदार आहे.  त्या काळातील नागरी शहररचना, बांधकाम तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, सामाजिक प्रशासन आणि त्याचा विकास, कला, उत्पादन, व्यापार, तसेच श्रद्धा-समजुती अशा त्या संस्कृतीतील सर्व समृद्ध जीवनाची माहिती आपल्याला या स्थळी मिळू शकते.


🎭धोलावीरा येथे, या सर्व संस्कृतींच्या खुणा अत्यंत उत्तम पद्धतीने जतन केल्या असून, अतिशय समृद्ध अशा कलात्मक वस्तूंच्या या नागरी वस्तीची सर्व प्रादेशिक वैशिष्ट्येही याठिकाणी आपल्याला आढळतात. ज्यातून, एकूण हडप्पा संस्कृतीविषयीचे समग्र ज्ञान आपल्याला मिळू शकते.


🎭धोलावीरा या शहराच्या जन्मापासून त्याची नगररचना, ही नियोजित शहर आणि वर्गीकृत अशा नागरी रहिवासी वस्त्यांचे अप्रतिम उदाहरण आहे. त्या काळातील लोकांच्या विविध व्यावसायिक कामांच्या अनुषंगाने तशी स्तररचना करण्यात आली आहे. जल संवर्धनातील, सांडपाणी व्यवस्थेतील तंत्रज्ञानाची प्रगती तसेच स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञान दृष्ट्या विकसित वैशिष्ट्ये, या रचनेत आपल्याला जागोजागी दिसतात. विशेष म्हणजे त्यात स्थानिक साहित्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.


🎭धोलावीरा हे प्रगैतिहासिक कांस्ययुगीन हडप्पा नागर संस्कृतीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. या वारसा स्थळी, हडप्पा संस्कृतीची सुरुवात, एक विकसित समृद्ध संस्कृति आणि अखेरचा काळ, या सर्व खुणा आढळतात. अगदी सुरुवातीच्या काळातील पुरावा, ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापूर्वीचा म्हणजे हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडतात.


🎭पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली अत्यंत महागडी जलव्यवस्थापन प्रणाली, त्या काळातील लोकांची भू-हवामानात होणाऱ्या बदलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीची साक्ष देणारी आहे. पावसाळी झऱ्यांमधील पाणी वळवणे, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध भूजलाचा वापर करणे, मोठमोठ्या दगडी जलाशयांमध्ये त्याची साठवणूक आणि जतन करणे हे आजही आपल्याला पौर्वात्य आणि दक्षिण संस्कृतित आजही आपल्याला दिसते. तसेच, पाणी मिळवण्यासाठी खडकात खोदलेल्या विहिरी या अशाप्रकारचे सर्वात प्राचीन उदाहरण आहे. अशा प्रकारची रचना त्यांच्या किल्यामध्ये आढळते धोलावीरा इथल्या जलसंवर्धनाच्या पद्धती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून प्राचीन जगातातील त्या सर्वाधिक प्रभावी उपाययोजना मानल्या जातात.

अमेरिकेतील लस घेतलेल्या नागरिकांनाही पुन्हा घालावा लागणार मास्क; आरोग्य प्रशासनाचे निर्देश.


🔰अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. करोना विषाणूंमध्ये सतत बदल होत असल्याने आणि डेल्टा व्हेरियंटवर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.


🔰रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (Centers for Disease Control and Prevention) संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. डेटानुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.


🔰“संसर्गाचं प्रमाण जास्त तसंच धोकादायक ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्यांनी घरांमध्येही मास्क वापरण्याची शिफारस सीडीसी करत आहे,” असं त्यांनी सांगितलं. सीडीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील दक्षिण भागात संक्रमणाचं प्रमाण अधिक आहे. तर दुसरीकडे ईशान्येकडील लसीकरण झालेल्या भागांमध्ये संक्रमणाचा मध्यम स्तरावर आहे.

NMCG संस्थेचा ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ उपक्रम..



🔰विज्ञान व पर्यावरण केंद्र (CSE) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने (NMCG) ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ या विषयावर आधारित एक नवीन क्षमता निर्मितीचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.


🔰गगा नदीच्या खोऱ्यातील शहरांमध्ये नदीचे आरोग्य सुधारण्यात मदत होणाऱ्या शस्वत शहरी जल व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी क्षमता निर्मिती आणि कृती संशोधनाला चालना देणे, हा या उपक्रमाचा हेतु आहे.


🔴कार्यक्रम पुढील घटकांवर केंद्रीत असणार,


जल संवेदनशील नागरी संरचना आणि नियोजन

शहरी भूजल व्यवस्थापन

शहरी जल कार्यक्षमता आणि संवर्धन

विकेंद्रित सांडपाण्यावरील प्रक्रिया आणि स्थानिक पुनर्वापर

शहरी पाणी संस्था / तलाव व्यवस्थापन

या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या भागधारकांमध्ये महानगरपालिका, तांत्रिक आणि संशोधन घटक, राज्य कार्यक्रम व्यवस्थापन गट, नमामि गंगे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्थानिक तळागाळातील समुदाय यांचा समावेश आहे.


🔴राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) विषयी...


🔰राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) ही राष्ट्रीय गंगा परिषदेची अंमलबजावणी करणारी शाखा आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये लागू झालेल्या “गंगा नदी (पुनरुत्थान, संरक्षण व व्यवस्थापन) प्राधिकरणे आदेश 2016” अंतर्गत NMCG ची स्थापना झाली.

संयुक्त राष्ट्रातील पी ५ गटात भारताने समतोल साधला- तिरूमूर्ती.



🔰संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या भारताने समतोल साधण्याचा  प्रयत्न केला आहे. पाच स्थायी सदस्यांमधील मतभेद मिटवण्यात मोठे काम केले आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत  तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे फिरते अध्यक्षपद १ ऑगस्टला मिळणार असून  २०२१-२२ या काळात हे पद भारताकडे राहणार आहे. सुरक्षा मंडळात एकूण पंधरा अस्थायी देश आहेत.


🔰भारताला सुरक्षा मंडळात अतिशय महत्त्वाच्या काळात पद मिळाले असून जग करोनात चाचपडत असताना व त्यावरून मतभेद व वादविवाद असताना सुरक्षा मंडळ व इतर पातळीवरही भारत सामूहिक कृतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत सदस्य देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करील. कारण सध्या अनेक प्रश्नांवरून सुरक्षा मंडळात वादविवाद आहेत.


🔰अनेक प्रश्नांवर भारताने ठोस भूमिका गेल्या सात महिन्यात घेतली आहे. कुठलीही जबाबदारी घेण्यात टाळाटाळ केलेली नाही. भारतासारख्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाचा संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा मंडळात महत्त्वाचे पद मिळाल्याने बहुमान होत आहे पण त्याचबरोबर पाच कायम सदस्य असलेल्या देशातील मतभेद टाळण्यास मदत होणार आहे. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका हे सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्य असलेले देश आहेत. सुरक्षा मंडळातील ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न करून विचारांती निर्णय घेण्यास भाग पाडू असे सांगून ते म्हणाले की, म्यानमार, अफगाणिस्तान यांसारख्या देशातील परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज असून तेथील परिस्थितीबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे.

Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम



🔰टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध


🔰आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. त्याच निमित्ताने १९९९ च्या कारगिल युद्धात नक्की काय घडले यावर ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने टाकलेली नजर…


🔰 भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.



🔰 कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.


🔰 टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.


१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम….


🔰 म ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.


🔰 म ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.


🔰 म २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.


🔰 म २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.


🔰 म ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.


🔰 जन १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.


🔰 जन १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.


🔰 जन १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली


🔰 जन २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.


🔰 जलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली


🔰 जलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली


🔰 जलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली


🔰 जलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला


🔰 जलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...