Wednesday 28 July 2021

धोलावीरा (हडप्पाकालीन शहर): भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ..



🎭गजरातच्या कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलाविरा या स्थळाला जुलै 2021 महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.


🎭याव्यतिरिक्त अलीकडेच, तेलंगाना राज्यात मुलुगु जिल्ह्यात पालमपेट येथील रुद्रेश्वर मंदिराला (ज्याला रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते) भारतातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाली आहे.


🎭भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एका संमिश्र स्थळांचा समावेश आहे.


🎗धोलावीरा शहराविषयी...


🎭हडप्पा संस्कृतीतील हे शहर दक्षिण आशियातील अगदी मोजक्या उत्तम पद्धतीने जतन केलेल्या प्राचीन नागरी वसाहतींपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व काळात, तिसऱ्या सहस्त्रकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या सहस्त्रकापर्यंतच्या काळात इथे मानवी संस्कृती असल्याच्या खुणा सापडतात. धोलाविरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते.


🎭आशियात सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या 1000 प्राचीन जागांमध्ये हे स्थळ सहाव्या स्थानी असून, या ठिकाणी सुमारे 1500 वर्षे मानवी वस्ती असावी, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मानवी जीवनाच्या या प्राचीन, अत्यंत सुरुवातीच्या काळातील,नागर संस्कृतीचा उदय आणि अस्त या दोन्हीचे धोलावीरा हे साक्षीदार आहे.  त्या काळातील नागरी शहररचना, बांधकाम तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, सामाजिक प्रशासन आणि त्याचा विकास, कला, उत्पादन, व्यापार, तसेच श्रद्धा-समजुती अशा त्या संस्कृतीतील सर्व समृद्ध जीवनाची माहिती आपल्याला या स्थळी मिळू शकते.


🎭धोलावीरा येथे, या सर्व संस्कृतींच्या खुणा अत्यंत उत्तम पद्धतीने जतन केल्या असून, अतिशय समृद्ध अशा कलात्मक वस्तूंच्या या नागरी वस्तीची सर्व प्रादेशिक वैशिष्ट्येही याठिकाणी आपल्याला आढळतात. ज्यातून, एकूण हडप्पा संस्कृतीविषयीचे समग्र ज्ञान आपल्याला मिळू शकते.


🎭धोलावीरा या शहराच्या जन्मापासून त्याची नगररचना, ही नियोजित शहर आणि वर्गीकृत अशा नागरी रहिवासी वस्त्यांचे अप्रतिम उदाहरण आहे. त्या काळातील लोकांच्या विविध व्यावसायिक कामांच्या अनुषंगाने तशी स्तररचना करण्यात आली आहे. जल संवर्धनातील, सांडपाणी व्यवस्थेतील तंत्रज्ञानाची प्रगती तसेच स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञान दृष्ट्या विकसित वैशिष्ट्ये, या रचनेत आपल्याला जागोजागी दिसतात. विशेष म्हणजे त्यात स्थानिक साहित्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.


🎭धोलावीरा हे प्रगैतिहासिक कांस्ययुगीन हडप्पा नागर संस्कृतीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. या वारसा स्थळी, हडप्पा संस्कृतीची सुरुवात, एक विकसित समृद्ध संस्कृति आणि अखेरचा काळ, या सर्व खुणा आढळतात. अगदी सुरुवातीच्या काळातील पुरावा, ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापूर्वीचा म्हणजे हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडतात.


🎭पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली अत्यंत महागडी जलव्यवस्थापन प्रणाली, त्या काळातील लोकांची भू-हवामानात होणाऱ्या बदलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीची साक्ष देणारी आहे. पावसाळी झऱ्यांमधील पाणी वळवणे, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध भूजलाचा वापर करणे, मोठमोठ्या दगडी जलाशयांमध्ये त्याची साठवणूक आणि जतन करणे हे आजही आपल्याला पौर्वात्य आणि दक्षिण संस्कृतित आजही आपल्याला दिसते. तसेच, पाणी मिळवण्यासाठी खडकात खोदलेल्या विहिरी या अशाप्रकारचे सर्वात प्राचीन उदाहरण आहे. अशा प्रकारची रचना त्यांच्या किल्यामध्ये आढळते धोलावीरा इथल्या जलसंवर्धनाच्या पद्धती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून प्राचीन जगातातील त्या सर्वाधिक प्रभावी उपाययोजना मानल्या जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...