माहितीच्या अधिकाराची वैशिष्ट्ये

माहिती जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या कोणत्याही व्यक्तीला माहिती मागण्याचा अधिकार आहे.

माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे हे उघड करणे अर्जदारावर बंधनकारक नसते.

माहिती मागण्यासाठी नमुन्यातील अर्ज, संपर्काचा पत्ता आणि 10 रु. शुल्क पुरेसे ठरेल.

एखाद्या महितीसाठीचा अर्ज सहाय्यक माहिती अधिकार्‍याकडे दिलेला असेल व सदरचा अर्ज मुख्य कार्यालयाकडे पाठवावयाचा असेल, तर आणखी पाच दिवसांची जास्त मुदत दिली जाऊ शकते.

एखाद्या नागरिकाने जीवित स्वातंत्र्य या संदर्भात माहिती मागितली असेल तर ती 48 तासांच्या आत देणे बंधनकारक आहे.

जर मागणी केलेली माहिती त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेची असेल तर ती माहिती देण्यासाठी 40 दिवसांची मुदत आहे.

माहितीच्या अधिकारामध्ये कामाचे निरीक्षण किंवा तपासणी या बाबतींचा समावेश करण्यात आला आहे.

सर्वसाधारण माहिती एखाद्या व्यक्तीने मागितली असेल तर ती 30 दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे.

जनमाहिती अधिकाराच्या निर्णयाविरुद्ध प्रथम अपील अधिकार्‍यांकडे 30 दिवसांच्या आत अपील करता येते.

केंद्रीय/राज्य प्रथम अपिल अधिकार्‍यांच्या निर्णयाविरुद्ध केंद्रीय/राज्य माहिती आयुक्ताकडे 90 दिवसांच्या आत अपील करता येते.

चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यास जनमाहिती अधिकार्‍याविरुद्ध कारवाई करता येते.

अर्ज सादर केल्यापासुन वेळेच्या आत माहिती न पुरवल्यास दंड आकारणीची तरतूद आहे.

अर्ज एका सर्व प्राधिकरणाकडून दुसर्‍या प्राधिकरणाकडे वर्ग केल्यास पाच दिवसात करणे बंधनकारक आहे.

माहिती देण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे.

राज्य कारभारात पारदर्शकता आणणे.

राज्य कारभारात खुलेपणा निर्माण करणे.

राज्यकारभार व शासन व्यवस्थेतील भ्रष्टाचारास आळा घालणे.

नागरिकांना शासकीय कारभारात सहभागी करून घेणे आणि सहभाग वाढविणे.

प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक व नागरिकांचे समूह घडविणे.

शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रती उत्तरदायित्व निर्माण करणे.

*‘द वॉल’ राहुल द्रविड दोषमुक्त, BCCI च्या लोकपालांचा मोठा निर्णय*

भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळत असलेल्या राहुल द्रविडची, लाभाचं पद भूषवल्याच्या आरोपांमधून मुक्तता करण्यात आलेली आहे. बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी आज या प्रकरणात आपला निकाल दिला आहे. "राहुल द्रविड विरोधातली तक्रार मी फेटाळत आहे, त्याच्यावर लाभाचं पद भूषवल्याचा आरोप सिद्ध होत नाहीये", जैन यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे.

"द्रविडवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये मला कोणत्याही प्रकारे हितसंबंध जपल्याचं किंवा लाभाचं पद भूषवल्याचं जाणवलं नाही. त्यामुळे राहुल द्रविडला मी दोषमुक्त करत आहे." जैन यांनी पत्रकारांशी बोलत असताना माहिती दिली. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी द्रविडविरोधात तक्रार दाखल केली होती.

राहुल द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षासोबत इंडियन सिमेंट कंपनीत उपाध्यक्ष पदावर काम करतो. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक एन.श्रीनीवासन यांच्या मालकीची ही कंपनी असल्यामुळे राहुलवर हितसंबंध जपल्याचा आणि लाभाचं पद भूषवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र लोकपालांनी दिलेल्या निर्णयानंतर राहुलची या आरोपांमधून सुटका करण्यात आलेली आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘आता विश्वात्मके देवे’ यात ‘देवे’ शब्दाची विभक्ती कोणती?

   1) व्दितीया    2) तृतीया    3) षष्ठी      4) सप्तमी

उत्तर :- 2

2) ‘तू मुंबईला जाणार की नाही ? हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

   1) उद्गारार्थी    2) प्रश्नार्थी    3) नकारार्थी    4) संकेतार्थी

उत्तर :- 2

3) ‘अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही’ या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.

   1) अद्यापिही          2) जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही
   3) लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर      4) लोकांना बाहेर काढू शकलेलो नाही

उत्तर :- 2

4) ‘मांजराकडून उंदीर मारला गेला’ – हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?

   1) भावकर्तरी प्रयोग  2) भावे प्रयोग   
   3) कर्मणी प्रयोग    4) कर्म-भाव संकर प्रयोग

उत्तर :- 3

5) ‘दारोदार’ हा कोणता समास आहे ?

   1) उपपद तत्पुरुष समास      2) कर्मधारय समास 
   3) अव्ययीभाव समास      4) नत्र तत्पुरुष समास

उत्तर :- 3

6) वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा अधिक काळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही, त्या ठिकाणी..............

     हे चिन्ह वापरतात.
   1) “-”      2) ;      3) ,      4) !

उत्तर :- 2

7) ‘पापणीत गोठविली मी नदी आसवांची’ – अलंकार ओळखा.

   1) अतिशयोक्ती    2) रूपक      3) व्यतिरेक    4) दृष्टांत

उत्तर :- 1

8) अनुकरणवाचक गट निवडा.

   1) बडबड, किरकिर, फडफड    2) अर्ज, इनाम, जाहीर
   3) भाकरी, तूप, कांबळे      4) सायकल, सर्कस, सिनेमा

उत्तर :- 1

9) योग्य पर्याय निवडा.

   अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत.
   ब) यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रगट होतात.

   1) अ आणि ब बरोबर  2) अ बरोबर ब चूक  3) अ चूक ब बरोबर  4) अ आणि ब दोन्ही चूक

उत्तर :- 1

10) ‘महान’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

   1) सुरेख    2) मोठा      3) छान      4) स्मृती

उत्तर :- 2

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्रे

- तेलबिया संशोधन केंद्र जळगाव
- गवत संशोधन केंद्र पालघर
- गहु संशोधन केंद्र महाबळेश्वर (सातारा)
- ऊस संशोधन केंद्र पाडेगाव (सातारा)
- काजू संशोधन केंद्र वेंगुला (सिंधुदुर्ग )
- केळी संशोधन केंद्र यावल (जळगाव)
- नारळ संशोधन केंद्र भाट्ये (रत्नागिरी)
- हळद संशोधन केंद्र डिग्रज (सांगली)
- सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन (रायगड)
- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव (सोलापूर)
- राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर (पुणे)
- मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर.

प्रश्नसंच 16 ऑक्टोबर 2019

1) ब्राझिलिया येथे कितवी BRICS शिखर परिषद पार पडत आहे?
उत्तर : 11 वी

2) 'जागतिक न्यूमोनिया दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

3) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 11 नोव्हेंबर

4) जगातले पहिले 'कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस पोर्ट टर्मिनल' कुठे उभारले जाणार आहे?
उत्तर : गुजरात

5) देशात चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्याने उभारण्यास कोणत्या प्रकल्पांतर्गत मान्यता मिळाली आहे?
उत्तर : मेक इन इंडिया

6) “औद्योगिक उत्पादन निर्देशांक” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर : केंद्रीय सांख्यिकी संस्था

7) “ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
उत्तर : क्लायमेट ट्रान्सपेरन्सी

8) ‘सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’ कधी पाळला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

9) पाचवी ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस’ प्रदर्शनी कुठे भरणार आहे?
उत्तर : बेंगळुरू

10) चॅलेन्जर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?

 30 अंश

 60 अंश

 90 अंश

 10 अंश

उत्तर : 90 अंश

2. लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.

 2

 4

 3

 5

उत्तर :4

 3. 1/9+1/12=?

 1/36

 7/36

 2/36

 2/21

उत्तर :7/36

 4. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही?

 रा.म.3

 रा.म.4

 रा.म.5

 रा.म.6

उत्तर :रा.म.5

 5. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

 औरंगाबाद

 अमरावती

 पुणे

 कोकण

उत्तर :औरंगाबाद

 6. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?

 पंजाब

 उत्तरप्रदेश

 हरियाणा

 हिमाचलप्रदेश

उत्तर :हरियाणा

 7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?

 तापी

 महानदी

 गोदावरी

 चंबळ

उत्तर :तापी

 8. अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 महाराष्ट्र

 आसाम

 मध्यप्रदेश

 गुजरात

उत्तर :गुजरात

 9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिसमोग्राफव्दारे केली जाते?

 भूकंपाचे धक्के

 पावसाचे प्रमाण

 योग्य वेळ

 हवेचा दाब

उत्तर :भूकंपाचे धक्के

 10. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

 परभणी

 यवतमाळ

 अमरावती

 वाशिम

उत्तर :यवतमाळ

 11. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली?

 25 ऑक्टोबर 2014

 27 ऑक्टोबर 2014

 31 ऑक्टोबर 2014

 1 नोव्हेंबर 2014

उत्तर :31 ऑक्टोबर 2014

 12. निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदान प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेला पर्याय NOTA चे विस्तृत रूप लिहा.

 नो टू ऑल

 नन ऑफ द अबोह

 नॉट अलाऊड

 यापैकी नाही

उत्तर :नन ऑफ द अबोह

 13. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभरला जाणार आहे, त्याचे प्रस्तावित नाव काय आहे?

 स्टॅच्यू ऑफ आर्यन मॅन

 स्टॅच्यू ऑफ सरदार

 स्टॅच्यू ऑफ युनिटी

 स्टॅच्यू ऑफ फ्रिडम

उत्तर :स्टॅच्यू ऑफ युनिटी

 14. अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला?

 2012

 2013

 2014

 2015

उत्तर :2013

 15. दारिद्ररेषेखालील जन्मलेल्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2014 पासून कोणती योजना सुरू केली?

 समृद्धि योजना

 सुकन्या योजना

 बेटी बचाव योजना

 निर्भया योजना

उत्तर :सुकन्या योजना

 16. दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?

 लॅक्टोज

 माल्टोज

 फ्रुक्टोज

 स्रूक्रोज

उत्तर :लॅक्टोज

 17. आहारात लोह खनिजाचे प्रामाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

 क्षय

 डायरिया

 अॅनिमिया

 बेरीबेरी

उत्तर :अॅनिमिया

 18. पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

 एडवर्ड जेन्नर

 साल्क

 हरगोविंद खुराणा

 विल्यम हार्वी

उत्तर :साल्क

 19. एखादा माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर गेल्यास-?

 वस्तुमान वेगळे पण वजन सारखेच राहील

 वस्तुमान व वजन दोन्ही सारखेच राहील

 वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 वस्तुमान व वजन दोन्हीही वेगळे राहील

उत्तर :वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 20. संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?

 रॅपीड अॅक्शन मेमरी

 रॅन्डम अॅक्सेस मेमरी

 राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट

 रोल अँड मेमरी

उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी

‘सजग’ गस्तीनौकेचे जलावतरण

◾️भारतीय बनावटीच्या गस्तीनौकेचे गुरुवारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या हस्ते गोवा शिपयार्ड येथे जलावतरण झाले.

◾️ त्यांनी या गस्तीनौकेचे ‘सजग’ असे नामकरण केले

◾️यावेळी श्रीपाद नाईक, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव सुभाष चंद्रा, तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन उपस्थित होते.

◾️भारतीय तटरक्षक दलासाठी पाच गस्तीनौका बांधणीचा प्रकल्प गोवा शिपयार्डने हाती घेतला आहे.

◾️ त्यापैकी ‘सजग’ ही तिसरी गस्तीनौका आहे.

◾️पाच गस्तीनौकांच्या प्रकल्पाचे १३ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.

◾️ या नौकांचा वापर प्रादेशिक सागरी सीमांमधील अनन्य आर्थिक क्षेत्राच्या रक्षणासाठी केला जाणार आहे.

◾️अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि संगणकीय नियंत्रण कक्षाने युक्त अशी ही ‘सजग’ नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यातील सर्वात आधुनिक नौका आहे.

◾️ २४०० टन वजनाच्या या नौकेत बचावकार्यासाठी आणि चाचेगिरीविरोधी शीघ्रकृती नाव, तोफा, इत्यादी शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत.

◾️ गस्तीनौकांचे आरेखन आणि बांधणी यासाठी शिपयार्ड आणि तटरक्षक दलामधील भागीदारीची त्यांनी प्रशंसा केली.

◾️तर ‘सजग’च्या बांधणीत ७० टक्के स्वदेशी घटकांचा वापर झाला असून शिपयार्डच्या परंपरेनुसार आम्ही ही नौका वेळेत पूर्ण केली आहे, असे गौरवोद्गार शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमांडर बी.बी. नागपाल यांनी काढले.

सरन्यायाधीश माहिती अधिकारात

◾️सरन्यायाधीशांचे कार्यालय सार्वजनिक आस्थापना असल्याने ते माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत येते, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

◾️ मात्र, ‘जनहिता’साठी माहिती जाहीर करताना न्यायिक स्वातंत्र्य लक्षात घेतले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

◾️या निकालामुळे न्यायिक स्वातंत्र्य आणि पारदर्शकता यांचा समतोल साधला गेला आहे.

◾️दिल्ली उच्च न्यायालयाच्या २०१० च्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव तसेच केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांनी आव्हान याचिका दाखल केल्या होत्या.

◾️ सरन्यायाधीश रंजन गोगोई,
📌 न्या. एन. व्ही. रामण्णा,
📌 न्या. धनंजय चंद्रचूड,
📌 न्या. दीपक गुप्ता आणि
📌 न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने या याचिका फेटाळून लावत सरन्यायाधीशांचे कार्यालय ‘आरटीआय’ कक्षेत असल्याचा निकाल दिला.

◾️न्यायवृंदाने नेमणुकीसाठी कोणत्या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली, हे या कायद्यानुसार जाहीर करता येईल. मात्र, त्यामागची कारणे जाहीर करता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

◾️ सरन्यायाधीश गोगोई, न्या. दीपक गुप्ता, न्या. संजीव खन्ना यांनी एक निकालपत्र दिले, तर न्या. रामण्णा आणि न्या.चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकालपत्रे लिहिली.

◾️सरन्यायाधीशांचे कार्यालय हे ‘आरटीआय’ कक्षेत येते.

◾️ दिल्ली उच्च न्यायालयाच्या ८८ पानांच्या निकालपत्राने तत्कालीन सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांना धक्का दिला होता. त्यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार
न्यायाधीशांबाबतची माहिती जाहीर करण्यास विरोध केला होता.

◾️उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. पी. शहा, न्या. विक्रमजित सेन, न्या. एस. मुरलीधर यांनी हा निकाल दिला होता.

✍ ‘कायद्यापुढे सर्व समान’

◾️ कायद्यापेक्षा कोणीच मोठा नसून, कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे या निकालाने अधोरेखित केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

✍माहिती अधिकाराअंतर्गत कोण?

◾️कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका (सरन्यायाधीशांसह) ही तिन्ही घटनात्मक आस्थापने

◾️ संसद किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून स्थापन केलेली कोणतीही संस्था किंवा संघटना

◾️केंद्र वा राज्य सरकारने अधिसूचना किंवा आदेश काढून स्थापलेली संस्था किंवा आस्थापना

◾️केंद्र वा राज्य सरकारी आर्थिक मदतीवर आणि नियंत्रणावर चालणाऱ्या संस्था

◾️ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, पूर्ण किंवा भरीव सरकारी आर्थिक मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संघटना

◾️खासगीकरण झालेल्या सार्वजनिक उपयोजितेच्या संस्था. उदा. वीज कंपन्या

◾️ अशा खासगी संस्था ज्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक सरकारी पाठबळ मिळते

✍कोण नाही?

◾️खासगी संस्था वा संघटना

◾️राजकीय पक्ष (यासंबंधीची याचिका न्यायप्रविष्ट)

चला जाणून घेऊ - दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

▪ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर SBI, IDBI तसेच PNB या बँकांचे थकीत कर्जे होणार वसूल

▪ पगारावर GST लावण्याचा कुठलाही इरादा नाही, अफवांवर केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाचे स्पष्टीकरण

▪ ब्राझीलचे अध्यक्ष जाएर बोल्सोनारो यांना भारताच्या येत्या प्रजासत्ताक दिनासाठी नरेंद्र मोदींकडून निमंत्रण

▪ गाझा पट्टीतील धुमश्चक्रीची अखेर; इस्रायल सरकार आणि इस्लामिक जिहाद ग्रुप यांच्यात युद्धबंदी करार

▪ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

▪ युतीतील सत्तावाटपाच्या चर्चेबाबत अमित शहांनी सांगितलेलेच अंतिम सत्य; आशिष शेलारांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

▪ राफेलसाठी जुलै 2018 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात जाणीवपूर्वक दुरुस्ती; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर आरोप

▪ टिकटॉकला टक्कर देण्यासाठी इंस्टाग्रामचे केले 'रिल्स' नावाचे वैशिष्ट्यपूर्ण फिचर लॉंच

▪ बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, दिवसअखेर 6 बाद 493 धावा

▪ सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असणारा 'विक्की वेलिंगकर' चित्रपट 6 डिसेंबरला होणार प्रदर्शित

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

     कोणी कोणास हसू नये

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) अनिश्चित सर्वनाम    4) आत्मवाचक सर्वनाम

उत्तर :- 3

2) ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द .................. आहे.

   1) सार्वनामिक विशेषण    2) क्रियापद    3) नाम    4) अव्यय

उत्तर :- 1

3) ‘तो रडता रडता थांबला’, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विशेषण      2) शब्दयोगी अव्यय 
   3) केवलप्रयोगी अव्यय    4) कृदन्त

उत्तर :- 4

4) पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. - मोठयाने ओरडू नकोस.

   1) नामसाधित क्रियाविशेषण अव्यय    2) विशेषणसाधित क्रियाविशेषण अव्यय
   3) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय    4) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 2

5) योग्य विधाने निवडा.

   अ) शुध्द शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून येतात.
   ब) शुध्द शब्दयोगी अव्यय लागणा-या नामाचे सामान्यरूप होते.

   1) दोन्ही योग्य    2) फक्त अ योग्य    3) फक्त ब योग्य    4) अ व ब अयोग्य

उत्तर :- 2

6) खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

    ‘माईंनी खूप त्रास काढला, म्हणून तर आता ते सुखात जगताहेत.’

   1) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय      2) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    4) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

7) यवं, फक्कड, खाशी, छान, वाहवा, भले – यापैकी किती विरोधीदर्शक अव्यये आहेत.

   1) पाच      2) वरील सर्व      3) तीन      4) चार

उत्तर :- 2

8) वेदश्री चित्रे काढीत आहे – काळ ओळखा.

   1) अपूर्ण वर्तमानकाळ  2) पूर्ण वर्तमानकाळ    3) रीती वर्तमानकाळ  4) उद्देश्य वर्तमानकाळ

उत्तर :- 1

9) पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता ?

   1) सुंदर    2) कडू        3) रानटी      4) शहाणा

उत्तर :- 4

10) आंबे – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) आंबा    2) आंबे        3) आंबी      4) आंबू

उत्तर :- 1

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक मासिक घट झाली: CEA

🔰केंद्रीय वीज प्राधिकरणाचे विजेची मागणी संदर्भातला मासिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर 2019 या महिन्यात भारताच्या विजेची मागणीत 13.2 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे, जी की गेल्या 12 वर्षांच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात वेगाने झालेली मासिक घट आहे.

🔰आशिया खंडातली तिसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असलेल्या भारतातली वाढती मंदी ही आकडेवारी दर्शविते.

🔴आकडेवारीनुसार दिसून आलेल्या ठळक बाबी :-

🔰महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या मोठ्या औद्योगिक राज्यांमध्ये विजेच्या मागणीत घट झाली. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्रातली विजेची मागणी 22.4 टक्क्यांनी तर गुजरातमध्ये 18.8 टक्क्यांनी घटली.

🔰देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील चार छोट्या राज्यांना वगळता सर्व प्रदेशात विजेच्या मागणीत घट झाली आहे.

🔰सप्टेंबर 2019 मध्ये भारतामधल्या पायाभूत सुविधांचे उत्पन्न 5.2 टक्क्यांपर्यंत घसरले आहे, जे की गेल्या 14 वर्षातले सर्वाधिक कमी आहे.

🔰उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये वीज मागणी घटल्याचे दिसून आले आहे. मध्यप्रदेशामध्ये विजेची मागणी एक चतुर्थांशने तर उत्तरप्रदेशामध्ये 8.3 टक्क्यांनी कमी झाली.

🔰भारत सरकारचे केंद्रीय वीज प्राधिकरण (CEA) ही संस्था मूळत: 1948 सालाच्या कायद्याच्या अंतर्गत स्थापन केली गेलेली संस्था आहे, ज्याची 2003 साली पुनर्स्थापना केली गेली. सन 1951 मध्ये ते अर्धवेळ मंडळ म्हणून नेमण्यात आले आणि सन 1975 मध्ये ते पूर्णवेळ मंडळ म्हणून नेमण्यात आले.

आंध्र प्रदेश सरकारने ‘नाडू-नेडू’ योजना सुरू केली

👉 आंध्र प्रदेश सरकारने ‘नाडू-नेडू’ कार्यक्रम सुरू केला आहे. राज्य शासकीय शाळांमध्ये इयत्ता १ ते 6 पर्यंत इंग्रजी माध्यमाची ओळख करुन देण्याचे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.
👉  पहिल्या टप्प्यात ही योजना 15715 शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत सर्व शाळांचा समावेश 12,000 कोटी रुपयांच्या बजेटसह होईल.

👉 सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाकडे जाण्याचा निर्णय समाजातील उपेक्षित वर्गाच्या उन्नतीसाठी घेण्यात आला आहे.

Super -30 Questions 15 Oct 2019

1.  कुणाची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते?
✅.  सरदार वल्लभभाई पटेल

2.  सौदी अरब भारताचे रुपे कार्ड सादर करणारा पश्चिम आशियातला कितवा देश आहे?
✅.  तिसरा

3.   'प्राकृतिक खेती कौशल किसान’ योजना कोणत्या राज्याने तयार केली?
✅.   हिमाचल प्रदेश

4.   कोणत्या कलमान्वये सरन्यायाधीशांच्या नियुक्तीपत्रावर भारताचे राष्ट्रपती स्वाक्षरी करतात?
✅.   कलम 126

5.  आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन कधी साजरा केला जातो?
✅.  29 ऑक्टोबर

6.  झोझो अजिंक्यपद ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
✅.   गोल्फ

7.   ‘मानव-तस्करीविरोधी’ एककांची स्थापना करण्यासाठी केंद्रसरकार कोणत्या निधीची मदत घेणार आहे?
✅.   निर्भया निधी

8.   ISROच्या सहकार्याने कोणती संस्था अंतराळ तंत्रज्ञान कक्षाची स्थापना करणार आहे?
✅.  : IIT दिल्ली

9.   कोल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
✅.  अनिल कुमार झा

10.   ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे?
✅.   रजनीकांत

11.  जीनोम सिक्वेंसींगसाठी CSIR द्वारे कोणता प्रकल्प राबवविला जात आहे?
✅.  इंडिजेन

12 यावर्षीचा ‘भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI), गोवा’ या कार्यक्रमाची कितवी आवृत्ती असेल?
✅. 50 वी

13बीरेंदर सिंग यादव हे कोणत्या देशासाठी नवनियुक्त भारतीय राजदूत आहेत?
✅.   इराक

14.  यावर्षीचा ‘दक्षता जागृती सप्ताह’ कोणत्या कालावधीत पाळला जाणार आहे?
✅.   28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019

15.  भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त कोण आहेत?
✅.  शरद कुमार

16. लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली?
✅.  राधाकृष्ण माथूर

17. कोणत्या राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’ जाहीर केली?
✅.  उत्तरप्रदेश

18.  “सखरोव्ह मानवाधिकार पारितोषिक 2019’ हा पुरस्कार कुणाला भेटला?
✅.   इलहम तोहती

19.   ‘भारत-भुटान-नेपाळ ट्रान्स-बॉर्डर कंजर्व्हेशन पीस पार्क’ हा कोणत्या उद्यानाचा विस्तार आहे?
✅. मानस राष्ट्रीय उद्यान

20.  जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) भारत केव्हा पोलिओमुक्त म्हणून घोषित झाला?
✅. सन 2014

21. ब्राझिलिया येथे कितवी BRICS शिखर परिषद पार पडत आहे?
✅.  11 वी

22.  'जागतिक न्यूमोनिया दिन' कधी साजरा केला जातो?
✅.   12 नोव्हेंबर

23.  ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ कधी साजरा केला जातो?
✅.  11 नोव्हेंबर

24.   जगातले पहिले 'कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस पोर्ट टर्मिनल' कुठे उभारले जाणार आहे?
✅.  गुजरात

25.   देशात चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्याने उभारण्यास कोणत्या प्रकल्पांतर्गत मान्यता मिळाली आहे?
✅. मेक इन इंडिया

26.  “औद्योगिक उत्पादन निर्देशांक” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
✅.  केंद्रीय सांख्यिकी संस्था

27.   “ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
✅.  क्लायमेट ट्रान्सपेरन्सी

28.  ‘सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’ कधी पाळला जातो?
✅.   12 नोव्हेंबर

29.   पाचवी ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस’ प्रदर्शनी कुठे भरणार आहे?
✅.   बेंगळुरू

30.   चॅलेन्जर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराचे विजेतेपद कोणी पटकावले?
✅.  पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन

Latest post

चालू घडामोडी :- 26 जानेवारी 2024

◆ यंदा देशातील एकूण 1132 पोलिस, अग्नीशामक सेवा, ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर झाली आहेत. ◆ महाराष्ट्र पोलीस दलाला एकून 62 ...