Saturday 25 July 2020

Online Test Series

महाराष्ट्रातील पहिले----

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 

➡️यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका

➡️मुंबई

महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र 

➡️मुंबई (1927)

महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र

➡️मुंबई (2 ऑक्टोबर 1972)

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण

➡️गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य

➡️कर्नाळा (रायगड)

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र 

➡️खोपोली (रायगड)

महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प

➡️तारापुर

महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ 

➡️मुंबई (1957)

महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ

➡️राहुरी (1968 जि. अहमदनगर)

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना

➡️प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी 

➡️कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी

महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे 

➡️देवगड (जि. सिंधुदुर्ग)

महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र 

➡️आर्वी (पुणे)

महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प 

➡️चंद्रपुर

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक 

➡️दर्पण (1832)

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक

➡️दिग्दर्शन (1840)

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र 

➡️ज्ञानप्रकाश (1904)

महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा

➡️पुणे (1848)

महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा 

➡️सातारा (1961)

महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी 

➡️मुंबई (1854)

महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल

➡️ताजमहाल, मुंबई

एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति

➡️श्री. सुरेन्द्र चव्हाण

भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति 

➡️महर्षि धोंडो केशव कर्वे

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति

➡️आचार्य विनोबा भावे

महाराष्टाचे पहिले रँग्लर

➡️रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर 

➡️आनंदीबाई जोशी

महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा

➡️वर्धा जिल्हा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष 

➡️न्यायमूर्ती महादेव रानडे

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) 

➡️मुंबई ते ठाणे (16 एप्रिल1853 )

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) 

➡️मुंबई ते कुर्ला (1925)

महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक 

➡️सुरेखा भोसले (सातारा)

महाराष्ट्रातील पहिला  संपूर्ण साक्षर जिल्हा

➡️सिंधुदुर्ग

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा

➡️कुसुमावती देशपांडे

महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त 

➡️डॉ. सुरेश जोशी

महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग 

➡️वडूज

ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट

➡️श्वास (2004)

राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट 

➡️श्वास

राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट

➡️श्यामची आई

भूगोल प्रश्नसंच

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र
______________________________________

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना

•देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

•देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

•देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

•देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

•देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

•देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

•देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

•देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

•देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

•देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

•देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

•देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

•देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

•देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

•देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

•देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

•देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

•देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

•देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

•देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

•देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

•देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

•देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

•देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

•देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

•देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

•देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

•देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

•देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

•देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

•देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

•देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

•देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

•देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

•देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

•देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

•देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

•देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

•देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

•देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

•देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

•देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

•देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

•देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

•देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा

हे नक्की वाचा :- 'या' 10 मूलभूत कर्तव्यांचा भारतीय घटनेत समावेश

स्वर्णसिंह कमिटीच्या शिफारशिनुसार खालील 10 मूलभूत कर्तव्यांचा भारतीय घटनेत समावेश करण्यात आलेला आहे. त्यावर एक नजर...

*1.* घटनेतील आदर्शचा, राष्ट्रीय ध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणे.

*2.* स्वातंत्र्य लढ्यापासून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे अनुपालन करणे.

*3.* भारतीय सार्वभौमत्व व एकात्मता यांचे संरक्षण करणे.

*4.* राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्राला गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवेस जाणे.

*5.* सर्व भारतीयांमध्ये एकात्मता बंधुभाव निर्माण करणे.

*6.* जंगल, सरोवरे, नद्या, तळे, वन्य प्राणी यासारख्या नैसर्गिक देणग्यांचे संरक्षण करणे.

*7.* आपल्या संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे.

*8.* शास्त्रीय दृष्टीकोन, मानवता व अभ्यासूवृत्ती यांची वाढ करणे.

*9.* सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे.

*10.* व्यक्तीगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेने वाटचाल करणे.

अरुण कुमार: आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या सुरक्षा विभागाचे नवे उपाध्यक्ष.

🔰रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. UICच्या 96व्या महासभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

🔰ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे म्हणजेच जुलै 2022 ते जुलै 2024 पर्यंत ते पदावर असणार.

🔴आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) विषयी...

🔰आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) याची स्थापना 1922 साली झाली आणि त्याचे मुख्यालय फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या शहरात आहे. संघाची उद्दिष्टे तीन स्तरांनुसार परिभाषित केली गेली आहेत; ते आहेत –धोरणात्मक, तांत्रिक/व्यवसायिक आणि समर्थन सेवा.

🔰वर्तमानात इटलीचे जियान्लुइगी कॅस्टेली संघाचे अध्यक्ष आहेत आणि फ्रान्सिओस डेवेन्न महासंचालक आहेत.

🔰UIC संघाचा सुरक्षा विभाग रेल्वे क्षेत्रातली मालमत्ता, स्थापना आणि सुरक्षा यांच्या संबंधित सर्व बाबींसाठी विश्लेषण आणि धोरणे निश्चित करते आणि ते विकसित करण्याचे अधिकार ठेवतो. या व्यासपीठाद्वारे सदस्यांमध्ये माहितीची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाते.

75 वर्षांत प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) भरणार

🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) आयोजित केली जाणार आहे.

🔰सत्रासाठी सदस्य राष्ट्रांचे प्रमुख त्यांचे पूर्व-रेकॉर्ड केलेले भाषण संघटनेकडे पाठवतील, जे सभेदरम्यान चालवले जाणार आहेत. सभेला 21 सप्टेंबर 2020 पासून सुरुवात होणार आहे.

🔴संयुक्त राष्ट्रसंघ (UN)  विषयी...

🔰आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.

🔰1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.

🔰संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

🔰संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.

🔰UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.

🔰संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारीपद‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यांच्याकडे आहे.

ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र

🔰भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.

🔰'ध्रुवास्‍त्र' क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली. ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.

🔴ठळक वैशिष्ट्ये....

🔰ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राचा वापर भारतीय भुदलाकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत तसेच भूमीवरून केला जाऊ शकतो.

🔰या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.

🔰हे स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.

🔰या क्षेपणास्त्राची लांबी 1.9 मीटर आहे आणि व्यास 0.16 मीटर आहे. त्याचे वजन 45 किलोग्रॅम आहे.हे क्षेपणास्त्र 240 मीटर / सेकंद या गतीने प्रवास करू शकते.

🔰संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी तयार केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले.

🔰हेलिकॉप्टरमार्फत सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीला “हेलीकॉप्टर-लॉंच्ड NAG (HELINA / हेलीना)” असे नाव देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको

🔰राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतू सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत.

🔰प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचने पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.

🔰अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे, असे महत्वाचे निर्देश अमित देशमुख यांनी यावेळी दिले आहेत.

🔰पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा १५ सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.

मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती.

🔰उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र 2020 हे वर्ष खूपच चांगलं ठरताना दिसतंय. लॉकडाउनमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली.
त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, आणि आता मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.

🔰अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले  आहेत.प्रसिद्ध बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

🔰रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अमेरिकी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 75 अब्ज डॉलर झाली आहे.

भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान.

🔰सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका 59 वर्षीय परिचारिकेला (नर्स) राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

🔰करोना महामारीमध्ये रुग्णांची सेवा केल्याबद्दल परिचारिकांसाठी असलेल्या राष्ट्रपती पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

🔰सिंगापूरमध्ये करोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पाच परिचारिकांना हा पुरस्कार देण्यात आला असून यात कला नारायणसामी यांचाही समावेश आहे.

🔰सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत मंगळवारी माहिती देण्यात आली.

🔰सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांचं हस्ताक्षर असलेल्या प्रमाणपत्रासह एक ट्रॉफी आणि 10,000 एसजीडी (सिंगापूरचं चलन) देण्यात आले.

व्योमेशचंद्र बॅनर्जी (1844 ते 1906)


🔸28 डिसेंबर 1885 रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज (बॉम्बे) या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते...
🔸जन्म कलकत्त्यातील एका ब्राह्मण कुटुंबात...
🔸वडील गिरीशचंद्र बॅनर्जी हे कलकत्ता हायकोर्टात वकील...
🔸शिक्षण-कलकत्ता विश्वविद्यालयात...
🔸ते प्रथम कलकत्ता सुप्रीम कोर्ट मध्ये लिपिक...
🔸1864 मुंबईच्या जीजीभाई यांची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर शिक्षणासाठी लंडनला...
🔸1866 दादाभाई नौरोजींनी व्योमेशचंद्र बॅनर्जींच्या (सचिव) सहकार्याने लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन संस्था स्थापन...
🔸1868 बॅरिस्टर बनवून भारतात परतले व कलकत्ता हायकोर्टात नावाजलेले वकील बनले...
🔸लंडनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स चे निवडणूक लढवणारे पहिले भारतीय ठरले होते(माञ पराभूत)...
🔸पहिल्या अधिवेशन सोबतच 1892 च्या अलाहाबाद अधिवेशनाचे देखील अध्यक्ष राहिले...
🔸1893 साली दादाभाई नौरोजी,व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि बद्रुद्दिन तय्यबजी द्वारा इंग्लंडमध्ये 'Indian Parliamentary Committee' ची स्थापना...
🔸त्यांनी देशात देशभक्ती जागृत करण्यासाठी 'शारदा उत्सवा'ची सुरुवात केली...
🔸यांचे तसेच गांधीजींचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले होते...
🔸21 जूलै 1906 लंडन येथे निधन...

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती


आसाम -  गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

गुजरात -  भिल्ल

झारखंड -  गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

त्रिपुरा -  चकमा, लुसाई

उत्तरांचल -  भुतिया

केरळ -  मोपला, उरली

छत्तीसगड -  कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

नागालँड -  नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

आंध्र प्रदेश-  कोळम, चेंचू

पश्चिम बंगाल -  संथाल, ओरान

महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली

मेघालय-  गारो, खासी, जैतिया

सिक्कीम- लेपचा

तामिळनाडू- तोडा, कोट, बदगा

==============

पिट्स इंडिया ऍक्ट

🔰 पंतप्रधान:-विल्यम पिट

📌 1773 च्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पास

📌 तरतुदी:-

📌 कंपनीचे राजकीय व व्यापारी कार्य वेगवेगळे केले गेले

📌  सहा सदस्य बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन

📌 मुंबई व मद्रास पूर्णपणे गव्हर्नर जनरल च्या नियंत्रण खाली आले

📌 बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय कार्य पाहणार

📌 बंगाल गव्हर्नर परिषद सदस्य संख्या 3 केली गेली

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...