Saturday 4 May 2024

महत्वाचे ऑपरेशन

1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2) ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू.

4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5) ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 

6) ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9) ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली.

चालू घडामोडी :- 04 मे 2024

◆ आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन दरवर्षी 4 मे रोजी साजरा केला जातो.

◆ ई-वाहन खरेदी करणाऱ्यामध्ये देशात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

◆ अनोळखी कॉलरचे नाव दिसण्यासाठी 'ट्राय' नवीन नियम आणणार आहे.

◆ चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने गोळा करून ते वैज्ञानिक अभ्यासासाठी पृथ्वीवर आणणारी चीनची 'चांग-ई-६' ही चंद्र तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

◆ युक्रेनने जगातील पहिली एआय प्रवक्ता निर्माण केली असून, ती नियमितपणे माध्यमांना व्हिडीओंच्या माध्यमातून माहिती देणार आहे.

◆ पूर्णिमा देवी बर्मन यांना 'ग्रीन ऑस्कर' व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 मिळाला आहे.

◆ दुबई येथे पार पडलेल्या पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये युएई या देशाने सर्वाधिक 286 पदके जिंकली आहेत.

◆ सौदी अरेबिया हा देश भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे.

◆ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशांच्या यादीत भारत 159 व्या स्थानावर आहे.

◆ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार नॉर्वे हा देश प्रथम स्थानावर आहे.

◆ पॅलेस्टाईन या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे.

◆ जेरेमिया मानेले यांची सोलोमन द्वीप या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम [HIMARS(रेंज-300km] रशिया देशाची आहे.

◆ 4 मे हा दिवस 1999 पासून आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...