स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
27 December 2020
रोगांचे वर्गीकरण
संसर्गजन्य
इन्फ्लुएंजा,
क्षय,
नायटा,
अमांश,
घटसर्प,
पोलियो.
असंसर्गजन्य
मधुमेह (डायबिटीस),
कर्करोग.
विषाणूंपासून होणारे
देवी,
इन्फ्ल्युएंझा,
पोलिओ,
कांजिण्या,
काला आजार,
जैपनीज एन्सेफेलाइटिस
जिवाणूंपासून होणारे
कुष्ठरोग,
कॉलरा (पटकी),
न्यूमोनिया,
क्षय (टी. बी.)
दुषित पाण्यापासून
कॉलरा,
विषमज्वर,
अतिसार,
कावीळ,
जंत इत्यादी.
हवेतून पसरणारे
सर्दी,
इन्फ्ल्यूएंझा,
घटसर्प,
क्षय.
कीटकांमार्फत पसणारे
अतिसार
अमांश,
पटकी
मलेरिया,
हत्तीरोग,
नारू,
प्लेग
कवकांपासून होणारे
गजकर्ण,
चिखल्या.
क्षयरोग त्याची लक्षणे व उपचार
· हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो.
· या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी 24 मार्च 1882 रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.
· जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
· क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो.
· क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
📌क्षयरोगाचे प्रकार :
1. फुप्फुसाचा 2. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)
📌क्षयरोगाची लक्षणे :
1. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,
2. हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप
3. वजन कमी होणे
4. थुंकीतून रक्त पडणे
5. भूक मंदावणे इ.
क्षयरोगाचे निदान :
लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.
1. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.
2. 'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.
📌प्रतिबंधक लस -
0 ते 1 वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात.
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर
होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन 1992-93 मध्ये सुरू करण्यात आला.
📌क्षयरोग औषधोपचार :
सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.
1. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.
2. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)
भारतातील जागतिक वारसा स्थळे
भारताच्या नकाशावर युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने
★ भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत.
◆ ताज महाल
◆ खजुराहो मंदिर
◆ आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश
◆ फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदे
◆ जुना गोवा
◆ सांची स्तूप, मध्य प्रदेश
◆ खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश
◆ भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश
◆ चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
◆ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
◆ एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
◆ अजिंठा लेणी, महाराष्ट्र
◆ वेरूळ लेणी, महाराष्ट्र
◆ चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू
◆ महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु
◆ हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
◆ पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
◆ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
◆ मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
◆ केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
◆ कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओरिसा
◆ महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
◆ भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
◆ नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तरांचल
◆ कुतुब मिनार, दिल्ली
◆ लाल किल्ला, दिल्ली
◆ हुमायूनची कबर, दिल्ली
◆ सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
◆ नालंदा विद्यापीठ(महाविहार), बिहार
◆ खांगचेंडझोंगा राष्ट्रीय अभयारण्य, सिक्किम
◆ कैपिटल इमारत संकुल, चंडीगड़
भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-
१) रामसर करार -
वर्ष - १९७१
* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
* अमलात येण्याचे वर्ष - १९७५
* भारताने मान्य केला - १९८२
२) CITES -
वर्ष - १९७३
* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
*अमलात येण्याचे वर्ष - १९७६
* भारताने मान्य केला - १९८०
३) बोन करार -
वर्ष -१९७९
* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९८३
* भारताने मान्य केला -१९८३
४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५
* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
* भारताने मान्य केला - १९९१
५) बँसेल करार -
वर्ष - १९८९
* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
* अमलात येण्याचे वर्ष - १९९२
* भारताने मान्य केला - १९९
२६) UNFCCC -
वर्ष - १९९२
* हवामान बदल रोखणे
* अमलात येण्याचे वर्ष - १९९४
* भारताने मान्य केला - १९९३
७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७
* हरितवायू उत्सर्जनात घट
* अमलात येण्याचे वर्ष - २००५
* भारताने मान्य केला - २००२
८) CBD जैवविविधता करार -
वर्ष -१९९२
* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९९३
* भारताने मान्य वर्ष - १९९४
९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -वर्ष - २०००
* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
* अमलात येण्याचे वर्ष - २००३
* भारताने मान्य केला - २००३
१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४
* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
* अमलात येण्याचे वर्ष - १९९६
* भारताने मान्य केला - १९९६
११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८
* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००५
१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१
*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००६
मराठी व्याकरण
नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दासविशेषण असे म्हणतात.
उदा.
चांगली मुले
काळा कुत्रा
पाच टोप्या
विशेषण – चांगली, काळा, पाच
विशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या
(नक्की वाचा):
वाक्य व त्याचे प्रकार
विशेषणाचे प्रकार :
गुणवाचक विशेषण
संख्यावाचक विशेषण
सार्वनामिक विशेषण
1. गुणवाचक विशेषण :
नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात.
उदा.
हिरवे रान
शुभ्र ससा
निळे आकाश
2. संख्या विशेषण :
ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.
संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.
गणना वाचक संख्या विशेषण
क्रम वाचक संख्या विशेषण
आवृत्ती वाचक संख्या विशेषण
पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण
अनिश्चित संख्या विशेषण
1. गणना वाचक संख्या विशेषण :
ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणालागणनावाचक विशेषण असे म्हणतात
उदा.
दहा मुले
तेरा भाषा
एक तास
पन्नास रुपये
गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात
1. पूर्णाक वाचक – पाच, सहा, अठरा, बारा.
2. अपूर्णाक वाचक – पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.
3. साकल्य वाचक – पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.
2. क्रमवाचक संख्या विशेषण :
वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा.
पहिल दुकान
सातवा बंगला
पाचवे वर्ष
3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :
वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते त्यासआवृत्तिवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा.
तिप्पट मुले
दुप्पट रस्ता
दुहेरी रंग
4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :
जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषणअसे म्हणतात.
उदा.
मुलींनी पाच-पाच चा गट करा
प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा
5. अनिश्चित संख्या विशेषण :
✍️ ज्या विशेषणाव्दारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा.
काही मुले
थोडी जागा
भरपूर पाणी
3. सार्वनामिक विशेषण :
✍️ सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांनासार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
उदा.
हे झाड
ती मुलगी
तो पक्षी
✍️ मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो.
मी – माझा, माझी,
तू – तुझा, तो-त्याचा
आम्ही – आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा
हा – असा, असला, इतका, एवढा, अमका
तो – तसा, तसला, तितका, तेवढा, तमका
जो – जसा, जसला, जितका, जेवढा
कोण – कोणता, केवढा
पृथ्वीची अक्षीय गती
◆ पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला तिचा अक्ष व ज्या अक्षाभोवती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्याला भ्रमणाक्ष म्हणतात.
◆ भ्रमणाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला दिवस म्हणतात.
◆ अक्षीय गती ही पृथ्वीची दैनिक गती असून तिच्यामुळेच दिवस व रात्र होत असतात.
◆अक्षीय गतीमुळे विषुववृत्तावरील प्रत्येक बिंदू ताशी सु. १,६०० किमी. गतीने फिरत असतो आणि जसजसे ध्रुवावरील बिंदूची गती शून्य असते.
◆ अक्षीय गतीमुळे उत्तर गोलार्धामधील गतिशील वस्तू उजवीकडे विचलित होते; अशा प्रकारे चक्रवात हा अक्षीय गतीचा पुरावा आहे. मात्र फूको लंबक (जे. बी. एल्. फूको या फ्रेंच भौतिकीविज्ञांनी शोधून काढलेला लंबक) हा अक्षीय गतीचा पहिला दृश्य पुरावा आहे.
◆ पृथ्वीच्या अक्षीय गतीत पुढील तीन प्रकारचे बदल होत असतात व त्यांच्यामुळे दिवसाचा (दिवस व रात्र यांचा मिळून) कालावधीही बदलत असतो.
सर्वांधिक बिबटे असणारी राज्ये
🐆 मध्यप्रदेश (३४२१)
🐆 कर्नाटक (१७८३)
🐆 महाराष्ट्र (१६९०)
🐆 तमिळनाडू (८६८)
🐆 छत्तीसगड (८५२)
🐆 उत्तराखंड (८३९)
🐆 ओडिशा (७६०)
🐆 करळ (६५०)
🐆 आध्रप्रदेश (४९२)
🐆 राजस्थान (४७६)
🐆 तलंगणा (३३४)
🐆 उत्तरप्रदेश (३१६)
🐆 बिहार (९८)
🐆 गोवा (८६)
🐆 पश्चिम बंगाल (८३)
🐆 आसाम (४७)
🐆 झारखंड (४६)
🐆 अरुणाचल प्रदेश (११)
केरळमध्ये देशातले पहिले ‘जेंडर डेटा हब’ उभारले जाणार
यूएन विमेन या संघटनेच्या मदतीने देशातले पहिले ‘जेंडर डेटा हब’ याची स्थापना करण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे.
‘जेंडर डेटा हब’ म्हणजे यूएन विमेन या संघटनेच्यावतीने महिला सशक्तीकरणासाठी चालविले जाणारे उपक्रम राबविण्यासाठी उपलब्ध असलेले स्थायी ठिकाण होय.
‘जेंडर डेटा हब’चे कार्यक्षेत्र दक्षिण आशिया पुरता निश्चित केले गेले आहे. म्हणजेच त्याठिकाणी दक्षिण आशियातल्या महिलांसाठीच्या जेंडर पार्कसाठी क्षमता-निर्मिती आणि प्रकल्प विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची रचना केली जाणार.
केरळमध्ये स्त्री-पुरुष समानता आणि सशक्तीकरणाच्या दिशेने कार्य करण्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराने 2013 साली जेंडर पार्कची स्थापना करण्यात आली.
ते संशोधन, धोरण विश्लेषण, क्षमता विकास, पुरस्कार, सामाजिक आणि आर्थिक उपक्रम राबविण्याचे एक व्यासपीठ आहे.
ते स्त्री-पुरुष समानतेसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यामध्ये मदत करण्यास संबंधित हस्तक्षेप तयार करण्यासाठी कार्य करते.
‘युनायटेड नेशन्स एंटिटी फॉर जेंडर इक्वलिटी अँड द एम्पोवेरमेंट ऑफ विमेन’ किंवा ‘यूएन विमेन’ ही जागतिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची एकी संघटना आहे. त्याची स्थापना 2 जुलै 2010 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (अमेरिका) येथे आहे.
केरळमध्ये २१ वर्षीय युवतीचा महापौरपदाचा मार्ग मोकळा
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये तिरुअनंतपुरम महापालिकेच्या महापौरपदी आर्या राजेंद्रन या २१ वर्षीय युवतीची निवड झाल्यात जमा आहे, कारण नगरसेवकांच्या बैठकीत तिचे नाव मंजूर करण्यात आले असून आता केवळ माकपच्या राज्य शाखेचे शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
आर्या यांनी सहा दिवसांपूर्वी माकपच्या नगरसेविका म्हणून शपथ घेतली. सर्व काही सुरळीत पार पडले तर त्या महापौर होणार आहेत. अजूनही त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून आता त्या तिरुअनंतपुरमच्या सर्वात तरुण महापौर ठरतील.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुअनंतपुरम महापालिकेत माकपची सत्ता स्थापन झाली असून पक्षाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यात आर्या राजेंद्रन यांचे नाव महापौर पदासाठी सुचवण्यात आले.
महाराष्ट्रात भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते.
आर्या राजेंद्रन यांना अभिनंदनाचे अनेक संदेश आले असून त्या मुदावनमुक्कल या भागात भाडय़ाच्या घरात राहतात. त्यांनी सांगितले, की परिपक्वता व नेतृत्व गुण हे कुणाच्या वयावरून ठरवले जात नसतात. राजकारण पुढे नेणे व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणे ही आपली दोन उद्दिष्टे राहतील.
आर्या या माकप कार्यकर्ते के. राजेंद्रन यांच्या कन्या असून ते तारतंत्री आहेत. आई श्रीलता या एलआयसी प्रतिनिधी आहेत. आर्या या गणितात बीएस्सी करीत असून ऑल इंडिया सेंट्स महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत आहेत. कचरामुक्त शहरावर त्यांनी भर दिला आहे.
कम्युनिस्ट पक्ष
📌भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा १९३६ पासून काँग्रेसचाच एक भाग होता;
📌परंतु त्या पक्षाची शिस्त स्वीकारण्याची इच्छा नसल्यामुळे तो १९४५ मध्ये काँग्रेसबाहेर पडला.
📌 राष्ट्रीय चळवळीच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहिल्यामुळे या पक्षाचा भारतीय जनतेवर विशेष प्रभाव पडला नाही.
▪️ 1964 मध्ये हा पक्ष फुटला.
1)भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)
- रशिया समर्थन
- उजव्या आणि केंद्रीय मतप्रवाह चे समर्थन करणारा गट
- सध्याचा दर्जा (राष्ट्रीय पक्ष)
- निवडणूक चिन्ह (मक्या चे कणीस व विळा)
2)मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM)
- चीन समर्थन
- डाव्या मतप्रवाह चे समर्थन करणारा गट
- सध्याचा दर्जा (राष्ट्रीय पक्ष)
- निवडणूक चिन्ह (विळा हातोडा व तारा)
👉 आर्या या मार्क्सवादी कम्युनिस्ट कडून (CPM) नगरसेवक आहेत.
सारख्या नावाची तालुके
❇️तालुका व जिल्हा❇️
🔳आष्टी:-बीड-वर्धा
🔳शिरूर:-बीड-पुणे
🔳कळंब:-यवतमाळ-उस्मानाबाद
🔳खड:-पुणे-रत्नागिरी
🔳कर्जत:-नगर-रायगड
🔳मालेगाव:-वाशीम-नाशिक
🔳कारंजा:-वाशीम-वर्धा
🔳सलू:-वर्धा-परभणी
🔳नांदगाव:-नाशिक-अमरावती
भारतातील राज्ये व लोकनृत्य
🔷【आंध्रप्रदेश】----कुचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।
🔷【असम】----बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।
🔷【बिहार】---जाट– जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, बिदेसिया।
🔷【गुजरात】--गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।
🔷【हरियाणा】--झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।
🔷【हिमाचल प्रदेश】---झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी।
🔷【जम्मू और कश्मीर】---रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली।
🔷【कर्नाटक】---यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी।
,🔷【केरल】---कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।
,🔷【महाराष्ट्र】---लावणी, नकाटा, कोली, लेजिम, गाफा, दहीकला दसावतार या बोहादा।
🔷【ओडीशा】---ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ।
🔷【पश्चिम बंगाल】---काठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, मरासिया, महाल, कीरतन।
🔷【पंजाब】 ---भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामन, भांड, नकूला।
🔷【राजस्थान】--घूमर, चाकरी, गणगौर, झूलन लीला, झूमा, सुईसिनी, घपाल, कालबेलिया।
🔷【तमिलनाडु】---भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी।
🔷【उत्तर प्रदेश】---नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चाप्पेली, जैता।
🔷【उत्तराखंड】---गढ़वाली, कुंमायुनी, कजरी, रासलीला, छाप्पेली।
🔷【गोवा】---तरंगमेल, कोली, देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, मोडनी, समायी नृत्य, जगर, रणमाले, गोंफ, टून्नया मेल।
🔷【मध्यप्रदेश】---जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच।
🔷【छत्तीसगढ़】---गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।
🔷【झारखंड】---अलकप, कर्मा मुंडा, अग्नि, झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, हूंटा नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच।
🔷【अरुणाचल प्रदेश】---बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम।
🔷【मणिपुर】--डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला, खूबक इशेली, लोहू शाह।
🔷【मेघालय】---का शाद सुक मिनसेइम, नॉन्गरेम, लाहो।
🔷【मिजोरम】----छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, स्वलाकिन, च्वांगलाईज्वान, जंगतालम, पर लाम, सरलामकई/ सोलाकिया, लंगलम।
🔷【नगालैंड】----रंगमा, बांस नृत्य, जीलैंग, सूईरोलियंस, गीथिंगलिम, तिमांगनेतिन, हेतलईयूली।
🔷【त्रिपुरा】---होजागिरी
🔷【सिक्किम】---छू फाट नृत्य, सिकमारी, सिंघई चाम या स्नो लायन डांस, याक छाम, डेनजोंग नेनहा, ताशी यांगकू नृत्य, खूखूरी नाच, चुटके नाच, मारूनी नाच।
🔷【लक्ष्यद्वीप】 --लावा, कोलकाई, परीचाकली
Latest post
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी...
-
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी...
-
1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? उत्तर : भारत 2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले? उत्तर : चीन 3. अमेरिकेच्या कोणत्...
-
१. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०२६ हे वर्ष "महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष" म्हणून घोषित केले आहे. २. राष्ट्रीय कुटुंब आ...