Sunday 27 December 2020

राउरकेला (ओडिशा) येथे भारतातले सर्वात मोठे हॉकी मैदान उभारले जाणार.


🔶ओडिशामध्ये राउरकेला शहरात एक जागतिक दर्जाचे हॉकी मैदान उभारले जाणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी याविषयी घोषणा केली.


⭕️ ठळक बाबी...


🔶 भारतातले सर्वात मोठे हॉकी मैदान असणार. मैदानाची 20000 आसन क्षमता असणार.त्याठिकाणी पुरुषांचे ‘2023 FIH हॉकी विश्वचषक’ खेळवले जाणार आहेत.

मैदान 15 एकर एवढ्या भूमीवर तयार केले जाणार.


⭕️ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) विषयी


🔶आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) हे फील्ड हॉकी आणि इनडोर फिल्ड हॉकी खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे. त्याचे मुख्यालय लुसाने (स्वित्झर्लंड) येथे आहे. 


🔶FIH चे पाच खंडात एकूण 128 सदस्य संघ आहेत. FIH याच्यावतीने दर चार वर्षांनंतर पुरुष हॉकी विश्वचषक (1971 सालापासून) आणि महिला हॉकी विश्वचषक (1974 सालापासून) या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...