Wednesday 17 January 2024

चालू घडामोडी :- 17 जानेवारी 2024

🔷

◆ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने डिसेंबर 2023 साठी 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने महिला गटात जिंकला.

◆ दीप्ती शर्मा ही आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ ठरलेली दुसरी 'भारतीय महिला खेळाडू आहे.

◆ आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार यागोदर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (ऑक्टोबर 2022) हिने प्राप्त केला होता.

◆ पॅट कमिन्स(ऑस्ट्रेलिया) हा डिसेंबर 2023 साठी 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार विजेता ठरला.

◆ यजमान महाराष्ट्राने नाशिक येथे आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात विविध कला प्रकारात चमकदार कामगिरी करुन सांघिक विजेतेपद मिळवले.

◆ राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र प्रथम तर हरियाणा आणि केरळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

◆ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि हरदीप सिंग पुरी यांनी दावोस येथील WEF येथे विलीड लाउंजचे उद्घाटन केले.

◆ I-STEM (भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी सुविधा नकाशा) लॅब आणि सुविधांमध्ये प्रवेश प्रदान करून संपूर्ण भारतातील संशोधन सहयोग सुधारण्यासाठी बंगळुरुमध्ये समवेषा प्रकल्प सुरु करत आहे.

◆ थिरुवल्लुवर दिवस सामान्यतः तामिळनाडू राज्यात 15 किंवा 16 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

◆ उबरने अयोध्येत आपली इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा सेवा सुरू केली.

◆ CII नॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन रोड सेफ्टी नवी दिल्लीत पार पडली.

◆ मॅडिसन मार्थ या 22 वर्षीय यूएस एअर फोर्स ऑफिसरने मिस अमेरिकाचा किताब जिंकला.

◆ आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये, भारतीय नेमबाज योगेश सिंगने 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेत 573 गुणांसह सुवर्णपदक मिळवले.

◆ गांधी ए लाईफ इन थ्री कॅम्पेंन्स या पुस्तकाचे लेखक "एम जे अकबर" आहेत.

◆ केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थस्थान जीर्णोद्वार आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान प्रसाद योजनेत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिराचा सामावेश करण्यात आला आहे.

◆ जागतिक हवामन संस्थेच्या माहितीनुसार 2023 हे वर्षे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्षे ठरले आहे.

◆ लिओनेल मेस्सी या खेळाडूने फिफा सर्वोत्तम फुटबॉल 2023 चा पुरस्कार पटकावला आहे.

◆ फुटबॉल पटू लिओनेल मेस्सी ने आठव्यांदा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू चा पुरस्कार मिळवला आहे.

◆ Aitana Bonmati ही स्पेन या देशाची फुटबॉलपटू फिफाची 2023 ची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू ठरली आहे.

◆ गेल्या 35 वर्षात कोणत्याही ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीमध्ये मानांकित खेळाडूला पराभूत करणारा "सुमित नागल" हा पहिला भारतीय टेनिस खेळाडू ठरला आहे.

◆ देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प महाराष्ट्र या राज्यात होणार आहे.

◆ भारताचा टेनिस पटू सुमित नागल जागतिक टेनिस क्रमवारीत 137व्या क्रमांकावर आहे.

◆ PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच आंध्रप्रदेश राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर व अमली पदार्थांच्या अकदामीचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे असून उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

◆ महाराष्ट्रात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या काळात "रस्ते सुरुक्षा अभियान" राबविण्यात येणार आहे.

◆ आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 इंडोनेशिया या देशात पार पडली आहे.

◆ इंडोनेशिया मध्ये पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक 19 पदके जिंकली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...