Monday 22 June 2020

पुणे जिल्हा

जिल्हयाचे मुख्य ठिकाण – पुणे   
 
क्षेत्रफळ – 15,643 चौ.कि.मी.

लोकसंख्या – 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके – 14 – जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती.

सीमा – उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे.

पुणे जिल्हा विशेष

‘विधेचे माहेरघर’ असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली.

आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय.

राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. ‘पुण्य’ या शब्दावरून ‘पुणे’ हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते.

देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी
(1) श्री विघ्नेश्वर, ओझर
(2) श्री गणपती, राजणगांव
(3) गिरजात्मक, लेण्याद्री
(4) चिंतामणी, थेऊर
(5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे.

पुणे जिल्ह्यातील महत्वाची स्थळे

पुणे – मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. तसेच निगडी येथे ‘अप्पूघर‘ हे करमणुकीचे केंद्र आहे.

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील ‘अप्पूघर’ हे एक करमणुकीचे केंद्र आहे.

जुन्नर – जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता.

आळंदी – हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे.

देहू – हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.

चाकण – येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे.

लोणावळा – हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत.

जेजूरी – महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे.

आर्वी – आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.

राजगुरूनगर – हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे.

भीमाशंकर – येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे.

उरुळी कांचन – येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे.

दौंड – दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते.

वालचंदनगर – येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे.

सासवड – हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे.
सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.

भोर – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत.

वेल्हे – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत.

वढू – येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

पौंड – हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे.

पुणे जिल्हयाची वैशिष्ट्ये

पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते.

1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे.

ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र  पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते.

पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे नागरी संकुल आहे.

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे)

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे

राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे

राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे

भारतीय कृषि उधोग प्रतिष्ठान, उरळी कांचन (पुणे)

महाराष्ट्र विकास प्राधिकरण (यशदा), पुणे
सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला

फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट, पुणे
नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला (पुणे)

मराठी शुद्ध लेखनाचे नियम

अनुस्वार      

▫️ नाकापासून स्पष्टपणे उच्चार होणा-या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा.     

उदा.

डोंगर, सतरंजी, धंदा, कुंभार, अंधार, पंचमी. इ.

▫️ नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.       

उदा.

लोकांना, मुलांकडून, मित्रांचे, घोड्यांसाठी, त्यांना इ.         

▫️ आदरार्थी अनेकवचनी (बहुवचनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.     

उदा.

शिक्षकांनी, वडिलांनी, आजोबांनी, विवेकानंदांनी, रानडेंनी इ.

▫️ पुढील शब्दांवर अनुस्वार देऊ नये.         

जसे - का, की, केळे, करू, करताना, रवेळू, घरात, घरी, जाऊ, तेथे, तेव्हा, जेथे, जेव्हा, झोप, नाव, नवे, पाच, बसू, माती, लाकूड, शाळेत. (कारण - या शब्दात अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत नाही)

हस्व - दीर्घ अक्षरे

▫️ इ - कारान्त आणि 'उ’ - कारान्त शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.         

उदा -

मी, कवी, गुरू, बाहू जू, ऋषी, गती, वही, गहू पेरू, वाळू, शत्रू.      

परंतु असे शब्द जोडशब्दात आल्यास हा शेवटचा ई कार व ऊ कार हस्व होतात.         

उदा -

विद्यार्थिभांडार ऋषिकुमार, कविचरित्र, लघुकथा, शत्रुपक्ष इ.         

अपवाद - अति, आणि, नि, परंतु, तथापि, अद्यापि, यद्यपि, प्रभृति, यथामति, यथाशक्ति, इति, ही अवये हस्वातच लिहावी.     

▫️ सामासिक शब्दातील पहिले पद हस्व 'इ' कारान्त किंवा 'उ' कारान्त असल्यास ते हस्वातच राहते. आणि ते पद दीर्घ 'ई' कारान्त किंवा ऊ' कारान्त तत्सम शब्द असल्यास ते दीर्घातच राहते.   

उदा -

कविचरित्र, गतिमान, गुरुवर्य, पशुपक्षी, युक्तिवाद, लघुकथा, वायुपुत्र, शक्तिमान, हरिनाम, गौरीहर, वधूवर इ.

एकाक्षरी शब्द दीर्घ असावेत -

उदा -

मी, तू, ती, ही, जी, ऊ, थू, धू, पी, पू, शी इ.            

▫️ शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असल्यास उपान्त्य अक्षर हे बहुधा हस्व असते.       

उदा-

दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकिली, गरिबी, गुरुजी, माहिती, सुरू, हुतुतू इ.        

अपवाद - संस्कृत मधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.         

उदा -

परीक्षा, प्रतीक्षा, गीता, पूजा इ.

मराठी व्याकरण

▫️  स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.

▫️  संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.

▫️ नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.

▫️ अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.

▫️ शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.

▫️ सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.

▫️ शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.

▫️ साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.

▫️ शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.

▫️ प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.

▫️ धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

▫️  धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.

  ▫️टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

▫️ समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.

▫️ शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.

▫️ मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.

▫️ महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.

उपसर्ग जोडून येणारे शब्द


मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द  जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.

                (१) अ + चूक   = अचूक

                (२) अ + मर     = अमर

                (३) अ +पार    =अपार

                 (४) अ + नाथ  = अनाथ

                 (५) अ + पात्र    = अपात्र.

                 (६) अ  + चल   = अचल

                 (७) अ  + शांत  = अशांत

                 (८) अ  +ज्ञान   = अज्ञान

                 (९) अ  + माप   = अमाप

                (१०) अ  +शुभ   = अशुभ

                (११) अ + सत्य  = असत्य

                (१२) अ + बोल  = अबोल

                (१३)  अ + खंड  =अखंड

                (१४) अं  + धार   = अंधार

                (१५)  अ  + समान   = असमान

                (१६) अ  + स्थिर   = अस्थिर

                (१७) अ  + न्याय   = अन्याय
   
                (१८) अ + पचन    = अपचन

                (१९) अ  + जय    = अजय
    
                (२०) अ + प्रगत   = अप्रगत

                (२१) अ + मोल   = अमोल

                (२२)  अ + योग्य    = अयोग्य
    
                (२३)  कु  + रूप    = कुरूप

                (२४) सु  + काळ   = काळ 

                (२५) सु    + गंध    = सुगंध
   
                (२६) सु   + पुत्र     = सुपुत्र

                (२७)  सु   + मार्ग   = सुमार्ग
  
                (२८) सु   + यश    = सुयश

                (२९) सु  +  योग्य    = सुयोग्य

                (३०) वि  + नाश    = विनाश

                (३१) आ  + मरण   =

आमरण

                (३२) ना   + खूष    = खूष
         
                (३३) ना  + पसंत   = नापसंत

                (३४)  ना  + पास   = नापास

                (३५) ना  + बाद    = नाबाद

                (३६)  बिन  + चूक     =

बिनचूक

                (३७)  बिन  + पगारी  =

बिनपगारी

                (३८) गैर  + हजर    =

गैरहजर

                (३९) अप + मान   = अपमान

                (४०) अप + यश    अपयश

जागतिक बँकेचा “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट: जून 2020” अहवाल


🔘 जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाच्या अहवालाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.

▪️अहवालानुसार -

🔘 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.

🔘 महामारीमुळे झालेल्या नुकसानामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे. महामारीमुळे उद्भवलेली मंदी ही 1870 सालानंतर पहिल्यांदाच पाहिली गेली आहे.

🔘 2020 साली महामारीमुळे देशांतर्गत मागणी व पुरवठा, व्यापार आणि वित्तपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक क्रियाकलापांमध्ये सात टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

🔘 2020-21 या आर्थिक वर्षात उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था 2.5 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे, जे की गेल्या 60 वर्षांत प्रथमच पाहिले गेले आहे.

🔘 दरडोई उत्पन्नात 3.6 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे यावर्षी कोट्यवधी लोक अत्यंत दारिद्र्यात ढकलले जाणार आहेत.

🔘 सध्याच्या अंदाजानुसार महामारीच्या मंदीमुळे जागतिक दरडोई GDP मध्ये 6.2 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.

🔘 जागतिक व्यापार, पर्यटन, वस्तूंच्या निर्यातीवर आणि बाह्य वित्तपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या देशांना महामारीचा सर्वात मोठा फटका बसत आहे.

🔘 वर्ष 1870 नंतर 1876, 1885, 1893, 1908, 1914, 1917-21, 1930-32, 1938, 1945-46, 1975, 1982, 1991, 2009 आणि 2020 या वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेने 14 वेळा जागतिक मंदी अनुभवली आहे.

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार योजना


🔸गावात परतलेल्या स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने केंद्र सरकारने “गरीब कल्याण रोजगार योजना’ ही प्रमुख ग्रामीण रोजगार व सार्वजनिक पायाभूत सुविधा योजना देशात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 20 जून 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. बिहार राज्यातल्या तालीहार (बेल्दौल तालुका, खगारीया जिल्हा) या गावात या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

🔸सहा राज्यांच्या 116 जिल्ह्यांमधली गावे सामाईक सेवा केंद्र तसेच कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून या अभियानात सहभागी होणार आहेत.

अभियानाबाबत

🔸125 दिवसांच्या या अभियानाची अंमलबजावणी मिशन मोडवर केली जाणार आहे. त्यात अत्यंत केंद्रिकृत, निर्धारित लक्ष्य लक्षात घेऊन 25 विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून एकीकडे स्थलांतरित मजुरांसाठी रोजगारनिर्मिती करणे आणि दुसरीकडे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणे अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत.

🔸या अभियानासाठी, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांची निवड करण्यात आली असून या राज्यातल्या 116 जिल्ह्यांमध्ये 25,000 पेक्षा जास्त स्थलांतरित मजुरांना या योजनेच्या लाभ मिळू शकणार. यात 27 आकांक्षी जिल्ह्यांचाही समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन तृतीयांश स्थलांतरित मजूर समाविष्ट केले जाणार आहेत.

🔸या अभियानासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

🔸हे अभियान 12 मंत्रालये / विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारले जाणार आहे. यात ग्रामीण विकास मंत्रालय, पंचायतराज मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, खाण, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय तसेच सीमावर्ती रस्ते, दूरसंचार आणि कृषी या मंत्रालयांचा समावेश आहे.

‘सत्यभामा’: खनिकर्म क्षेत्रात प्रगतीसाठी संशोधन व विकास संदर्भात नवे व्यासपीठ

🕸केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते दिनांक 15 जून 2020 रोजी खाण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘सत्यभामा’ (खनिज प्रगतीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान योजना उर्फ SATYABHAMA) या संकेतस्थळ आधारित व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला.

🕸राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) आणि खाण माहिती विभागाद्वारे व्यासपीठाची रचना, विकास आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे.

🕸हे व्यासपीठ प्रकल्पांवर ऑनलाईन लक्ष ठेवण्यासोबतच वैज्ञानिक / संशोधकांकडून सादर केलेले संशोधनाचे प्रस्ताव आणि त्यासाठी दिलेला निधी/अनुदान वापरण्यास परवानगी देते.

🕸संशोधक यावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकल्पांचे प्रगती अहवाल आणि अंतिम तांत्रिक अहवाल देखील सादर करू शकतात.

महत्त्वाचे प्रश्नसंच

▪️ “माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
✍उत्तर : भालचंद्र मुणगेकर

▪️ भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोण आहे?
✍उत्तर : करण बाजवा

▪️ सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
✍उत्तर : लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड

▪️ कोणत्या कंपनीच्या सहकार्याने "इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला?
✍उत्तर : मायक्रोसॉफ्ट

▪️ 'इनव्हिन्सिबल - ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर' शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✍उत्तर : तरुण विजय

▪️ ‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ कुणाला देण्यात आला?
✍उत्तर : प्राची साळवे

▪️ ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’मध्ये कोणत्या संस्थेला वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे?
✍उत्तर : नागरी उड्डयण महासंचालनालय आणि नागरी उड्डयण सुरक्षा विभाग

▪️ कोणत्या ठिकाणी ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ आयोजित करण्याचे नियोजित आहे?
✍उत्तर : टोकियो, जापान

▪️ “आफ्रिकन लायन” हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे?
✍उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका आणि मोरोक्को

▪️ कोणत्या ठिकाणांदरम्यान नवी सागरी रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे?
✍उत्तर : मुंबई आणि मांडवा

भारतीय दंड संहिता

भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाच्या लोकांवर गुन्हांबद्दल कारवाई करण्यासाठीच्या नियमांना भारतीय दंड संहिता असे म्हणतात. यालाच भारतीय दंड संहिता कायदा १८६० ही म्हटले जाते. ही मुख्य गुन्हेगारी कारवाई नियमावली आहे.

◾️निर्मिती संपादन करा

भारतीय दंड संहितेची निर्मिती ब्रिटीश कायद्यावर आधारलेली आहे. याची निर्मिती १८६० मध्ये लॉर्ड मेकॉलेने केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कायदा मंडळ स्थापन करण्यात आले. या कायदेमंडळाने मसुदा तयार केला व तो १८६२ ला लागू करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने याच संहितेचा वापर पाकिस्तान दंड संहिता म्हणून सुरू केला.

जगण्याचा हक्क

◾️( व्याख्या कलमे 10 ते 52 ) ( वाढीव शिक्षा कलम 75 )

कलम 10 :-पुरूष किवा स्त्री हया शब्दाचा अर्थ

कलम 11 :-व्यक्ती किवा पुरूष

कलम 14 :-शासनाचा सेवक

कलम 21 :-लोकसेवक

कलम 22 :-जंगम मालमत्ता

कलम 23 :-अन्यायाची प्राप्ती / अन्यायाचे नुकसान

कलम 24 :-लबाडीने

कलम 25 :-कपटाने

कलम 26 :-मानन्यास कारण

कलम 28 :–बनावट वस्तू तयार करणे (नकलीकरण)

कलम 29 :-दस्तऐवज

कलम 30 :-किंमतीचा दस्तऐवज / मूल्यवान रोखा

कलम 34 :-सामाईक इरादा

कलम 39 :-आपखुषीने / इच्छापुर्वक

कलम 40 :–अपराध / गुन्हा

कलम 44 :-क्षती / नुकसान / ईजा

कलम 52 :-इमानाने / प्रामाणिकपणे

कलम 75 :-वाढीव शिक्षा प्रकरण 12 ( खोटी नाणी व स्टॅम्प ) आणि प्रकरण 17 ( मालमत्ते संबंधीचे गुन्हे कलम 378 ते 462 ) याखाली पुर्वशिक्षा असता वाढीव शिक्षा

◾️प्रकरण 4 थे ( साधारण अपवाद )

कलम 76 :-गैरसमजुतीने केलेले कृत्य ( सरकारी नोकरास कायदयाचे संरक्षण ) कायद्याने बांधील असलेल्या सरकारी नोकराने गैरसमजुतीने केलेले कृत्य

कलम 79 :-कायदयाचे समर्थन असणा-य परंतु वस्तुस्थितीच्या चुकभूलीमुळे तसा पाठींबा असल्याचे समजणाच्या मणूष्याने केलेले कृत्य ( खाजगी इसमास कायदयाचे संरक्षण )

कलम 80 :-कायदेशीर कृत्य करित असतांना अपघाताने घडलेले कृत्य

कलम 81 :-गुन्हेगारी उद्देश नसतांना संभाव्य नूकसान टाळण्यासाठी व नुकसानीस प्रतिबंध करण्या साठी केलेले कृत्य

कलम 82 :-7 वर्षाहून कमी वयाच्या मुलाने केलेले कृत्य

कलम 83 :-7 वर्षापेक्षा जास्त व 12 पेक्षा कमी वयाच्या व प्रौढबुध्दी नसलेल्या मुलाचे कृत्य

कलम 84 :-वेडया मणुष्याने केलेले कृत्य 

कलम 85 :-स्वतःच्या इच्छेविरूध्द

चढविलेल्या नशेमुळे विचार करण्यास असमर्थ असलेल्या मणुष्याने केलेले कृत्य

कलम 86 :-ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किवा जाणिव आवश्यक असते असा अपराध ठरणारे कृत्य नशा केलेल्या मणुष्याने केले तर

कलम 90 :-भीतीने अगर गैरसमजुतीने दिलेली भ्रमीष्ठ व्यक्तीची किवा बालकाची संमती

कलम 94 :-धमकी देऊन एखात्याकडून करवून घेतलेले कृत्य

कलम 95 :-क्षुल्लक नुकसान असणारे कृत्य

कलम 96 :-खाजगी नात्याने बचाव करण्याच्या हक्कावरून केलेले कृत्य

कलम 97 :-शरीराचा व मालमत्तेचा खाजगी नात्याने बचाव करण्याचा हक्क

कलम 98 :-वेड्या माणसाने केलेल्या कृत्या पासुन वैयक्तीक संरक्षणाचा हक्क

कलम 99 :-ज्या कृत्यांचे विरूध्द वैयक्तीक संरक्षणाचा हक्क नाही अशी कृत्ये

कलम 100 :-शरीराचा वैयक्तीक संरक्षणाचा हक्क बजावतांना जीव केव्हा घेता येतो

कलम 101 :-मृत्यू शिवाय दुसरे एखादे नुकसान करण्याचा अधिकार

कलम 102 :-खाजगी नात्याने शरीराचा बचाव करण्याचा हक्क कधी उत्पन्न होतो आणि कधीपर्यंत असतो

कलम 103 :-मालमत्तेच्या वैयक्तीक संरक्षणाचा हक्क बजावतांना जीव केव्हा घेता येतो.

कलम 104 :-मृत्यू शिवाय दुसरे एखादे नुकसान करण्याचा अधिकार

कलम 105 :-खाजगी नात्याने मालाचा बचाव करण्याचा हक्क कधी उत्पन्न होतो आणि कधीपर्यंत असतो

कलम 106 :-जीव घेण्याच्या उद्देशाने अंगावर चालून आल्याने निरपराध मणुष्यास दूखापत होण्याचा धोका असता त्याविरूध्द वैयक्तिक संरक्षणाचा हक्क

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...