Monday 22 June 2020

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार योजना


🔸गावात परतलेल्या स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने केंद्र सरकारने “गरीब कल्याण रोजगार योजना’ ही प्रमुख ग्रामीण रोजगार व सार्वजनिक पायाभूत सुविधा योजना देशात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 20 जून 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. बिहार राज्यातल्या तालीहार (बेल्दौल तालुका, खगारीया जिल्हा) या गावात या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

🔸सहा राज्यांच्या 116 जिल्ह्यांमधली गावे सामाईक सेवा केंद्र तसेच कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून या अभियानात सहभागी होणार आहेत.

अभियानाबाबत

🔸125 दिवसांच्या या अभियानाची अंमलबजावणी मिशन मोडवर केली जाणार आहे. त्यात अत्यंत केंद्रिकृत, निर्धारित लक्ष्य लक्षात घेऊन 25 विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून एकीकडे स्थलांतरित मजुरांसाठी रोजगारनिर्मिती करणे आणि दुसरीकडे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणे अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत.

🔸या अभियानासाठी, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांची निवड करण्यात आली असून या राज्यातल्या 116 जिल्ह्यांमध्ये 25,000 पेक्षा जास्त स्थलांतरित मजुरांना या योजनेच्या लाभ मिळू शकणार. यात 27 आकांक्षी जिल्ह्यांचाही समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन तृतीयांश स्थलांतरित मजूर समाविष्ट केले जाणार आहेत.

🔸या अभियानासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

🔸हे अभियान 12 मंत्रालये / विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारले जाणार आहे. यात ग्रामीण विकास मंत्रालय, पंचायतराज मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, खाण, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय तसेच सीमावर्ती रस्ते, दूरसंचार आणि कृषी या मंत्रालयांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...