Tuesday 23 January 2024

चालू घडामोडी :- 23 जानेवारी 2024

◆ स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अंतराळयानाच्या यशस्वी उपयोजनासह चंद्रावर सॉफ्ट लँडिंग मिळवणारा जपान हा 5 वा देश ठरला आहे.

◆ मनसुख मांडविया यांनी राजकोटमध्ये कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी केली.

◆ आशिया ऑलिम्पिक शॉटगन क्वालिफायरमध्ये रायजा-गुजोंत जोडीने कांस्यपदक मिळवले.

◆ जैसलमेर 22-24 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या वार्षिक डेझर्ट फेस्टिव्हलची तयारी करत आहे. [थीम :- "वाळवंटाकडे परत"]

◆ भारतीय धावपटू मानसिंग आशियाई मॅरेथॉन विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय ठरला आहे.

◆ संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78 व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस पाच दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार रवी शास्त्री यांना जाहीर झाला आहे.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शुभमन गिल ची निवड केली आहे.

◆ 23 जानेवारी हा दिवस भारतात पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ भारतात 23 जानेवारी हा दिवस 'सुभाष चंद्र बोस' यांच्या सन्मानार्थ पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ एशियन मॅरॉथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये मान सिंह भारतीय धावपटू ने सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ एशियन मॅरॉथॉन चॅम्पियनशिप 2024 हाँगकाँग देशात आयोजित करण्यात आली होती.

◆ भारत आणि किर्गिस्थान यांच्यात हिमाचल प्रदेश राज्यात खंजर 11 हा युद्ध सराव आयोजीत करण्यात आला आहे.

◆ उत्तरप्रदेश राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो.

◆ हिपॅटायटीस A या रोगावरील देशातील पहिली स्वदेशी लस 'हेविश्योर' ही हैद्राबाद ठिकाणच्या इंडियन immunological Ltd ने विकसित केली आहे.

◆ बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांना मरोणत्तर भारतरत्न जाहीर.

◆ तलाठी भरतीचे 23 जिल्ह्यांचे निकाल जाहीर

चालू घडामोडी :- 22 जानेवारी 2024

◆ असोसिएशन ऑफ स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या केंद्रीय संस्थेमार्फत देशात प्रथमच 24 जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

◆ महाराष्ट्र राज्य पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER मध्ये देशांत 8व्या क्रमांकावर आहे.

◆ भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक चंदीगड येथे आहे.

◆ LIC ने शुभारंभ केलेल्या जीवन धारा-2  पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी 20 वर्षे वयाची अट आहे.

◆ इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत "सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी" या भारताच्या बॅडमिंटन जोडीने उपविजेतेपद पटकावले आहे.

◆ इंडीया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद चीन या देशाच्या 'शा युकी' ने पटकावले.

◆ बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.

◆ अयोध्या येथे श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्ताने 19 लाख दिवे लावण्यात येणार आहेत.

◆ टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2024 मध्ये पहिले तीन क्रमांक इथोपिया या देशाच्या धावपटूंनी पटकावले.

◆ मुंबई मध्ये आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2024 चे हे 19वे वर्ष आहे.

◆ भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प सुरत येथे स्थापन करण्यात आला आहे.

◆ केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी देशातून वस्तू व सेवांची निर्यातीत 0.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

◆ प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात पर्यटन मंत्रालय व्दारे "भारत पर्व" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

◆ केंद्रीय पर्यटन मंत्रालया द्वारा 23 ते 31 जानेवारी कालावधीत देशात भारत पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ 50 वा कुर्बी युवा महोत्सव आसाम राज्यात आयोजित करण्यात आला होता.

◆ अयोध्या येथे उभारण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुकलेच्या "नगाडा" शैलीतील आहे.

◆ अयोध्या मध्ये राम मंदिरा मध्ये स्थापन करण्यात येणारी रामाची मूर्ती बनविणारे अरुण योगीराज कर्नाटक राज्याशी संबधित आहेत.

◆ अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 या दिवशी होत आहे.

◆ 2024 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम "विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी" ही आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...