१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश
Friday, 27 August 2021
लष्करी सराव(समविष्ट देश ):-
भारतातील सर्वात मोठे
Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?
-- राजस्थान
Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?
-- उत्तरप्रदेश
Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?
-- मुंबई ( महाराष्ट्र )
Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?
-- आग्रा
Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?
-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )
Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?
-- थर ( राजस्थान )
Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?
-- भारतरत्न
Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?
-- परमवीर चक्र
Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?
--रामेश्वर मंदिर
Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?
-- सेंट कथेड्रल, गोवा
Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?
-- सुवर्णमंदिर ,अमृतसर
Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?
-- जामा म्हशजीद
Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?
-- चिलका सरोवर ( ओरिसा )
🔹महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
A. 200.60 लाख हेक्टर
B. 207.60 लाख हेक्टर
C. 307.70 लाख हेक्टर✔️✔️
D. 318.60 लाख हेक्टर
🔹कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले.
A. 513 ✔️✔️
B. 213
C. 102
D. 302
🔹 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?
A. तेरणा
B. प्रवरा
C. मांजरा
D. भातसा ✔️✔️
🔹___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
A. कांडला ✔️✔️
B. कोची
C. मांडवी
D. वरीलपैकी नाही
🔹जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे.
A. अजंठा लेणी ✔️✔️
B. कार्ले लेणी
C. पितळखोरा लेणी
D. बेडसा लेणी
🔹खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?
A. आंध्र प्रदेश ✔️✔️
B. महाराष्ट्
C. मध्य प्रदेश
D. गुजरात
🔹गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
A. अकोला
B. बुलढाणा
C. धुळे ✔️✔️
D. ठाणे
🔹2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. पुणे ✔️✔️
D. सोलापूर
🔹महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?
A. सह्याद्रि पर्वत ✔️✔️
B. सातपुडा पर्वत
C. निलगिरी पर्वत
D. अरवली पर्वत
🔹महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.
A. सायरस
B. ध्रुव
C. पूर्णिमा
D. अप्सरा✔️✔️
१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते✅✅✅
३) कमी होते
४) समान राहते
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅✅
४) मानवी प्राणी
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण✅✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव✅✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅✅
४) नाक
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅✅
३) साथीचे रोगविषयक
४) यापैकी नाही
विधानपरिषद स्थान
विधान परिषदेची जागा दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट भागात राजधानी मुंबईत आहे . अर्थसंकल्पीय अधिवेशन व पावसाळी अधिवेशन मुंबईत तर हिवाळी अधिवेशन सहाय्यक राजधानी नागपूर येथे आयोजित केले जाते .
विधानपरिषदेची रचना
विधानपरिषदेमध्ये than० पेक्षा कमी सदस्य किंवा विधानसभेच्या एकूण सदस्यांपैकी जास्तीत जास्त एक तृतीयांश सदस्यांचा समावेश असेल, जो या विभागात प्रदान केलेल्या पद्धतीने निवडला जाईल.
Members० सदस्य विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जातील
महाराष्ट्रातील सात प्रभागांमधून (मुंबई, अमरावती विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग आणि पुणे विभाग) पदवीधारकांमधून members सदस्य निवडले जातात.
महाराष्ट्रातील सात विभागांतील शिक्षकांमधून members सदस्य निवडले जातात (मुंबई, अमरावती विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग व पुणे विभाग)
महाराष्ट्रातील २१ प्रभागातून (मुंबई (२ जागा) आणि अहमदनगर, अकोला-कम-वाशिम-कम-बुलढाणा, अमरावती, औरंगाबाद-कम-जालना, भंडारा-गोंदिया) मधील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी २२ सदस्य निवडले गेले आहेत. , धुळे-कम-नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद-कम-लातूर-कम-बीड, परभणी-हिंगोली, पुणे, रायगड-कम-रत्नागिरी-कम-सिंधुदुर्ग, सांगली-कम-सातारा , सोलापूर, ठाणे-कम-पालघर, वर्धा-कम-चंद्रपूर-कम-गडचिरोली आणि यवतमाळ)
राज्यपालाद्वारे साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ आणि सामाजिक सेवाशास्त्र या विषयांबद्दल विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असणार्या १२ सदस्यांची नेमणूक
हे एक सतत घर आहे आणि विघटनास अधीन नाही. तथापि, त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दुसर्या वर्षी सेवानिवृत्त होतात आणि त्यांची जागा नवीन सदस्यांनी घेतली आहे. अशा सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विधान परिषदेचे सभासद त्याचे अध्यक्ष व उपसभापती निवडतात.
रक्त (Blood) 🔰
- रक्त हा लाल रक्त पेशी (आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स), पांढर्या रक्त पेशी (ल्युकोसाइट्स) आणि बिंबिका (प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स) यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे.
- रक्ताचा मुख्य घटक पाणी आहे. रक्त हा एकमेव द्रव उती आहे. रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते.
- हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.
- पांढर्या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते. पृष्ठ्वंशी प्राण्यांचे रक्त तांबड्या रंगाचे असते.
- संधिपाद प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनानासाठी हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन असते.
- कीटक आणि काहीं मृदुकाय प्राण्यामध्ये हिमोलिंफ नावाचा द्रव, प्राणवायू वहनाचे कार्य करतो. हिमोलिंफ बंद रक्तवाहिन्यामध्ये नसते. ते रक्तवाहिन्या आणि शरीर यांच्या मधल्या पोकळ्यांमधून वाहते.
- बहुतेक कीटकांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनासाठी हिमोग्लोबिन सारखा वाहक रेणू नसतो.
- रक्त हा संयोजी उतींचा द्रवरूप प्रकार आहे.
शुद्ध रक्ताचा रंग लाल भडक असून चव खारट असते.
- रक्त आम्लारी / अल्कलीधर्मी असून त्याचा सामू (pH) 7.35 ते 7.45 आहे. रक्त द्रवरूप तसेच स्थायूरुप घटकांचे बनलेले असते.
- रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा असे म्हणतात. रक्तातील स्थायूरुप भागाला रक्तपेशी असे म्हणतात.
जिवाणू
🔰 कॉलरा (cholera) 🔰
____________________________________
◾️ जिवाणू चे नाव - विब्रिओ कॉलरी
◾️ प्रसार - दूषित अन्न पाणी
◾️ मोठी अवयव - मोठी आतडे
◾️ लक्षणे - उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे
◾️ उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS)
◾️ लस - हाफकिन ची लस
ORS चे घटक
1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट
◾️ शिगेल्ला बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो
🔰 घटसर्प 🔰
____________________________________
◾️जिवाणू चे नाव - कॉनिऺबॅक्टेरियम डिप्थेरी.
◾️ प्रसार - हवेमार्फत द्रवबिंदू च्या स्वरूपात
◾️ अवयव - श्वसनसंस्था
◾️ लक्षणे - श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे घसा लाल होणे
◾️उपचार - पेनिसिलिन लस. DPT ( त्रिगुणी लस)
🔰 डांग्या खोकला. 🔰
____________________________________
◾️जिवाणू चे नाव - haemophilus pertusis
◾️ प्रसार - हवेमार्फत
◾️ अवयव - श्वसनसंस्था
◾️ लक्षणे - तीव्र खोकला छातीत दुखणे
◾️ उपचार - DPT (त्रिगुणी लस)
🔰 धनुर्वात (tetanus)🔰
____________________________________
◾️ जिवाणू चे नाव - काॅस्ट्रिडियम टिटॅनी
◾️ प्रसार - ओल्या जखमेतून
◾️अवयव - मध्यवर्ती चेतासंस्था
◾️लक्षणे - दातखिळी बसणे ताप तीव्र वेदना
◾️उपचार - DPT लस
🔰 न्युमोनिया. 🔰
____________________________________
◾️ जिवाणू चे नाव - डीप्लोकोकस न्युमोनी
◾️ प्रसार - हवेमार्फत
◾️अवयव ,- फुप्फुसावर सूज येणे
◾️ लक्षणे - छातीत दुखणे श्वसनासाठी त्रास
◾️ उपचार - औषध पेनिसिलीन
. 🔰 कुष्ठरोग 🔰
____________________________________
◾️ जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री
◾️ प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू
◾️ अवयव - परिघीय चेता संस्था
◾️ लक्षणे - बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे
◾️ उपचार - लस उपलब्ध नाही
विज्ञान - शोध व संशोधक ----
01) विमान – राईट बंधू
02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
03) रडार - टेलर व यंग
04) रेडिओ - जी. मार्कोनी
05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
06) थर्मामीटर - गॅलिलीयो
07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
08) विजेचा दिवा - एडिसन
09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स
10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
12) सायकल - मॅकमिलन
13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
16) ग्रामोफोन - एडिसन
17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
19) उत्क्रांतिवाद - डार्विन
20) भूमिती - युक्लीड
21) देवीची लस - जेन्नर
22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
23) अँटी रेबीज -लुई पाश्चर
24) इलेक्ट्रोन – थॉमसन
25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
26) न्यूट्रोन – चॅडविक
27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार
▪️ महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य
▪️ तामिळनाडू - भरतनाट्यम
▪️ करळ - कथकली
▪️ आध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
▪️ पजाब - भांगडा, गिद्धा
▪️ गजरात - गरबा, रास
▪️ ओरिसा - ओडिसी
▪️ जम्मू आणी काश्मीर - रौफ
▪️ आसाम - बिहू, जुमर नाच
▪️ उत्तरखंड - गर्वाली
▪️ मध्य प्रदेश - कर्मा, चार्कुला
▪️ मघालय - लाहो
▪️ कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
▪️ मिझोरम - खान्तुंम
▪️ गोवा - मंडो
▪️ मणिपूर - मणिपुरी
▪️ अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
▪️ झारखंड - कर्मा
▪️ छत्तीसगढ - पंथी
▪️ राजस्थान - घूमर
▪️ पश्चिम बंगाल - गंभीरा
▪️ उत्तर प्रदेश - कथक
वातावरण
पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.
1. तपांबर
भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.
हवेतील घटक घटकाचे प्रमाण
नायट्रोजन 78.03%
ऑक्सीजन 20.99%
कार्बडायक्साईड 00.03%
ऑरगॉनवायु 00.94%
हैड्रोजनवायु 00.01%
पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक 0.01%
एकूण हवा 100.00%.
2. तपस्तब्धी
भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.
3. स्थितांबर
तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.
ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.
मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.
4. आयनाबंर
मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.
इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.
एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.
5. बाहयांबर
आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.
भारताचे मानचिन्हे.
◾️ 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला..
◾️राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 या प्रमाणात असतो..
◾️ घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली..
◾️ जन गण मन हे गीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी रचले आहे..
◾️संविधान सभेने वंदेमातरम या गीतालासुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा बहाल केला आहे..
◾️ वंदेमातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे..
◾️भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून घेण्यात आले आहे..
◾️ या बोधचिन्हात मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते हे वाक्य अंतर्भूत करण्यात आले आहे..
📌 राष्ट्रीय नदी :- गंगा..
📌 राष्ट्रीय महाकाव्य :- गीता..
📌 राष्ट्रीय जलजीव :- गंगा डॉल्फिन..
📌 राष्ट्रीय फळ :- आंबा..
📌 राष्ट्रीय विरासत पशु :- हत्ती..
📌 राष्ट्रीय खेळ :- हॉकी..
📌 राष्ट्रीय वृक्ष :- वड..
📌 राष्ट्रीय पशु :- वाघ..
आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणजे काय ?👇 (NDM Act, 2005)
◾️आपत्ती म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी किंवा अन्य प्रकारची हानी संभवते. बाहेरील मदतीची आवश्यकता भासण्याइतपत तीव्रता असणारी बाब म्हणजे आपत्ती.
◾️आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय?
नैसर्गिक आपत्ती(Natural Calamities) मानव संसाधन (Human Resources), राष्ट्रीय संपत्ती( National Wealth),आणि अर्थव्यवस्था (Economy) संबधित कोणतीही आपत्ती आल्यानंतर अथवा आपत्ती येऊ नये म्हणून केलेली कार्यवाही म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीपूर्व काळासंबंधी आपत्ती प्रतिबंध यंत्रणा किंवा पूर्वतयारी तसेच नियोजन, संघटन, समन्वय व कार्यप्रणाली यांची योग्य अंमलबजावणी महत्वाची असते.
◾️आपत्ती व्यवस्थापन कायदा :-
भारतात १९९३ साली ओरिसा (ओडिशा)च्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून धोक्यांचा आणि त्यापासून उद्भवणाऱ्या आपत्तींचा सर्वंकष अभ्यास केला. तसेच भारताने आपत्तिदरम्यान मदतकार्यासाठी व्यवस्थापनातील सगळे विभाग, शास्त्रीय संशोधनातील संस्था, शिक्षण संस्था आणि सामान्य जनसमुदाय तसेच बचावकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड कळून चुकली.
◾️त्यानंतर संसदेत पारित झाल्यानंतर NDMA
👉२५ डिसेंबर २००५👈 साली राष्ट्रपतीने संमत केला. आपत्ती व्यवस्थापनाचे धोरण आणि आराखडा तयार करण्याची तरुतूद कायद्यात आहे.
◾️आपत्ती व्यवस्थापन कायदा कोण लागू करु शकतो?
कोणत्याही प्रकारची आपत्ती लागू करताना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरीय समितीचे प्रमुख आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतात. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान, राज्यपातळीवर मुख्यमंत्री, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी हा निर्णय घेतात.
भारतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये खालील 4 समिती/संस्था महत्वाची भूमिका पार पाडतात.
◾️राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(NDMA)-
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती तयार केली जाते ज्याचे कायमस्वरुपी अध्यक्ष पंतप्रधान असतात. पंतप्रधान 9 तज्ज्ञांची नेमणूक करतात येणाऱ्या आपत्तींबाबत माहीत देतात. राज्यस्तरावर या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात.
◾️राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM)- राज्यस्तरीय प्रशिक्षक तयार करण्याचे काम ही संस्था करते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या गाईडलाईननुसार ही संस्था आपत्ती व्यपस्थापनची सर्व प्रशिक्षण देते.
◾️राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल(NDRF) -
राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल उभारण्यात आल्या असून आपत्ती नंतरच्या काळात काम करतो. केंद्रशासनार्गंत निमलष्करी दल म्हणजे सीमा सुरक्षा दल( BSF) आणि इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP) सारखे दल आपत्ती व्यवस्थापनासाठी पाठविल्या जातात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेले आधुनिक संसाधनाचा वापर करुन आपत्ती निवारणाचे काम हे दल करतात. पुर, त्सुनामी, भूकंप कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास निमलष्करी दल आपत्ती निवारण करते.
🔸राज्य स्तरावर तत्सम दल (SDRF) -
राज्य स्तरावर तत्सम दल उभाण्यात आली असून मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये मुख्य सचिव(Chief Secretary) यांच्या खालोखल सर्व विभाग प्रमुख असतात. आपत्ती आल्यानंतर राज्य स्तरावर तत्सम दलाने दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे काम हे अधिकारी करतात. राज्यशासनाने अथवा केंद्रशासनाने घेतलेला निर्णय अतिमपातळीपर्यंत पोहचवून अंमलबजावणी करण्याचे काम हे अधिकारी करतात. आपत्ती आल्यानंतर या सर्व विभागांच समन्वय साधण्याचे काम राज्य स्तरावर तत्सम दल विभागामार्फत केले जाते.
🔸आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांना मिळणारे अधिकार..
- आवश्यकता भासल्यास खासगी जागा, वाहने, सेवा, वस्तू अधिग्रहित करण्याचा अधिकार.
उदा. हॉस्पिटल, डॉक्टर, अँमब्यूलन्स
- आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारा निधी उभा करणे.
- आपत्ती बाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणे.
- आपत्ती व्यवस्थापनसाठी लागणारी मानवी संसाधन( Man Power) उभारणे.
- आत्यवशक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणे.
🔸आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांवरील जबाबदारी..
- आपत्ती बाबत जनजागृती करणे
- आपत्ती बाबत गोंधळाची निर्माण होऊ नये यासाठी दक्ष राहणे.
- आपत्तकालिन मदत आणि सेवा लोकांपर्यंत पोहचवणे.
- आपत्ती निवारणासाठी धोरण आखणे आणि अंमलबजावणी करणे.
🔸आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे व दंड :
कायद्यातील प्रकरण १० मधील कलम ५१ ते ५८ यांमार्फत आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित विविध प्रकारचे गुन्हे व त्यांवर करावयाच्या कार्यवाहीची तरतूद आहे.
घटनेतील मूलभूत कर्तव्य.
1.घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
2.ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने.
3.भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे.
4.देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्या प्रथांचा त्याग करणे.
6. आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे.
7. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे.
8. विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे.
9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे.
11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
पंचायत राज संदर्भातील समित्या
🔴 व्ही आर राव (1960)
🔹विषय - पंचायत सांख्यिकी सुसूत्रता समिती
🟠 एस डी मिश्रा (1961)
🔹विषय - पंचायत राज आणि सहकारी संस्था
🟡 व्ही ईश्वरण (1961)
🔹विषय - पंचायत राज प्रशासन
🟢 जी आर राजगोपाल (1962)
🔹विषय - न्याय पंचायती संदर्भात अभ्यासगट
🟣 आर आर दिवाकर (1963)
🔹विषय - ग्रामसभेसंदर्भात
⚫️ एम राजा रामकृष्णय्या (1963)
🔹विषय - पंचायत राज संस्थेच्या अंदाजपत्रक संदर्भात अभ्यासगट
⚪️ के संथानम (1963)
🔹विषय - पंचायत राज अर्थविषयक अभ्यास गट
🟤 के संथानम (1965)
🔹विषय - पंचायत राज निवडणूक संदर्भात
🔴 आर के खन्ना (1965)
🔹विषय - पंचायत राज लेखापरीक्षणसंबंधी अभ्यासगट
🟠 जी रामचंद्रन (1966)
🔹विषय - पंचायत राज प्रशिक्षण संदर्भात
🟢 श्रीमती दया चोबे (1976)
🔹विषय - समुदाय विकास आणि पंचायत राज
नदीने तयार केलेल्या सीमा
🎇 गोदावरी नदी 🎇
🚦अहमदनगर-औरंगाबाद
🚦जालना-बीड
🚦बीड-परभणी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇 भीमा नदी 🎇
🚦पणे-सोलापूर
🚦पणे-अहमदनगर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇 कष्णा नदी 🎇
🚦सांगली-कोल्हापूर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇 नीरा नदी 🎇
🚦पणे-सोलापूर
🚦पणे-सातारा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇 मांजरा नदी 🎇
🚦उस्मानाबाद - बीड
सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे
▪️ कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी “टॉकबॅक” कीबोर्ड विकसित केले आहे?
उत्तर : गुगल
▪️ कोणत्या कायद्याच्या अन्वये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक गुन्हा ठरविण्यात आला आहे?
उत्तर : आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५
▪️ कोविड-19 महामारीमुळे रद्द केलेला ‘टूर डी फ्रान्स’ कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : सायकल शर्यत
▪️ कोणत्या व्यक्तीला ‘इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : अब्देलौहब एसाओई
▪️ “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स” याची स्थापना करण्याची शिफारस केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : एम. एस. साहू
▪️ कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?
उत्तर : हैदराबाद
▪️ कोणत्या शहराने ‘स्मार्ट शहरे’ अभियानाच्या अंतर्गत ‘सय्यम’ अॅप तयार केले?
उत्तर : पुणे
▪️ 2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : शेयर ए मिलियन स्टोरीज
▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान’ आरंभ केले?
उत्तर : गुजरात
▪️ 2020 या सालाचा ‘विल्यम ई. कोल्बी पुरस्कार’ कुणी जिंकला?
उत्तर : अॅडम हिगिनबॉथम
सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना
🔺 सभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला.
🔺 सभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय.
परीक्षा उत्तीर्ण झाले.सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
🔺 नताजींनी 1940 मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
🔺 डिसेंबर 1940 मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.
🔺 जानेवारी 1941 मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.
🔺 नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.
🔺 नताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.
🔺 सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.
त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.
🔺 आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.
🔺 सभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
🔺 आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.
🔺आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.
🔺 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.
चालू घडामोडी प्रश्नसंच
१) फ्रान्स देशातील भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
अ) भूषण धर्माधिकारी
ब) अनंत देशपांडे
✓क) जावेद अशरफ
ड) यापैकी नाही
२) आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली ?
अ) महाराष्ट्र
✓ब) केरळ
क) मध्यप्रदेश
ड) गुजरात
३) अभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ?
अ) साहित्य
ब) शांतता
✓क) अर्थशास्त्र
ड) भौतिकशास्त्र
४) पोलादी स्त्री म्हणून ओळखली जाणारी जलतरणपटू कोण आहे ?
✓अ) काॅटिका होसझू ( हंगेरी )
ब) चित्रेन नेटसन ( भारत )
क) वर्तिका सिंह ( भारत )
ड) यापैकी नाही
५) लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे ?
अ) तारु
ब) फेटा
✓क) लेह
ड) यापैकी नाही
🔵 फ्रान्स देशातील भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
अ) भूषण धर्माधिकारी
ब) अनंत देशपांडे
क) जावेद अशरफ ✔️✔️
ड) यापैकी नाही
____________________________________
🟢 आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली ?
अ) महाराष्ट्र
ब) केरळ ✔️✔️
क) मध्यप्रदेश
ड) गुजरात
____________________________________
🟡 अभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ?
अ) साहित्य
ब) शांतता
क) अर्थशास्त्र ✔️✔️
ड) भौतिकशास्त्र
____________________________________
🟠 पोलादी स्त्री म्हणून ओळखली जाणारी जलतरणपटू कोण आहे ?
अ) काॅटिका होसझू ( हंगेरी ) ✔️✔️
ब) चित्रेन नेटसन ( भारत )
क) वर्तिका सिंह ( भारत )
ड) यापैकी नाही
____________________________________
🔴 लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे ?
अ) तारु
ब) फेटा
क) लेह ✔️✔️
ड) यापैकी नाही
🔴 भारतातली कोणती संस्था कोविड-19 रोगाच्या उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल सॉलिडेरीटी ट्रायल’ उपक्रमात भाग घेणार आहे?
(A) भारतीय वैद्यकीय संघ
(B) भारतीय वैद्यकीय परिषद
(C) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद✅✅
(D) यापैकी नाही
_________________________________
🟠 कोणत्या संस्थेनी ‘युनाइटेड वुई फाइट' या शीर्षकाचे संगीत अल्बम तयार केला?
(A) स्पिक मॅके
(B) भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद✅
(C) कलाक्षेत्र फाउंडेशन
(D) भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार
_________________________________
🟢 कोणत्या संस्थेनी 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला?
(A) खाद्यान्न व कृषी संघटना✅🔰✅
(B) आंतरराष्ट्रीय वन संशोधन संघ
(C) संयुक्त राष्ट्रसंघ वन मंच
(D) फॉरेस्ट स्टूवर्डशीप काऊंसिल
_________________________________
🔵 कोणत्या संस्थेनी 'ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट' प्रकाशित केला?
(A) जागतिक आरोग्य संघटना✅
(B) खाद्यान्न व कृषी संघटना
(C) आंतरराष्ट्रीय खाद्यान्न धोरण संशोधन संस्था
(D) ग्लोबल अलायन्स फॉर इम्प्रूव्ह्ड न्यूट्रिशन
_________________________________
🟣 कोणत्या देशात ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ ही संस्था आहे?
(A) ब्रिटन
(B) फ्रान्स
(C) संयुक्त राज्ये अमेरिका🔰✅✅
(D) रशिया
प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान
◾️दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला.
🔰 तत्त्वज्ञान 🔰
_______________
🔹परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे.
◾️तयाने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.
◾️सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.
🔰 प्रार्थना समाजाचे कार्य 🔰
________________________
◾️प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली.
◾️शरी. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.
◾️न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.
◾️ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.
◾️देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली.
◾️अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली.
◾️ या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला.
◾️ मलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.
◾️ ४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.
◾️मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती.
◾️परार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे
यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
- डेक्कन रयत समाज, मराठा राष्ट्रीय संघ, ऑल इंडिया मराठा लीग. 🌼 डक्कन रयत समाज १) ऑगस्ट 1916 मध्ये महाराष्ट्रात डेक्कन रयत समाज नावाची...
-
◾️ स्पष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात ◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात ◾️या पेशीतील क...