Friday 27 August 2021

रक्त (Blood) 🔰


- रक्त हा लाल रक्त पेशी (आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स), पांढर्‍या रक्त पेशी (ल्युकोसाइट्स) आणि बिंबिका  (प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स) यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे. 


- रक्ताचा मुख्य घटक पाणी आहे. रक्त हा एकमेव द्रव उती आहे. रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. 


- हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.


- पांढर्‍या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते. पृष्ठ्वंशी प्राण्यांचे रक्त तांबड्या रंगाचे असते. 


- संधिपाद प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनानासाठी हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन असते. 


- कीटक आणि काहीं मृदुकाय प्राण्यामध्ये हिमोलिंफ नावाचा द्रव, प्राणवायू वहनाचे कार्य करतो. हिमोलिंफ बंद रक्तवाहिन्यामध्ये नसते. ते रक्तवाहिन्या आणि शरीर यांच्या मधल्या पोकळ्यांमधून वाहते. 


- बहुतेक कीटकांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनासाठी हिमोग्लोबिन सारखा वाहक रेणू नसतो.


- रक्त हा  संयोजी उतींचा द्रवरूप प्रकार आहे.

शुद्ध रक्ताचा रंग लाल भडक असून चव खारट असते.


- रक्त आम्लारी / अल्कलीधर्मी असून त्याचा सामू (pH) 7.35 ते 7.45 आहे. रक्त द्रवरूप तसेच स्थायूरुप घटकांचे बनलेले असते.


- रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा असे म्हणतात. रक्तातील स्थायूरुप भागाला रक्तपेशी असे म्हणतात.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतीय कर संरचना (Indian Tax Structure)

व्याख्या :- "जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय...