15 May 2024

रग्युलेटिंग ऍक्ट १७७३


🔶बरिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता.

 🔶बरिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली.

🔶लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान होता.त्याने पार्लमेंटमध्ये एक ठराव करून कंपनीने हिंदुस्थानातील व्यापारामुळे जो फायदा झाला असेल त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे असे ठरवले व कंपनीला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटमध्ये एक कायदा पास करून घेतला.

🔶 इ.स. १७७३ सालीं नॉर्थने कंपनीच्या राज्यकारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३ असे म्हणतात.

🔶बरिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. 

🔶बगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यात आला. 

🔶मद्रास व मुंबईचे राज्यपाल  त्यांच्या अमलाखाली आले.कंपनीवर देखरेख ठेवण्याच्या कामात मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या हाताखाली चार सभासदांची एक समिती नेमण्यात आली.

🔶कलकत्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली.तिथे मुख्य न्यायाधीश आणि अन्य तीन न्यायाधीशांची नेमणूक झाली. हे न्यायाधीश गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली येत नसत.

🔶हा कायदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच बनवलेला होता.

परंतु ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या.

🔶या कायद्यामुळे गव्हर्नर जनरलला संपूर्णत: समितीच्या सदस्यांवर अवलंबून रहावे लागे. याला प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे काहीही अधिकार नव्हते.

🔶अमेंडिंग ऍक्ट १७८१ द्वारे यात काही सुधारणा करण्यात  आल्या.


पोलीस भरती प्रश्नसंच

 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

1. बिहार

2. उत्तर प्रदेश

3. राजस्थान🎯

4. महाराष्ट्र


भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

1. कोयना

2. गोदावरी

3. यमुना

4. गंगा🎯


२०११ ची लोकसंख्या जि किर्वी लोकसंख्या गणना होती?

1. १६ वी

2. १५ वी🎯

3. १८ वी


आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे, ते कोठे आहे?

1. भूज (गुजरात)🎯

2. कच्छ (गुजरात)

3. मुत्पनडल (तामिळनाडू)

4. मणिकरण (हिमाचल प्रदेश



पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते?

1. तामिळनाडू🎯

2. उत्तर प्रदेश

3. महाराष्ट्र



सर्वात जास्त कुपोषित बालके असलेले राज्य कोणते?

1. बिहार

2. मध्यप्रदेश🎯

3. राजस्थान

4. महाराष्ट्र



महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?

1. मुंबई प्रांत🎯

2. मराठवाडा प्रांत

3. कोकण प्रांत

4. विदर्भ प्रांत


विधानसभेच्या सभासदांची संख्या किती असते?

1. २५०

2. २६७

3. २८८🎯

4. २४०


चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

1. अमरावती🎯

2. अहमदनगर

3. नाशिक

4. सातारा


महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे?

1. गोदावरी

2. गंगा

3. कोयना

4. कृष्णा🎯


माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1. रायगड🎯

2. पुणे

3. औरंगाबाद

4. सातारा


प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?

1. कोल्हापूर🎯

2. जालना

3. अकोला

4. धर्माबाद


देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे?

1. सातारा

2. सांगली

3. सिंधुदुर्ग🎯

4. बीड


मुंबई विद्यापीठाची स्थापन केव्हा झाली?

1. सन १८५७🎯

2. सन १९४८

3. सन १८६०

4. सन १९२५


खालीलपौकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही.

1) वज्रेश्वरी🎯

2) राजवाडी

3) आसवली

4) उन्हेरे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका :

🎯सवरूप -

जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🎯कार्ये -

जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🎯भांडवल उभारणी -

स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🎯विस्तार -

भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

प्रार्थना समाज


✔️बराम्हो समाजाच्या विचारांचा महाराष्ट्र्रावरही प्रभाव पडला व त्या दृष्टीने 1949 मध्ये परमहंस सभा स्थापन करण्यात आली.

✔️1867 मध्ये केशवचंद्र सेनच्या प्रेरणेने मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली.

✔️आत्माराम पांडुरंग 1823-1898 नावाच्या सुधारक वृत्तीवरच्या व्यक्तीने हा समाज स्थान करण्याच्या कामी पुढाकार घेतला प्रार्थना समाजपचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे होते.

✔️परार्थना समाजातील सभासद स्वत:ला प्रार्थना समाजाचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे असे मानीत नव्हते, तर हिंदू धर्मातील एक चळवळ मानीत.

✔️थोडक्यात प्रार्थना समाजाची श्रध्दा पूर्णपणे हिंदू धर्मावर होती.

✔️एकेश्र्वरवादाच्या सिध्दान्ताव्यितिरिक्त समाज सुधारण हे उद्दिष्ट मानून प्रार्थना समाजाने विश्र्वासापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिला.

✔️मानव सेवा हीच खरी ईश्र्वराची भक्ती असे प्रार्थना समाजाचे मत होते.


🔰समाज सुधारणेच्या बाबतीत प्रार्थना समाजाने आपल्या समोर चार उद्देश ठेवले

१. जातिभेद निर्मूलन

२. बालविवाह प्रतिबंध,

३. विधवा विवाह

४. स्त्री शिक्षण

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या.


🧩लोकसंख्या :

1. 600 ते 1500 - 7 सभासद

2. 1501 ते 3000 - 9 सभासद

3. 3001 ते 4500 - 11 सभासद

4. 4501 ते 6000 - 13 सभासद

5. 6001 ते 7500 - 15 सभासद

6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद

🧩निवडणूक -

🅾प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

🧩कार्यकाल -

🅾5 वर्ष

🧩विसर्जन -

🅾कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.

🧩आरक्षण :

1. महिलांना - 50%

2. अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

3. इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

1857 नंतर ब्रिटिशांची राज्यपद्धती

  1. प्रशासकीय बदल   


०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल लॉर्ड कॅन्न्निंगने १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून राणीचा जाहीरनामा वाचून दाखविला.


०२. १८५८ च्या कायद्यानुसार भारताची प्रशासनव्यवस्था इंग्लंडचा राजा कडे सोपविण्यात आली. भारताचा शासन प्रमुख गवर्नर जनरल याचे पदनाम बदलून त्यास व्हाईसरॉय असे नाव देण्यात आले.


०३. व्हाईसरॉयच्या मदतीसाठी व त्यास सल्ला देण्यासाठी ५ सदस्यांचे एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल नियुक्त करण्यात आले. कौन्सिलचा सल्ला स्वीकारणे व नाकारणे यासंबंधीचा पूर्ण अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला.


०४. कायदे विषयीसंबंधी इम्पिरियल लेजीस्लेटिव्ह कौन्सिल तयार केले. पुढे इंडियन कौन्सिल एक्ट, १८६१ नुसार व्हाईसरॉयला कौन्सिलमध्ये ६ ते १२ सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले. कौन्सिलने मंजूर केलेले कायदे व्हाईसरॉयच्या संमतीशिवाय मंजूर होत नसत.


०५. इंग्लंडच्या मंत्रिमंडळात भारतमंत्री या नव्या मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली. भारतमंत्र्यावर भारताच्या प्रशासनाची जबाबदारी टाकण्यात आली. भारतमंत्र्यांच्या मदतीसाठी १५ सदस्यांचे इंडियन कौन्सिल देण्यात आले. भारतमंत्री लंडनमध्येच वास्तव्य करीत. परंतु त्याचा वेतनाचा खर्च भारत सरकारच्या खजिन्यातून करण्यात येत असे.


०६. व्हाईसरॉयने भारतमंत्र्याच्या आदेशानुसारच निर्णय घेतले पाहिजेत असे बंधन घालण्यात आले. १८७० नंतर व्हाईसरॉय व भारतमंत्री यांच्यात तात्काळ संपर्क व्हावा म्हणून भारत ते लंडन अशी थेट केबल सेवा प्रस्थापित करण्यात आली.


०७. भारतामध्ये प्रांत पाडण्यात आले. बंगाल, मद्रास, आणि मुंबई हे प्रांत प्रेसिडेन्सी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. प्रेसिडेन्सीचे प्रशासन ब्रिटिशांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय कौन्सिलकडे सोपविण्यात आले. इतर प्रांताचे कारभार लेफ्टनंट गवर्नर व चीफ कमिश्नर यांच्याकडे सोपविण्यात आले. चीफ कमिश्नरची नियुक्ती व्हाईसरॉय करीत असे. इतर प्रांतांपेक्षा प्रेसिडेन्सी प्रशासनास जास्त अधिकार होते.


०८. इंडियन कौन्सिल एक्ट, १८६१ नुसार प्रशासनात विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यामुळे प्रांतिक एक्झिक्यूटिव्ह कौन्सिललाच लेजीस्लेटिव्ह कौन्सिलचे रूप देण्यात आले. लेजीस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये ४ ते ८ अशासकीय ब्रिटीश व हिंदी सदस्यांची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आले. अर्थात, लेजीस्लेटिव्ह कौन्सिल हे निव्वळ सल्लागार मंडळ होते. अंतिम अधिकार केंद्राकडेच होते.


०९. इंडियन कौन्सिल एक्ट, १८९२ नुसार केंद्रीय लेजीस्लेटिव्ह कौन्सिलच्या सदस्यत्वामध्ये १२ ते १६ सदस्यांची वाढ करण्यात आली. हे सर्व शासकीय सदस्य होते.


१०. सर्व प्रांतिक सरकारे भारत सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली होती.या काळात प्राप्तीकर सुरु करण्यात आला. सर्व आयातीवर १०% आयातकर लादण्यात आला. मिठावरील कर वाढविण्यात आला. या काळात वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याची प्रथा सुरु करण्यात आली.


2. स्थानिक शासन पद्धत


०१. १८१६ व १८१९ साली स्थानिक शासनासाठी काही नियम मंजूर केले.


०२. १८५८ नंतर ब्रिटिशांनी नगर पालिका व जिल्हा लोकल बोर्ड अशा संस्था स्थापन करण्यास स्थानिक जनतेला उत्तेजन दिले.


०३. १८६४ ते १८६८ दरम्यान देशात स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात आली. या संस्थांच्या सदस्यांची नियुक्ती सरकारकडून करण्यात आली. संस्थांच्या अध्यक्षपदी डिस्ट्रीक्ट मैजिस्ट्रेटची नियुक्ती करण्यात आली.


०४. लॉर्ड मेयोने १८७० साली स्थानिक स्वराज्य संस्थानच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. सर्व प्रांतात म्युन्सिपल एक्ट मंजूर करून शासकीय व अशासकीय सदस्य असलेल्या समित्या तयार करण्यात आल्या. मात्र प्रत्येक समितीच्या अध्यक्षपदी शासन नियुक्त शासकीय सदस्य असेल याची दक्षता घेण्यात आली.


०५. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांना बरेच स्वातंत्र्य दिले. मे, १८८२ मध्ये सरकारने लोकल बोर्डातील अशासकीय सभासदांची संख्या वाढविली. ग्रामीण व नागरी लोकल बोर्डात एक सामंजस्य निर्माण केले.


०६. कलकत्ता, मद्रास व मुंबई येथील महापालिकांचे कार्यक्षेत्र व कामकाज इतर जिल्ह्यांच्या नगरपालिकांपेक्षा सर्वस्वी वेगळे होते. १८ व्या शतकाच्या अखेरीस या महानगरांचे प्रशासन व कामकाज सुरळीत व्हावे म्हणून गवर्नर जनरलने प्रतिष्ठित व्यक्तींची जस्टीस ऑफ पीस म्हणून नियुक्ती केली. त्यांना न्यायालयीन कामकाज करता येत होते. त्याचप्रमाणे सफाई कामगार, वॉचमन यांच्या नेमणुका करण्याचे अधिकारही देण्यात आले होते.

लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५)



👉 लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. 

कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता. 

१८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. 

दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली. 

१९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. 

कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता. 

१८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले. 

पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. 

कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला. 

१९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली. १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. 

१९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला. 

कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय.

 तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता. 

सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले. 

कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात. लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.


👉 कर्झनच्या शेती सुधारणा :

१९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली. 

१९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. 

कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. 

कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला. 

कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली. 

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

🏈🔴अलीकडे, कोणत्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
अ) सांभर तलाव
ब) चिलका तलाव
क) पुलिकट लेक
ड) रुद्र सागर तलाव ✅✅✅✅✅

🏈🔴 २५ - २७ नोव्हेंबर, २०१९ दरम्यान  कॉमनवेल्थ यूथ पार्लियामेंट, २०१९ कोठे आयोजित करण्यात आले होते ? 
(अ) नवी दिल्ली ✅✅✅✅✅
(ब) कोलकाता
(क) जयपुर
(ड) लंदन

🏈🔴 आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो?
(अ) २५ नोव्हेंबर ✅✅✅✅✅
(ब) २२ नोव्हेंबर
(क) २० नोव्हेंबर
(ड) २२ नोव्हेंबर

🏈🔴२३ - २४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान १७२ व्या संरक्षण पेन्शन न्यायालयाचे आयोजन कोठे केले गेले? 
(अ) नवी दिल्ली
(ब) भोपाळ
(क) जयपुर
(ड) लखनऊ ✅✅✅✅✅

🏈🔴 नोव्हेंबर २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने हवामान बदल आणि पर्यावरण क्षेत्रात तांत्रिक सहकार्यासाठी कोणत्या देशाशी सामंजस्य कराराला मंजुरी दिली? 
(अ) स्वित्झर्लंड ✅✅✅✅✅
(ब) ब्राझील
(क) अमेरिका
(ड) जपान

🏈🔴 २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सरकारी ई-मार्केट प्लेस (जीईएम) आणि दिल्ली सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला.  यासह, जीईएमने आतापर्यंत किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी करार केले आहेत? 
(अ) ०२
(ब)  ३०✅✅✅✅✅
(क) ३५
(ड)  २९

🏈🏈द्वितीय स्टार्टअप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल कॉन्फरन्स, ६ ते ७ डिसेंबर, २०१९ दरम्यान कोठे पार पडणार ?
(अ) नवी दिल्ली
(ब) गोवा✅✅✅✅✅
(क) मुंबई
(ड) जयपूर

🏈🔴'जागतिक मृदा दिवस' कधी साजरा केला जातो?
(अ) ०१ डिसेंबर
(ब) ०४ डिसेंबर
(क) ३० नोव्हेंबर
(ड)  ०५ डिसेंबर✅✅✅✅

🏈🔴अ) नोव्हेंबर 2019 मध्ये राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्यूरो (NCRB) ने अपघाती मृत्यू आणि आत्महत्या' हा अहवाल प्रसिद्ध केला.
ब) अहवालानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.
अ) फक्त
ब) फक्त बी
क) अ आणि ब दोन्ही✅✅✅✅✅
ड) ए किंवा बी नाही

🌐🌐_______ येथे ‘ह्यूमन लायब्ररी’ उघडण्याविषयीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) चेन्नई
(B) बेंगळुरू
(C) मुंबई
(D) म्हैसूर✅✅✅✅✅

🌐🌐कोणत्या व्यक्तीची फिनलँड या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली?
(A) अंती रिने
(B) सॅना मारिन✅✅✅✅✅
(C) सौली निनीस्ते
(D) जुहा सिपिला

🌐🌐अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था ------- मध्ये  स्थापन करण्यात आली.
अ) 1951
ब) 1926✅✅✅
क) 1917
ड) 1971

🌐🌐‘उपपद’ किंवा ‘कृदन्त – तत्पुरुष’ समासाचे उदाहरण कोणते?
अ) नास्तिक   
ब) रक्तचंदन   
क) अहिंसा   
ड) पांथस्थ✅✅✅✅✅

🔰🔰) विरामचिन्हे किती प्रकारची आहेत ?
अ) एक     
ब) दोन ✅✅✅✅✅    
क) तीन   
ड) चार

🌐🌐‘सिध्द’ शब्द कशाला म्हणतात ?
अ) भाषेतील मूळ शब्द जो भाषा सिध्द करतात   
ब) परभाषेतून आलेले शब्द
क) भाषेतील मूळ शब्द जे जसेच्या तसे वापरले जातात✅✅✅✅✅   
ड) भाषेतील मूळ शब्द जे बदलत असतात

🔰🔰 पुढील पद्य पंक्तीस कोणता रस आहे ?
     ‘जुने जाऊ द्या भरणा लागुन,
     जाळुनी किंवा पुरुनी टाका !’
अ) करुण   
ब) रौद्र✅✅✅✅✅     
क) हास्य   
ड) बीभत्स

🌐🌐‘अंबर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
अ) परमेश्वर   
ब) आकाश✅✅✅✅✅   
क) अभंग   
ड) अमर

🔰🔰‘उन्नती’ या शब्दाला विरोधार्थी शब्द ओळखा.
अ) अवनिती   
ब) विकृती   
क) प्रगती   
ड) अवनती✅✅✅✅✅

🌐🌐खालील वाक्यातील म्हणीच्या योग्य अर्थासाठी समर्पक वाक्य निवडा.
     ‘पोलिसांनी रघुला चोरीच्या आरोपाखाली अटक केली. पण कर नाही त्याला डर कशाला असे म्हणून तो शांत होता.’
अ) तो गुन्हेगार होता   
ब) तो अपराधी नव्हता✅✅✅✅✅
क) तो बेईमान होता   
ड) त्याला अपराधी वाटत होते

🔰🔰भरडले जाणे : या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
अ) संकटे येणे   
ब) पीठ दळणे   
क) लढा देणे   
ड) दु:खाचे आघात होणे✅✅✅✅✅

🌐🌐 “जो भविष्य सांगतो तो” – या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
अ) ज्योतिष   
ब) ज्योतिषी✅✅✅✅✅   
क) जादूगार   
ड) भविष्यक

🔰🔰भारताचे परराष्ट्रसचिव कोण आहेत ?
अ) निरुपमा राव
ब)  रंजन मथाई ✅✅✅
क) एस.एम.कृष्णा
ड)  सुनील मित्रा

🔰🔰नाफेड (NAFED) ........... चे कार्य करते.
१) सहकार विपणन   
२) शासकीय अभिकरण
३) विमा अभिकर्ता  
४) करारशेती प्रेरक
अ) १, २     
ब) १, २ आणि 3✅✅✅✅✅   
क) १, २, ३ आणि ४   
ड) २, ३ आणि ४

🔰🔰2013-2014 या वर्षी भारतात
........... या पिकाची लागवड अन्न धान्याखालील एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणात दिसून येते.
अ) गहू      
ब) तांदूळ✅✅✅✅✅     
क) ज्वारी   
ड) मका

🔰🔰सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?
अ) मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि आसाम   ब) महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू✅✅✅✅✅
क) जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि आसाम 
ड) झारखंड, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश

🔰🔰महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ??
अ) तोरणमाळ
ब) आंबोली✅✅✅✅✅
क) महाबळेश्वर
ड) चिखलदरा

 
🔰🔰महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते ?
अ) कमळ
ब) झेंडू
क) गुलाब
ड) यापैकी नाही✅✅✅✅✅

🔰🔰अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते?
अ) गुलाब
ब)  कमळ
क)  झेनिया✅✅✅✅✅
ड)  यापैकी नाही

🔰🔰रिझर्व्ह बँकेचे मुख्य गव्हर्नर कोण आहेत.
अ) रघुराम राजन  
ब) डॉ, उर्जित पटेल   
क) डॉ, डी.सुब्बाराव   
ड) शक्तीकांत दास✅✅✅✅✅

🔰🔰भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण आहेत.
अ) डॉ, सी.व्ही.रमण   
ब)  डॉ, होमी भाभा     
क)  डॉ, मेघनाद साहा   
ड)  डॉ, विक्रम साराभाई✅✅✅✅✅

🔰🔰श्रीमती प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या?
अ) मध्यप्रदेश
ब) आंध्रप्रदेश
क) जम्मू काश्मिर
ड)  राजस्थान✅✅✅✅✅

🔰🔰कोणत्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली?
अ) नेवासे✅✅✅✅✅
ब)  आपेगाव
क) आळंदी
ड) देहू

 
🔰🔰लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान कोणत्या देशात आहे ?
अ) इंग्लंड✅✅✅✅✅
ब)  भारत
क) आस्ट्रेलिया
ड) दक्षिण आफ्रिका

ग्रामसेवक / सचिव.

🅾️निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

🅾️नमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी

🅾️नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी

🅾️कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा

🧩कामे :

1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.

🧩गरामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन

🅾️गरामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

🅾️बठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

🅾️सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

🅾️अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

🅾️गरामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

Latest post

महाजनपद आणि त्यांची माहिती:

1. अंग 🟢    - स्थान: गंगेच्या दक्षिणेला, बिहार    - राजधानी: चंपा 🏰    - राजा: दशरथ 👑    - पाडाव: मगधच्या बिंबिसारने याचा पाडाव केला ⚔️ 2...