Sunday 21 April 2024

चालू घडामोडी :- 21 एप्रिल 2024

◆ मृतदेहाच्या अवस्थेवरुन मृत्यूची अचूक वेळ सांगणाऱ्या किड्याचा शोध पुण्याच्या झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा कलावटे यांनी लावला असून त्याला 'मोरेश्वर किडा' असे नाव दिले आहे.

◆ साक्षरतेत प्रथमस्थानी असणाऱ्या केरळमधील महिलांचे लोकसभा उमेदवारीमध्ये अव्वल स्थान आहे.

◆ इस्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या पाच वर्षीय भाची सॅलीच्या मृतदेहाला मिठी मारताना पॅलेस्टिनी महिला इनास अबू मामार यांचे रॉयटर्स वृत्तसंस्थेचे मोहम्मद सालेम यांनी काढलेल्या छायाचित्राला 'वर्ल्ड प्रेस फोटो ॲवॉर्ड ऑफ द इयर' मिळाला आहे.

◆ 2006 पासून दरवर्षी 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिन साजरा केला जातो.

◆ चार्ल्स कॉर्नवॉलिस यांना 'भारतातील नागरी सेवेचे जनक' म्हणून ओळखले जाते.

◆ सत्येंद्रनाथ टागोर हे 1863 मध्ये भारतीय नागरी सेवेसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय ठरले.

◆ एस सोमनाथ यांनी इस्रो अंतराळ सुरक्षेसाठी बेंगळुरू येथील "दिगंतरा मुख्यालयाचे" उद्घाटन केले.

◆ चार दिवसांचा "वर्क वीक" असणारा सिंगापूर हा आशियातील पहिला देश ठरणार आहे.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे “भगवान महावीर” यांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन केले.

◆ बेंगळुरूचे 'केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ' देशातील सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे.

◆ पुढील वर्षी 16 फेब्रुवारीला ‘बाफ्टा 2025 अवॉर्ड्स’ सोहळा होणार आहे.

◆ भारतीय नौदलाने पूर्व समुद्र किनारी ‘पूर्वी लहर’ हा सराव केला आहे.

◆ जपानचा बॅडमिंटनपटू केंटो मोमोटा याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

◆ Rupay ने ‘Link it, Forget it’ ही मोहीम सुरू केली आहे.

◆ जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाला मोठा धक्का! नागालँडच्या 6 जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधील महत्वाच्या परिषदा

(Syllabus pt.  #GS1 = 1.11, #GS2 = 4th point - महाराष्ट्राची निर्मिती) 1) मराठी साहित्य संमेलन, 1908 पुणे - अध्यक्ष = चिंतामणराव वैद्य - महा...