Tuesday 21 June 2022

अग्निपथ लष्करी योजना काय आहे ?



◆ 14 जून 2022 रोजी, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने अग्निपथ योजनेला मंजुरी दिली , जी भारतीय तरुणांना भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्यास सक्षम करते. 


◆ केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, 'अग्निपथ' योजनेच्या माध्यमातून तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी निर्माण करण्यासाठी सर्व उपयुक्त प्रयत्न केले जातील. 


◆ ही योजना तरुणांना नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षित करण्यास आणि शिकण्यास आणि त्यांच्या आरोग्याची पातळी सुधारण्यास मदत करेल. 


◆ रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे तरुणांना विविध क्षेत्रात नवीन कौशल्ये शिकायला मिळतील. 


❇️ अग्निपथ योजनेंतर्गत सशस्त्र दलाचा भाग असणारे 'अग्निवीर', असेही ते म्हणाले.


◆ 4 वर्षांच्या सेवेनंतर चांगले वेतन पॅकेज आणि एक्झिट रिटायरमेंट पॅकेज दिले जाईल.


 ❇️ अग्निपथ योजना : पात्रता ❇️


◆ या योजनेंतर्गत, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात आणि भारतीय सशस्त्र दलात सेवा देण्यासाठी उमेदवार 17.5 ते 21 वयोगटातील असणे आवश्यक आहे.


संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

   1) उपमा    2) उत्प्रेक्षा    3) रूपक      4) अपन्हुती

उत्तर :- 2

2) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) तुरट    2) आंबट चिंबट    3) खारट      4) कडवट

उत्तर :- 2

3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील

    अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) लक्ष्यार्थ    2) वाच्यार्थ    3) वाक्यार्थ    4) शब्दार्थ

उत्तर :- 1

4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.
   1) दैत्य    2) दानव      3) राक्षस      4) देव

उत्तर :- 4

5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) नापीक    2) सुकाळ    3) अवर्षण    4) कोरडा

उत्तर :- 2

6) योग्य पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा. – ‘नांव सोनूबाई हाती .................... वाळा.’

   1) सोन्याचा    2) चांदीचा    3) कथलाचा    4) पितळेचा

उत्तर :- 1

7) दिलेल्या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा.

    ‘भिम्याला कुस्तीत चारीमुंडया चीत केल्यापासून त्याचा ...............’

   1) इंगा जिरविणे    2) उधाण येणे    3) ऊर दडपणे    4) उघडा पडणे

उत्तर :- 1

8) निराश्रित मुलांना आश्रय देणारी अशी एक संस्था ..................

   1) धर्मालय    2) अनाथालय    3) देवालय    4) वृध्दाश्रम

उत्तर :- 2

9) खालील शुध्द स्वरूपात लिहिलेला शब्द ओळखा.

   1) दैवदूर्विलास    2) दैवदूर्वीलास    3) दैवदूरविलास    4) दैवदुर्विलास

उत्तर :- 4

10) खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता ?
   1) त्   2) थ्    3) द्      4) ण्

उत्तर :- 4

ग्रंथी (Glands) आणि ज्ञान-विज्ञान


🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठेवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते

🎇 ग्रंथी या दोन प्रकारच्या असतात

1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)
2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)

🎇अंतः स्रावी ग्रंथी
या संप्रेरके(Harmon's)स्रावतत

🎇बाह्यस्रावी ग्रंथी
या विकारे(Enzymes)स्रावतत

🎇अंतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)

🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात



ज्ञान-विज्ञान

______ संस्थेमधील भारतीय शास्त्रज्ञांनी दृश्यमान प्रकाश शोषून कार्बन डायऑक्साइडचे मिथेनमध्ये रूपांतर करण्यासाठी स्वस्त धातू-मुक्त उत्प्रेरक विकसित केले - जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बंगळुरू.

________ येथील डॉ. सन्यासीनायडू बोड्डू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शास्त्रज्ञांनी नॅनो-पदार्थापासून अत्यंत स्थिर आणि अविषारी सुरक्षा शाई विकसित केली आहे, जी त्याच्या अद्वितीय रासायनिक गुणधर्मांमुळे उत्स्फूर्तपणे प्रकाश उत्सर्जित करते आणि ज्याचा उपयोग बनावट नोटा तसेच मानक वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी केला जाऊ शकतो - इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (मोहाली).

खगोलशास्त्राच्या इतिहासात प्रथमच, आकाशगंगेच्या बाहेर दुसर्‍या आकाशगंगेतील ग्रहाचे अस्तित्व _____ याने शोधून काढले आहे, जो M-51-ULS-1 ताऱ्याभोवती फिरणारा शनीच्या आकाराचा एक ग्रह आहे – NASA संस्थेची ‘चंद्र’ अंतराळ दुर्बीण.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सामान्य ज्ञान

डंपा व्याघ्र प्रकल्प - मिझोरम.

भद्रा व्याघ्र प्रकल्प - कर्नाटक.

पेंच व्याघ्र प्रकल्प - महाराष्ट्र.

पक्के व्याघ्र प्रकल्प - अरुणाचल प्रदेश.

नामेरी व्याघ्र प्रकल्प - आसाम.

सातपुडा व्याघ्र प्रकल्प - मध्यप्रदेश.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती

🔰 आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰

🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→   १४०० ग्रॅम.
 
🔶 सामान्य रक्तदाब ?
→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→   न्यूरॉन.

🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→   ५ ते ६ लीटर.
 
🔶 सर्वात लहान हाड ?
→   स्टेटस ( कानाचे हाड )

🔶 सर्वात मोठे हाड ?
→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   १२० दिवस.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   २ ते ५ दिवस.

🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→   ७२ प्रतिमिनिट.

🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→   थायरॉईड ग्रंथी.

🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→   ग्लुटियस म्याक्सीमस.

🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→   ६३९.

🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→   मोनोसाईटस - ३ ते ८%.
→   बेसोफिल्स - ०.५%.
→   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

🔶 शरीराचे तापमान ?
→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

🔶 प्रौढांमधील दातांची संख्या ?
→   ३२.

🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→   २० दूधाचे दात.

🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→   पापणी (कंजक्टायव्हा).

_______________________________________________________________

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”

🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते -

१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

🔸 जुलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

🔸 देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता


📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.

📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.

📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे.

📌ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.

📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.

📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.

📌 ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'

📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."

🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :

📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.

📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.

📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.

📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही
त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.

📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.

भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव

✅ भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव ...(भाग-1)

 ऑस्ट्र-हिंद : इंडिया - ऑस्ट्रेलिया
 LAMITIYE : इंडिया - सेशल्स
 औसीइंडेक्स : इंडिया - ऑस्ट्रेलिया
 सिटमँक्स : सिंगापूर , थायलँड व इंडिया
 स्लिनेक्स : इंडिया - श्रीलंका
 मित्र शक्ति : इंडिया - श्रीलंका
 मैत्री : इंडिया : थायलँड
 युद्ध अभ्यास : इंडिया - अमेरिका
 टाईगर ट्रंफ : इंडिया - अमेरिका
 वज्र प्रहार : इंडिया - अमेरिका
 मलबार : इंडिया , जपान व अमेरिका
 शक्ति : इंडिया - फ्रान्स
 गरुड : इंडिया - फ्रान्स
 वरुण : इंडिया - फ्रान्स
 सुर्य कीरण : इंडिया - नेपाळ
 सम्प्रिंती : इंडिया - बांग्लादेश
 कॉर्पैट : इंडिया - बांग्लादेश
 जायर-अल-बहर : इंडिया - कतार
 दस्तलिक : इंडिया - उझबेकिस्तान
 हँड इन हँड : इंडिया - चीन
 हिम विजय : भारत - चीन
 चांग-थांग : भारत - चीन
 इंद्र : इंडिया - रशिया
 कोंकण : इंडिया - ब्रिटन
 इंद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन
 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन
 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान .

✅ भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव (भाग-2)

 इंद्र : इंडिया - रशिया
 कोंकण : इंडिया - ब्रिटन
 इंद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन
 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन
 हरिमाऊ शक्ति : इंडिया - मलेशिया
 गरुड शक्ति : इंडिया - इंडोनेशिया
 समुद्र शक्ति : इंडिया - इंडोनेशिया
 इकुवेरीन : इंडिया - मालदीव
 अल नागाह : इंडिया - ओमान
 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान
 नसीम-अल-बहार : इंडिया - ओमान
 धर्मा गार्डीयन : इंडिया - जपान
 सहयोग काजीन : इंडिया - जपान
 शिन्यू मैत्री : इंडिया - जपान
 जिमेक्स : इंडिया - जपान
 प्रबळ दोस्त्याक : इंडिया - कझाकस्तान
 नोमँडिक एलिफंट : इंडिया - मंगोलिया
 बोल्ड कुरुक्षेत्र : इंडिया - सिंगापूर
 खंजर : इंडिया - किरगिस्तान
 डीझर्ट इगल : इंडिया - युएई
 फोर्स : आशियान
 इमबेक्स : इंडिया - म्यानमार
 सिम्बैक्स : इंडिया - सिंगापूर
 विंबैक्स : इंडिया - वियतनाम
 सियाम इंडिया : इंडिया - थायलँड .

मुस्लिम लीग’ ची स्थापना

मुस्लिम लीग’ ची स्थापना.

   ठिकाण :- ढाका

   संस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला

   मुख्यालय :- लखनऊ

   उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे.

  मुस्लिम लीगची स्थापना ‘All Indian Mohammadan Educational Conference’ च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी करण्यात आली.

 ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर 1906 दरम्यान घेण्यात आली होती.

  पुढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली.

मुस्लिम लीगचे अध्यक्ष  ---------------

1907 अहमजी पीरभॉय

1908-1912 आगाखान

1912-1918 सर मुहम्मद अली

1919-1930 मुहम्मद अली जिना

1931 सर मुहम्मद शफी

1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान

1932-1933 मिया अब्दुल अझीझ

1933-1934 हफिज हिदायत हुसेन

1934-1947 महम्मद अली जिना.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती


◾️ काँग्रेस चे पहिले अध्यक्ष
    - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 )

◾️ काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा
    - अॅनी बेझंट ( 1917 )

◾️ काँगेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष
    - बद्रुद्दिन तैयबजी( 1887 )

◾️ काँग्रेस चे पहिले पारशी अध्यक्ष
    - दादाभाई नौरोजी ( 1886)

◾️ काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष
    - पी. आनंद चार्लू ( 1891 )

◾️ काँगेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा- सरोजिनी नायडू ( 1925 )

◾️ काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष
    - सर नारायण गणेश चंदावरकर ( 1900)

◾️ काँग्रसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष - मौलाना आझाद ( 1940 - 1946)

◾️ ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
    - फैजपूर ( 1936 )

◾️ काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती
    - बाल गंगाधर टिळक.
_______________________________
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत

2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन

3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन

4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री

5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस

6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा

7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी

औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती


(प्रश्न-उत्तर) 

 औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? - मराठवाडा.

औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? – मराठवाडा.

मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? – औरंगाबाद.

लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? – उस्मानाबाद.

जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? – औरंगाबाद.

महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? – मराठवाडा.

गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद-जळगाव.

औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? – अजिंठा.

· जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? – नांदेड.

· गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? – पैठण-औरंगाबाद.

· जायकवाडी जलाशयाचे नाव काय? – नाथसागर.

· जायकवाडी योजना स्टेज-1 कोणत्या जिल्हयासाठी आहे? – औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड.

· महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने हाती घेण्यात आला? – कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे.

· बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? – राहुरी व औरंगाबाद.

· महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? – मराठवाडा.

· महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून इतर ठिकाणी लोक स्थलांतर होण्याचे कारण काय? – कोरडा दुष्काळ.

· जायकवाडी जलविद्युत केंद्र कोठे आहे? – पैठण, औरंगाबाद.

· गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे? – जपान.

· हिमरुशाली साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? – औरंगाबाद.

· गुजराती फेटे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? – पैठण.

· महाराष्ट्रातील औद्योगिकदुष्ट्या अविकसित भाग कोणता? – मराठवाडा.

· शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? – नांदेड.

· दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? – पैठण.

· पैठण हे कोणत्या संताची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते व तेथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? – संत एकनाथ.

· औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? – हिंगोली.

· घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? – नांदेड.


· परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणता जिल्ह्यात आहे? – बीड.

· खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – लातूर.

· अंबेजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? – बीड.

· तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? – उस्मानाबाद.

· पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या आहे? – औरंगाबाद.

· धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – उस्मानाबाद.

· वेरूळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? – औरंगाबाद.

· वेरूळ अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे? – शिल्पकला.

· महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? – मराठवाडा.

· मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? – 1972.

· वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे? – औरंगाबाद.

· श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे? – तुळजापूर (उस्मानाबाद).

· महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे? – नांदेड.

· कवि मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? – अंबेजोगाई.

· मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? – अक्षी.

· दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे? – उस्मानाबाद.

· महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? – मराठवाडा.

· भारुडे लोकप्रिय करणारे संत कोण? – एकनाथ.

· शिखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संताचे वाण्ड्मय समाविष्ठ आहे? – नामदेव.

· प्रवारा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? – गोदावरी.

· बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? – बीड.

· मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते आहे? – औरंगाबाद.

· देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे? – अजंठा रांगा.

· गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती? – हरिषचंद्र-बालाघाट.

· बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे? – गोदावरी.

भारतीय अर्थव्यवस्था

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲:
भारतीय वित्तीय व्यवस्था

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो.

विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलटपक्षी, वित्तीय व्यवस्था न्यूनविकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात.

अर्थ – व्यापक दृष्टीने, वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच, विविध सरकारे इत्यादींना असते.

उदा. व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृह बांधणीसाठी असते.

व्यापार्‍यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच, साठवण्यासाठी असते. तर, उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते.

सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते.

अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या व्यवस्थेस ‘वित्तीय व्यवस्था’ (Financial System) असे म्हणतात.

____________________

भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना –

वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात.

______________________

1. भारतीय नाणे बाजार –

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.

नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.

असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो.

संघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

_____________

2. भारतीय भांडवल बाजार

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.

भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते.

भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्‍या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो.

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती

जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

रचना – प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

सभासद संख्या – प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

सभासदांची निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

पात्रता (सभासदांची) – जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.
आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

राजीनामा :

अध्यक्ष – विभागीय आयुक्ताकडे
उपाध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :

1. अध्यक्ष – 20,000/-

अविश्वासाचा ठराव – अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

बैठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

महाधिवक्ता बद्दल संपूर्ण माहिती

महाधिवक्ता बद्दल संपूर्ण माहिती

राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 165 नुसारच एक महाधिवक्त्याचे पद निर्माण केलेले आहे.
हा महाधिवक्ता राज्य सरकारचा वकील म्हणूनदेखील काम करतो.
या महाधिवक्त्याला अनेक वैधानिक स्वरूपाचे कार्य पार पाडावी लागतात. त्यामुळे महाधिवक्याला घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखले जाते. अशा महाधिवक्त्याची नेमणूक पुढीलप्रमाणे केली जाते-

1. नेमणूक

महाधिवक्त्याची नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात.
महाधिवक्त्याला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राज्यपालासमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.
राज्यपालाच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महाधिवक्ता पदासाठी केली जाते.

2. पात्रता

भारतीय घटना कलम 165 नुसार महाधिवक्ता पदावर नियुक्त होणार्‍या पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.
त्याचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
त्यांनी भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्षे न्यायाधीश म्हणून किंवा उच्च न्यायालयात 5 वर्षे वकील म्हणून कार्य केले असावे.
संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात.
राज्यपालाच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी.
उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या पात्रता त्या व्यक्तीच्या अंगी असाव्यात.

3. कार्यकाल

भारतीय राज्यघटनेत महाधिवक्त्याच्या तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही परंतु त्याचे निवृत्ती वय 62 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महाधिवक्ता वयाच्या 62 वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकतो असे असले तरी महाधिवक्ता मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो.
याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटना विरोधी कृत्य केले असेल तर राज्यपाल त्याला पदच्युत करतात.

सामान्यत: राज्यातील मंत्रीमंडळ बदलते की. महाधिवक्ता बदलला जातो.

4. वेतन व भत्ते

महाधिवक्त्याला दरमहा रुपये 80,000/- वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. शासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला मोफत असतो.
एकदा निश्चित झालेले त्याचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.
महाधिवक्त्याचे वेतन हे राज्याच्या संचित निधीतून दिल्या जाते.
निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

5. अधिकार व कार्ये

राज्यपालाने मागितलेल्या कायदेशीर बाबीसंबंधी सल्ला देणे.
राज्य सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडणे.
राज्यविधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणे.
महाधिवक्त्याला खाजगी वकिलीदेखील करता येते. परंतु एखदया खटल्यामध्ये एक पक्ष राज्यसरकारचा असेल तर राज्यसरकारच्या बाजूने युक्तिवाद करावा लागतो.
योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...