Wednesday 10 January 2024

महादेव गोविंद रानडे



जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू - 16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 - सामाजिक परिषद.

1890 - औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :


1865 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.

1867 - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.

1870 - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.

उद्दीष्ट - थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.

वकृत्वोत्तेजक सभा - पुणे.

नगर वचन मंदिर - पुणे.

1875 वसंत व्याख्यान - माला (पुणे).

1882 - हुजूरपागा शाळा (पुणे).

31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.

1896 - हिंदू विडोज होम.

इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .

मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.

पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.

1889 - Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :


इंदु प्रकाश (मासिक).

एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.

1874 - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.

1888 - ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.

मराठी सत्तेचा उदय.

मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

निबंध - प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.

'तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य' हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये :

ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.

भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.

1873 - 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.

पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.

संमतीवय विधेयकास पाठिंबा.

इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.

दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.

'महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.' टिळकांचे मत.

राज्यसेवा परीक्षा नियोजनअभ्यासासाठी टिप्स-

-- जो दररोज अभ्यास करणार आहे त्याची रिविजन त्यादिवशी करायचे आहे

-- दिवस कमी असल्या कारणामुळे कोणताही टाइमपास करू नये

-- मुख्य परीक्षेचा आता कोणताही अभ्यास करू नका

-- तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा अभ्यास करा नवीन पुस्तके जास्त विकत घेण्याच्या फंदात पडू नका

-- जर मागच्या तीन ते चार वर्षापासून सतत अपयश येत असेल तर सर्व सोशल मीडिया बंद करून अभ्यास करा

-- परीक्षेचा अभ्यास कसा करावा यासाठी दिवसभराच्या सेमिनार साठी कुठेही वेळ घालवू नका

-- या पुस्तकातून अगोदर अभ्यास केला आहे त्याच पुस्तकाचा सतत अभ्यास करा

-- या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयामध्ये कोर अर्थशास्त्र विचारले जात नाही त्यामुळे अर्थशास्त्राची विशेष तयारी करण्यासाठी वेळ घालवू नका दारिद्र्य रोजगार विकास सर्वसमावेशक विकास शाश्वत विकास लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्‍न विचारले जात असल्या कारणामुळे जास्त वेळ देऊ नका

--CSAT मध्ये गणित या विषयावरती मागील पाच वर्षात पाच ते सात प्रश्न विचारले जातात त्यासाठी जास्त वेळ वाया घालू नका त्यासाठी स्पेशल क्लास लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही मागील परीक्षेमध्ये चे प्रश्न विचारले गेले आहेत त्याचाच सराव करा तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होत आहेत

-- उताऱ्यावरील प्रश्न यासाठी मागील आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि दररोज तीन ते चार उतारे सोडवा आणि त्यामध्ये आपण कुठे चुका करतोय त्याच्यावरती काम करा

-- बुद्धिमत्ता मध्ये पंधरा ते सतरा प्रश्न विचारले जातात त्याची विशेष तयारी करा कोणतेही पुस्तक वापरा त्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये किमान दहा ते बारा प्रश्नांची उत्तर येऊन जातील जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही केले तर त्याला काहीच फरक पडत नाही सध्या मार्केटमध्ये बुद्धिमत्ता चे चांगली पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये प्रश्न सोडवण्याच्या चांगल्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत आणि ही पुस्तके अतिशय स्वस्तात बाजारात मिळतात त्यामुळे आणखी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही ती पुस्तकेच जर तुम्ही व्यवस्थित पणे सोडवली तर तुमची भीती कायमची दूर होऊ शकते.

-- सामान्य विज्ञान या विषयावरती जास्त प्रश्न परीक्षा मध्ये विचारले जातात त्यामुळे या विषयाचा अभ्यास आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे या दोन बाबी होणे गरजेचे आहे सामान्य विज्ञान विषयासाठी क्रमिक पुस्तकांमधील 60 ते 70 टक्के प्रश्न येतात या विषयांमध्ये मुलांना मार्ग कमी का पडतात कारण या विषयावरची असलेली भीती आणि रिविजन न करणे हे आहे त्यामुळे या विषयांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायला हवी.

-- इतिहास या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये अभ्यास जास्त आहे आणि विद्यार्थी या विषयालाच सर्वाधिक वेळ देतात आणि परीक्षेमध्ये प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे त्यांनाही देता येत नाहीत त्यामुळे एकच चांगलं पुस्तक वापरा आणि शालेय क्रमिक पुस्तके वापरा त्याचीच सतत सतत रिविजन करा प्रश्न सोडवा .कमीत कमी वेळ द्या.

-- चालू घडामोडी या विषयासाठी मागील जानेवारी 2022 पासून चालू घडामोडी चा अभ्यास करा

-- भूगोल आणि पर्यावरण या विषयांमध्ये आपणास हमखास चांगले मार्क मिळू शकतात यासाठी क्रमिक पुस्तके त्यासंदर्भातल्या चालू घडामोडी आणि कोणतेही पुस्तक वाचा जास्त प्रश्न आहे प्राकृतिक भूगोल  व भारत आणि जगाच्या भूगोलाचा संदर्भात विचारले जातात याचाही जास्तीत जास्त सराव करा

-- राज्यघटना आणि लोकाभिमुख धोरण कायदे या संदर्भामध्ये बेसिक राज्यघटनेचा अभ्यास चांगला झाला पाहिजे जो पुढे जाऊन तुम्हाला मुख्य परीक्षेलाही उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर शासनाची महिला कम कुवत घटक आणि विविध बाबी जसे की शिक्षण आरोग्य व्यवसाय रोजगार यासंदर्भात मधील शासनाचे धोरण याबाबत प्रश्न विचारले जातात.

-- जर प्रायोरिटी ठरवायचे म्हटलं तर सर्वाधिक जास्त प्रायोरिटी या परीक्षांमध्ये CSAT, सामान्य विज्ञान राज्यघटना भूगोल चालू घडामोडी 
पर्यावरण अर्थशास्त्र आणि इतिहास या क्रमाने द्यायला हवी.

-- लक्षात घ्या हा अभ्यास सर्व तुम्हालाच करावयाचा आहे कोणीतरी तुम्हाला मदत करेल या आशेने स्वतःला फसवू नका आणि घरच्यांनाही फसवू नका

--- आज पर्यंतचा इतिहास परीक्षेचे अभ्यासक्रम जास्त असल्याने त्याच प्रमाणे कॉम्पिटिशन जास्त असल्याकारणामुळे जो हार्ड आणि स्मार्ट दोन्ही वर काम करेल तसेच आत्मविश्वास सातत्य आणि स्वतःला पारंगत ठेवेल तोच हा गड जिंकेल.

-- फालतू च्या बिनकामाचा ज्या आपल्या करिअरमध्ये काहीही महत्वाच्या नाहीत अशा गप्पा अभ्यास करताना सोशल मीडियावर करण्यात वेळ घालू नका लक्षात ठेवा 2023 ही लढाई तुमची पण आहे त्यामुळे दुसऱ्याच्या लढाईबद -- यश मिळेपर्यंत समाजकारण-राजकारण या गोष्टीपासून दूर राहा स्वतःचे हित कशात आहे हे पहा

भारतीय अर्थव्यवस्था :दारिद्र्य

अर्थ :

⚫️ जीवनाच्या किमान मूलभूत गरजा ( अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य इ.)  भागविता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय . जेव्हा समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अपयशी ठरतो , तेव्हा अशा स्थितीला  ' जन दारिद्र्य ' असे म्हणतात . अशा वेळी दारिद्र्य ही एक सामाजिक समस्या बनते.

⚫️ दारिद्र्याची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे , ज्यामध्ये दारिद्र्याची कल्पना चांगल्या जीवन स्तराच्या  ऐवजी निम्न जीवन स्तराच्या  आधारावर करण्यात येते.  भारतातही दारिद्र्याच्या व्याख्येच्या आधार उच्च जीवन ऐवजी  निम्न जीवन स्तरच मानण्यात येतो

दारिद्रय निर्मूलनासाठी धोरणे व कार्यक्रम (Policies and programmers towards poverty alleviation) :

भारताच्या घटनेत तसेच पंचवार्षिक योजनांमध्ये सामाजिक न्याय हे सरकारच्या विकास धोरणांचे प्राथमिक उद्दीष्टय असल्याचे सांगण्यात आले आहे.
बहुतेक सर्व धोरणांमध्ये दारिद्रय निर्मूलनावर भर देण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने सरकारने विविध डावपेचांचा स्विकार करण्यात आलेला आहे.
दारिद्रय निर्मूलनासाठी सरकारने त्री-आयामी दृष्टीकोनाचा स्विकार केला आहे.

अ) वृद्धीधारीत दृष्टिकोन,

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम, आणि

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद.

अ) वृद्धीधारित दृष्टिकोन (Growth-oriented Approach) –

हा दृष्टिकोन अशा अपेक्षेवर आधारलेला आहे की, आर्थिक वृद्धीचे परिणाम (जिडीपी व दर डोई जीडीपीतील वेगवान वृद्धी) समाजाच्या सर्व गटांपर्यंत पसरतील, तसेच गरीब जनतेपर्यंत झिरपत जातील.
1950 च्या दशकात व 1960 कया दहकाच्या सुरुवातीपर्यंत नियोजनाचा मुख्य भर याच दृष्टीकोनावर आधारित होता. त्यामागे असा विचार होता की, निवडक प्रदेशांमध्ये वेगवान औधौगिक विकास आणि हरित क्रांतीच्या माधमातून कृषि विकास घडवून आणल्यास न्यून-विकसित प्रदेशांना तसेच समाजातील मागास आणल्यास गटांना त्याचा फायदा प्राप्त होईल.
मात्र, एकंदरीत वृद्धी आणि कृषि व उधोग क्षेत्रातील वृद्धी अपेक्षित वेगाने होऊ शकली नाही. दुसर्‍या बाजूला, लोकसंख्येच्या विस्फोटामुळे दर डोई उत्पन्नातील वाढ अत्यल्प ठरली. हरित क्रांतीमुळे प्रादेशिक तसेच वैयक्तिक विषमतेत भरच पडली. भू-सुधारणा यशस्वी होऊ शकल्या नाही. त्यामुळे आर्थिक वृद्धीचे फायदे गरीब जनतेपर्यंत झिरपून पोहचले नाहीत.

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम (Poverty Alleviation Programmers PAPs) –

वृद्धीधारीत दृष्टीकोनाला पर्याय म्हणून धोरण निर्मात्यांनी दारिद्र्यावर प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांच्या राबवणुकीचार भर देण्यास सुरुवात केली. सामाजिक मालमत्ता निर्माण करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कामाची निर्मिती करून गरीब जनतेसाठी उत्पन्नसृजक रोजगार निर्माण करता येईल, हा मागील विचार होता.
या दृष्टीकोनाचा अवलंब अल्प प्रमाणात तिसर्याच योजनेदरम्यान करण्यात आला, व त्यानंतर टप्प्याटप्याने त्याचा विस्तार करण्यात आला. अशा दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांचे तीन प्रकार पडतात-
स्वयंरोजगाराचे कार्यक्रम: उदा. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना.
मजुरी रोजगार कार्यक्रम: उदा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
स्वयंरोजगार व मजुरी रोजगारांचे एकत्रीकरण असलेल्या योजना: उदा. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना.

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद (Provision of minimum basic amenities) –

या दृष्टिकोनात जनतेला किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन दरिद्रयाचा प्रश्न हाताळण्याचा समावेश होतो.

सामाजिक उपभोगाच्या गरजांवर (उदा. अनुदानित दराने अन्नधान्य पुरवठा, शिक्षण व आरोग्य सोयी, पाणी पुरवठा व स्वच्छता इ.) सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जनतेचे राहणीमान उंचवता येऊ शकते, या कल्पनेचा भारत हा जगात अग्रेसर देश असल्याचे मानले जाते.

या दृष्टीकोना अंतर्गत कार्यक्रमांच्या आधारे रोजगार निर्मिती करणे, गरिबांच्या उपभोगात भर घालणे व शिक्षण-आरोग्यात सुधारणा होणे, या बाबी अपेक्षित आहेत.

गरिबांच्या अन्न व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढील तीन प्रमुख कार्यक्रम राबविले जात आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्था
एकात्मिक बाल विकास योजना
राष्ट्रीय मध्यान्न आहार योजना
वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राबविण्यात येणार्यान योजनांमध्ये पुढील योजनांचा समावेश होतो-

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
प्रधानमंत्री ग्रामोदय योजना
भारत निर्माण योजना
इंदिरा आवास योजना
ग्रामीण गरीबांना शहरी सेवांचा पुरवठा (PURA)

तसेच, सरकारने काही विशिष्ट गटांना मदत करण्यासाठी विशेष सामाजिक सुरक्षेच्या योजना सुरू केल्या आहेत.
उदा. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP), ज्यांतर्गत ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना’ चालविली जाते.

Basic Concepts of Economics :

🛑दारिद्र्य 🛑

जीवनाच्या मुलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्र्य होय.

दारिद्र्य एक सापेक्ष संकल्पना आहे.



🔶कामगार 

उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.




🛑बेरोजगारी🛑

 रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.  रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.



🔶बेरोजगारीचे प्रकार

१) खुली बेरोजगारी :- 

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.


२) हंगामी बेरोजगारी :-

शेतीच्या नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.


३) अदृश्य / प्रच्छन्न बेरोजगारी :-

आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास..


४) कमी प्रतीची बेरोजगारी :-

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते.


५) सुशिक्षीत बेरोजगारी :- 

जेव्हा सुशिक्षीत लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात.


६)चक्रीय बेरोजगारी :-

विकसीत भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते.


७) घर्षणात्मक बेरोजगारी :-

 विकसीत देशांना जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.

• असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उद्योगामध्ये निर्माण झालेले असतात.)


बकसार लढाई



ब्रिटिश सैन्याने लढाईत गुंतलेली संख्या ७०७२ होती ज्यात ८५९ ब्रिटिश, ५०२७ भारतीय सिपाही आणि ९१८ भारतीय घोडदळांचा समावेश होता. 

युतीची संख्या ४०,००० पेक्षा जास्त असल्याचे अनुमान होते. बंगाल, अवध आणि मोगल साम्राज्याने बनलेल्या भारतीय राज्यांच्या युतीशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी युद्ध करीत होती. यात ४०,००० पुरुष असून ब्रिटिश सैन्याने १०,००० पुरुषांचा पराभव केला होता. बक्सरच्या युद्धानंतर नवाबांनी अक्षरशः आपली लष्करी सत्ता गमावली होती. तीन भिन्न मित्रपक्षांमध्ये मूलभूत समन्वयाचा अभाव त्यांच्या निर्णायक पराभवासाठी जबाबदार होता. 


मिर्झा नजाफ खानने मुघल शाही सैन्याच्या उजव्या बाजूची सेनापती म्हणून काम केले आणि दिवसाच्या वेळी मेजर हेक्टर मुनरो यांच्याविरुध्द सैन्य चालवणारे पहिले सैन्य होते; वीस मिनिटांत ब्रिटीश ओळी तयार झाल्या व त्यांनी मोगलांची प्रगती उलटवली. ब्रिटीशांच्या म्हणण्यानुसार, दुर्राणी आणि रोहिल्ला घोडदळ देखील उपस्थित होते आणि विविध झगडांमध्ये लढाई चालू असताना लढले. पण मध्यरात्रीपर्यंत लढाई संपली आणि शुजा-उद-दौलाने मोठी टंब्रिल्स आणि गनपाऊडरची तीन भव्य मासिके उडून टाकली. 


मुनरोने आपली सेना वेगवेगळ्या स्तंभांमध्ये विभागली आणि विशेषत: अवधच्या नवाब मोगल ग्रँड विझियर शुजा-उद-दौलाचा पाठलाग केला, त्यांनी नदी पार केल्यावर बोट-पूल उडवून प्रत्युत्तर दिल्याने त्यांनी मोगल बादशाह शाह आलम दुसरा आणि त्याच्या सदस्यांचा त्याग केला. 


स्वत: ची रेजिमेंट. मीर कासिम देखील त्याच्या ३० दशलक्ष रुपयांच्या रत्नांसह पळून गेला आणि नंतर १७७७ मध्ये दारिद्र्य संपादन केला. मिर्झा नजाफ खानने शाह आलम दुसराच्या आसपासच्या स्थापनेची पुनर्रचना केली. त्यांनी माघार घेत नंतर विजयी इंग्रजांशी बोलणी करण्याचे निवडले. इतिहासकार जॉन विल्यम फोर्टेस्के यांनी असा दावा केला आहे की ब्रिटिशांचा मृत्यू युरोपियन रेजिमेंटमधील एकूण ८४७:३९ ठार आणि ६४ जखमी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सिपाह्यांमध्ये २५० मृत्यू, ४३५ जखमी आणि ८५ बेपत्ता आहेत. त्यांनी असा दावाही केला की, तीन भारतीय सहयोगी २००० जणांचा मृत्यू झाला आणि बरेच लोक जखमी झाले. आणखी एक स्रोत असे म्हणतात की ब्रिटिश बाजूने ६९ युरोपियन आणि ६६४ आणि मोगल बाजूने ६००० लोक जखमी झाले होते. तेथील तोफखान्यांनी १३३ तोळे आणि १० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. युद्धानंतर लगेचच मुनरोने मराठ्यांना मदत करण्याचे ठरविले, ज्यांना "युद्धासारखी शर्यत" म्हणून वर्णन केले गेले होते, ते मुघल साम्राज्य आणि त्याचे नवाब आणि म्हैसूर यांच्याविषयी अविरत आणि अटळ द्वेषासाठी परिचित होते.


यूपीएससी अभ्यासक्रम मराठी मध्ये

 नमस्कार मित्रानो आज आपण या लेखात ( UPSC syllabus ) यूपीएससी अभ्यासक्रम बघणार आहोत. तसेच या लेखात आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम, आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तसेच यूपीएससी मुलाखत या सर्व घटकांची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू.


यूपीएससी परीक्षा अभ्यासक्रम:

 देशात यूपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये IAS ची परीक्षा हि सर्वोच्य स्थानी मानली जाते. आज आपण या मधील IAS च्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेऊया. सध्याच्या वेळेला आणि भूतकाळाला जोडणारा यूपीएससी अभ्यासक्रमाचा उच्च स्तर म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काठीण्य पातळी असलेला अभ्यासक्रम आहे. Upsc.gov.in वर जाहीर केलेल्या यूपीएससीच्या अधिकृत अधिसूचने मध्ये यूपीएससी अभ्यासक्रमाचा उल्लेख केलेला आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम हा IAS च्या तयारीचा मूळ आणि IAS परीक्षेत निवडलेला पहिला घटक आहे. UPSC परीक्षेतील प्रत्येक गोष्ट आपण UPSC च्या अभ्यासक्रमामधून आपण समजून घेऊ शकतो. यूपीएससी चा अभ्यासक्रम समजून घेणे ही आयएएस परीक्षेत यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. उमेदवारांना हे समजून घेणे आवश्यक आहे की सध्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्ताची घटना ही सामान्य अध्ययन अभ्यासक्रमाच्या मूलभूत विषयांशी निगडीत आहे आणि सध्याच्या घडामोडींच्या सहाय्याने उमेदवार या प्रकरणाची प्रासंगिकता समजून घेऊ शकतात.

IAS प्रिलिम्स आणि IAS मुख्य परीक्षेसाठी दरवर्षी यूपीएससीच्या अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम अधिसूचित केला जातो.IAS तयारीचा पहिला आवश्यक घटक म्हणजे IAS अभ्यासक्रमाची आपणास स्पष्ट समज असणे आवशक आहे. IAS प्रिलिम्स अभ्यासक्रम आणि IAS मुख्य अभ्यासक्रमाचा स्वतंत्रपणे यूपीएससी अधिसूचनेमध्ये उल्लेख केला आहे. परंतु IAS मुख्य परीक्षा अभ्यासक्रम म्हणजे IAS प्रिलिम्स अभ्यासक्रमाचा विस्तृत विस्तार आहे. उमेदवारने IAS अभ्यासक्रमाची खोली समजून घेणे आवश्यक आहे. यूपीएससी अभ्यासक्रम समजण्यासाठी मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका टॉर्च म्हणून काम करतात. याशिवाय आयएएस च्या तयारीच्या मार्गावर राहण्यासाठी उमेदवारांना दररोजच्या चालू घडामोडींचा आभ्यास करणे आवश्यक आहे.

IAS टॉपर्स केलेल्या उमेदवारांचे योग्य विश्लेषण आणि IAS च्या मागील प्रश्नपत्रिकां मधून आयएएस तयारीला दिशा प्रदान करते. परीक्षेची खोली समजून घेण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास नेहमीच आयएएस अभ्यासक्रमाच्या विषयाशी संबंधित ठेवण्यासाठी उमेदवारांना यूपीएससी अभ्यासक्रम अंतर्भूत करणे आवश्यक आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम IAS च्या तयारीची मर्यादा ठरवते. यूपीएससी मध्ये IAS अभ्यासक्रम वेगळ्या अस्तित्वात नसतो, ही त्यांची गतिशीलता आहे जी IAS परीक्षा अधिक जटिल बनवते. यूपीएससी परीक्षेत IAS अभ्यासक्रमात नमूद केलेले सर्व विषय IAS बनू पाहणारया परीक्षार्थींना, तसेच सामान्य माणसाला समजून घेण्याची मागणी करतात.


आयएएस अभ्यासक्रम 2022 – पूर्व परीक्षा

पेपरप्रश्न आणि वेळमार्क
सामान्य अध्ययन पेपर – ११०० प्रश्न200
सामान्य अध्ययन पेपर – २ (CSAT – Qualifying only)८० प्रश्न200 ( या मार्कांचा विचार केला जात नाही )
एकूण200




IAS – आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर १

  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व असणार्‍या सध्याच्या घटना.
  • भारत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास.
  • भारतीय आणि जागतिक भूगोल – भौतिक, सामाजिक, भारत आणि जगाचा आर्थिक भूगोल.
  • भारतीय राज्य व राज्यशास्त्र-राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण, मुलभूत हक्कांचे प्रश्न इ.
  • आर्थिक आणि सामाजिक विकास, टिकाऊ विकास, गरीबी, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इ.
  • पर्यावरणीय विषय, जैव-विविधता आणि हवामान बदल – या विषयावर विषय विशेषतेची आवश्यकता नाही.
  • सामान्य विज्ञान.

प्रीलिम्स परीक्षेसाठी यूपीएससीने आयएएस अभ्यासक्रमातील चालू घडामोडींना अव्वल स्थान दिले आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. आपण असे म्हणू शकतो की आयएएस तयारीच्या दिशेने निर्णय घेण्यामध्ये हा एक घटक महत्वाचा आहे. आयएएसच्या इच्छुकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या सद्य घटनांचा विचार करून सर्व विषयांचा अभ्यास केला पाहिजे.

इतर सर्व विषय आयएएसच्या पूर्वपरीक्षा परीक्षेसाठी तितकेच महत्वाचे आहेत, परंतु उमेदवाराने आयएएसच्या तयारीत असंबद्ध विषय सोडण्याची सवय विकसित केली पाहिजे. भारतीय राजकारण हा असा एक विषय आहे जिथे उमेदवार नेत्यांच्या राजकीय विधानांबद्दल वाचण्यात वेळ वाया घालवतात. परंतु ही सवय मर्यादित ठेवण्याची आणि केवळ घटनात्मक कार्या पुरती मर्यादीत ठेवण्याची सूचना देते.


आयएएस प्रिलिम्स अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर -2 (CSAT)

  • आकलन.
  • संवाद कौशल्यासह परस्पर वैयक्तिक कौशल्ये.
  • तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता.
  • निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे.
  • सामान्य मानसिक क्षमता.
  • मूलभूत संख्या (संख्या आणि त्यांचे संबंध, परिमाण च्या ऑर्डर इ.) (दहावी ची पातळी), डेटा स्पष्टीकरण (चार्ट, आलेख, सारण्या इ. – (दहावी ची पातळी)

IAS – आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक ( पारंपारिक ) पेपर-आधारित परीक्षा आहे. ज्यात उमेदवारांना प्रश्नांसाठी लांब उत्तरे लिहिण्याची आवश्यकता असते. सामान्य अध्ययनच्या पेपर व्यतिरिक्त, एक निबंध पेपर आहे ज्यामध्ये उमेदवारांना दोन निबंध लिहिणे आवश्यक आहे.

आयएएस मुख्य परीक्षा विषय व त्यांचे गुण खाली दिले आहेत.

पेपरपेपर चे नावमार्क
घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या भाषांमधून उमेदवाराने
निवडलेल्या भारतीय भाषेपैकी एक भाषा. (केवळ पात्रता )
३०० (केवळ पात्रता)
इंग्रजी (केवळ पात्रता)३०० (केवळ पात्रता)
निबंध लेखन२५०
सामान्य अध्ययन पेपर – १२५०
सामान्य अध्ययन पेपर – २२५०
सामान्य अध्ययन पेपर – ३२५०
सामान्य अध्ययन पेपर – ४२५०
पर्यायी – विषय पेपर १२५०
पर्यायी – विषय पेपर २२५०
आयएएस मुख्य (लेखी)१७५०
आयएएस मुलाखत२७५
एकूण२०२५
UPSC syllabus in Marathi PDF

नावाप्रमाणेच आयएएस मुख्य परीक्षा ही उमेदवारांची सुध्दा मुख्य परीक्षा आहे. आयएएस निवड केवळ आयएएस मुख्य (लेखी) आणि आयएएस मुख्य (मुलाखत) मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित आहे. यूपीएससी अधिकृत अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम विषयाची यादी वेळोवेळी प्रदान करते. यूपीएससी अभ्यासक्रम पेपरनिहाय स्वरुपात देण्यात आला आहे आणि उमेदवारांना त्याच पद्धतीने आयएएस परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.

आयएएस अभ्यासक्रम – निबंध पेपर

यूपीएससीच्या अधिसूचनेत आयएएस निबंध पेपर अभ्यासक्रमाचा उल्लेख नाही. अधिकृत अधिसूचनेमध्ये फक्त एक विस्तृत रूपरेषा प्रदान केली गेली आहे. परंतु उमेदवारांकडून मिळालेल्या अपेक्षेचा उल्लेख अधिसूचनेत करण्यात आला आहे. “त्यांच्या कल्पना सुव्यवस्थित पद्धतीने मांडण्यासाठी आणि संक्षिप्तपणे लिहिण्यासाठी त्यांनी निबंधाच्या विषयाशी जूळून जाणे अपेक्षित आहे.

यूपीएससी ने नेहमीच तत्वज्ञान, लोक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यावर विषय दिला आहे. या निबंधातून उमेदवारांच्या जागतिक दृष्टिकोनाची चाचणी घेतली जाते. उमेदवाराने गुंतलेली समस्या कशी पाहिली आणि त्या समस्येचे निराकरण कसे सुचविले यावर या विषयातील यश अवलंबून असते.

आयएएस अभ्यासक्रम – सामान्य अध्ययन पेपर  


इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड भूगोल ऑफ द वर्ल्ड सोसायटी.

  • भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत, कला, साहित्य आणि आर्किटेक्चरच्या मुख्य पैलूंचा समावेश.
  • आधुनिक भारतीय इतिहास अठराव्या शतकाच्या मध्य काळा पासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्तिमत्त्व, आणि मुद्दे.
  • स्वातंत्र्य चळवळ – त्याचे विविध टप्पे आणि देशातील विविध भागातील महत्त्वपूर्ण योगदानकर्ते / योगदान.
  • देशातील स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि पुनर्रचना.
  • जगाच्या इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती, महायुद्धे, राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, विस्तारवाद, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी घटनांचा समावेश आहे.
  • भारतीय समाजातील विविध वैशिष्ट्ये आणि विविधता.
  • महिलाची भूमिका आणि महिलांची संघटना, लोकसंख्या आणि संबंधित समस्या, दारिद्र्य आणि विकासात्मक समस्या, शहरीकरण, त्यांच्या समस्या आणि त्यांचे उपाय.
  • भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम.
  • सामाजिक सशक्तीकरण, जातीयवाद, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता.
  • जगाच्या भौतिक भूगोलातील ठळक वैशिष्ट्ये.
  • जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यांचा समावेश असलेले ) जगातील विविध भागात (भारतासह) प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या स्थानासाठी जबाबदार घटक.
  • भूकंप, सुनामी, ज्वालामुखीय, चक्रीवादळ इत्यादी, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे भौगोलिक वैशिष्ट्यांमधील बदल, वनस्पती आणि जीव-जंतु आणि अशा बदलांचा परिणाम यासारख्या महत्त्वपूर्ण भौगोलिक घटना.

सामान्य अध्ययन पेपर – 

शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध.

  • भारतीय राज्यघटना – ऐतिहासिक अधोरेखित, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्ती, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना.
  • संघ आणि राज्ये यांची कार्ये आणि जबाबदारया, फेडरल स्ट्रक्चरशी संबंधित मुद्दे आणि आव्हाने, स्थानिक पातळीवरील अधिकार आणि वित्तपुरवठा आणि त्यातील आव्हाने.
  • विवाद निराकरण यंत्रणा यांचे विविध अवयव आणि संस्था यांच्यात शक्तींचे पृथक्करण.
  • लैंगिक संतुलन प्रतिबिंबित करणारे एक कार्यबल असण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि महिला उमेदवारांना प्रोत्साहित केले जाते.
  • भारतीय घटनात्मक योजनेची इतर देशांच्या घटनेशी तुलना.
  • संसद व राज्य विधिमंडळ – रचना, कार्यप्रणाली, व्यवसायाचे आचरण, अधिकार व सुविधा व त्याद्वारे उद्भवणारे प्रश्न.
  • कार्यकारी आणि न्यायपालिकेची रचना, संघटना आणि कार्य-सरकारची मंत्रालये आणि विभाग, दबाव गट आणि औपचारिक / अनौपचारिक संघटना आणि त्यांची लोकसभेमधील भूमिका.
  • लोकप्रतिनिधी कायद्याची ठळक वैशिष्ट्ये.
  • विविध घटनात्मक पदाची कार्ये, अधिकार, कार्ये व जबाबदारया, विविध नेमणुका. वैधानिक, नियामक आणि विविध अर्ध-न्यायिक संस्था.
  • सरकारची धोरणे आणि विविध क्षेत्रातील विकासासाठी हस्तक्षेप आणि त्यांच्या अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे.
  • विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग – स्वयंसेवी संस्था, बचत गट, विविध गट आणि संघटना, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्था आणि इतर भागधारकांची भूमिका.
  • केंद्र व राज्ये यांनी असुरक्षित लोकसंख्ये साठी कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, या असुरक्षित विभागांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सुधारणेसाठी यंत्रणा, कायदे, संस्था स्थापन केले आहेत.
  • आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन संबंधित सामाजिक क्षेत्र / सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे.
  • दारिद्र्य आणि उपासमारीशी संबंधित मुद्दे.
  • शासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, ई-गव्हर्नन्स अप्लिकेशन्स, मॉडेल्स, यश, मर्यादा आणि संभाव्यतेचे महत्त्वपूर्ण पैलू. नागरिकांची सनद, पारदर्शकता आणि जबाबदारी आणि संस्थात्मक आणि इतर उपाय.
  • लोकशाहीमध्ये नागरी सेवांची भूमिका.
  • भारत आणि त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध.
  • द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गटबाजी, आणि भारत किंवा भारताच्या हितावर परिणाम करणारे करार.
  • विकसनशील देशांच्या राजकारणाचा आणि भारताच्या हितावर आधारित राजकारणाचा प्रभाव, भारतीय डायस्पोरा.
  • महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, आणि त्यांची रचना.

सामान्य अध्ययन पेपर – ३

  • तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन.
  • भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, गतिशीलता, संसाधनांचा विकास, विकास आणि रोजगाराशी संबंधित मुद्दे.
  • समावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे.
  • सरकारी बजेट.
  • देशातील विविध भागात मुख्य पीक-पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली, साठवण, शेती उत्पादनांचे वाहतूक आणि विपणन मुद्दे व संबंधित अडचणी, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ई-तंत्रज्ञान.
  • प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किंमतींशी संबंधित मुद्दे. सार्वजनिक वितरण प्रणाली- उद्दीष्टे, कामकाज, मर्यादा, सुधार, बफर साठा आणि अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान मोहिम, पशु संगोपन अर्थशास्त्र.
  • भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.
  • भारतातील जमीन सुधारना.
  • अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणात बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम.
  • पायाभूत सुविधा: ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इ.
  • गुंतवणूक मॉडेल.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान- घडामोडी आणि त्यांचे अनुप्रयोग आणि दैनंदिन जीवनातील प्रभाव.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारतीयांची उपलब्धि; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
  • आयटी, स्पेस, कॉम्प्यूटर्स, रोबोटिक्स, नॅनो-टेक्नॉलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित विषयांमध्ये जागरूकता.
  • संवर्धन, पर्यावरण प्रदूषण आणि र्‍हास, पर्यावरणाचा प्रभाव मूल्यांकन.
  • आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन
  • विकास आणि अतिरेकी प्रसार यांच्यात दुवा.
  • अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि राज्य-नसलेल्या इतर घटकांची भूमिका.
  • संप्रेषण नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सची भूमिका, सायबर सुरक्षाच्या मूलभूत गोष्टी, मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध.
  • सुरक्षा आव्हाने आणि सीमाभागातील त्यांचे व्यवस्थापन – दहशतवादासह संघटित गुन्ह्यांचा दुवा.
  • विविध सुरक्षा दले आणि एजन्सी आणि त्यांचा आदेश.

सामान्य अध्ययन पेपर – ४

नीतिशास्त्र, अखंडता आणि योग्यता या पेपरमध्ये उमेदवारांची वृत्ती आणि त्यांची अखंडता, सार्वजनिक जीवनातील संभाव्यता आणि त्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्नांशी संबंधित असलेल्या समस्यांविषयी आणि समाजाशी वागताना होणारया संघर्षांबद्दलच्या प्रश्नांचा अभ्यास यात समावेश असेल. त्यासोबत खालील विस्तृत क्षेत्रे कव्हर केली जातील.

  • नीतिशास्त्र आणि मानवी इंटरफेस: मानवतेच्या नीतीमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र – खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमध्ये. मानवी मूल्ये – महान नेते, सुधारक आणि प्रशासकांचे जीवन आणि शिकवण्यांचे धडे, मूल्यमापन करण्यामध्ये कौटुंबिक समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका.
  • वृत्ती: सामग्री, रचना, कार्य त्याचा प्रभाव आणि विचार आणि वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय दृष्टीकोन, सामाजिक प्रभाव आणि मन वळवणे.
  • नागरी सेवा, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेचे समर्पण, दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती, सहिष्णुता आणि करुणेसाठी योग्यता आणि मूलभूत मूल्ये.
  • भावनिक बुद्धिमत्ता-संकल्पना आणि प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि अनुप्रयोग.
  • भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
  • सार्वजनिक / नागरी सेवेची मूल्ये आणि सार्वजनिक प्रशासनात नीतिशास्त्र. स्थिती आणि समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, नियम आणि विवेक, जबाबदारी आणि नैतिक कारभार. प्रशासनात नैतिक आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक मुद्दे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स.
  • कारभाराची शक्यता: सार्वजनिक सेवेची संकल्पना, शासन आणि संभाव्यतेचा तात्विक आधार, सरकारमधील माहिती सामायिकरण आणि पारदर्शकता, माहितीचा अधिकार, संहिता.
  • नीतिशास्त्र, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा वितरणाची गुणवत्ता, सार्वजनिक निधीचा उपयोग, भ्रष्टाचाराची आव्हाने.
  • वरील मुद्द्यांवरील केस स्टडीज.

UPSC मध्ये पर्यायी विषय कोणते असतात?

पर्यायी – विषय पेपर १


आयएएस मुख्य परीक्षेत 25 पर्यायी विषय आहेत आणि त्यातील फक्त एक विषय उमेदवार निवडू शकतो. पर्यायी विषयाला एकून १७५० पैकी ५०० गुण आहेत. हे एकूण ३० % च्या आसपास आहे. म्हणून उमेदवारांना पर्यायी विषयांची काळजीपूर्वक निवड करण्याची सूचना देण्यात आली आहे कारण ते आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते किंवा तोडू शकते.

खाली आयएएस मुख्य वैकल्पिक विषयांची अधिकृत यादी आहे. उमेदवार पर्यायी विषय म्हणून कोणत्याही एका विषयाची निवड करू शकतात.


शेतीपशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानमानववंशशास्त्र
वनस्पतिशास्त्ररसायनशास्त्रसिव्हिल अभियांत्रिकी
वाणिज्य आणि लेखाअर्थशास्त्रविद्युत अभियांत्रिकी
भूगोलइतिहासभूशास्त्र
कायदाव्यवस्थापनगणित
वैद्यकीय विज्ञानयांत्रिकी अभियांत्रिकीतत्वज्ञान
भौतिकशास्त्रराज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधमानसशास्त्र
सार्वजनिक प्रशासनसमाजशास्त्रसांख्यिकी
प्राणीशास्त्र




पर्यायी – विषय पेपर 

उमेदवार त्यांच्या वैकल्पिक विषय म्हणून पुढीलपैकी कोणत्याही भाषेचे साहित्य निवडू शकतात.

आसामीबंगालीडोगरी
बोडोहिंदीगुजराती
काश्मिरीकन्नडकोंकणी
मैथिलीमल्याळममणिपुरी
नेपाळीमराठीपंजाबी
संस्कृतओडियासंथाली
तामिळउर्दूतेलगू
सिंधीइंग्रजी

अधिक माहिती साठी या संकेत स्थळाला भेट देऊ शकता . संघ लोक सेवा आयोग

आपणास  हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. जर आपणास इतर कोणत्याही विषया बद्दल माहिती हवी असेल तर आपण कमेंट करू शकता. जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी त्या विषयावर लेख उपलब्ध करून देऊ.

पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:

महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.


आरक्षण :

1. महिलांना : 50 %

2. अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)

3. इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)


विसर्जन : 

राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.


कार्यकाल : 5 वर्ष


राजीनामा :

सभापती - जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे 


त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 

30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन : 

सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन :

 सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक - कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक - गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.


गटविकास अधिकारी :

निवड - गटविकास अधिकारी

नेमणूक - राज्यशासन

कर्मचारी - ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण - मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती - उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कार्य व कामे :

1. पंचायत समितीचा सचिव

2. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

3. वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.

4. कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

6. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

7. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

9. महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.


पंचायत समितीची कामे :

1. शिक्षण

2. कृषी

3. वने

4. समाजकल्याण

5. पशुसंवर्धन व दुग्धविकास

6. सार्वजनिक आरोग्य सेवा

7. दळणवळण

8. समाजशिक्षण

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा


*देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत. 


*राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. 


*पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते. 


*लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.


* राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.


* जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.


* मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.


* राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 


*महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 


*पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.


* महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.


* जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत. 


*भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे. 


*महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे. 


*महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. 


*राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. अजंठा, वेरूळ व घारपुरीची लेणी, गेट वे ऑफ इंडिया आणि वास्तुशास्त्राच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू


जसे विहार व चैत्य यामुळे जगभरातील पर्यटक राज्याकडे आकर्षित होतात. 


*मानव विकासास सहाय्यभूत ठरणार्‍या प्रत्येक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे राज्यात उदयास आली आहेत. क्रीडा, कला, साहित्य व सामाजिक सेवा यामध्ये राज्याचे भरीव योगदान आहे. ‘बॉलीवूड’ नावाने जगप्रसिद्ध असलेला चित्रपट उद्योग राज्यात स्थित आहे.

चालू घडामोडी :- 10 जानेवारी 2024

◆ युरोपातील जर्मनी सौरऊर्जेच्या निर्मितीत आघाडीवर असून, त्याखाली अनुक्रमे 2) इटली, 3) स्पेन, 4) नेदरलँड, 5) फ्रान्स हे देश आहेत.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा नवी दिल्लीत 'नॅशनल PACS मेगा कॉन्क्लेव्ह चे नेतृत्व करणार आहेत.

◆ सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक झाली.

◆ आसामचे राज्यपाल गुलाब कटारिया आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुवाहाटी येथे ई-गव्हर्नन्सवरील प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले.

◆ मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मोइरांग कॉलेजमध्ये कॉलेज फागथांसी मिशनचे उद्घाटन केले.

◆ पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे राज्यातील महानगपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आला. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक बटकावला. तर मुंबई महापालिका द्वितीय आणि कोल्हापूर महापालिका तृतीय स्थानी आहे.

◆ फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी आत्तापर्यंत सर्वात तरुण असणारे ग्याब्रियल अटल यांची निवड झाली आहे.

◆ ग्याब्रियल अटल हे फ्रान्स या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत.

◆ प्रसिध्द हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. ते "रामपूर सहस्वान" संगीत घराण्याचे गायक होते.

◆ शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार हे पुरस्कार मिळालेले आहेत.

◆ प्रसिध्द हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांना 2022 वर्षी भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

◆ शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना 2012 साली "पश्चिम बंगाल" राज्याच्या सर्वोच्च बंगभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

◆ महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ ऑस्ट्रेलिया ची महिला क्रिकेट पटू एलिस पेरी हिने 300 अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.

◆ फ्रॅझ बेकनबॉर(जर्मनी) यांचे निधन झाले. ते जर्मनीच्या 1974 वर्षीच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार होते.

◆ केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड व लोणावळा या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत.

◆ चीन या देशाने आईनस्टाइन प्रोब या खगोलशास्त्रीय उपगृहाचे प्रक्षेपण केले आहे.

◆ भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने "विजय प्रकाश श्रीवास्तव" सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ भारतात 2006 वर्षापासून 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो.

◆ क्रिर्गीस्तान देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषीत केले आहे.

◆ 2023 या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत देशाचे पर्यटक देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 10 January


🔖 प्रश्न - फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली?

ANS - ग्याब्रियल अटल यांची - ते फ्रान्स देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. 

🔖 प्रश्न - राशीद खान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

ANS - संगीत

🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यात कोठे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले?

ANS - मुंबई येथे

🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकेच्या ई गव्हर्नन्स निर्देशकांत कोणत्या महानगर पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला?

ANS - पिंपरी चिंचवड

🔖 प्रश्न - केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या?

ANS - सासवड व लोणावळा नगरपालिका

🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणत्या देशाने आईनस्टाइन प्रोब या खगोलशास्त्रीय उपगृहाचे प्रक्षेपण केले?

ANS - चीन

🔖 प्रश्न - भारताच्या राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

ANS - २६

🔖 प्रश्न - राष्ट्रीय गून्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

ANS - महाराष्ट्र

🔖 प्रश्न - भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने कोणाला सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

ANS - विजय प्रकाश श्रीवास्तव यांना

🔖 प्रश्न - १० जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो?

ANS - विश्व हिंदी दिवस म्हणून - २००६ पासून भारतात १० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो.

🔖 प्रश्न - कोणत्या देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणुन घोषीत केले?

ANS - क्रिर्गीस्तान ने

🔖 प्रश्न - २०२३ या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

ANS - भारत - २०२३ या वर्षात २.९० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...