Thursday 7 May 2020

राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा नोकरभरती नाही.

🅾कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आरोग्यसेवा वगळता इतर विभागांत  नोकर भरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

🅾तसेच शासकीय खर्चाला 67 टक्के कट लावण्यात आला असून, प्रत्येक विभागाला आता त्यांच्या एकूण बजेटच्या फक्त 33 टक्केच रक्कम मिळणार आहे. शिवाय, नवीन कोणतीही योजना सादर करू नये, असे वित्त विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

🅾तर प्रत्येक विभागाने आपल्या चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत किंवा रद्द करण्यासारख्या आहेत त्या निश्चित कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे.
वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, मदत पुनर्वसन हे विभाग प्राधान्य क्रमाचे विभाग म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

🅾 या विभागांनी फक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपला निधी खर्च करायचा आहे. अन्य विभागांना कोणत्याही खरेदीच्या नव्या प्रस्तावांना मंजुरी देता येणार नाही.तसेच फर्निचर, दुरुस्ती, झेरॉक्स मशीन, संगणक, कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे, असे खर्चदेखील आता करता येणार नाहीत.

🅾प्राधान्यक्रम नसलेल्या विभागांना, कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना, प्रशासकीय मान्यता देता येणार नाही अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असली तरी निविदा प्रसिद्ध करता येणार नाही.मात्र औषधे, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व त्यांचा पुरवठा यांच्या खरेदीसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे.

राज्य ३१ मे पर्यंत करोनामुक्त झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंचे आदेश :

राज्यात वेगाने पसरणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेतली व ३१ मे पर्यंत राज्य करोनामुक्त करण्याचे आदेश दिले.

‘प्रत्येक जिल्हा ग्रीन झोन बनलाच पाहिजे. भले मग त्यासाठी तुम्ही कितीही कठोर भूमिका घ्या’, असे उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले.

‘स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आवश्यक निर्णय घेऊ शकतात. पण करोना नियंत्रणात आणण्याच्या बाबतीत कुठलीही हयगय अजिबात सहन करणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले’. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.

पोलीस भरती प्रश्नसंच

▶️खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.

A. बालदिन - १४ नोव्हेंबर

B. कामगार दिन -१ मे

C. शिक्षणदिन - १५ सप्टेंबर✅

D. बालिका दिन -३ जानेवारी

▶️छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खाली पर्यायांपैकी कोणते?

A. तुकाराम - एकनाथ

B. रामदास -तुकाराम✅

C. तुकाराम - नामदेव

D. रामदास - एकनाथ

▶️शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?

A. सर्वनाम

B. नाम✅

C. क्रियापद

D. विशेषण

▶️मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.

A. फक्त दिवस

B. डोपरी किंवा पहाटे

C. फक्त रात्री✅

D. दिवस किंवा रात्री

▶️खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:

३८ , २९ , २२ , ? , १४ , १३

A. १८

B. १६

C. १७✅

D. १९

▶️अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.

सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?

A. १४

B. ८

C. ७✅

D. ११

▶️३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?

A. ९२०✅

B. २३०

C. ११५

D. ६९०

▶️_यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर

A. संत गाडगेबाबा✅

B. संत तुकाराम

C. संत चोखामेळा

D. संत शेख महंमद

▶️बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?

A. स्वदेशी आंदोलन

B. चोरीचौरा आंदोलन

C. फोडा आणि तोडा आंदोलन

D. बंग - भंग आंदोलन✅

▶️खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?

A. ५/६

B. ३/५

C. ७/९

D. ४/७✅

▶️◾️◾️इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश

अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत.

ब. स्वतंत्र (विलग) पाय-यांमध्ये सादर केले जातात.

क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात.

ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे :

A) फक्त अ आणि ब

B) फक्त ब आणि के

C) अ, ब आणि क✅

D) वरील सर्व

▶️◾️अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ?

A) - 1.51J

B) - 3.4eV

C) - 1.51 eV ✅

D) - 13.6 eV

▶️◾️खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

A)  भारताचे पहिले पर्यावरण पुरक जैव इंधन (bio-fuel) युक्त विमान चेन्नई आणि बेंगलुरु दरम्यान उडाले. ✅

B)  भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018 चे राष्ट्रीय धोरण जाहिर केले आहे.

C) या धोरणानुसार 2030 पर्यत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

D) वरीलपैकी एकही नाही

▶️◾️ नुकताच 'बॉनेटहेड
शार्क' (Bonnethead Shark) मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

अ] तो प्रामुख्याने समुद्र गवत (sea grass) खातो.

ब] तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य विधान/ने निवडा :

पर्यायी उत्तरे :

A) फक्त अ✅

B) फक्त ब

C) अ आणि ब दोन्हीही

D) अ आणि ब दोन्हीही नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रकिया सुरू.

🏵न्यायालयात दाखल होणारी प्रकरणे ई-फायलिंग  पद्धतीने दाखल करतायावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

🏵यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून राज्यात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांची यादी मागविण्यात आली आहे, अशी माहिती बार कौन्सिलतर्फे देण्यात आली.

🏵सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटीकडून या आराखड्यावर सध्या काम सुरू आहे. या कमिटीकडून बार कौन्सिल ऑफ इंडियाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र बरोबरच देशातील इतर राज्यांत कडूनही यासाठी माहिती मागविण्यात आली आहे.

🏵ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर कोर्टात दाखल होणारे दावे ई-फायलिंग द्वारे कसे दाखल करता येतील याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

🏵महाराष्ट्रातील वकिलांची माहिती गोळा करण्यासाठी तसेच ई-फायलिंग या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच बैठक घेण्यात आली अशी माहिती कौन्सिलचे सदस्य अड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

🏵राज्यातील व परराज्यातील माहिती गोळा करण्यात आल्यानंतर ही माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटी कडे येणार आहे. त्या नंतर पुढील आराखडा तयार केला जाणार आहे.

🏵ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर प्रत्येक वकीलाला तालुका, जिल्हा, हायकोर्ट, आणि सुप्रीम कोर्टातही ई फाइलिंग द्वारे दावे दाखल करता येऊ शकणार आहेत, असे ही अड. उमाप यांनी सांगितले.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...