Wednesday 28 August 2019

1 सप्टेंबरपासून बदलणार बँकांशी संबंधित 7 नियम

 1 सप्टेंबर 2019पासून बँकेशी संबंधित अनेक नियम बदलणार आहे. ज्याचा प्रभाव आपल्यावर सरळ सरळ पडणार आहे. एकीकडे बँकेच्या माध्यमातून घर खरेदी करणं स्वस्त होणार असलं तरी दुसरीकडे बँकेची वेळ बदलणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेतलेलं गृह कर्ज स्वस्त होणार आहे. अशा प्रकारचे बँकांचे 7 महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. 

59 मिनिटांत मिळणार वैयक्तिक, वाहन आणि गृह कर्ज

कार आणि घर खरेदी करण्यासाठी 59 मिनिटांत आपल्याला आता कर्ज मिळू शकणार आहे. 1 सप्टेंबरपासून अनेक बँका नव्या सुविधा पुरवणार आहेत. बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास अनेकांच्या फेऱ्या मारण्यापासून सुटका होणार असून, एका फेरीतच तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 1 कोटी रुपयांपर्यंत अवघ्या 59 मिनिटांत कर्ज देण्याची योजना एमएसएमई (MSME) पोर्टलवर सुरू आहे. तसेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय), युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँक यांनी ही मर्यादा 5 कोटींवर वाढविली आहे. बँक ऑफ इंडियाने आता बरीच रिटेल कर्ज या श्रेणीत आणण्याची योजना तयार केली आहे. आणखी एक सरकारी इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) देखील यासाठी तयारी करत असल्याचे समजते. 1 सप्टेंबरपासून 59  मिनिटांत ग्राहकांना गृह आणि ऑटोसाठी कर्जे मिळणार आहेत. 

SBIच्या ग्राहकांसाठी RLLRवर मिळणार कर्ज

SBIच्या माध्यमातून घर खरेदी करणं स्वस्त होणार आहे. एसबीआयनं गृह कर्जावरच्या व्याजदरात 0.20 टक्के कपात केली आहे. 1 सप्टेंबरपासून वाहन कर्जावरचं व्याजदर 8.05 टक्के होणार आहे. आरबीआयनं ऑगस्टमध्ये रेपो रेट कमी करून 5.40 टक्क्यांवर आणला आहे. 

15 दिवसांत बँक जारी करणार किसान क्रेडिट कार्ड (KCC)

1 सप्टेंबरपासून किसान क्रेडिट कार्ड (KCC) तयार करणं आणखी सोपं होणार आहे. जास्त करून 15 दिवसांत बँकांकडून किसान क्रेडिट कार्ड जारी केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बँकांना 15 दिवसांत क्रेडिट कार्ड देण्यास सांगितलं आहे.  

बँक ऑफ महाराष्ट्र लागू करणार नवे व्याजदर 

सार्वजनिक क्षेत्रात मोठी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रविवारपासून रिटेल कर्जाला रेपो रेटशी जोडणार आहे. त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून कर्ज घेणं स्वस्त होणार आहे. बँकेनं रिटेल कर्जावरच्या व्याजदराला रेपो रेटशी जोडल्यानंतर याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. रेपो रेटशी कर्जाचे व्याजदर जोडल्यानं आरबीआय जेव्हा जेव्हा रेपो रेटमध्ये बदल करेल, तेव्हा तेव्हा त्याचा प्रभाव कर्जाच्या दरावर पडणार आहे. 

एसबीआयनं फिक्स्ड डिपॉझिट दरांमध्ये केली कपात 

देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं फिक्स्ड डिपॉझिट आणि बल्क डिपॉझिटच्या व्याजदरांत कपात केली आहे. तसेच सेव्हिंग बँक खात्याच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. 1 लाख रुपयांपर्यंत डिपॉझिट ठेवणाऱ्या ग्राहकाच्या सेव्हिंग अकाऊंटवर 3.5 टक्के व्याज मिळतं. तर बँकेनं रिटेल टर्म डिपॉझिटवर 0.1 टक्क्यापासून 0.5 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. बल्क डिपॉझिट रेटमध्ये 0.3 पासून 0.7 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. 

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न 29/8/2019

1) वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा अधिक काळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही, त्या ठिकाणी..............
     हे चिन्ह वापरतात.

   1) “-”      2) ;      3) ,      4) !
उत्तर :- 2

2) ‘पापणीत गोठविली मी नदी आसवांची’ – अलंकार ओळखा.

   1) अतिशयोक्ती    2) रूपक      3) व्यतिरेक    4) दृष्टांत

उत्तर :- 1

3) अनुकरणवाचक गट निवडा.
   1) बडबड, किरकिर, फडफड    2) अर्ज, इनाम, जाहीर
   3) भाकरी, तूप, कांबळे      4) सायकल, सर्कस, सिनेमा

उत्तर :- 1

4) योग्य पर्याय निवडा.

   अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत.
   ब) यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रगट होतात.

   1) अ आणि ब बरोबर  2) अ बरोबर ब चूक  3) अ चूक ब बरोबर       4) अ आणि ब दोन्ही चूक

उत्तर :- 1

5) ‘महान’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

   1) सुरेख    2) मोठा      3) छान      4) स्मृती

उत्तर :- 2

6) ‘तो घरी जातो’ या वाक्यातील प्रयोग कोणते ?

   1) सकर्मक कर्तरी    2) अकर्मक कर्तरी   
   3) कर्मणी      4) भावे

उत्तर :- 2

7) ‘जलद’ या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव सांगा.

   1) विभक्ती – तत्पुरुष समास    2) अलुक – तत्पुरुष समास
   3) उपपद – तत्पुरुष समास    4) नत्र – तत्पुरुष समास

उत्तर :- 3

8) विरामचिन्हाचा वापर करताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात.

   अ) एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास  
    ब) ओकीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास
   क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना  
   ड) स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास

   1) फक्त क    2) अ व ड    3) ब व ड    4) अ व क

उत्तर :- 4

9) पुढीलपैकी कोणता शब्द ‘देशी’ आहे ?

   1) गाव      2) दूध     
   3) अत्तर    4) झाड

उत्तर :- 4

10) ‘आपली पाठ आपणास दिसत नाही.’ – या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.

   1) एकाचे दुस-याशी न जमणे
    2) आपल्या भावाचे कृत्य आपणास समजत नाही
   3) आपलेच सगे सोयरे आपल्याला ओळखत नाही   
   4) स्वत:चे दोष स्वत:लाच दिसत नाही

उत्तर :- 4

एका ओळीत सारांश, 29 ऑगस्ट 2019

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉भारतीय हवाई दलाची प्रथम महिला फ्लाइट कमांडर - विंग कमांडर शालिजा धामी.

👉चेहर्‍याचा बायो-मेट्रिक डेटा साठवून ठेवणारा ‘बायोमेट्रिक सीफेअरर आयडेंटिटी डॉक्युमेंट’ (BSID) कार्ड सादर करणारा जगातला पहिला देश – भारत.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉भारत सरकारच्या ‘चाईल्ड वेल-बीइंग इंडेक्स’ यामध्ये अग्रस्थानी असलेला राज्य – केरळ.

👉केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रीने शुभारंभ केलेले शालेय शिक्षण संदर्भातले व्यासपीठ - शगुन.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ याच्या निर्णयानुसार, दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला स्टेडियमला दिले जाणारे नवे नाव - अरूण जेटली स्टेडियम.

👉स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या 2019 BWF विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय दिव्यांग खेळाडूंच्या पथकाने जिंकलेल्या पदकांची एकूण संख्या – 12 (त्यात 3 सुवर्ण).

👉माद्रिद (स्पेन) येथे झालेल्या 2019 विश्व तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेतली भारताची रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती - कोमलिका बारी.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉या राज्य सरकारने 27 ऑगस्ट रोजी नोकरी व शिक्षणात खुल्या प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) 10 टक्के आरक्षण लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली - छत्तीसगड.

👉28 ऑगस्ट 2019 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, या ठिकाणी हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात येणार आहे - मुंबई.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉27 ऑगस्ट रोजी केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी चालू केलेला मोबाइल अॅप - जनौषधी सुगम.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय हवाई दलाचा स्थापना दिन - 8 ऑक्टोबर 1932.

👉जागतिक तिरंदाजी महासंघ – स्थापना वर्ष: सन 1931 (4 सप्टेंबर); मुख्यालय: ल्युसाने, स्वित्झर्लंड.

👉जागतिक बॅडमिंटन महासंघ – स्थापना वर्ष: सन 1934; मुख्यालय: क्वालालंपूर, मलेशिया.

👉छत्तीसगड राज्याची राजधानी - रायपूर.

पूरस्थितीवर मात करण्यासाठी ‘इस्रो’ची मदत

🅾गेल्या पंधरा वर्षांत राज्यातील सर्व नद्यांच्या काठांवरील जमीन वापर पद्धती (लॅण्ड यूज पॅटर्न) कशी बदलली आहे, याचा अभ्यास उपग्रह नकाशांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) मदत घेण्यात येणार असून हा अभ्यास लवकरच सुरू होणार आहे. या अभ्यासातून येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येतील.

🅾यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांना पुराचा फटका बसला. कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळेच कोल्हापूर, सांगलीत पुराची समस्या उद्भवते, असे मानता येणार नाही. कृष्णा खोऱ्याची भौगोलिक स्थिती, अतिवृष्टी हे मुद्देही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पूर परिस्थिती नेमकी कशामुळे तयार होते, याबाबत उपग्रह नकाशांच्या मदतीने नव्याने अभ्यास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या अभ्यासासाठी साधारण एक वर्षांचा कालावधी लागेल. याबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा झाली आहे.

🅾दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये तसेच उर्वरित राज्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने २३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्र (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन्स सेंटर – एमआरएसएसी), भारतीय हवामान विभाग, भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (एमडब्लूआरआरए), जलक्षेत्रातील विश्लेषक यांची तज्ज्ञ अभ्यास समिती गठित केली आहे. ही समितीही राज्यातील नदीकाठांचा डिजिटल विदा तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना करणार आहे.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती

आज ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू, जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती. देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेल्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस दरवर्षी देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. म्हणून आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल विशेष काही... 

1) *असे पडले नाव* : मेजर ध्यानचंद यांचे मुळ नाव ध्यान सिंग होते. परंतु ते रात्री उशिरापर्यंत हॉकीचा सराव करत. नंतर त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.

2) *खेळाची सुरुवात* : ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त 6 वी पर्यंतच झाले. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा विशेष अनुभव नव्हता.

3) *भारतीय संघाचे नेतृत्त्व* : हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांचा सामना करत होते. अशा परिस्थितीतही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता.

4) *न्यूझीलंड दौऱ्यात छाप* : ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. 1926 च्या न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 21 सामने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे 192 गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते.

5) *ऑलिम्पिक हिरो* : मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला.

6) *हिटलरची ऑफर नाकारली* : 1936 मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या लढतीत ध्यानचंद यांचा खेळ पाहून जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर त्यांचे चाहते झाले. यामुळे हिटलरने त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.

7) *पद्मभूषण देऊन गौरव* : ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना 1948 साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना 1956 साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. मेजर ध्यानचंद यांचे 3 डिसेंबर 1979 रोजी निधन झाले.

हॉकी विश्वात आपल्या असामान्य कामगिरीने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या तसेच आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

बालकल्याण निर्देशांकामध्ये  केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल  प्रदेश  अव्वल

👉भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ‘चाईल्ड वेल-बीइंग इंडेक्स’ म्हणजेच ‘बालकल्याण निर्देशांक’ जाहीर करण्यात आला आहे.

👉वर्ल्ड व्हिजन इंडिया आणि IFMR लीड या स्वयंसेवी संस्थांनी हा निर्देशांक तयार केला आहे.

👉हा निर्देशांक म्हणजे निरोगी वैयक्तिक विकास, सकारात्मक संबंध आणि संरक्षणात्मक वातावरण या तीन आयामी घटकांच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेले एक साधन आहे. 

🌹🌳🌴अहवालातल्या ठळक बाबी🌴🌳🌹

👉आरोग्य, पोषण आणि शिक्षण सुविधांमधल्या अपवादात्मक कामगिरीमुळे केरळ राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे.

👉केरळच्या पाठोपाठ तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना स्थान मिळाले आहेत.

👉कुपोषण आणि बालकांचा कमी जन्मदर यामुळे मेघालय, झारखंड आणि मध्यप्रदेश यादीत तळाशी आहेत.

👉केंद्रशासित प्रदेशांमध्ये, पुडुचेरीने सर्वाधिक गुण मिळवले आहेत आणि ते अव्वल ठरले. तर दादरा व नगर हवेली कमकुवत कामगिरी दर्शविणारे प्रदेश ठरले.

👉केरळमध्ये बालकांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. तसेच कुपोषण, कमी जन्मदर अश्या मुद्द्यांवर प्रभावी कार्य केलेले आहे. त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छता सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

👉झारखंडमध्ये जन्मदर, पोषण आणि पाणी आणि स्वच्छता सुविधांची उपलब्धता अश्या घटकांवर लक्षणीय सुधारणा करण्याची गरज आहे. राज्यात अधिकाधिक बालकांमध्ये खुंटलेली वाढ आणि कमी वजन ह्या समस्या दिसून आल्या आहेत. तसेच राज्यात प्रसूतीगृहांची उपलब्धता कमी आहे. पाच वर्षांची होण्यापूर्वीच मृत्यू होणार्‍या बालकांची संख्या जास्त आहे. राज्यात शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे.

👉मध्यप्रदेशात जन्मदर, पोषण, बालकांच्या विरुद्ध गुन्हेगारी आणि किशोरवयीन गुन्हे अशा बाबींमध्ये निम्न कामगिरी दिसून आली आहे. राज्यात दरिद्री कुटुंबात राहणार्‍या बालकांची संख्या सर्वाधिक आहे.

लष्करी सराव (जानेवारी २०१९ ते जुलै २०१९):-

● सी व्हिजिल- २०१९
* भारतीय नौदलाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा तटरक्षीय सराव
* भारतीय सागर किनारपट्टीला सरक्षण देण्याच्या उद्देशाने २६/११ हल्यानंतर १० वर्षानी भारतीय नौदलाने पोरबंदरपासून ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या ७५१५ किमीलांबीच्या किनारपट्टीवर एकाचवेळी दोन दिवशीय सी व्हीजील हा लष्करी सराव आयोजित केला होता.

● इम्बेक्स २०१८-१९:-
भारत आणि म्यानमार
ठिकाण;- चंडीमंदीर (हरियाणा) लष्करी तळावर पार पडला
उद्देश:-
सयुंक्त राष्ट्र संघाच्या शांतता अभियानासाठी म्यानमार सैन्यदलास प्रशिक्षण देणे.

●संप्रिती २०१९ :-
भारत आणि बांगलादेश
ठिकाण :- तंगैल (बांगलादेश)
यावर्षी या सराव मालिकेची आठवी आवृत्ती आयोजित केली आहे.

●वरुण 19.1:-
भारत आणि फ्रान्स
ही संयुक्त कवायत दोन टप्प्यात होणार आहे. गोवा आणि जिबोती येथे मे महिन्याच्या शेवटी घेतला जाणार आहे.

●ग्रुप सेल:-
कालावधी :- ३ ते ९ मे
* जपान, फिलीपीन्स आणि अमेरिकेच्या नौदल जहाजांसमवेत भारताच्या कोलकाता आणि शक्ती या जहाजांनी दक्षिण चीनी समुद्रात एकत्रित सहा दिवसांचा नौसेना ग्रुप सेल’ (Group Sail) मध्ये सहभाग घेतला
उद्देश :-
* सहभागी राष्ट्रांची भागीदारी अधिकारी दृढ करणे आणि सहभागी राष्ट्रांच्या नौदलात परस्पर सामंजस्य वृद्धींगत करणे हा यामागचा उद्देश आहे.

●सिम्बेक्स-2019:-
१६ मे ते २२ मे २०१९ या दरम्यान भारत आणि सिंगापुर यांच्या मध्ये सिम्बेक्स-2019 हा २६ वा युद्ध अभ्यास आयोजित केला होता. १९९३ या वर्षापासून दरवर्षी भारत आणि सिंगापुर यांच्या मध्ये सिम्बेक्स हा युद्धसराव आयोजित केला जातो.

●बुल स्ट्राइक:-
* ९ मे २०१९ रोजी भारतीय सैन्य दलाने अंदमान निकोबार येथे बुल स्ट्राइक’ (Bull Strike) या नावाने सैन्य अभ्यास आयोजित केला होता. या सैन्य अभ्यासात भूसेना,वायुसेना व नौदल या सैनिकांनी भाग घेतला.

●“IN-VPN BILAT EX”
* दोन्ही देशांमधील सागरी संबंध वाढविण्याच्या उद्देशाने, भारत आणि व्हिएतनाम यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव म्हणून यावर्षी “IN-VPN BILAT EX” या मालिकेची द्वितीय आवृत्ती आयोजित करण्यात आली.

●वायु शक्ति २०१९;-
* १६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने जैसलमेर येथे सर्वात मोठा युद्धाभ्यास केला. पोखरणमध्ये हवाई दलाने आयोजित केलेल्या 'वायुशक्ती २०१९' या युद्धसरावात सुखोई ३०, मिग २९, मिराज २०००, जगुआर, मिग २७ या लढाऊ विमानांनी शक्तीप्रदर्शन केले. आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या विमानांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

●अल नागह 2019”:-
* 13 मार्च 2019 रोजी भारत आणि ओमान यांच्या “अल नागह 2019” नावाच्या संयुक्त युद्धसरावाचा शुभारंभ झाला. भारतीय पायदळ आणि रॉयल आर्मी ऑफ ओमानी यांचा दोन आठवडे चालणारा हा सराव ओमानमध्ये निझवा येथील तळावर आयोजित करण्यात आला होता

●AUSINDEX  - 2019
* भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या AUSINDEX या सयुक्त नौदल सरावाची तिसरी आवृती २ ते १६ एप्रिल दरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडली
* AUSINDEX हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांचा द्वैपक्षीय सागरी सराव असून या सरावाला २०१५ साली सुरुवात झाली.

●बोल्ड कुरुक्षेत्र-2019
* भारत आणि सिंगापुर या दोन्ही देशामधला १२ वा सयुक्त सैन्य अभ्यास ८ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९ या दरम्यान झांसीच्या बबीना मिलिट्री येथे छावणीत पार पडला.दहशतवादविरोधी कार्यात सहकार्य वाढविणे, संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि सागरी सुरक्षा सुधारणे हा या सरावाचा उद्देश आहे.

●लिमा :- २०१९
* लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी हवाई प्रदर्शन (लिमा 2019) मलेशियातल्या लांगकावी इथे २६ ते ३० मार्च २०१९ या दरम्यान पार पडले.
* भारतीय हवाई दल प्रथमच या सागरी हवाई प्रदर्शनात सहभागी होणार असून, स्वदेशात विकसित केलेल्या एलसीए लढाऊ विमानानी यात सहभाग घेतला या प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे भारतीय हवाई दलाला रॉयल मलेशियन एअर फोर्स समवेत संवाद साधण्याची आणि दोन्ही देशातल्या हवाई दलात अधिक घनिष्ट संबंध निर्माण करण्याची संधी मिळाली

●मित्र शक्ती-६:
* भारत आणि श्रीलंका यांचा ‘मित्र शक्ती-६ ” हा संयुक्त लष्करी सराव . २०१८-१९ या वर्षासाठी २६ मार्च ते ८ एप्रिल या काळात श्रीलंकेत आयोजित करण्यात आला होता.
* दोन्ही देशाच्या लष्करांच्या दरम्यान लष्करी संबंध आणि देवाणघेवाण यांचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘मित्र शक्ती’ लष्करी सराव दरवर्षी आयोजित केला जातो.

दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत बुमराह ठरला अव्वल

✍विंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने 297  धावांपर्यंत मजल मारली. यानंतर इशांत शर्मा आणि इतर भारतीय गोलंदाजांच्या भेदक
माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजला 222  धावांमध्ये गारद केलं. इशांत शर्माने विंडीजचा निम्मा संघ गारद केला.

✍तर त्याला मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 2-2 तर जसप्रीत बुमराहने 1 बळी घेत चांगली साथ दिली.जसप्रीत बुमराहने मात्र केवळ एक बळी मिळवत दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.

✍कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामने खेळून सर्वात जलद 50 बळींचा टप्पा गाठणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याने 11 व्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली.

✍तसेच बुमराहने वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी  यांच्या नावावर संयुक्तपणे असलेला 13 सामन्यांचा विक्रम मोडला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत झाले 25 मोठे निर्णय; आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घोषणांचा धडाका

 
मुख्यमंत्री बैठकीतील निर्णय पुढीलप्रमाणे :
1. राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ.
2. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा 2 व 3 ला मान्यता.
3. सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम 2019 नव्याने तयार करण्यात येणार.
4. शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय.
5. नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता.
6. मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समूह पद्धतीने पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा.
7. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता.
8. शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासितांचे विद्यावेतन सहा हजारांवरून अकरा हजार रुपये.
9. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास मान्यता.
10. राज्यातील शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान.
11. बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता.
12. पर्यटन प्रकल्पांना देय असलेली वित्तीय प्रोत्साहने वितरित करण्याबाबत.
13. महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिले ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार.
14. नागपूरच्या मिहान प्रकल्पास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता.
15. वर्धा येथे नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यास मान्यता.
16. कायमस्वरुपी बंद करण्यात आलेल्या आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेस हस्तांतरित व स्थलांतरित करून आदिम जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविण्यास मान्यता.
17. राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन सहकारी साखर कारखान्यांना उपलब्ध करण्यात येणार.
18. नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी शासन हमी.
19. नागपूरच्या मौजा बिनाकी येथील बिनाकी हाऊसिंग स्कीममधील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या लाभात होणाऱ्या दस्तावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंजुरी. 
20. मुंबई येथे हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता.
21. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम-1949 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. अवैध साठा, विक्री केल्यास शिक्षेत वाढ.
22. मिशन मंगल या हिंदी चित्रपटास राज्य जीएसटी कराच्या परताव्यासाठी शासन निर्णय काढण्यास मान्यता.
23. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48(8) मध्ये सुधारणा.
24. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 24-अ मध्ये सुधारणा करण्याबाबत. अध्यादेश पुन्हा जारी करण्यास मान्यता.
25. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणार. सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळणार.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...