Tuesday 26 November 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) भारताने अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ५ हजार किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्रे सोडू शकणारा भारत हा जगातील ---------देश आहे.
:- सहावा

२) १९५७ पासुन प्रकाशित होत असलेले योजना हे मासिक भारतातील किती भाषेतून प्रकाशित होते:- १३

३)---------------- या राज्य सरकारने आपली सुरक्षा योजना घोषित केली :- गुजराथ

४) गर्व:-२ हे मोबाईल अॅप कोणत्या मंत्रालयाने सुरु केले  :-उर्जा मंत्रालय

५) डिसेंबर २०१६ मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने कैद्यासाठी टेलीफोन ची सुविधा सुरु केली :- उत्तरप्रदेश

६) जगातील पहिला सोलर हायवे खालीलपैकी कोणत्या देशाने बनवला:-  फ्रांस

-------------------------

१) २०१७ मध्ये होणारी २० वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोणत्या शहरात होणार आहे :- विशाखापट्टणम

२)२०१६ चा ५२ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली :-शंख  घोष

३)अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ)कडून जाहीर केलेला २०१६ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला :- जेजू लालपेखालू

४) वन खात्यासाठी 24 × 7 हेल्पलाईन सुरु करणारे भारतील पहिले राज्य कोणते  :- महाराष्ट्र

५) खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठा तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले  :-शाहरुख खान

६) प्रतिकार हा नेपाळ आणि ----------- या देशातील पहिला संयुक्त लष्करीअभ्यास सराव आहे :-चीन

७) कोणत्या देशांने फीफाचा २०१६ या वर्षातील सर्वोत्कृष्ट टीम चा पुरस्कार जिंकला  :-अर्जेंटिना

८) खालीलपैकी भारतातील कोणत्या बेटाचे नाव "नवीन डेन्मार्क 'असे करण्यात आले होते:- अंदमान-निकोबार बेट

९) २०१८ मध्ये होणाऱ्या महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे  :-इंग्लंड

१०) भारतातील कोणत्या राज्याने "दमन" हा एक नवीन मलेरिया कार्यक्रम सुरु केला :-ओडिशा

११) राष्ट्रीय मेल सेवासाठी drones वापरकरणारा जगातील पहिला देश कोणता
फ्रान्स

१२) खालील पैकी--------------- यांनी "डिजिटली सुरक्षित ग्राहक" ही मोहीम भारतात कोणी सुरु केली :- मायक्रोसॉफ्ट

----------------------------

१) -------------- यर राज्य सरकारने अलीकडेच इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित आणि EBCs यांना न्यायालयीन सेवे साठी 50% आरक्षण जाहीर केले आहे
बिहार

२)कोणत्या भारतीय वंशाचे ब्रिटिश प्राध्यापकाला राणी एलिझाबेथ- II यांच्या कडून नाइटहून या पुरस्काराने न्मानित केले गेले आहे? :-शंकर बाल्सुब्र्ण्याम

३)भारतातील पहिले लेसर तंत्रज्ञान आधारित प्रगत AVMS आरटीओ चेक पोस्ट-------- या राज्य स्थापन केले आहे? :-गुजरात

४)१०४ वी इंडियन सायन्स काँग्रेस (आय.एस.सी.) परिषद कोणत्या राज्यात सुरु होत आहे :-आंध्र प्रदेश

५) भारतीय प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाच्या (ASCI) मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
१) हैदराबाद

६)रणजी करंडक स्पर्धेत -----------संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल ६५ वर्षांनंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला :-गुजरात

७) १ जानेवारी २०१७ पासून ----------- या देशाने बेरोजगारांना दरमहा सरकार ५८७ डॉलर म्हणजे जवळपास ४० हजार रुपये भत्ता देण्याचे सरकारने निर्णय घेतला
फिनलँड

८)------------- यर राज्य सरकारने अलीकडेच इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित आणि EBCs यांना न्यायालयीन सेवे साठी 50% आरक्षण जाहीर केले आहे
बिहार

तापमान वाढ असह्य; २०१९ दुसरे सर्वाधिक ‘उष्ण’ वर्ष


🔥मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भर पडत आहे. १९९८ पासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याची नोंद नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनने केली. १९९८सह २००५, २००९, २०१०, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८ या वर्षांची उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली.

🔥नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनकडील माहितीनुसार, अल निनोसह तत्सम घटकांमुळे तापमानात उत्तरोत्तर वाढ होत आहे. मुळात जमिनीसह समुद्रावरील वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणात पडणारी भर; असे अनेक घटक वाढत्या उष्ण वर्षांस कारणीभूत आहेत. नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशननेही २०१९ सालच्या सात महिन्यांतील तापमानाची नोंद घेत, त्याची १८८० सालापासून आतापर्यंत म्हणजे १४० वर्षांतील माहितीसोबत तुलना केली. त्यावेळी तापमानवाढीतील फरक समोर आला.

🔥जुलैमध्ये युरोपसह ग्रीनलँड उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला. जुलैमध्ये अलास्का, पश्चिम कॅनडा, मध्य रशिया येथील तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ३ अंशांनी अधिक होते. जानेवारी ते जुलै, २०१९ हा काळ तिसरा उष्ण काळ ठरला. दरम्यान, जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाता कामा नये, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

अनिता आनंद: कॅनडामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्त पहिल्या हिंदू


1) कॅनडा मंत्रिमंडळ :-

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडून नवीन मंत्रिमंडळाचे अनावरण

2) मंत्रिमंडळ रचना :-

👉तीन इतर इंडो-कॅनेडियन (Indo-Canadian) मंत्री

👉शीख सहभाग

👉त्यातील प्रत्येकजण मागील सरकारचे सदस्य

3) अनिता आनंद यांचा प्रवास :-

👉ऑक्टोबरच्या फेडरल निवडणुकीत आनंद यांची पहिल्यांदा सार्वजनिक सेवा व खरेदी मंत्री म्हणून निवड

👉नवीन ट्रूडो सरकार (Trudeau overnment) साठी मंत्रिमंडळात येणाऱ्या ७ नवीन लोकांपैकी आनंद एक

4) मंत्रिमंडळाबाबत काही महत्वाचे मुद्दे :-

👉२०१५ पासूनचे चौथे भारत-कॅनडियन मंत्री अमरजित सोही होते

📌२०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते मंत्रिमंडळात परतले नाहीत

👉मंत्रिमंडळात इतरही महत्वपूर्ण बदल

👉मावळते परराष्ट्र व्यवहार मंत्री क्रिस्टिया फ्रीलँड (Chrystia Freeland) यांना उपपंतप्रधान पदी बढती

👉तसेच आंतर सरकारी कामकाज (intergovernmental affairs) मंत्री म्हणून पदोन्नती

अखेर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं होतं. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. आज सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. मात्र, आज सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांनी माझ्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

1. आयुष्यमान भारत योजना संपूर्ण भारतात कधी लागू करण्यात आली आहे?
-- 25 सप्टेंबर 2018 पासून

2. भगतसिंग कोशारी हे महाराष्ट्र चे कितवे राज्यपाल आहे?
-- 19 वे ( 18 वे विद्यासागर राव )

3. 2000 हजार धावा ( फास्ट धावा )  पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता ?
-- मिताली राज

4. जल धोरण तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
-- महाराष्ट्र

5. " ऑर्डर ऑफ दि सेट अँड्रूअ अ पोस्टल " हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार कोणत्या देशाकडून मिळालेला आहे ?
-- रशिया

6. मैत्री 2019 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये पार पडला ?
-- भारत×थायलंड

7. भारताचे रॉकेट मॅन कोणाला म्हणतात?
-- डॉ.के.वि. सिवन

8. ई - सिगारेट वर बंदी घालणारे प्रथम राज्य कोणते?
-- पंजाब

9. किरण बेदी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत?
-- पद्दुचेरी

10. कोणत्या राज्याची विधान परिषद 31 ऑक्टोबर 2019 ला बरखास्त करण्यात येणार आहे ?
-- जम्मू काश्मीर ( कलम 370 रद्द )

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...