११ मे २०२४

अटल सेतू - भारतातील सर्वांत लांब सागरी सेतू


🔥 मुंबई येथे अटल सेतू आहे.


🔥 लांबी: 21.8 किमी


🔥 अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि सर्वात लांब सागरी पूल आहे.  


🔥 हा 6 लेनचा पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.  


🔥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच या पुलाचे उद्घाटन केले, अटल सेतूने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे. 


🔥 त्यामुळे मुंबईहून दक्षिण भारत, पुणे आणि गोव्याला जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होतो. 


🔥 शिवाय, यामुळे जवाहरलाल नेहरू बंदर आणि मुंबई बंदराची जोडणी मजबूत झाली आहे. अटल सेतू मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक चालक असेल अशी अपेक्षा आहे.  प्रवासाच्या वेळा कमी करून आणि प्रमुख क्षेत्रांमधील कनेक्टिव्हिटी सुधारून, हा पूल व्यापार, वाणिज्य आणि एकूणच आर्थिक क्रियाकलाप सुलभ करण्यासाठी तयार आहे.

महत्त्वाच्या संस्था

● G7 (Group of 7)

- स्थापना 1975

- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.

- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा


● BRICS

- स्थापना: 2006

- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 


● Asian Development Bank (ADB)

- स्थापना: 19 डिसेंबर 1966

- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स



● SAARC (South Asian Association for Regional Cooperation)

- स्थापना: 16 जानेवारी 1987

- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ 

- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव


● ASEAN (Association of South East Asian Nation)

- स्थापना: 8 ऑगस्ट 1967

- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया 

- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर


● BIMSTEC (Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation)

- स्थापना: 6 जून 1997

- मुख्यालय: ढाका, बांगलादेश

- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 


● OPEC (Organization of Petroleum Exporting Countries)

- स्थापना: 1960

- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया

- सदस्य संख्या: 13


● IBSA 

- स्थापना: 6 जून 2003

- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria 

- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती.



🅾️जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

🅾️रचना - प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

🅾️सभासद संख्या - प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

🅾️सभासदांची निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

🅾️पात्रता (सभासदांची) - जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

🅾️आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

🅾️तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

🅾️कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

🅾️अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

🅾️कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

🧩राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे

मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

🅾️अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

🅾️सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

🅾️बठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

🧩मख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :

🅾️ परत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :

📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.


📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.


📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे. 


📌ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.


📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.


📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.


📌 ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'


📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."


🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :


📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.


📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.


📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.


📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही

त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.


📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.


राज्यसेवा प्रश्नसंच

 १) कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?

   1) 84 वी घटना दुरुस्ती  

   2) 85 वी घटना दुरस्ती

   3) 86 वी घटना दुरुस्ती  

   4) 87 वी घटना दुरुस्ती


उत्तर :- 3


२) समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्यांच्या अंतर्भाव होतो ?

   अ) कायद्यासमोर समानता   

   ब) अस्पृश्यतेची समाप्ती

   क) पदव्यांची समाप्ती   

   ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य


   1) अ, ब, ड    

  2) अ, क, ड  

  3) क, अ, ब  

  4) ब, ड, क


उत्तर :- 3


३) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्वे समाजसापेक्ष आहेत.

   ब) राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे.

  क) एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत.

    वरीलपैकी कोणते /ती विधान / ने बरोबर आहे / त ?


   1) अ आणि ब  

  2) ब आणि क   

  3) अ आणि क  

  4) अ, ब आणि क


उत्तर :- 4


४) मधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की, .............

     ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे.

   1) सीडॉ (CEDAW) 

   2) युएनडीपी (UNDP)

   3) सीइसीएसआर (CECSR)  

   4) युएनसीएचआर (UNCHR)


उत्तर :- 1


५) योग्य कथन / कथने ओळखा :

   अ) अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.

   ब) 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले.

 1) कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे      2) कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर

   3) दोन्ही कथने अ आणि ब  बरोबर आहेत    

 4) दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत


उत्तर :- 2


६) खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा, व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत ?

   अ) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे.


   ब) राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल.

  क) अशी कोणतीही बंधने कायदा करुनच नागरिकांवर लादता येईल.

 ड) अशी बंधने प्रशासकीय आदेशाव्दारेही लादता येतील.


   1) अ, ब   

  2) क, ड     

  3) अ, ब, क   

  4) अ, ब, क, ड


उत्तर :- 3


७) योग्य कथन / कथने ओळखा.

 अ) डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे.

   ब) तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69 टक्के आहे.


   1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे   

   2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर 

   3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर 

   4) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची


उत्तर :- 3


८) सार्वजनिक सेवेच्या (Public employment) अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

   अ) संसद कायदा करुन सार्वजनिक नोक-यांकरिता, एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते.

  ब) राज्य शासन त्यांचे राज्यातील सार्वजनिक सेवेतील नोक-याकरिता राज्यातील किमान रहिवासाची अट कायदा करुन घालू शकते.

   क) नागरिकांचे मागासवर्गीय गट, ज्यांना सार्वजनिक सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या पदोन्नतीकरीता आरक्षण ठेवता येते.

   ड) एखाद्या विशिष्ट वर्षातील भरावयाच्या एकूण जागांच्या कमाल 50 टक्के जागा आरक्षित करण्याच्या मर्यादेमध्ये त्यापूर्वीच्या 

       वर्षात रिक्त राहिलेल्या आरक्षित जागाही विचारात घ्याव्या लागतात.

   1) अ, ब  

   2) अ, ड  

    3) अ, ब, क, ड    

   4) अ


उत्तर :- 4


९) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ............. यांनी ‘सर्वात टीकात्मक भाग’ असे केले आहे ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरू  

   2) डॉ. राजेंद्र प्रसाद

   3) सरदार वल्लभभाई पटेल   

   4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 4


१०) कालानुक्रमे मांडणी करा:

   अ) अंतर्गत सुरक्षा कायदा   

   ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा

   क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा 

   ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा


   1) ब, अ, ड, क   

   2) अ, ब, क, ड  

   3) क, ड, अ, ब   

   4) ब, ड, क, अ


उत्तर :- 1


२२५१)  खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही ?

   1) तुटीचा अर्थभरणा    
   2) लोकसंख्या वाढ
   3) बेरोजगारीत वाढ    
  4) प्रशासकीय खर्चात वाढ

    उत्तर :- 3

२२५२) भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टय कोणते आहे ?

   1) समतोल किंमत रचना    
   2) समन्वित किंमत रचना
   3) 1 व 2 दोन्ही    
   4) कोणतेही नाही

    उत्तर :- 3

२२५३) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु ...............
      टक्के मुले ही कुपोषित आहेत. 

   1) 30 टक्के 
   2) 35 टक्के   
  3) 40 टक्के   
  4) 45 टक्के

   उत्तर :- 3

२२५४) कोणत्या स्थितीमध्ये GDI चे मूल्य HDI च्या मूल्यापेक्षा कमी असणार ?

   1) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जात नाही. 
    2) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो.
   3) जेव्हा लैंगिक समता ही संविधानकरित्या सुनिश्चित केली जाते.
   4) वरीलपैकी कोणतेही नाही.

    उत्तर :- 2

२२५५) योग्य पर्याय निवडा.
     भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2004 मधील तरतूदी

   अ) वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी.     .
 ब) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे.
   क) रोजगार करणा-या व्यक्तीला किमाल वेतनाची हमी.

   1) वरील सर्व चूक   
   2) वरील सर्व बरोबर    
   3) अ व ब बरोबर   
   4) केवळ क बरोबर

    उत्तर :- 2

शकराचार्य केशवानंद भारती

🟢 ऐतिहासिक खटला

◾️निधन
केशवानंद भारती :-   राज्यशास्त्र Imp घटक
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
◾️१९७३ मधील केरळ राज्य सरकार विरुद्ध केशवानंद भारती खटल्यातील मुख्य पक्षकार व केरळमधील कासरगोड एडनीर मठाचे शंकराचार्य केशवानंद भारती यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते.

● केरळ सरकारच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत केशवानंद भारती यांनी केंद्र सरकारनं केलेल्या २४, २५ आणि २९ घटनादुरूस्तीला आव्हान दिलं होतं.

●देशाच्या न्यायालयीन इतिहासात केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार १९७३ हा खटला महत्त्वाच्या खटल्यांपैकी एक समजला जातो.         

🎇 कशवानंद भारती खटला :-
संपुर्ण नक्की वाचा... 🎇


🔸कशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.

🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.

🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.

🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?

🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.

🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.

🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.

🔸या खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले गेले.

🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.

🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.

🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.

🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.

🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सामान्य ज्ञान 10 प्रश्नोत्तरे

प्रश्न १ : महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले ?

           १)  लोकमान्य टिळक

           २)  आचार्य विनोबा भावे ✔️

           ३)  बाळशास्त्री जांभेकर

           ४)  गो.ग.आगरकर


प्रश्न २ : निकटदृष्टीता हा दृष्टीदोष ............ भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो ?

           १)  अंतर्वक्र ✔️

           २)  बहिर्वक्र

           ३)  गोलीय

           ४)  द्विनाभीय


प्रश्न ३ : ‘चले जाव’ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?

           १)  1942 साली ✔️

           २)  1920 साली

           ३)  1940 साली

           ४)  1930 साली


प्रश्न ४ : तंबाखूमध्ये ............. हे धोकादायक रसायन असते .

           १)  युरिया

           २)  युरिक आम्ल

           ३)  निकोटीन ✔️

           ४)  कॅल्शियम कार्बोनेट


प्रश्न ५ : जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?

           १)  न्यूटन

           २)  सी व्ही रमन

           ३)  आईनस्टाइन

           ४)  चार्ल्स डार्विन ✔️


प्रश्न ६ : महात्मा गांधी खालीलपैकी कोणती गोलमेज परिषदेत हजर होते ?

           १)  पहिल्या 

           २)  दुसर्‍या ✔️

           ३)  तिसर्‍या

           ४)  चौथ्या


प्रश्न ७ : खालीलपैकी कोणत्या धातुपासून बनविलेल्या वस्तु चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?

           १)  लोखंड

           २)  निकेल

           ३)  कोबाल्ट

           ४)  वरील सर्व ✔️



प्रश्न ८ : बर्फामध्ये ............ मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?

           १)  साखर

           २)  मीठ ✔️

           ३)  कॉपर

           ४)  झिंक


प्रश्न ९ : नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात ?

           १)  राजेशाही

           २)  लोकशाही ✔️

           ३)  हुकुमशाही

           ४)  वरीलपैकी नाही


प्रश्न १० : हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो ?

           १)  40 वर्षातून

           २)  50 वर्षातून

           ३)  76 वर्षातून ✔️

           ४)  80 वर्षातून

महत्वपूर्ण सराव प्रश्न उत्तरे

प्रश्नः Q: भारताचे पहिले प्रभारी पंतप्रधान कोण होते?

उत्तरः गुलझारी लाल नंदा.


प्रश्नः Q: महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकांना 'लोकहितवादी' म्हटले जाते?

उत्तर: गोपाळ हरी देशमुख.


प्रश्नः Q: भटनागर पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला?

उत्तरः 1957 


प्रश्नः Q : 'सत्यार्थ प्रकाश 'रचना कोणी केली?

उत्तरः स्वामी दयानंद सरस्वती.


प्रश्नः Q: दालचिनी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळते?

उत्तर: झाडाची साल पासून.


प्रश्नः Q: 'अमृत बाजार पत्रिका' हे प्रकाशन कोणत्या वर्षी सुरू झाले?

उत्तरः 1868


प्रश्नः Q: नील नदीच्या काठावर कोणती संस्कृती विकसित झाली होती?

उत्तरः इजिप्तची संस्कृती.


प्रश्नः Q: अकबराने 'दिन-ए-इलाही' हा धर्म कधी जाहीर केला?

उत्तरः1582


प्रश्नः Q: 'भरतनाट्यम' कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे?

उत्तर: तामिळनाडू.


प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च सेनापती कोण आहे?

उत्तरः राष्ट्रपति


प्रश्नः Q: धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तरः वैद्यकीय क्षेत्र.


प्रश्नः Q: हिटलरने आत्महत्या कधी केली?

उत्तरः 30 एप्रिल 1945


प्रश्नः Q: लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर: ठाणे, महाराष्ट्र (भारत)


प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?

उत्तर - मेजर ध्यानचंद  खेल रत्न पुरस्कार


प्रश्नः Q: 'एग्रीकल्चर' हा कोणत्या भाषेचा शब्द आहे?

उत्तरः लॅटिन भाषा.

चालू घडामोडी :- 10 मे 2024

◆ भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा टी-20 क्रिकेट मध्ये 400 हून अधिक षटकार ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

◆ भारताने वस्तूंच्या जागतिक निर्यात दारांमध्ये 19 व्या स्थानावरून 17व्या स्थानावर झेप घेतली आहे.

◆ संयुक्त राष्ट्रांने 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

◆ वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होते.

◆ जगात सर्वात श्रीमंत शहरांची यादीत मुंबई 24व्या क्रमांकावर आहे.

◆ जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क शहर प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारत या देशाने जपान देशाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे.

◆ 2023 मध्ये चीन या देशाने सौर ऊर्जा पासून सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे.

◆ स्कॉटलंड या देशाचे प्रथम मंत्री म्हणून जॉन स्विनी यांची निवड झाली आहे.

◆ भारत बायोटेक कंपनी द्वारे क्षयरोग या आजारावरील MTBVAC ही लस विकसित करण्यात येत आहे.

◆ भारताच्या तेजस्वीन शंकरने टक्सन, ऍरिझोना, यूएसए येथे झालेल्या USATF फेस्टिव्हलमध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत विजय मिळवला.

◆ श्री पवन सिंधी यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ आयआरडीएआयने केकी मिस्त्री यांच्या एचडीएफसी लाइफच्या अध्यक्षपदी नियुक्तीला अधिकृत मान्यता दिली आहे.

◆ समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी केलेल्या असाधारण प्रयत्नांची दखल घेत पवन सिंधी यांना ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 हा सन्मान देण्यात आला आहे.

◆ दरवर्षी 10 मे रोजी जगभरात लोक जागतिक ल्युपस दिवस साजरा करतात.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━