Friday 30 December 2022

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थरी गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ गरीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ गरेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ यनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले

31 डिसेंबर चालू घडामोडी


Q.1) लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✅ महाराष्ट्र

Q.2) महाराष्ट्र राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आले?
✅ चंद्रशेखरन विक्रम लिमये

Q.3) आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून कोणत्या राज्यात ‘बिजली उत्सव’ आयोजित केल्या गेला?
✅ आसाम

Q.4) बेंजामिन नेतन्याहू यांनी कोणत्या देशाचे सहाव्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे?
✅ इस्रायल

Q.5) केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ प्रवीण के श्रीवास्तव

Q.6) महान फुटबॉलपटू एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो, ज्यांना पेले म्हटले जाते, त्यांचे नुकतेच वर्षी निधन झाले आहे, ते कोणत्या देशाची खेळाडू होते?
✅ ब्राझील

Q.7) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2022 वर्षांतील सर्वोत्तम पुरुष ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळाले आहे?
✅ सूर्यकुमार यादव

Q.8) आयसीसी पुरूषांच्या इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीत कोणत्या एका भारतीय गोलंदाजाला स्थान मिळाले आहे?
✅ अर्शदीप सिंग

Q.9) ‘स्टे सेफ ऑनलाइन’ मोहीम आणि ‘G20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स’ कोणी लाँच केले?
✅ अश्विनी वैष्णव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

न्यूटनचे गतीचे नियम

♦️भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत.

♦️हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात.

हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

पहिला नियम

♦️: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने पहिला नियम करत राहाते.

दुसरा नियम: 

बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.

तिसरा नियम:

जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.

महत्त्वाचे

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्ताच्या अणि या नियमांच्या साहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले.

यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वीपुरते मर्यादित नसून सार्वत्रिक आहेत हे स्पष्ट झाले.

तत्त्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत.

तसेच ज्या वस्तूवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते.

पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सूक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.

खारफुटी जंगले


♻️आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै♻️


🟩 खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. 


🔸मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती,

🔸इग्रजीत मॅंग्रोव्ह असे म्हणतात.

🔸 तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे.


🔷या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात.


🔺भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे.



🔶जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत. 

🔹तयापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत. 

🔹पश्चिम किनार पट्टीवर २७,

🔹पर्व किनार पट्टीवर ४०,

🔹अदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत.


♻️उपयुक्तता♻️


🔘खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते. 


🔘मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते.


🔸कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही. 


🔘तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. 

🔸टनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो.


🔘निपा नावाचे पाम जातीचे झाड असते, त्यापासून साखर निर्माण करतात. 


🔘चिपी जातीच्या झाडांच्या फळांपासून श्रीलंकेत खाद्यपेये बनवतात. 


🔘खारफुटीच्या विविध जातींपासून पारंपरिक औषधे तयार होतात.


🔘मेस्वाल या वनस्पतीपासून साबणापासून टूथपेस्टपर्यंत विविध वस्तू तयार होतात.


 🔘Acanthus ilicifolius ही वनस्पींपासून अस्थमा, संधीवात आणि त्वचा विकार हा बरा होतो.


 🔘तिवर या वनस्पतीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो.


🔴या समूहात एकच विषारी वनस्पती आढळते ती म्हणजे इक्झोकरीआ अगर गेवा.🔴


✅ गीर फाऊंडेशन ही संस्था गुजरात मधील खारफुटी वनस्पतीवर काम करीत आहे. ✅

प्राचीन भारत इतिहास:



* वेद काल


०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.

०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.

०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.

०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.

०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे.  ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.

०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.


* ऋग्वैदिक काळ


०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.

०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.

०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.

१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.

११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.

१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.

१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.

१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.

१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.

१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.

१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.

१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.

१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.

२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.


* उत्तर वैदिककाळ 


२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.

२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.

२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.

२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.

२५.  उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.

२६.  उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.

२७.  उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे. व्यापारासाठी निष्क, शतमान आणि कृष्णाल या मुद्रांचा वापर केला जात असे.

२८. उत्तर वैदिक काळात ऋग्वैदिक काळाच्या तुलनेत धर्माचे स्वरूप अधिकच जटील होत गेले. यज्ञात बळींचे तसेच पुरोहितांचे महत्व वाढत गेले. या काळात अनेक प्रकारचे यज्ञ केले जाऊ लागले.

वनस्पतीचे वर्गीकरण :




उपसृष्टी : 1 अबीजपत्री - अपुष्प वनस्पती

विभाग - 1 : थॅलोफायटा

· शरीर साधे , मऊ ,तंतुमय

· मूळ , खोड , पान, नसते.

· पाण्यात आढळतात .

· स्वयंपोषी असतात.

· लैगिक जननांग - युग्माकधानी

वर्ग - 1 : शैवाल

· वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी

· उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा

· प्रकाश स्वयंपोषी

वर्ग - 2 : कवक

· परपोशी पोषण पद्धती

· इतरांच्या शरीरात, शरीरावर किंवा मृतोपाजीवी असतात.

· शरीर तंतुजालरूपी असते.

· तंतुरूपी कवकाना बुरशी म्हणतात.

· उदा. पेनिसिलीयम , म्युकर

· जननांगे मोठी आणि छत्रिसारखी असणाऱ्यांना 'छत्रकवके' म्हणतात.

· उदा . अगॅरिकस

· एकपेशीय कवकाना 'किन्व' म्हणतात .

· उदा . सॅकरोमायसिस

शैवाक -

· शैवाल व कवक एकत्र वाढ

· परस्परपूरक सहजीवन

· उदा . उस्निया (दगडफूल)

जीवाणू -

· एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव.

· निरनिराळ्या पोषण पद्धती.

· प्रजजन साध्या स्वरूपाचे.

विभाग -२ : ब्रायोफायटा

· निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, सावलीत राहण्याऱ्या उभयचर वनस्पती आहेत.

· बीजाणू निर्मितीचे प्रजनन करतात.

· शरीर चपटे , रीबिनसारखे व मऊ.

· मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात.

· उदा. मॉस, रिक्सिया , मार्केंशिया , अॅन्थॉसिरॉस, फ्युनारीया

विभाग -3 : टेरीडोफायटा

· पाणी व खनिज वहनासाठी सुस्पष्ट संवहनी संस्था असते.

· मूळ, खोड, पाने असतात.

· सहसा लहान पर्णिका असतात.

· सावलीत व दमट वातावरणात वाढतात.

· अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.

· 3 उपवर्गात विभाजन होते.

वर्ग -1 : लायाकोपोडीनी

· या वनस्पती नेच्यासारख्या असतात.

· उदा. लायाकोपोडीयम, सीलॅजीनेला

वर्ग -2 : इक्वीसेटीनी

· नेच्यासारख्याच असतात.

· बिजानुधानीच्या समूहास शंकू म्हणतात.

· उदा. इक्वीसेटम

वर्ग -3 : फिलीसिनी

· वनस्पतीचा सर्वात मोठा वर्ग आहे.

· या वनस्पतींना 'नेचे' म्हणतात.

· बिजानुधानीपुंज पानावर तयार होतात.

· उदा. नेफ्रोलीपीस, अॅडीएन्टम, किलॅन्थेस, टेरिस

उपसृष्टी : 2 बिजपत्री - सपुष्प वनस्पती

विभाग -1 : अनावृत्तबीजी वनस्पती

· यांना उच्चकुलीन वनस्पती असे म्हणतात.

· या वनस्पतीच्या बिजांवर आवरण नसते. त्यांची मोठया आकाराची बीजे बृहद्बीजाणू पत्रांवर तयार होतात.

· काही वृक्ष मोठे व पुरातन असतात.

· उदा . सायकस, सूचीपर्णी (पायनस), देवदार (सेडस)

· सदाहरित, बहुवार्षिक

· खोडाला फांद्या नसतात.

· नर व मादी फुले वेगवेगळया बिजानुपत्रावर येतात.

· फळे येत नाहीत.

विभाग -2 : आवृत्तबिजी वनस्पती

· या वनस्पतीची बीजे संरक्षक आवरणात असतात.

· फुले हीच प्रजननांगे असतात.

· अतिसूक्ष्म जलीय वनस्पती वुल्फिया टे प्रचंड आकाराच्या ऑस्ट्रेलीयन अकॅशिया किंवा युकॅलिप्टस् यांचा समावेश होतो.

· 2 वर्गात विभागणी होते.

वर्ग -1 व्दिबिजपत्री वनस्पती

· बियांच्या भ्रुनात दोन बिजपत्रे असतात.

· मूळ हे सोटमूळ प्रकारचे असते.

· पानाचा शिराविण्यास जालीकीय असतो.

· उदा. सुर्यफुल, सदाफुली, जास्वंद, लिंबू ,पेरू, आंबा, वाटणा, वाल, हरभरा, टोमॅटो, मिरची, वांगी ,कोथिंबीर, कापूस,तुळस

वर्ग -2 एकबिजपत्री वनस्पती :

· बियांच्या भृणात फक्त एकच बिजपत्र असते.

· मुले तंतुसारखी , अपस्थानिक मुळे

· पानांचा शिराविण्यास समांतर असतो.

· फुल त्रीभागी.

· उदा. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, ऊस, गवत, बांबू , कांदा,लसून, कर्दळी, केली, पाम, ऑर्कीड

विज्ञान प्रश्नसंच


🌸*मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?*

१) कोरनिआ  

२) इरीस✅✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸*सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?*

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸 *अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?*

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸*१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.*

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 *स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.*

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?*

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??*

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 *खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.*

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸*वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?*

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸*इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?*

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान

भारतातील नागरी सेवांचा विकास



 

✏️कॉर्नवॉलिस (1786-93):- यांनी प्रथम आयोजन केले

 

✏️वेलेस्ली (1798-1805)

1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज

2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)

3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज

 

✏️1853- खुली स्पर्धा

 

✏️भारतीय नागरी सेवा कायदा,1861

 1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}

 {19-1878}

 2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय 

 

✏️वैधानिक नागरी सेवा (1878-79:लिटन)

 1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)

  

✏️ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886)-डफरिन

1.करारबद्ध आणि uncovenanted Drop

2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),

-   प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),

-   अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)

3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले

 

✏️माँटफोर्ड सुधारणा,1919

 1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल

 

✏️ली कमिशन,1924

1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.

2.लोकसेवा आयोग स्थापन करणे

(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)

 

✏️GoI Act,1935

1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना

महत्त्वाचे सराव प्रश्न व उत्तरे


1)कोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले?


(A) IIT मुंबई✅✅✅

(B) IIT मद्रास

(C) IIT दिल्ली

(D) IIT मंडी


1)कोणी स्लोव्हाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली?


(A) मारिया रोको

(B) एड्रियाना कारेमब्यू

(C) डेनिएला हांतुचोवा

(D) जुझाना कापुतोवा✅✅✅


3)कोणती शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे?


(A) मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी✅✅✅

(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ

(C) मॅक्स प्लांक विद्यापीठ

(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू


4)कोणत्या सालापर्यंत ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे केले जाणार आहे?


(A) सन 2025

(B) सन 2022✅✅✅

(C) सन 2030

(D) सन 2035



5)राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भारताला 5 भूकंपीय विभागांमध्ये विभागले आहे. कोणता क्षेत्र सर्वात उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जातो जो अतीव तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडतो?


(A) क्षेत्र 5✅✅✅

(B) क्षेत्र 1

(C) क्षेत्र 3

(D) क्षेत्र 2




6)भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 पाणबुडी तयार करण्यासाठी भारत सरकारने जून महिन्यात 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने प्रकल्पाची सुरुवात केली?


(A) प्रोजेक्ट 17A

(B) प्रोजेक्ट 75-I✅✅✅

(C) प्रोजेक्ट 71A

(D) प्रोजेक्ट 79-I


7)भारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?


(A) कर्णजेट

(B) जेटएक्स

(C) जेट-ओ

(D) रामजेट✅✅✅


8) भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (ZSI) आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण (BSI) च्या प्रकाशनानुसार, 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या?


(A) 539✅✅✅

(B) 739

(C) 639

(D) 439


9) कोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे?


(A) कार्बन डाय ऑक्साइड

(B) नायट्रोजन✅✅✅

(C) मिथेन

(D) सल्फर डाय ऑक्साईड


10) स्पेनमधील सेव्हिले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शहरी सांडपाण्यामधून बहुतेक प्रदूषके शोषून घेणारा पदार्थ शोधून काढला. त्या पदार्थाचे नाव काय आहे?


(A) Na-माईका-4

(B) CL-माईका-4

(C) N4-माईका-4

(D) C18-माईका-4✅✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागमध्ये येणाऱ्या महानगरपालिका


🎯 कोकण प्रशासकीय विभाग 

1. बृहन्मुंबई महानगरपालिका

2. ठाणे महानगरपालिका

3. कल्याण - डोंबिवली महानगरपालिका

4. मीरा - भाईंदर महानगरपालिका

5. भिवंडी - निजामपूर महानगर पालिका

6. नवी मुंबई महानगर पालिका

7. उल्हास नगर महानगरपालिका

8.  पनवेल महानगरपालिका

9.वसई - विरार महानगरपालिका


🎯 पुणे प्रशासकीय विभाग

1. पुणे महानगरपालिका

2. पिंपरी - चिंचवड महानगरपालिका

3. सोलापूर महानगरपालिका

4. कोल्हापूर महानगरपालिका 

5. सांगली - मिरज - कुपवाडा महानगरपालिका


🎯 नाशिक प्रशासकीय विभाग

1. नाशिक महानगरपालिका

2. मालेगाव महानगरपालिका

3. अहमदनगर महानगरपालिका

4. धुळे महानगरपालिका

5. जळगाव महानगरपालिका


🎯 औरंगाबाद प्रशासकीय विभाग

1. औरंगाबाद महानगरपालिका

2. परभणी महानगरपालिका

3. लातूर महानगरपालिका

4. नांदेड - वाघाळा महानगरपालिका 


🎯 अमरावती प्रशासकीय विभाग

1. अमरावती

2. अकोला


  🎯 नागपूर प्रशासकीय विभागात

1. नागपूर

2. चंद्रपूर

राज्यात ३६२८ तलाठी पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार..

 राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून यामध्ये एकुण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार याची यादी खालीलप्रमाणे..👇🏻


● पुणे विभागात ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे,

● अमरावती विभागात १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे, 

● नागपूर विभागात ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे,

● औरंगाबाद विभागात ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे, 

● नाशिक विभागात ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे, 

● कोकण विभागात ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे..


🧾 जिल्ह्यानुसार तलाठी साझे आणि महसूली मंडळे यांसाठी रिक्त पदांची संख्या अनुक्रमे खालीलप्रमाणे..↓↓


📍 पुणे 

पुणे- ३३१,         ५५

सातारा- ७७,       १२

सांगली- ५२,       ०९

सोलापूर- १११,    १९

कोल्हापूर- ३१,     ०५


📍 अमरावती

अमरावती- ३४,     ०६

अकोला- ०८,        ०१

यवतमाळ- ५४,      ०९

बुलढाणा- १०,       ०२


📍 नागपूर

नागपूर- ९४,          १६

चंद्रपूर- १३३,         २३

वर्धा- ५०,               ०८

गडचिरोली- ११४,   १९

गोंदिया- ४९,           ०८

भंडारा- ३८,            ०६


📍 औरंगाबाद 

औरंगाबाद- ११७,     १९

जालना- ८०,            १३

परभणी- ७६,           १३

हिंगोली- ६१,           १०

बीड- १३८,              २३

नांदेड- ८४,              १४

लातूर- ३९,              ०७

उस्मानाबाद- ९०,      १५


📍 नाशिक

नाशिक- १७५,          २९

धुळे- १६६,               २८

जळगाव- १४६,         २४

अहमदनगर- २०२,     ३४

अलीकडेच घडलेल्या घडामोडी


प्रश्न: समुद्राच्या लाटांपासून वीज निर्माण करण्यासाठी कोणत्या IIT ने अलीकडेच 'Ocean Web Energy Converter' विकसित केले आहे?

उत्तर: IIT मद्रास.


प्रश्न: कोणत्या संस्थेने अलीकडेच जागतिक जल संसाधन अहवाल 2021 प्रसिद्ध केला आहे?

उत्तर: जागतिक हवामान संघटना.


प्रश्नः नुकतीच 'जे. सी. बोस: एक सत्याग्रही सायंटिस्ट' या विषयावरील परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

उत्तर : नवी दिल्ली.


प्रश्न: भारतातील पहिले सोन्याचे एटीएम नुकतेच कोठे उघडले गेले?

उत्तर : हैदराबाद.


प्रश्न: कोणता देश अलीकडेच $100 अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे?

उत्तर भारत.


प्रश्न: अलीकडे कोणत्या मेट्रोने यशस्वीरित्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे?

उत्तर : नागपूर मेट्रो.


प्रश्‍न: अलीकडे NDDB आणि अमूल दुग्‍ध उत्‍पादन वाढवण्‍यासाठी कोणत्या देशाला तांत्रिक सहाय्य करतील?

उत्तर: श्रीलंका.


प्रश्न: भारत आणि कोणत्या देशाने अलीकडे स्थलांतर आणि गतिशीलता करारावर स्वाक्षरी केली आहे?

उत्तर: जर्मनी.


प्रश्न: अलीकडेच 'फोर्ब्स एशिया हीरोज ऑफ फिलान्थ्रॉपी' यादीत कोणाचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर: गौतम अदानी.


प्रश्न: अलीकडेच गोव्यात भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलातील 'संगम सराव'ची 7 वी आवृत्ती पार पडली?

उत्तर: अमेरिका. 


Q.1) स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?

➡️ तामिळनाडू


Q.2) नुकतेच भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन करण्यात कोठे करण्यात आले?

➡️ करळ


Q.3) आयुष्मान भारत आरोग्य खाते आयडी निर्मितीसाठी श्रेणीत पहिले पारितोषिक आणि दूरसंचार विभागातील दुसरे पारितोषिक कोणत्या केन्द्रशाशित प्रदेशाला देण्यात आले आहे?

➡️ जम्मू आणि काश्मीर


Q.4) सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका_ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे.

➡️ सलोचना चव्हाण


Q.5) चंद्रावरच्या पहिल्या नागरी मोहिमेसाठी ‘ड्रीम क्रू’ची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश आहे?

➡️ दव जोशी


Q.6) भारत-इंडोनेशिया समन्वित गस्तीची 39 वी आवृत्ती कोणत्या कालावधीत आयोजित केली जात आहे?

➡️ 08 ते 19 डिसेंबर


Q.7) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज कोण बनला आहे?

➡️ इशान किशन


Q.8) युनिसेफ दिन केंव्हा साजरा केला जातो?

➡️ 11 डिसेंबर


Q.9) आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा केला जातो?

➡️ 11 डिसेंबर

30 डिसेंबर चालू घडामोडी


Q.1) नुकतेच अटल सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ प्रभू चंद्र मिश्रा


Q.2) कोणत्या IIT ने Wharton-QS Reimagine Education Awards 2022 जिंकले आहे?

✅ IIT मद्रास


Q.3) अलीकडेच अकरा दिवसीय “धनुजत्रा” महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे?

✅ ओडिसा


Q.4) “हसमुख अधिया” हे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत?

✅ गुजरात


Q.5) फरहान बेहर’ या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू ने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे?

✅ दक्षिण आफ्रिका


Q.6) भारत सरकार कोणत्या देशात “भारतीय मिशन” चालू करणार आहे?

✅ लिथोनिया


Q.7) इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून कोणत्या संघाला ओळखले जाते?

✅ मुंबई इंडियन्स


Q.8) 2022 चा 30वा एकलव्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

✅ स्वस्ति सिंग


Q.9) धर्मदाम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदार संघ आहे. ते कोणत्या राज्यात आहे?

✅ केरळ


Q.10) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे कोणत्या तरुणाला 'Eat Right Campus' टॅग मिळाला आहे?

✅ बुलंदशहर कारागृह

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Q.1) लष्कराचे इंजीनिअर-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ अरविंद वालिया


Q.2) प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे?

✅ मेघालय


Q.3) ऑस्ट्रेलियाचा पुरूष कसोटीपटूचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आता कोणाच्या स्मरणार्थ दिला जाणार आहे?

✅ दिवंगत शेन वॉर्न


Q.4) __हे विज्ञानावरील G20 वर्किंग ग्रुपचे सचिवालय म्हणून घोषित करण्यात आले.

✅ IISc बेंगळुरू


Q.5) प्रथम केआर गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अलेडा ग्वेरा


Q.6) “फोर्क्स इन द रोड: माय डेज अँट आरबीआय अँड बियॉन्ड” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ सी. रंगराजन


Q.7) उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील ‘मुंदेरा बाजार’ नगरपरिषदेचे नाव बदलून काय केले जाणार आहे?

✅ चौरी-चौरा


Q.8) इंडियन बँकेने नुकतेच कोणत्या राज्यात ‘MSME प्रेरणा’ कार्यक्रम सुरू केला?

✅ राजस्थान


Q.9) BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 कोणाला निवडण्यात आले आहे?

✅ ब्लेथ मिड

Mpsc राज्यसेवा परीक्षा-प्रश्नसराव



1. टी-२० क्रिकेटची सुरुवात कुठे झाली?

1.  ऑस्ट्रेलिया

2.  इंग्लंड

3.  भारत

4.  दक्षिण आफ्रिका

उत्तर:-2


2. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण?

1.  पी. के. सावंत

2.  वसंतदादा पाटील

3.  शरद पवार

4.  देवेंद्र फडणवीस

उत्तर:-3


3. उस्मानिया विद्यापीठ कुठे आहे?

1.  अहमदाबाद

2.  हैद्राबाद

3.  नांदेड

4.  अलीगड

उत्तर:-2


4. उपराष्ट्रातीच्या निवडणुकीत कोणत्य सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात?

1.  लोकसभा

2.  लोकसभा, राज्यसभा व विधानसभा

3.  लोकसभा व राज्यसभा

4.  राज्यसभा

उत्तर:-3


5. भारतात सर्वात जुने उच्च न्यायालय कुठे आहे?

1.  चेन्नई

2.  मुंबई

3.  अलाहाबाद

4.  दिल्ली

उत्तर:-3


6. भारतातील रबर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते?

1.  केरळ

2.  आसाम

3.  तामिळनाडू

4.  हिमाचल प्रदेश

उत्तर:-1


7. जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होता?

1.  लॉर्ड रीडिंग

2.  जनरल डायर

3.  लॉर्ड मॉंटेग्यु

4.  सर मायकेल ओडवायर

उत्तर:-2


8. राज्यात महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम केव्हापासून लागू झाला?

1.  १९६९

2.  १९६५

3.  १९६३

4.  १९५९

उत्तर:-2


9. युरोपचे प्रवेशद्वार म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

1.  लंडन (इंग्लंड)

2.  रोम (इटली)

3.  शिकागो (यूएसए)

4.  अंमस्टरडोम (हॉलंड)

उत्तर:-4

प्राचीन भारताचा इतिहास



 राज्यसेवा परीक्षेसाठी विशेषतः
.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.
०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.
०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.
०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.
०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.
०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.
०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.
०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.
१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.
११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.
१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.
१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.
१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.
१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.
१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.
१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.
१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

क्रियाशील फ्लोरीन



◆ ज्ञात मूलद्रव्यात फ्लोरीन मूलद्रव्य सर्वात क्रियाशील असून सेंद्रिय, असेंद्रिय, कार्बन, धातू, काच व सिरॅमिक अशा बहुतेक सर्व प्रकारच्या पदार्थावर प्रक्रिया करतो. 


◆ हायड्रोजन आणि फ्लोरीनचे हायड्रोफ्लोरीक आम्ल हे संयुग काचसुद्धा विरघळवते.


◆ फ्लोरीनच्या विषारी गुणामुळे व त्याच्या हाताळणीत होण्याऱ्या जखमांमुळे फ्लोरीनचे रसायनशास्त्र उलगडण्याची प्रगती अतिशय संथ गतीने झाली. 


◆ दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्लोरीनचे उत्पादन व्यावसायिक स्तरावर होत नव्हते. जसे रसायनशास्त्रात संशोधन होत गेले तसे काही वर्षांनी फ्लोरीन, क्लोरीन आणि कार्बन यांच्या क्लोरोफ्लुरो कार्बन या संयुगाचा शोध लागला. 


◆ या संयुगाचा वापर वातानुकूलित यंत्रे व रेफ्रिजरेटरमध्ये शीतक म्हणून केला जायचा. जवळपास साठ वर्षे क्लोरोफ्लुरो कार्बन अजिबात धोकादायक नाही अशी खात्री होती.


◆ पण क्लोरोफ्लुरो कार्बनमुळे पृथ्वीभोवती असणारा ओझोन वायूचा थर नष्ट व्हायला सुरुवात झाली.


◆ १९८७ मध्ये झालेल्या ‘मॉट्रिअल करारानुसार’ ओझोन वायूचा थर नष्ट करणाऱ्या क्लोरोफ्लुरो कार्बनसारख्या रसायनांचे उत्पादन आणि वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


◆ सध्या त्याच्याऐवजी हायड्रोफ्लुरो कार्बन वापरण्यात येतो. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कारण ओझोनच्या आवरणात सुधारणा होत असल्याचे दिसते. 


◆ फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट वापराव्यात अशा जाहिराती आपण बघतो. क्षार आणि खनिजांच्या स्वरूपात आढळणारा फ्लोराईड हा फ्लोरीनचा आयन. 


◆ दातांच्या व हाडांच्या मजबुतीसाठी फ्लोराईड आवश्यक असल्याने पिण्याच्या पाण्यात सोडियम फ्लोराईड मिसळले जाते.


◆ फ्लोराईड वापरताना त्याचे प्रमाण मात्र योग्य असावे लागते. उच्च तापमानाला टिकणारे प्लास्टिक तयार करण्यासाठी फ्लोराईड मिसळले जाते. 


◆ सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आणि गृहिणींचे लाडके उत्पादन म्हणजे टेफ्लॉन. 


◆ पदार्थ न चिकटणाऱ्या, न जळणाऱ्या या टेफ्लॉनच्या निर्मितीसाठी कार्बन आणि फ्लोरीनचे मजबूत बंध असलेल्या फ्लोरोबहुवारीकाचा उपयोग केला जातो. 


◆ ऊष्णता वाहून नेणे, विद्युतरोधक, पाणी न शोषणारा, घर्षण कमी करणारा, न गंजणारा या फ्लोरोबहुवारीकाच्या विविध गुणधर्मामुळे औद्योगिक क्षेत्रात याचा वापर केला जातो. 


◆ विद्युत वाहक तारांच्या बाह्य़ लेपनासाठी, विमानांच्या आणि वाहनांच्या भागांना लेपन करण्यासाठी फ्लोरोबहुवारीकाचा वापर केला जातो. 


◆ आण्विक ऊर्जा केंद्रासाठी लागणाऱ्या इंधनातील युरेनियम २३८ पासून युरेनियम २३५ वेगळा करण्यासाठी युरेनियम हेक्झाफ्लोराईड हे फ्लोरीनचे संयुग वापरतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाश्वत विकासाची संकल्पना



आपल्या बुद्धीच्या जोरावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना माणूस हा निसर्गचक्राचा एक घटक आहे याची जाणीव शाश्वत विकास या संकल्पनेत आहे. पृथ्वीवरील इतर कोणताही सजीव आपल्या गरजेपेक्षा जास्त संसाधनांचा वापर करत नाही. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गचक्र आहे. माणसाच्या सतत अधिक काही मिळवण्याच्या इच्छेमुळे तो सतत अधिकाधिक संसाधनांचा वापर करत असतो.


○शाश्वत विकास १७ ध्येये 


•सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.


 • भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.


•आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.


• सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.


• लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.


•पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.


•सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.


•शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.


•पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.


•विविध देशांमधील असमानता दूर करणे.


•शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.


• उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.


• हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.


•महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.


•परिस्थितिकीय व्यवस्थांचा शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.


•शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.


•चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

सराव प्रश्नसंच - भूगोल

 ● माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अ. सातारा

ब. नाशिक

क. रायगड

ड. पुणे


उत्तर - क. रायगड 


● मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे

अ. मुळा

ब. तापी

क. गोदावरी

ड. कृष्णा


उत्तर - अ. मुळा 


● महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?

अ. पुणे विद्यापीठ

ब. मुंबई विद्यापीठ

क. शिवाजी विद्यापीठ

ड. नागपूर विद्यापीठ


उत्तर - ब. मुंबई विद्यापीठ 


● महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौ. किमी आहे?

अ. 307713

ब. 407434

क. 503932

ड. 603832


उत्तर - अ. 307713


● महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो?

अ. पहिला

ब. दुसरा

क. तिसरा

ड. चौथा


उत्तर - ब. दुसरा 


● चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?

अ. रायगड

ब. ठाणे

क. पालघर

ड. नाशिक


उत्तर - क. पालघर 


● महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे?

अ. रायगड

ब. पुणे

क. नागपूर

ड. ठाणे


उत्तर - ड. ठाणे


● कोणत्या जिल्ह्यात तुषार सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे?

अ. पुणे

ब. नाशिक

क. नागपूर

ड. कोल्हापूर


उत्तर - ब. नाशिक 


● महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

अ. अहमदनगर

ब. पुणे

क. सोलापूर

ड. रायगड


उत्तर - अ. अहमदनगर 


● सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे?

अ. पुणे

ब. सांगली

क. वर्धा

ड. अहमदनगर


उत्तर - क. वर्धा



Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...