०१ जुलै २०२३

स्पर्धा मंच प्रश्नोत्तर सराव


🔸१) वर्ध्याजवळच महात्मा गांधींनी वसविलेले 'सेवाग्राम' आहे. सेवाग्रामचे नाव पूर्वी .... असे होते. 

- शेगाव


🔹२) जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अणुसंधान संस्था कोठे आहे?

- वर्धा


🔸३) जगाच्या इतिहासात सर्वांत मोठे धर्मांतर एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गाने नागपूर येथे घडून आले. कोणत्या दिवशी ? 

- १४ ऑक्टोबर, १९५६


🔹४) 'नागझिरा' हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

- गोंदिया


🔸५) थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे म्हैसमाळ हे स्थळ औरंगाबाद जिल्ह्यात आहे; तर हीच ओळख असलेले जव्हार हे स्थळ .... जिल्ह्यात आहे.

- पालघर


🔸१) इ. स. १९४६ मध्ये स्थापन झालेली व नंतरच्या काळात 'आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट' म्हणून ख्यातनाम झालेली

संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?

- पुणे


🔹२) इ. स. १९७४ मध्ये स्थापन झालेली 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट' राज्यात कोठे आहे? 

- मांजरी (पुणे)


🔸३) पुण्यातील शनिवारवाडा बांधण्याचे श्रेय कोणत्या पेशव्यास द्यावे लागेल?

- पहिला बाजीराव पेशवा 


🔹४) पुण्याजवळ .... येथे 'स्व. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' विकसित होत आहे. 

- हिंजेवाडी


🔸५) इ. स. पूर्व पहिल्या शतकापासून सध्याच्या जुन्नर जवळच्या .... येथून घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते. 

- नाणे घाट


🔸१) उत्तर कोंकणी भाषेच्या .... या बोलीवर उर्दूचा प्रभाव आढळतो.

- बाणकोटी


🔹२) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या ..... या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

- खानदेशी


🔸३) मराठीच्या .... या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून 'अहिराणी' असेही म्हणतात.

- खानदेशी


🔹४) सन १८८१. मध्ये विकसित करण्यात आलेले व आता 'फिरोजशहा मेहता उद्यान' म्हणून ओळखले जाणारे मुंबई येथील उद्यान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते ?

- हँगिंग गार्डन


🔸५) मुंबई येथील 'हुतात्मा चौक' म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता ?

- फ्लोरा फाऊंटन

महत्त्वाचे प्रश्नोत्तरे


१) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे.

ब) अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते. 

क) या हजार वर्षांत महाराष्ट्राची अस्मिता विविध अंगांनी संपन्न होत गेलेली आहे. 

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त क योग्य 

४. वरील सर्व योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 


२) महाराष्ट्राची भूमी याबद्दल खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

अ) महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे. 

ब) सुमारे नऊ कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.

१. विधान : अ योग्य 

२. विधान : ब योग्य 

३. वरील दोन्ही विधान योग्य 

४. वरील दोन्ही विधान अयोग्य 

उत्तर : १. विधान : अ योग्य 

[ब) सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.]


३) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) सह्याद्रीच्या पूर्वेकडील जमीन मात्र सावकाश सपाटीकडे जाणारी आहे. 

ब) या पठाराच्या प्रदेशाला देश महणतात. 

क) देशावरील जमिनीचा पोत आणि कस यांत फार विविधता आहे.

१. फक्त अ व ब योग्य

२. फक्त ब व क योग्य 

३. फक्त अ व क योग्य 

४. वरील सर्व विधान योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व विधान योग्य 


४) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सांगली-सोलापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.

ब) नगर-सोलापूरकडाची जमीन बव्हंशी कोरडी, रूक्ष आणि परिणामी नापीक, कोकणच्या मानाने देशावरची शेती अधिक बरकतीची आहे.

क) एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील लोकांना शेतीभाती पिकविण्यासाठी फार मेहनत करावी लागते.

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त ब व क योग्य 

४. फक्त अ व क योग्य 

उत्तर : ३. फक्त ब व क योग्य 

[अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सातारा-कोल्हापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.]


५) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

१. भूमीच्या वैशिष्ट्यांबरोबर सृष्टी आणि हवामान यांतही विविधता निर्माण होणे स्वाभाविक आहे. 

२. पावसाचे प्रमाण सर्वत्र भिन्नभिन्न असल्यामुळे महाराष्ट्राला अर्थातच एकजिनसी रूप नाही.

३. वरील दोन्ही योग्य 

४. वरील दोन्ही अयोग्य 

उत्तर : ३. वरील दोन्ही योग्य 


६) कितव्या शतकात उद्योतनसूरी या जैन ग्रंथकाराने कुवलय माला नामक ग्रंथात रेखलेली मराठ्यांची प्रतिमा आजही यथातथ्य वाटते ?

१. सहाव्या 

२. सातव्या 

३. आठव्या 

४. नवव्या 

उत्तर : ३. आठव्या 


७) खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते सांगा.

अ) मराठे कलहप्रिय अभिमानी असलेल्या प्रसंग ओढवल्याशिवाय ते लढायला बाहेर पडत नाहीत.

ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा शेतकरी समाज आहे. 

क) वायव्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही. 

ड) वैऱ्याचा सूड घ्यावा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करावे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा ही मराठ्यांची जीवनमूल्ये आहेत.

१. फक्त अ व ब अयोग्य 

२. फक्त ब व क अयोग्य 

३. फक्त अ व ड अयोग्य 

४. फक्त क व ड अयोग्य 

उत्तर : २. फक्त ब व क अयोग्य 

[ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा कृषीवेल समाज आहे. 

क) ईशान्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही.]


८) खाली काही सातवाहन बद्दल कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

१. ख्रिस्ती कालगणनेच्या सुरवातीच्या काळात गोदातीरावरील प्रतिष्ठान म्हणजेच आताचे पैठण या ठिकाणाहून राज्य करणार्‍या सातवाहन राजघराण्यापासून महाराष्ट्राच्या इतिहासाची संगती सहजपणे लावला येते.

२. सातवाहन हे पहिले महाराष्ट्रीय राज्यकर्ते.

३. सातवाहनांनंतर पश्चिम महाराष्ट्रात त्रैकूटक, भांदकचे वाकाटक, चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि देवगिरीचे यादव हि राजघराणी विशेषत्वाने नावारूपास आली.

४. वरील सर्व योग्य

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :
संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक
चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला
हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम
जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू
खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई
संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू
खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग
कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर
दक्षिण भारतातील उठाव  -
पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास
म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर
विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर
गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर
रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड
रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत
भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824
केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर
फोंडा सावंतचा उठाव : 1838
भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश
दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी
__________________________________

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स



1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स 

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882)

प्रश्न मंजुषा

1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले  आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.


अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.

ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.

क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.


पर्याय- 

1 ) अ आणि ब   2) ब आणि क

3 ) अ आणि क  4) ब आणि ड


Ans:-1


2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 

  

पर्याय - 

1 ) सप्टेंबर     2 ) डिसेंम्बर

3 ) जून          4 ) मार्च


Ans:-3


3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?


पर्याय - 

1 ) अटलांटिक  2 ) पॅसिफिक

3 ) हिंदी           4 ) आर्क्टिक 


Ans:-1


4 ) द्वीपगिरी काय आहे ? 


पर्याय - 

1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .


Ans:-1



5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं. 

 

पर्याय - 

1 )सकाळी 11 ते 12

2 ) दुपारी 12 ते 1 

3 ) दुपारी 1 ते 2 

4 ) दुपारी 2 ते 3


Ans:-4


6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?

अ) NOW ऑफ NEVER

ब)BROKEN WINGS

क)THE WAY OUT

ड)NOTA

Ans:-1


7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?

अ)जगन्नाथ मिश्रा

ब)अमीर अली

क)गफार खान

ड)नारायण पंडित

Ans:-1


8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

अ)मिंटो 2रा

ब)कर्झन

क)माउंटबॅटन

ड)वेव्हल

Ans:-3


9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?

अ)तात्या टोपेे 

ब)भगतसिँग 

क)अनंत कान्हेरे 

ड)नोटा


Ans:-1

 १०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?

अ)स.सेन

ब)अशोक मेहता

क)T. R. होल्म्स

ड)OTRAM


Ans:-1