Friday 1 July 2022

नवनियुक्त मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेचा परिचय


▪️ शपथग्रहण सोहळा - ३० जून २०२२
▪️ पूर्ण नाव - एकनाथ संभाजी शिंदे
▪️ जन्म - ९ फेब्रुवारी १९६४
▪️ मुळगाव - दरे ( महाबळेश्वर, जि. सातारा)
▪️ शिक्षण - बी. ए. (मराठी & राजकारण)
▪️ विधानसभा मतदारसंघ - कोपरी-पांचपाखाडी
▪️ पत्नीचे नाव - लता एकनाथ शिंदे
▪️ मुलाचे नाव - श्रीकांत एकनाथ शिंदे
▪️ गुरू - आनंद दिघे
▪️ राजकिय पक्ष - शिवसेना
▪️ पालकमंत्री - ठाणे जिल्हा व गडचिरोली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸 १९८४ - शिवसेना शाखाप्रमुख म्हणून नियुक्त
🔸 १९८६ - बेल्लारी तुरुंगात ३० दिवस कारावास
🔸 १९९७ -  ठाणे महानगरालिकेचे नगरसेवक
🔸 २००४ ते २०१९  सलग चारदा आमदार म्हणून विजयी
🔸 २०१४ - एका महिन्यासाठी विरोधी पक्षनेते म्हणून कार्य
🔸 २०१५ ते २०१९  - सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री
🔸 २०१९ - सात ते आठ महिने आरोग्य मंत्री म्हणून पदावर.
🔸 २०१९ ते २०२२ - नगरविकास विभागाचे मंत्रीपद

घटकराज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील तुलना


(1) घटकराज्याचे केंद्रासोबतचे संबंध हे संघराज्यीय स्वरूपाचे आहेत.
▪️केंद्रशासित प्रदेशाचे केंद्राशी असलेले संबंध एकात्म स्वरूपाचे आहेत.

(2) घटकराज्य आणि केंद्र यांच्यामध्ये अधिकारांचे वाटप झालेले आहे.
📌याउलट, केंद्रशासित प्रदेशांवर थेट केंद्राचे नियंत्रण आणि प्रशासन असते.

(3) घटकराज्यांना स्वायत्तता असते.
▪️केंद्रशासित प्रदेशांना स्वायत्तता नसते..

(4) घटकराज्यांच्या प्रशासकीय संरचनेत एकसारखेपणा आढळतो.
📌केंद्रशासित प्रदेशांची प्रशासकीय रचना भिन्न स्वरूपाची आहे.

(5) घटकराज्याच्या कार्यकारी प्रमुखाला राज्यपाल म्हणतात.
▪️केंद्रशासित प्रदेशांचा कार्यकारी प्रमुख विविध पदनामांनी ओळखला जातो. उदा. प्रशासक किंवा ले. गव्हर्नर किंवा मुख्य प्रशासक. इ.

नागरिकत्व

🎯राज्यघटनेनुसार 26 जानेवारी 1950 रोजी पुढील चार प्रकारच्या वर्गवारीतील लोक भारताचे नागरिक असतील असे नमूद केले होते.

🔴  'अधिवासा' द्वारे नागरिक
(Citizens by Domicile)
▪️कलम 5

🔴 'स्थलांतरा' द्वारे नागरिक
(Citizens by Migration)
▪️कलम 6.

🔴 'पुनर्वास्तव्या'द्वारे नागरिक (Citizens by Resettlement),
▪️कलम 7.

🔴 'नोंदणी'द्वारे नागरिक (Citizens by Registration)
▪️ कलम 8

🎯 26 जानेवारी 1950 नंतर नागरिकत्व बद्दल तरतूदी करण्याचा अधिकार घटनेने कलम 11 अन्वये संसदेला देण्यात दिलेला आहे.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...