पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे


🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा



💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.

वस्तुनिष्ठ महाराष्ट्र




*महाराष्ट्रातील :अष्टविनायक*

-----------------------------------------------------:

०१) महागणपती रांजणगांव (पुणे)

०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)

०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)

०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)

०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)

०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)

०७) वरद विनायक. महाड. (रायगड)

०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)

------------------------------------------------------------

-----------------------

*महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प*

------------------------------------------------------------

-----------------------

०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.

०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)

०३) डहाणू, चोला ठाणे.

०४) एकलहरे नाशिक.

०५) बीड. परळी वैजनाथ.

०६) फेकरी भुसावळ.

०७) पारस. अकोला.

०८) ऊरण. रायगड.

------------------------------------------------------------

-----------------------

🐆🐅🐿🐇 *महाराष्ट्र : अभयारण्ये.*🐇🐿🐅🐆

------------------------------------------------------------

-----------------------

*कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) कर्नाळा, फनसाड रायगड.

०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.

०३) मालवण. सिंधुदुर्ग.

------------------------------------------------------------

-----------------------

*पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.

०२) कोयना अभयारण्य. सातारा.

०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.

०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.

०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे

------------------------------------------------------------

-----------------------

*नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.

०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &

अहमदनगर.

०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.

०४) यावल अभयारण्य. जळगांव.

०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.

------------------------------------------------------------

-----------------------

 *औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद

व नगर.

०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.

०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.

उस्मानाबाद.

०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद

व जळगांव.

------------------------------------------------------------

-----------------------

*अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.

अमरावती.

०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.

०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.

०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य

बुलढाणा.

०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.

०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.

नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) नागनागझिरा गोंदिया

०२) बोर. वर्घा व नागपुर

०३) अंधारी चंद्रपुर

०४) चपराळा, भांबरागड.  गडचिरोली....

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 ♦️परश्न १ ला : - आठ आठवडे संपल्यापासून जन्मापर्यंतच्या अवस्थेस काय म्हणतात ?

१) भ्रुणावस्था

२) प्रसुतिवस्था

३) जिजावस्था

४) गर्भावस्था✅


♦️परश्न २ रा : - कर्मचारी महिलांकरिता निवासगृह बांधण्याकरिता बांधकाम खर्चाच्या किती टक्के अनुदान संस्थांना केंद्र शासनाकडून प्राप्त होते ?

१) २५ %

२) ७५ %✅

३) ५० %

४) १०० %


♦️परश्न ३ रा : - मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ हा केव्हा लागू करण्यात आला ?

१) सप्टे १९९४

२) आॅक्टो १९९३

३) सप्टे १९९३✅

४) आॅक्टो १९९४


♦️परश्न ४ था : - मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ मध्ये कोणत्या कलमात मानवी हक्काची व्याख्या देण्यात आली आहे ?

१) कलम २ - C

२) कलम २ - D✅

३) कलम ३ - A

४) कलम २ - A


♦️परश्न ५ वा : - पुश उपक्रम हा कोणामार्फत राबविण्यात येत आहे ?

१) केंद्रिय महिला व बालविकास मंत्रालय

२) राज्य महिला व बाल विभाग

३) राष्ट्रिय महिला आयोग

४) राज्य महिला आयोग✅


♦️परश्न ६ वा : - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कोणत्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले ? 

१) २०१७

२) २०१८✅

३) २०१६

४) २०१५


 ♦️परश्न ७ वा : - खालील कोठे केंद्रीय अन्न परिक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे ?

१) मुंबई

२) चेन्नई

३) कोलकत्ता

४) फरीदाबाद✅


♦️परश्न ८ वा : - खालीलपैकी कोणत्या राज्याने देशात सर्वप्रथम महिला पुलीस स्वयंसेवी योजना सुरु केली आहे ?

१) महाराष्ट्र

२) तेलंगणा

३) हरियाणा✅

४) दिल्ली


 ♦️परश्न ९ वा : - गर्भवती माता आणि लहान मुलांसाठी खालीलपैकी कोणता आपत्कालीन हेल्पलाइन नंबर आहे ?

१) १०२✅

२) १०८

३) १११

४) १२३


♦️परश्न १० वा : - International  union  of  Nutritional  Science  या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) दिल्ली

२) मुंबई

३) व्हिएन्ना✅

४) न्युयार्क



Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...