Tuesday 9 April 2024

चालू घडामोडी :- 09 एप्रिल 2024

◆ इंटिग्रेटेड मॅट्रेस उत्पादक स्लीपफ्रेश मॅट्रेसने बॉलीवूड सुपरस्टार विद्या बालनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ मुंबई इंडियन्स T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा पहिला संघ ठरला.

◆ अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार करण्यात आला आहे.

◆ ATP मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा "सुमित नागल" हा भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Female Award इंग्लंडची फलंदाज "माइया बौचियर" यांना मिळाला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Male Award श्रीलंकेच्या "कामिंदू मेंडिसने" यांना मिळाला आहे.

◆ The idea of democracy हे पुस्तक "सॅम पित्रोदा" यांनी लिहिले आहे.

◆ कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळवणारी अनुपमा उपाध्यय भारत या देशाची खेळाडू आहे.

◆ श्रीनिवास पालिया यांची "विप्रो" उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पीटर पेलेग्रिनी यांची "स्लोवाकिया" या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.

◆ भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी "सुविधा" पोर्टल सूरू केले आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये भारत 51व्या क्रमांकावर आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ Economic business ranking 2024 "Economics inteligens unit" कडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

◆ UNO द्वारे जैव विविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी एस्ट्रीड शोमेकर यांची निवड करण्यात आली आहे.

ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत 1064 जणांची सुटका.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्‍थानके, फलाटावरील 1064 मुलांची सुटका करण्‍यात आली आहे.

RPF च्या इतर उल्लेखनीय ऑपरेशन्स👇👇
1] मेरी सहेली पथके :- रेल्वेतील महिला प्रवाशांना, विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने मेरी सहेली पथके तैनात करण्यात आली आहेत.

2] ऑपरेशन मातृशक्ती :- ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत, महिला आरपीएफ जवानांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना मदत केली.

3] मिशन जीवन रक्षा :- मिशन जीवन रक्षा अंतर्गत, आरपीएफ जवानांनी रेल्वेचा अपघात किंवा रेल्वे-खाली आत्महत्त्या करण्यापासून अनेक जणांचे प्राण वाचवले.

4] ऑपरेशन महिला सुरक्षा :- महिला आणि मुलींना मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या जाळ्यात अडकण्यापासून 150 जणांना रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत वाचवले होते.

5] ‘मेरी सहेली' नावाचा कार्यक्रमही रेल्वेकडून राबविण्यात येत आहे.

Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...