Thursday 30 April 2020

संचारबंदीच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी धान्याच्या मालवाहतुकीत मोठी वाढ


- संचारबंदीच्या काळातही अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध राहणार याची खबरदारी भारतीय रेल्वे त्याच्या माल व पार्सल सेवेच्या माध्यमातून घेत आहे.

- संचारबंदी जाहीर झाल्यापासून 25 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत 7.75 लक्ष टनांहून अधिक खासगी धान्याची मालवाहतूक भारतीय रेल्वेनी देशभरात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 6.62 लक्ष टन धान्याची मालवाहतूक झाली होती.

▪️इतर ठळक बाबी

- रेल्वेद्वारे खासगी धान्याची मालवाहतूक करण्यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू ही आघाडीची राज्ये आहेत.

- कोविड19 महामारीमुळे जाहीर संचारबंदीच्या काळात अन्नधान्यासारखी कृषी उत्पादने वेळेवर गोळा केली जाणार आणि देशभरात त्यांचा पुरवठा सुरळीत राहणार यासाठी भारतीय रेल्वे सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

- फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नाशवंत वस्तू आणि शेतीसाठी बियाणे याकरिता विशेष पार्सल गाड्यांसाठी भारतीय रेल्वेने मार्ग निश्चित केले आहेत.

- देशाच्या सर्व भागात अविरत पुरवठा राहावा यासाठी ज्या ठिकाणी मागणी कमी आहे अशा मार्गावरही गाड्या चालवल्या जात आहेत. मार्गावर शक्य त्या सर्व ठिकाणी रेल्वेगाडयांना थांबा देण्यात आला आहे.

महत्त्वाचे प्रश्नसंच

📕 कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?

(A) हैदराबाद✅✅
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) बंगळुरू

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?

(A) बियास नदी
(B) रावी नदी✅✅
(C) चिनाब नदी
(D) झेलम नदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📘 वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?

(A) अल्जेरिया
(B) ट्युनिशिया
(C) लिबिया
(D) लेबनॉन✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?

(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस✅✅
(B) फ्लिपकार्ट
(C) पेटीएम
(D) इन्फोसिस

📘 कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?

(A) मध्यप्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तराखंड✅✅
(D) हरयाणा

🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान
B. बॅ. महमद अली जीना
C. मौलाना अब्दुल करीम आझाद
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

______________________________
🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅
B. समता
C. सुलभ समाचार
D. बहिष्कृत भारत
______________________________
⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873
B. 10 ऑक्टोबर, 1873
C. 14 सप्टेंबर, 1873 ✅
D. 15 ऑगस्ट, 1873
______________________________
🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅
B. विरेंद्रकुमार घोष
C. अरविंदो घोष
D. हेमचंद्र दास

🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले
B. गणेश वासुदेव जोशी
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. जगन्नाथ शंकर शेठ✅
______________________________
🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार☑️
B) भारत आणि नेपाळ
C) भारत आणि बांग्लादेश
D) भारत आणि थायलँड

🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
______________________________
🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113

______________________________
🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही
______________________________
🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी
______________________________
⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?अशोक मेहता✅अशोक मेहता✅

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी
______________________________
🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी
2)दोडाबेटा✅✅
3) अन्ना मलाई
4) उदकमडलम
______________________________
🟡 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

______________________________

बौद्ध परिषदा

🎯पहिली बौद्ध परिषद

👁‍🗨काळ:-483 इ स पू

👁‍🗨अद्यक्ष:-महाकश्यप

👁‍🗨ठिकाण:-राजगृह

👉राजा:-अजातशत्रू

🎯दुसरी बौद्ध परिषद

🔘काळ:-387 इ स पू

🔘अद्यक्ष:-महास्तवीर रेवत

🔘ठिकाण:-वैशाली

👉राजा:-कालाशोक

🎯तिसरी बौद्ध परिषद

👁‍🗨काळ:-243 इ स पू

👁‍🗨अद्यक्ष:-मोगलीपुत्र तिस्स

👁‍🗨ठिकाण:-पाटलीपुत्र

👉राजा:-अशोक

🎯चौथी बौद्ध परिषद

🔘काळ:-पहिले शतक

🔘अद्यक्ष:-वसुमित्र

🔘ठिकाण:-कुंडलवण

👉राजा :-कनिष्क

General Knowledge

▪️ कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी “टॉकबॅक” कीबोर्ड विकसित केले आहे?
उत्तर : गुगल

▪️ कोणत्या कायद्याच्या अन्वये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक गुन्हा ठरविण्यात आला आहे?
उत्तर : आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५

▪️ कोविड-19 महामारीमुळे रद्द केलेला ‘टूर डी फ्रान्स’ कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : सायकल शर्यत

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : अब्देलौहब एसाओई

▪️ “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स” याची स्थापना करण्याची शिफारस केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : एम. एस. साहू

▪️ कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?
उत्तर : हैदराबाद

▪️ कोणत्या शहराने ‘स्मार्ट शहरे’ अभियानाच्या अंतर्गत ‘सय्यम’ अॅप तयार केले?
उत्तर : पुणे

▪️ 2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : शेयर ए मिलियन स्टोरीज

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान’ आरंभ केले?
उत्तर : गुजरात

▪️ 2020 या सालाचा ‘विल्यम ई. कोल्बी पुरस्कार’ कुणी जिंकला?
उत्तर : अ‍ॅडम हिगिनबॉथम

प्रश्न मंजुषा

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद 🚔
४) नरेंद्र मोदी

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)🚔
२) CH4
३) NO2
४) CO2

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८🚔
३) २०१३
४) २०१८

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा 🚔
३) २ वेळा
४) ५ वेळा

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर🚔
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  🚔

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028🚔
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  🚔
४) कलकत्ता

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका 🚔
४) दक्षिण आफ्रिका

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  🚔
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा 🚔
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे 🚔
४) स्मिता कोल्हे

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  🚔
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो 🚔
४) शरद पवार

१६) बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन

१६) स्वातंत्र्य आधी भारतात कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात होती ?
माफ करा या प्रश्नाचे उत्तर

उत्तर:-आसाम

________________________________
🔴 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✔️✔️
३) २ वेळा
४) ५ वेळा
________________________________
🟤 घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✔️✔️
________________________________
⚫️ भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✔️✔️
४) कलकत्ता
________________________________
🔵 विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे ✔️✔️
________________________________
🟢 महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✔️✔️
४) स्मिता कोल्हे
________________________________
🟡 संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  ✔️✔️
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७
________________________________
🟠 ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✔️✔️
४) शरद पवार
________________________________
🔴 बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन
____________________________________

_____________

महाराष्ट्रतील ग्रामीण भागाच्या विद्युतीकरणासाठी कर्ज.

🌿महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे विद्युतीकरण  करण्यासाठी आशियायी विकास बँकेने भारत सरकारला 2616 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

🌿महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य असून ग्रामीण भागात कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक लोक अजूनही काम करतात.

🌿कृषी उत्पादनाला पाटबंधारे व वीज, पाणी यांच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे फटका बसत आहे. ग्रामीण भागात उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याची गरज असून महाराष्ट्रात नवीन वीज संजालातून वीज देण्यासाठी या कर्जाचा वापर केला जाणार आहे.

🌿या कर्जातून 33/11 केव्हीची 121 उपकेंद्रे सुरू  करण्यात येणार असून 46,800 कि.मी.ची 11 किलोव्होल्टचे विस्तारित वीज संजाल सुरू करण्यात येणार आहे.

🌿महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची क्षमताही यात वाढवली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार व ही कंपनी 703.1 दशलक्ष डॉलर्सच्या प्रकल्पातच 357.1 दशलक्ष डॉलर्सचा वाटा उचलणार आहे.

२०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल १० देशांत.

💢२०२८च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अव्वल १० देशांत स्थान मिळवणे नक्कीच शक्य आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी व्यक्त केली.

💢या ध्येयाच्या दिशेने शासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

💢‘‘ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात.

💢गेल्या काही वर्षांत भारताला अनेक युवा आणि कौशल्यवान क्रीडापटू गवसले असून २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये आपण नक्कीच अव्वल १० देशांत स्थान मिळवू शकतो, असे मला वाटते. त्यादृष्टीने क्रीडा खात्यासह शासनानेही आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत,’’ असे रिजिजू म्हणाले.

💢‘‘२०२८च्या ऑलिम्पिकसाठी अद्याप आमच्याकडे आठ वर्षांचा कालावधी असल्याने खेळाडूंच्या शोधमोहिमेची अंतिम रुपरेषा कशी असावी, याविषयी आम्ही सध्या चर्चा करत आहोत.

💢त्याचप्रमाणे २०२१च्या ऑलिम्पिकसाठी खेळाडू कसे तयारी करत आहेत, याकडेही आमचे लक्ष आहे,’’ असे रिजिजू यांनी नमूद केले.

आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीला HCARD रोबोटची साथ.

☄दुर्गापूर येथील CSIR-सेंट्रल मेकेनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या प्रयोगशाळेनी HCARD (हॉस्पिटल केअर असिस्टिव्ह रोबोटिक डिव्हाइस) रोबोटिक उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि नेव्हिगेशनच्या स्वयंचलित तसेच मानवचलित अशा दोन्ही पद्धतीने कार्य करते.

☄संसर्ग झालेल्या लोकांची काळजी घेताना रुग्णालयातल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोविड-19 विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे HCARD रोबोट आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांपासून शारीरिक अंतर राखण्यास मदत करू शकते.

🌑यंत्राची वैशिष्ट्ये...

☄संचालन, रूग्णांना औषधे आणि खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी ड्रॉव्हर अ‍ॅक्टिवेशन, नमुना संकलन आणि दृकश्राव्य संवाद यासारख्या वैशिष्ट्यांसह नियंत्रण कक्ष असलेल्या परिचारिका बूथद्वारे या रोबोटचे नियंत्रण आणि परीक्षण केले जाऊ शकते.

☄या उपकरणाची किंमत 5 लक्ष रुपयांहून कमी आहे आणि त्याचे वजन 80 किलोहून कमी आहे.

पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट.

🔰अंतराळातून रॉकेटच्या तिप्पट वेगाने जाणारा एक मोठा उल्कापिंड 1998 OR2 पृथ्वीच्या जवळून गेला आहे.

🔰या उल्कापिंडमुळे पृथ्वीला कोणताही धोका नव्हता. कारण हा उल्कापिंड 63 लाख किमीवरून पुढे गेला आहे.

🔰तर तो याआधी 12 मार्च 2009 मध्ये पृथ्वीपासून 2.68 कोटी किमी लांबीवरून गेला होता. आता घाबरायचे कारण नसल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.

🔰तसेच हा उल्कापिंड पृथ्वीच्या शेजारून यापुढेही जाणार असून त्याचा वेग पाहता तो 11 वर्षांनी पुन्हा येणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे पृथ्वीपासून 1.90 कोटी किमी असणार आहे.

🔰हा उल्कापिंड दर 11 वर्षांनी पृथ्वीजवळून जातो. भविष्यात हा उल्कापिंड 2031, 2042 आणि नंतर 2068 व 2079 मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.

🔰यापैकी 2079 मध्ये हा उल्कापिंड पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे आतापेक्षा 3.5 पटींनी कमी असणार आहे. आज हा उल्कापिंड 63लाख किमी लांबून गेला आहे. 2079 मध्ये हा उल्कापिंड 17.73 लाख किमी अंतरावरून जाणार आहे. हे या उल्कापिंडाचे पृथ्वीपासूनचे सर्वांत कमी अंतर असणार आहे.

अध्यक्षीय निवडणूक लांबणीवर टाकणार नाही - ट्रम्प.


✳️करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीची तारीख बदलण्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. ३ नोव्हेंबर रोजी तेथे अध्यक्षीय निवडणूक होत आहे. व्हाइट हाऊस येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा विचार आपण करूच शकत नाही, तसे करण्याचे काही कारणही नाही.

✳️त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांनी गेल्या आठवडय़ात असे म्हटले होते की, ट्रम्प हे अमेरिकी निवडणुकीच्या तारखा बदलण्याच्या विचारात आहेत. ट्रम्प हे निवडणुकांच्या तारखा बदलणार आहेत, त्याची कारणे ते काहीही सांगतील, पण निवडणुका कशासाठी लांबणीवर टाकायच्या हे समजत नाही.

✳️ट्रम्प यांनी सांगितले की, झोपाळू बिडेनना कुणीतरी काहीही लिहून देते आणि प्रचाराच्या काळात ते काहीही बोलतात. त्याप्रमाणेच मी निवडणुका लांबणीवर टाकण्याची अटकळ त्यांनी बांधली आहे. पण निवडणुका लांबणीवर टाकण्याचा विचार मी कधीही केलेला नाही.

गांधीनगरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ याची स्थापना झाली

भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) होणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांचे नियमन एकाच जागी करण्याच्या उद्देशाने गुजरातच्या गांधीनगर या शहरात ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ (International Financial Services Centres Authority) याची स्थापना करण्यात आली आहे.

27 एप्रिल 2020 हा दिवस प्राधिकरणाचे स्थापना दिन असणार आणि त्याचे मुख्यालय गांधीनगर येथे असणार अशी अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली.

वर्तमानात, भारतात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधले (IFSC) बँकिंग, भांडवली बाजारपेठ आणि विमा हे क्षेत्र अनेक नियामकांद्वारे नियमित केले जात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI), निवृत्तीवेतन निधी नियंत्रण व विकास प्राधिकरण (PFRDA) आणि भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण (IRDAI) या संस्थांकडून हा कारभार व्यवस्थापित केला जात आहे.

आता, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) हे भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) चालणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांमध्ये समन्वय राखणारी, नियंत्रण राखणारी व त्यांचे व्यवस्थापन करणारी संस्था असणार आहे.

IFSCA संस्थेचे स्वरूप

🔸आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) यात अध्यक्षांसह एकूण नऊ सदस्यांचा समावेश असणार आहे आणि त्या सर्वांची नियुक्ती केंद्र सरकार करणार. हे सदस्य RBI, SEBI, IRDAI व PFRDA यांचे प्रत्येकी एक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे दोन अधिकारी कर्मचारी असणार आहेत. उर्वरित दोन सदस्यांची नेमणूक शोध समितीच्या शिफारशीवरून केली जाणार.

🔸ही संस्था ‘विशेष आर्थिक क्षेत्र कायदा-2005’ अन्वये स्थापन करण्यात आली आहे.

आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम.

🔰केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मंगळवारी केली. आयटी क्षेत्रातील ८५ टक्के काम घरुनच केले जात असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले. वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी ३० एप्रिल रोजी संपत होता. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान त्यांनी ही घोषणा केली.

🔰वर्क फ्रॉम होमसंदर्भात सरकारने अनेक सवलती दिल्या असल्याचाही उल्लेख प्रसाद यांनी यावेळी केला. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील आयटी सेक्रेट्री, कम्युनिकेशन सेक्रेट्री आणि पोस्टल सेक्रेट्रींनी प्रेझेंटेशन सादर करुन कोणकोणत्या गोष्टींची राज्यांना केंद्राकडून अपेक्षा आहे हे सांगितले. घरुन काम करण्याचे नियम शिथिल करण्यात आले आहे. “घरुन काम करणे हे सर्वसामान्य व्हावे यासाठी आम्हा प्रयत्नशील आहोत,” असंही प्रसाद यावेळी म्हणाले. तसेच नवीन उद्योजकांनी या संदर्भातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षाही प्रसाद यांनी व्यक्त केली.

🔰सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतींमध्ये सुरक्षा ठेवींमध्ये सूट, काही ठिकाणी व्हिपीएन न वापरता काम कऱण्याची सूट, घरी काम करण्यासंदर्भात उपकरणे पुरवण्यासाठी परवानगीमध्ये सूट देण्याचा समावेश आहे. १३ मार्च रोजी सरकारने आयटी कंपन्यांनी घरुन काम कऱण्याची परवानगी देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार ३० एप्रिलला हा कालावधी संपणार होता. मात्र आता तो वाढवण्यात आला आहे.

दीपांकर दत्ता यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ.

🔰कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली.

🔰राजभवन येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दत्ता यांना पदाची शपथ दिली.राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी न्या. दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथ दिली.दत्ता यांनी 16 नोव्हेंबर 1989 रोजी वकिलीला सुरुवात केली.

🔰त्यांनी कोलकाता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, झारखंड उच्च न्यायालय तसेच काही वेळा सर्वोच्च न्यायालयात एकूण 16 वर्षे सेवा बजावताना दिवाणी, घटनात्मक, कामगार, सेवा, शिक्षण व वाहतूक विषयक प्रकरणे हाताळली.तसेच घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. 22 जून 2006 रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये त्यांची कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बँकेची निवडणूक लढण्यास अपात्र ठरविणारे ‘ते’ कलम रद्द.

🔰राज्याच्या सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांना सहकारी वा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरवणारे सहकार कायद्यातील एक पोटकलम महाविकास आघाडी सरकारने रद्द केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

🔰देवेंद्र फडणवीस सरकारने जानेवारी 2016 मध्ये असा निर्णय घेतला होता की, रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीवरून ज्या सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले असेल त्यांच्या संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढता येणार नाही आणि हा निर्णय आधीच्या दहा वर्षांपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू  राहील.

🔰तसेच याचा अर्थ जानेवारी 2006 पासून रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीवरून वा मागणीवरून बरखास्त झालेल्या बँकांच्या संचालकांनादेखील पुढील दहा वर्षे बँकेची निवडणूक लढवता येणार नाही. त्यासाठी सहकार कायद्याच्या कलम 73 क मध्ये पोटकलम 3-अ जोडण्यात आले.

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...