Thursday 18 March 2021

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :


सुरुवात - 22 जानेवारी 2015


दूत - साक्षी मलिक  


बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

  हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

  'बेटा बेटी एकसमान' हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.

  हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.

  यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.

  भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' टपाल तिकिटेही काढण्यात आली.

  सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू. 


महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)


   जिल्हा - 2001 - 2011


1) बीड - 894 - 807 

2) जळगाव - 880 - 842 

3) अहमदनगर - 884 - 452 

4) बुलढाणा - 908 -  855

5) औरंगाबाद - 890 - 858 

6) वाशिम - 918 - 863 

7) कोल्हापूर - 839 - 863 

8) उस्मानाबाद - 894 - 867 

9) सांगली - 867 - 85

घटनेतील मूलभूत कर्तव्य




1.      घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  


2.      ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 


3.      भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 


4.      देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 


5.      धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 


6.      आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 


7.      वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 


8.      विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 


9.      सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 


10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 


11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

सहावी पंचवार्षिक योजना



👉1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985

👉भर - दारिद्र्य निर्मुलन व रोजगार निर्मिती .

👉 परतिमान- अॅलन मान व अशोक उद्र . 👉उद्दीष्टये- 1 )रोजगार निर्मिती 

               2 )आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन . 👉अध्यक्ष - इंदिरा गांधी 

👉उपाध्यक्ष - एन डी तिवारी

 👉IRDP - 2 ऑगस्त 1980 पासून सुरु 

👉 NREP- 2 ऑक्टोबर 1980

👉RLEGP - 15 अगस्त 1983

👉DWCRA - 1982 ( डेन्मार्क च्या मदतीने )

👉 नवीन २० कलमी कार्यक्रम -१४ जाने 👉1982 दोन नवीन पोलाद प्रकल्प - 

           1 ) सलेम ( TN )  - 1982

           2 ) विशाखापट्टणंम ( AP ) - 1982

महाराष्ट्रातील अभयारण्ये



▪️नरनाळा - अकोला

▪️टिपेश्वर -यवतमाळ  

▪️यडशी रामलिंग - उस्मानाबाद

▪️अनेर - धुळे, नंदुरबार

▪️अधेरी - चंद्रपूर


▪️औट्रमघाट - जळगांव

▪️कर्नाळा - रायगड

▪️कळसूबाई - अहमदनगर

▪️काटेपूर्णा - अकोला 

▪️किनवट - नांदेड,यवतमाळ


▪️कोयना - सातारा

▪️कोळकाज - अमरावती

▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव

▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर

▪️चपराला - गडचिरोली


▪️जायकवाडी - औरंगाबाद 

▪️ढाकणा कोळकाज - अमरावती

▪️ताडोबा - चंद्रपूर

▪️तानसा - ठाणे

▪️दऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर


▪️नवेगांव - भंडारा

▪️नागझिरा - भंडारा

▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक

▪️नानज - सोलापूर

▪️पच - नागपूर


▪️पनगंगा - यवतमाळ, नांदेड

▪️फणसाड - रायगड

▪️बोर - वर्धा

▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई

▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे


▪️मालवण - सिंधुदुर्ग 

▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर

▪️माहीम - मुंबई

▪️मळा-मुठा - पुणे

▪️मळघाट - अमरावती


▪️यावल - जळगांव

▪️राधानगरी - कोल्हापूर

▪️रहेकुरी - अहमदनगर

▪️सागरेश्वर - सांगली

नदीकाठची शहरे



◆ नळगंगा – मलकापूर


◆ तिस्तूर -चाळीसगाव


◆ पांझरा – धुळे, पवनार


◆ कान – साक्री


◆ बुराई – सिंदखेड


◆ गोमती – शहादा


◆ मास – शेगाव


◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)


◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)


◆ भोगावती – पेण


◆ उल्हास – कर्जत


◆ गड – कणकवली


◆ आंबा – पाली


◆ जोग – दापोली


निसर्ग चक्रीवादळ



👉 या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


👉या चक्रीवादळाला बांगलादेशने "निसर्ग" असे नाव दिले आहे. 


👉उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती. 


👉या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या देशांनी सुचवलेल्या नावांचा समावेश कऱण्यात आला होता. 


👉अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिलं नाव निसर्ग आहे. जे बांगलादेशने सुचवले आहे. 


👉२००४ मध्ये ६४ नावाची यादी तयार केली होती. गेल्या आठवड्यात आलेल्या आम्फान चक्रीवादळाला या यादीतील अखेरचं नाव दिलं आहे. 


👉तयानंतर आता नव्या यादीतील पहिलं नाव तीन तारखेला धडकणाऱ्या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे.


♦️नावे कशी देतात?♦️

👉चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. 


👉फले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. 


👉भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. 


👉इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. 


♦️चक्रीवादळ का तयार होते?♦️

एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. 


👉भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. 


👉दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.


♦️चक्रीवादळाचा इशारा कधी दिला जातो?

👉वाऱ्यांचा वेग नेमका किती आहे त्यावरून त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे की वादळ ते ठरवले जाते. अर्थात जगभरातील वादळांसाठी हे निकष बदलतात. 


👉अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. 


👉पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वाऱ्यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. 


👉वाऱ्यांनी ६३-६५ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.

नर्मदा नदी



नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदीचा उगम मध्यप्रदेश मधील सातपुडा पर्वरांगेतील “अमरकंटक” येथे होते. नर्मदा नदीची एकूण लांबी १२९० किमी एवढी आहे व तिची महाराष्ट्रातील लांबी ५४ किमी एवढी आहे. नंदुरबार जिल्हयाच्या अती उत्तरेकडून ही नदी वाहते. नर्मदा नदी सातपुडा पर्वत रांगेतील अक्राणी टेकड्यांमुळे तापी नदी पासुन वेगळी झाली आहे. नर्मदा नदी भडोच, गुजरात येथे अरबी समुद्रास मिळते. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील उपनदी तवा ही आहे. नर्मदा नदीवर “धुवांधार धबधबा” आहे. नर्मदा नदीवरील गुजरात राज्यातील “सरदार सरोवर प्रकल्प” बांधण्यात आला आहे.

गोदावरी नदी

 गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील ०९ जिल्हयातुन वाहते. दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. गोदावरी नदीस “दक्षिण गंगा” किंवा “ब्रहद्ध गंगा” या नावानेही ओळखले जाते.गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  


गोदावरी नदीचा उगम :-


सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हिारी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे. गोदावरी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या देानच राज्यांतुन वाहते. गोदावरी नदीची एकूण लांबी * किमी एवढी आहे.गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते. १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.


गोदावरीच्या उपनद्या


पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका, बोरा इत्यादी.


गोदावरी नदीच्या काठावरील शहरे


नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.


गोदावरी नदीवरील धरणे


गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसाार” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.


Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...