Wednesday 30 December 2020

ब्रिटन कडून ऑक्सफर्डच्या करोना लसीला मान्यता.


🔰करोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करत असलेल्या ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे.

तर यासोबतच ब्रिटन करोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.


🔰बरिटनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात करोनाचा नवा प्रकार फैलावत असून अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत.


🔰आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने (MHRA) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या  करोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारने मान्यता दिली आहे”.

सुबोध जयस्वाल ‘सीआयएसएफ’च्या महासंचालकपदीपोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या(सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.


केंद्रातून राज्यात परतल्यानंतर युती सरकारच्या काळात जयस्वाल यांची आधी मुंबई पोलीस आयुक्त आणि गेल्यावर्षी पोलीस महासंचालकदी नियुक्ती झाली होती. पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून महासंचालक जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विशेषत: गृह विभाग यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी के ंद्रात जाण्याची मागितलेली परवानगी राज्य सरकारने लगेच मान्य के ली होती. त्यानुसार केंद्र सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८५ च्या तुकडीतील जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती के ली आहे. त्यांचा कार्यकाल हा नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल.

2020 नंतरचे स्पर्धा परीक्षा जगमित्रांनो Mpsc खूप काही महत्वाचे निर्णय घेत आहे. पुढे पण घेत राहील.

आयोगाला 6 महिन्यात बऱ्यापैकी वेळ भेटला आहे 

आयोग webiste बदल करत आहे 

आता आयोग मुख्य परीक्षा online करत आहे .आयोगावर जे दिरंगाइचे आरोप होतात ते कमी होतील. मुख्य परीक्षा निकाल लवकर लागतील.

उमेदवारांच्या उत्तरपत्रिका रेल्वे स्टाफ selection सारख्या ऑनलाइन पाहता येतील.

 Survival of the fittest जो 

डार्विनच्या नियम आहे त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत चला.

प्रत्येक गोष्टीला विरोध करत बसू नका.

स्पर्धा खूप वाढतेय.


उमेदवारांनी स्वतःचा time limit ठरवून घ्या . 

बाकी पण खूप गोष्टी आहेत या जगात  करण्यासाठी. तुम्ही थांबत नव्हता म्हणून शेवटी आयोगाला attmept limit आणावे लागले 

वयाच्या तिशीनंतर पार्ट time जॉब करत तयारी करत चला.

देशातील राज्य आयोगांमध्ये आपले MPSC पारदर्शकतेसाठी देशात एक नंबर आहे हे विसरू नका.


आता सर्वांनी शासनाला लवकरात लवकर पदभरती करण्यासाठी विनंती करावी एवढीच अपेक्षा !!!!!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) दशकातील पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.पुरस्कार विजेत्यांची यादी

◆ दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 

- विराट कोहली

◆ दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी

◆ दशकातील सर्वोतम कसोटी क्रिकेटपटू 

- स्टीव्ह स्मिथ

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू 

- विराट कोहली 

◆ दशकातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू 

- राशिद खान 

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम दवेन्टी-२० महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम संलग्न क्रिकेटपटू  

- कायले कोएटझर 

◆ दशकातील सर्वोत्तम महिला संलग्न क्रिकेटपटू 

- कॅथरिन ब्राइस

◆ दशकातील सर्वोत्तम खेलभावनेचा पुरस्कार 

- महेंद्रसिंह धोनी

महासागर किती खोल आहेत?


आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग सपाट नाही. तो अनेक भूखंडांचा बनलेला आहे. या भूखंडांनाच टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हणतात. हे भूखंड स्थिर नसून ते सतत सरकत असतात. त्यामुळे जिथं असे दोन भूखंड एकमेकांना भिडतात तिथं तणावाची परिस्थिती निर्माण होते. भूखंडांच्या त्या टकरीपोटी एखादा भूखंड वर उचलला जातो. त्याचे उंच पर्वत बनतात. दुसरा एखादा भूखंड खाली ढकलला जातो. तिथं खोल विवरं निर्माण होतात. ती पाण्यानं भरली की तिथं खोल खोल महासागर बनतात.


जशी सर्वच पर्वतांची उंची सारखी नाही. एव्हरेस्टसारखं एखादं शिखर उंचच उंच असतं. सह्याद्रीसारख्या पर्वतराजींची उंची त्याच्या पावपटच असते. महासागरांच्या खोलीचीही स्थिती वेगळी नाही. काही महासागर चांगलेच खोल आहेत, तर इतर काही उथळ आहेत. एवढंच काय, पण एखाद्या महासागराची खोलीही सगळीकडे सारखीच नसते. तिच्यातही चढउतार असतात त्यामुळे महासागरांमधला सर्वात खोल प्रदेश कोणता आणि तो किती खोल आहे? असा प्रश्नच आपण विचारू शकतो.


प्रशांत महासागरातला ऑस्ट्रेलिया व पापुआ न्यूगिनीच्या उत्तरेला आणि फिलिपाईन्सच्या पूर्वेला असलेल्या मॅरियाना बेटानजीकचा मरियाना ट्रेंच या नावानं ओळखला जाणारा प्रदेश सर्वात खोल आहे. १९५१ साली इंग्लंडच्या एका सर्वेक्षण जहाजानं त्याची खोली प्रथम मोजली. त्यामुळे त्या खोल भागाला चॅलेंजर डीप' या नावानं ओळखलं जातं. त्याची खोली तब्बल ११,०३३ मीटर आहे. म्हणजेच त्या जागी जर एव्हरेस्ट या जगातल्या सर्वात उंच शिखराला आणून ठेवलं तर त्याच्या माध्यावरून बाहणाच्या पाण्याची खोलीही दीड किलोमीटरपेक्षा जास्त भरेल.


इतक्या खोलावर अर्थात संपूर्ण निर्जीव प्रदेश असेल, अशी कल्पना होती; पण १९६० मध्ये अमेरिकन नौसैनिक जाक पिकार्ड आणि डोनाल्ड वॉल्श हे 'प्रत्रिएस्त' या जहाजातून तिथं पोहोचले. त्यानंतर बँथीस्कोप नावाच्या एका उपकरणात शिरून ते त्या खोलीवर उतरले आणि त्यांनी त्या प्रदेशाचे सर्वेक्षण केलं. तिथं त्यांना अनेक पाणवनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा संचार असलेला दिसून आला. त्यांच्या या मोहिमेतही त्या प्रदेशाची खोली मोजली गेली. त्यातूनच आता ११.०३ किलोमीटर  महासागरांची सर्वात जास्त खोली आहे, हे सर्वमान्य झालं आहे.

महाराष्ट्र Police भरती साठी महत्त्वाचे प्रश्न1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )


18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने


19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया


20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...