Monday 10 January 2022

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे :-


◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ★

   ◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

       ● मि - मिझोराम
       ● त्र - त्रिपुरा
       ● म - मध्य प्रदेश
       ● झा - झारखंड
       ● रा - राजस्थान
       ● गु - गुजरात
       ● छा - छत्तीसगड
       ● प - पश्चिम बंगाल

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...