Saturday 1 February 2020

2014-15 आणि 2019-20 च्या जीडीपीच्या प्रमाणात सामाजिक सेवांवरील खर्चात 1.5 टक्के वाढ


मानव विकास निर्देशांकातील 1.34 टक्के वार्षिक वाढीसह सर्वाधिक वेगाने सुधारणा होणाऱ्या देशांत भारताचा समावेश

शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचे प्रमाण 2014-15 आणि 2019-20 च्या जीडीपीच्या प्रमाणात 4 टक्क्यांहून 4.7 टक्के

समावेशक विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये वाढ आवश्यक आहे. सरकारची सामाजिक उत्थानाप्रतीची कटीबद्धता आर्थिक सर्वेक्षण-2019-20 चे वैशिष्ट्ये आहे. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी आज संसदेसमोर आर्थिक सर्वेक्षण-2019-20 सादर केले.

सरकारांचा सामाजिक सेवांवरील खर्च

आर्थिक सर्वेक्षणानूसार, केंद्र आणि राज्य सरकारांचा सामाजिक सेवांवरील खर्च 2014-15 मध्ये 7.68 लाख कोटी रुपयांहून 2019-20 (अर्थसंकल्प अनुमान) मध्ये 15.79 लाख कोटी रुपये झाला आहे. सकल घरगुती उत्पादन (जीडीपीच्या) प्रमाणात सामाजिक सेवांवरील खर्चात 2014-15 ते 2019-20 दरम्यान दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या प्रमाणात 2.8 टक्क्यांहून 3.1 टक्के झाला आहे. तसेच आरोग्यावरील खर्चात 1.2 टक्क्यांहून 1.6 एवढी वाढ झाली आहे.

मानव विकास

भारताचे मानव विकास निर्देशांकातील स्थान सुधारले आहे. वर्ष 2017 मध्ये भारत १३० व्या  स्थानावर होता तो आता 2018 मध्ये 0.647 गुणांच्या वाढीसह 129 वर पोहचला आहे. मानव विकास निर्देशांकात भारत सर्वाधिक सुधारणा होणारा देश आहे. ब्रिक्स देशांच्या यादीत चीन (0.95), दक्षिण आफ्रिका (0.78), रशिया (0.69) आणि ब्राझील (0.59) यांच्यापेक्षा भारत वरच्या स्थानावर आहे

‘संप्रीती-9’: भारत आणि बांग्लादेश यांच्यातला संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव

3 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2020 या कालावधीत मेघालयाच्या उमरोई गावात ‘संप्रीती-9’ नावाचा भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आला आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा ‘संप्रीती’ या नावाने संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित केला जातो. यावर्षीचा कार्यक्रम हे या मालिकेतले नववे संस्करण आहे.

सरावादरम्यान कमांड पोस्ट एक्सरसाइज (CPX) आणि फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (FTX) घेण्यात येणार आहे. दोन्ही देश दहशतवादविरोधी कारवाईच्या बाबतीत त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करणार आणि योग्य पद्धतींचा सराव करणार.

युरोपियन युनियनच्या संसदेत ‘सीएए’विरोधात ठराव; भारताने घेतला तीव्र आक्षेप : 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या विरोध आंदोलनांनंतर आता हे प्रकरण युरोपियन युनियनच्या संसदेत पोहोचले आहे. सीएएच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावावर युरोपियन युनियनच्या संसदेत चर्चा आणि मतदान होणार आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला असून हा आमचा देशांतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

भारताने यासंदर्भात म्हटले की, युरोपियन युनियनच्या संसदेला असे कृत्य करायला नको होते ज्यामुळे लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. जगभरातील अधिकाधिक देशांनी हे मान्य केलं आहे की, सीएए हा पूर्णतः भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. उलट युरोपच्या संसदेत हा ठराव आणणाऱ्यांनी आणि याचे समर्थन करणाऱ्यांनी याबाबतची तथ्थ्ये जाणून घेण्यासाठी भारताशी संपर्क साधावा.

या ठरावाद्वारे भारताला आवाहन करण्यात आले आहे की, भारताने सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांसोबत रचनात्मक चर्चा करावी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांना संपुष्टात आणण्यावर विचार करावा. सीएएमुळे भारतात नागरिकत्व निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये धोकादायकरित्या बदल होईल. भारत याला अंतर्गत बाब सांगत असला तरी अनेक देश या कायद्याला मानवाधिकारांशी जोडून पाहत असून प्रश्न उपस्थित करीत आहे.

परदेशी माध्यमंही यावर सातत्याने आक्रमक भुमिका घेत आहेत. यामुळे जगात मोठे संकट निर्माण होऊ शकते आणि हे मोठे कठीण काम होऊन बसेल. युरोपियन युनियनच्या संसदेत या ठरावावर बुधवारी चर्चा होणार असून त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी यावर मतदानही घेतले जाणार आहे.

DRDO गुजरात विद्यापीठात एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार


- संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक तंत्रज्ञान केंद्र उभारणार आहे. त्यासाठी गुजरात विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे.

- विद्यापीठात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटर फॉर एक्सटेंशन अँड रिसर्च अँड इनोव्हेशन (CERI) नावाने हे केंद्र उभारण्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे.

- पुढच्या आठवड्यात DRDO विद्यापीठातल्या पायाभूत सुविधा पाहण्यास आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाशी कसे सहयोग करावे आणि विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग कसा असावा हे पाहण्यासाठी एक पथक पाठवविणार आहे.

▪️ DRDO विषयी

-संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारत सरकारची एक संस्था आहे,
- ज्याकडे लष्करी क्षेत्रात संशोधन आणि विकासाची जबाबदारी आहे. संस्थेची स्थापना वर्ष 1958 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
——————————————

महत्त्वाचे प्रश्नसंच

1. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?

 (1)मराठी साहित्य दिन
 (2)मराठी राजभाषा दिन
 (3)मराठी कविता दिन
 (4)राज्यभाषा दिन

 

2. ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी ऐकण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिनाची सुरुवात केली?

(1) जनता दरबार दिन
(2) प्रशासकिय दिन
(3) लोकशाही दिन
(4) शासन तक्रार दिन

3. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

(1)20 मे
 (2)11 मे
 (3)13 मे
 (4)18 मे

4. संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे?

1)न्यूयॉर्क
2)वॉशिंग्टन
3) जिनिव्हा
4) रोम

5. जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?

 1)न्यूयॉर्क
 2)वॉशिंग्टन
 3)जिनिव्हा
 4)रोम

 

6. सार्कचे मुख्यालय कोठे आहे?

 (1)दिल्ली
 (2)ढाक्का
 (3)इस्लामाबाद
 (4)काठमांडू

7. सार्कची स्थापना केव्हा करण्यात आली?

 (1)1982
 (2)1983
 (3)1984
 (4)1985

8. अॅमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते?

 (1) पर्यावरण संरक्षण
(2) जागतिक शांतता
(3) मानवी हक्क
(4) अर्थसाहाय्य

9. जागतिक मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

(1) 10 डिसेंबर
 (2) 5 जून
 (3) 11 जानेवारी
 (4) 1 डिसेंबर

10. संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193 वा सदस्य देश कोणता?

 (1)युगोस्लाव्हीया
 (2)कौरू
 (3)तुव्हालू
(4)दक्षिण सुदान

⏩⏩⏩उत्तरे

(1)2
(2)3
(3)2
(4)1
(5)4
(6)4
(7)4
(8)3
(9)1
(10)4

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


⚛ चीनचे चलन कोणते ?
⏩⏩युआन.

⚛ युरोप व आशिया या खंडांना कोणत्या संयुक्त शब्दाने ओळखतात ?
⏩⏩युरेशिया.

⚛ 'कांगारूची भूमी' असे कोणत्या देशाला म्हणतात ?
⏩⏩आस्ट्रेलिया.

⚛ ऊस उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?
⏩⏩उत्तरप्रदेश.

⚛ जागातील सर्वांत कमी तापमानाचे ठिकाण कोणते ?
⏩⏩वोस्टोक. ( अंटार्क्टिक )

चालू घडामोडी प्रश्नसंच

कतार देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
(A) शेख अब्दुल्ला बिन नासेर बिन खलीफा अल थानी
(B) शेख खालिद बिन खलीफा बिन अबदेलझिज अल थानी⚛✅✅
(C) मोहम्मद बिन रशिद अल मखतूम
(D) यापैकी नाही

तरनजित सिंग संधू ह्यांची ______ या देशातले पुढचे भारतीय राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
(A) रशिया
(B) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅✅
(C) जर्मनी
(D) मलेशिया

कोणाला ‘हरित रत्न पुरस्कार 2019’ देण्यात आला आहे?
(A) ए. आर. पाठक
(B) एन. कुमार✅✅
(C) पी. व्ही. पटेल
(D) यापैकी नाही

कोणत्या व्यक्तीची भारतीय बँकांचा संघ (IBA) याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली?
(A) रजनीश कुमार
(B) व्ही. जी. कन्नन
(C) सुनिल मेहता✅✅✅
(D) दीनबंधू महापात्रा

कोणत्या शहरात पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग ह्यांच्या हस्ते ‘भुवन पंचायत V3’ ह्या डिजिटल व्यासपीठाचे उद्घाटन केले?
(A) महाराष्ट्र
(B) भुवनेश्वर
(C) रायपूर
(D) बेंगळुरू✅✅

कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्य विधानपरिषद रद्द करण्याच्या प्रक्रियेसंदर्भातला ठराव संमत केला?
(A) तामिळनाडू
(B) पंजाब
(C) आंध्रप्रदेश✅✅
(D) उत्तरप्रदेश

कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलीस स्टेशन’ सुरू केले?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) ओडिशा✅✅✅

कोणत्या शहरात ‘भारत-ब्राझील व्यवसाय मंच’ याची बैठक आयोजित केली गेली?
(A) नवी दिल्ली✅⚛✅
(B) मुंबई
(C) गुरुग्राम
(D) बेंगळुरू

कोणत्या देशाने युरोपीय संघामधून बाहेर पडण्याच्या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी 50 पेन्स मूल्य असलेले नवीन नाणे प्रसिद्ध केले?
(A) जर्मनी
(B) स्वीडन
(C) लक्झेमबर्ग
(D) ब्रिटन✅✅✅

कोणत्या शब्दाची निवड ‘ऑक्सफोर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर 2019’ म्हणून झाली?
(A) नारी शक्ती
(B) टॉक्सिक
(C) संविधान✅✅
(D) क्लायमेट एमर्जन्सी

कोणत्या शहरात ‘बीटींग द रिट्रीट’ सोहळा आयोजित केला जातो?
(A) चेन्नई
(B) लखनऊ
(C) मुंबई
(D) नवी दिल्ली✅✅✅

⚛⚛
कोणत्या दिवशी ‘वंश नाश करण्यामध्ये बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?
(A) 26 जानेवारी
(B) 25 जानेवारी
(C) 27 जानेवारी✅✅
(D) 29 जानेवारी

⚛⚛
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ____________ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा✅✅✅
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

⚛⚛
टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद✅✅✅

⚛⚛
कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅✅
(D) चंदीगड

⚛⚛
कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर✅✅✅
(C) गोरखपूर
(D) कानपूर

⚛⚛कतार देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
(A) शेख अब्दुल्ला बिन नासेर बिन खलीफा अल थानी
(B) शेख खालिद बिन खलीफा बिन अबदेलझिज अल थानी✅✅
(C) मोहम्मद बिन रशिद अल मखतूम
(D) यापैकी नाही

⚛⚛
तरनजित सिंग संधू ह्यांची ______ या देशातले पुढचे भारतीय राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
(A) रशिया
(B) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅
(C) जर्मनी
(D) मलेशिया

⚛⚛
कोणाला ‘हरित रत्न पुरस्कार 2019’ देण्यात आला आहे?
(A) ए. आर. पाठक
(B) एन. कुमार✅✅
(C) पी. व्ही. पटेल
(D) यापैकी नाही

कोणत्या व्यक्तीची भारतीय बँकांचा संघ (IBA) याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली?
(A) रजनीश कुमार
(B) व्ही. जी. कन्नन
(C) सुनिल मेहता✅✅
(D) दीनबंधू महापात्रा

कोणत्या शहरात पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग ह्यांच्या हस्ते ‘भुवन पंचायत V3’ ह्या डिजिटल व्यासपीठाचे उद्घाटन केले?
(A) महाराष्ट्र
(B) भुवनेश्वर
(C) रायपूर
(D) बेंगळुरू✅✅

30 डिसेंबरला भारतीय रेल्वेनी ________वर प्रवाश्यांसाठी अनुकूल अश्या नवीन माहिती प्रणालीचे उद्घाटन केले.
(A) चेन्नई जंक्शन
(B) गुडूर जंक्शन
(C) अनकापल्ले जंक्शन✅✅
(D) मनोरमा जंक्शन

आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ _____ या नावाने ओळखले जाते.
(A) MJEX
(B) टायगर
(C) ऑक्टोपस✅✅
(D) CT-TTX

पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
(A) जावेद इकबाल
(B) मिआन साकीब निसार
(C) आसिफ सईद खान खोसा
(D) गुलजार अहमद✅✅

QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी _____ या संस्थेनी घेतली.
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)✅✅
(B) भारतीय भुदल
(C) भारतीय नौदल
(D) भारतीय हवाई दल

आसामच्या मंत्रिमंडळाने अशी घोषणा केली आहे की ‘आसामी’ भाषेला राज्य भाषा बनवतील. त्याच्या संदर्भात भारतीय राज्य घटनेतल्या कोणत्या कलमात सुधारणा केली जाणार?
(A) कलम 345✅✅
(B) कलम 354
(C) कलम 348
(D) कलम 352

कोणती संस्था ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) भारत निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2019–20’ याच्या द्वितीय आवृत्तीचे अनावरण करणार आहे?
(A) NITI आयोग✅✅
(B) राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC)
(C) डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC)
(D) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
(A) वर्ष 2005
(B) वर्ष 2001
(C) वर्ष 2011✅✅
(D) वर्ष 2012

दरवर्षी ___ या दिवशी भारतात ‘सुशासन दिन’ साजरा केला जातो.
(A) 26 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर✅✅
(C) 15 डिसेंबर
(D) 24 डिसेंबर

दरवर्षी ____ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.
(A) 15 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर
(C) 24 डिसेंबर✅✅
(D) 23 डिसेंबर

2020 या साली ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ या कार्यक्रमाच्या कितव्या आवृत्तीचे जानेवारी महिन्यात उद्घाटन झाले?
(A) 15 वा
(B) 16 वा✅✅✅
(C) 27 वा
(D) 6 वा

कोणत्या देशाने सर्वोच्च उंचीवर फॅशन शो कार्यक्रम आयोजित करून नवा विश्वविक्रम केला?
(A) भुटान
(B) चीन
(C) नेपाळ✅✅
(D) भारत

कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
(A) आंध्रप्रदेश
(B) तेलंगणा⚛⚛✅✅
(C) तामिळनाडू
(D) ओडिशा

कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
(A) फरीदाबाद⚛✅✅
(B) जयपूर
(C) अजमेर
(D) गुरुग्राम

‘संप्रीती’ हा भारत आणि _________ यांच्यादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे.
(A) श्रीलंका
(B) बांग्लादेश✅💐✅
(C) चीन
(D) जापान

कोणता खेळाडू ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू ठरला?
(A) पी. आर. श्रीजेश
(B) कृष्ण बहादुर पाठक
(C) सूरज लता देवी
(D) राणी रामपाल✅💐⏩✅

__________ यांनी कर्नाटकच्या मंगळुरू येथे दलात एक ‘सी-448’ हाय-स्पीड इंटरसेप्टर नौका दाखल केली आहे.
(A) भारतीय नौदल
(B) भारतीय तटरक्षक दल✅💐✅
(C) भारतीय सशस्त्र सेना
(D) यापैकी नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) जानेवारी 2020 या महिन्यात KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्या बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?⚛
(A) भारतीय स्टेट बँक
(B) ICICI बँक
(C) HDFC बँक✅✅
(D) इंडियन बँक

भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) RBIचे कार्यकारी संचालक ______ यांची पतधोरण समितीचे (MPC) सदस्य म्हणून नियुक्ती केली.
(A) जनक राज⚛✅💐
(B) एम. डी. पात्रा
(C) बी. पी. कानुनगो
(D) एम. के. जैन

मेडागास्करमध्ये आपत्ती निवारणात मदतीचा हात देण्यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन ________' राबवत आहे.
(A) निस्तार
(B) व्हॅनिला✅✅
(C) सुनयना
(D) मदद

कोणत्या शब्दाची निवड ‘ऑक्सफोर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर 2019’ म्हणून झाली?
(A) नारी शक्ती
(B) टॉक्सिक
(C) संविधान✅✅
(D) क्लायमेट एमर्जन्सी

कोणत्या शहरात ‘बीटींग द रिट्रीट’ सोहळा आयोजित केला जातो?
(A) चेन्नई
(B) लखनऊ
(C) मुंबई
(D) नवी दिल्ली✅✅💐

कोणत्या दिवशी ‘वंश नाश करण्यामध्ये बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?
(A) 26 जानेवारी
(B) 25 जानेवारी
(C) 27 जानेवारी✅✅
(D) 29 जानेवारी

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ________ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा✅⚛✅
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद✅💐

कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली⚛✅✅
(D) चंदीगड

कोणता देश शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश ठरला?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) चीन✅✅
(D)  अमेरिका====पहिल्या क्रमांकावर

कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर💐✅✅
(C) गोरखपूर
(D) कानपूर

चालु घडामोडी प्रश्नमंजुषा

1)हेलिकॉप्टरच्या अपघातात कोबे ब्रायंट ह्यांचे निधन झाले. ते ___ या खेळाशी संबंधित होते.
(A) क्रिकेट
(B) टेनिस
(C) बास्केटबॉल.   √
(D) कुस्ती

2)कोणत्या राज्याने ‘सुभाषचंद्र बोस आपदा प्रबोधन पुरस्कार 2020’ जिंकला?
(A) उत्तराखंड. √
(B) उत्तरप्रदेश
(C) ओडिशा
(D) हिमाचल प्रदेश

3)कोणत्या व्यक्तीची केरळ मिडिया अॅकॅडमीतर्फे दिल्या जाणार्‍या उत्कृष्ट माध्यम व्यक्तीच्या पुरस्कारासाठी निवड केली गेली?
(A) रवीश कुमार
(B) एन. राम.   √
(C) राजदीप सरदेसाई
(D) यापैकी नाही

4)2018-19 या वर्षी सर्वाधिक भाजीपाला उत्पादनात कोणते राज्य अव्वल ठरले आहे?
(A) पश्चिम बंगाल.  √
(B) उत्तरप्रदेश
(C) मध्यप्रदेश
(D) बिहार

5)कोणत्या शहरात तिसरी वैश्विक बटाटा परिषद आयोजित करण्यात आली?
(A) पुणे
(B) बेंगळुरू
(C) गांधीनगर.   √
(D) लखनऊ

6)कोणत्या राज्यात ‘नमामी गंगे’ अभियानाच्या अंतर्गत पाच दिवसांची ‘गंगा यात्रा’ सुरू झाली?
(A) उत्तराखंड
(B) उत्तरप्रदेश.  √
(C) बिहार
(D) पश्चिम बंगाल

7)62 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सादर केलेल्या पुरस्कारांच्या जोडी जुळवा:

(i) सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम (a) ‘बॅड गाय’ (बिली इलिश)

(ii) रेकॉर्ड ऑफ द इयर (b) ‘व्हेन वी ऑल फॉल अस्लीप व्हेअर डू वी गो’

(iii) सर्वोत्कृष्ट नवा कलाकार (c) इगोर (टायलर, द क्रिएटर)

(iv) अल्बम ऑफ द इयर (d) बिली इलिश

(A) i-a , ii-c ,iii-b , iv-d
(B) i-a , ii-c ,iii-d , iv-b
(C) i-c , ii-a ,iii-b , iv-d
(D) i-c , ii-a ,iii-d , iv-b.   √

8)OPPO या कंपनीने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भागीदारीने संशोधन करण्यासाठी कोणत्या IIT संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
(A) IIT दिल्ली
(B) IIT हैदराबाद.  √
(C) IIT रुडकी
(D) IIT मद्रास

9)पंतप्रधान मार्जन सारेक ह्यांनी पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत?
(A) स्लोव्हेनिया.  √
(B) क्रोएशिया
(C) सर्बिया
(D) एस्टोनिया

10)खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे:

(i) एम.सी. मेरी कोमला पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे आणि ती मणीपूरची आहे.

(ii) पी. व्ही. सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे आणि ती तेलंगणाची आहे.

(iii) गुरु शशधर आचार्य ह्यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आणि ते एक कलाकार आहेत.

(iv) एकता कपूर ह्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

(A) (i), (ii) आणि (iii)
(B) (i), (iii) आणि (iv)
(C) (i), (ii) आणि  (iv).   √
(D) (ii), (iii) आणि (iv)

11) सध्या भारतामध्ये एकूण किती केंद्रशाशित प्रदेश आहेत?

(A) 6
(B) 7
(C) 8.  √
(D) 9
(जम्मू काश्मीर आणि लडाख यां चे विभाजन करून जरी 9 केंद्रशासित प्रदेश झाले होते तरी दमण दीव आणि दादरा नगर हवेली या विलानीकरणा मुळे पुन्हा ती संख्या 8 झाली आहे.)

औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)

·        औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? - मराठवाडा.

·        मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? - औरंगाबाद.

·        लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - उस्मानाबाद.

·        जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - औरंगाबाद.

·        महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? - मराठवाडा.

·        गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद-जळगाव.

·        औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? - अजिंठा.

·        जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? - नांदेड.

·        गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? - पैठण-औरंगाबाद.

·        जायकवाडी जलाशयाचे नाव काय? - नाथसागर.

·        जायकवाडी योजना स्टेज-1 कोणत्या जिल्हयासाठी आहे? - औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड.

·        महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने हाती घेण्यात आला? - कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे.

·        बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? - राहुरी व औरंगाबाद.

·        महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? - मराठवाडा.

·        महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून इतर ठिकाणी लोक स्थलांतर होण्याचे कारण काय? - कोरडा दुष्काळ.

·        जायकवाडी जलविद्युत केंद्र कोठे आहे? - पैठण, औरंगाबाद.

·        गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे? - जपान.

·        हिमरुशाली साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? - औरंगाबाद.

·        गुजराती फेटे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? - पैठण.

·        महाराष्ट्रातील औद्योगिकदुष्ट्या अविकसित भाग कोणता? - मराठवाडा.

·        शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? - नांदेड.

·        दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? - पैठण.

·        पैठण हे कोणत्या संताची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते व तेथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? - संत एकनाथ.

·        औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - हिंगोली.

·        घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? - नांदेड.

·        परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणता जिल्ह्यात आहे? - बीड.

·        खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - लातूर.

·        अंबेजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड.

·        तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद.

·        पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या आहे? - औरंगाबाद.

·        धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद.

·        वेरूळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? - औरंगाबाद.

·        वेरूळ अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे? - शिल्पकला.

·        महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.

·        मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? - 1972.

·        वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे? - औरंगाबाद.

·        श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे? - तुळजापूर (उस्मानाबाद).

·        महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे? - नांदेड.

·        कवि मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? - अंबेजोगाई.

·        मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? - अक्षी.

·        दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे? - उस्मानाबाद.

·        महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.

·        भारुडे लोकप्रिय करणारे संत कोण? - एकनाथ.

·        शिखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संताचे वाण्ड्मय समाविष्ठ आहे? - नामदेव.

·        प्रवारा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - गोदावरी.

·        बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड.

·        मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते आहे? - औरंगाबाद.

·        देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे? - अजंठा रांगा.

·        गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती? - हरिषचंद्र-बालाघाट.

बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे? - गोदावरी.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...