Saturday 1 February 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित.

🎆 चीनमध्ये थैमान घालणा-या आणि चीनमधून जगभरात पसरण्याचा धोका असणा-या कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. 

🎆 चीनवर अविश्वास व्यक्त् करण्याचा मानस नसून परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसे सक्षम नसलेल्या इतर देशांना मदत करण्याचा हेतू यामागे आहे,असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रस् अधनोम यांनी सांगितलं. 

🎆 या विषाणूचा उद्रेक टाळण्यासाठी जलद उपाययोजना केल्याबद्दल त्यांनी चीन सरकारचं कौतुक केलं.

🎆 ट्रेड्रस यांनी या आठवडयात चीनमध्ये प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि सामूहिक प्रयत्नांमधूनच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखू शकतो, असंही ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...