Saturday 1 February 2020

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


⚛⚛कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते 'GATI' संकेतस्थळाचे उद्घाटन झाले?
(1)नितीन गडकरी✅✅
(2)अर्जुन मुंडा
(3)पीयूष गोयल
(4)निर्मला सीतारमण
⏩⏩केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि MSME मंत्री नितीन गडकरी ह्यांनी 'GATI' संकेतस्थळ कार्यरत केले आहे. हे डिजिटल व्यासपीठ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी तयार केले आहे. या व्यासपीठावरून कंत्राटदार प्रकल्पाच्या संबंधित कोणतीही समस्या उपस्थित करू शकतात.

⚛⚛2020 या वर्षासाठी कोणत्या देशाने ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?
(1)भारत
(2)गुयाना✅✅
(3)ट्युनिशिया
(4)अफगाणिस्तान
⏩⏩दक्षिण अमेरिकेच्या गुयाना देशाने हा 2020 या वर्षासाठी ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. गुयानाने पॅलेस्टाईनकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. ‘ग्रुप ऑफ 77’ (G77) याची स्थापना 15 जून 1964 रोजी जिनेव्हामध्ये झाली. ही संयुक्त राष्ट्रसंघातल्यास विकसनशील देशांची सर्वात मोठी आंतरसरकारी संघटना आहे. त्याचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे.

⚛⚛कोणती व्यक्ती 2020 या वर्षासाठी ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याचे अध्यक्ष आहेत?
(1)सुनील अरोरा✅✅
(2)के. एम. नुरुल हुडा
(3)सुशील चंद्र
(4)यापैकी नाही
⏩⏩⏩24 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीत स्ट्रेन्दनींग इंस्टिट्यूशनल कपॅसिटी’ या विषयाखाली ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याच्या दहाव्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. भारतीय निवडणूक आयोग (ECI) याकडे 2020 या वर्षासाठी FEMBoSA याचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. सुनील अरोरा हे भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) अध्यक्ष आहेत. 1 मे 2012 रोजी दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच (फोरम ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज ऑफ साउथ एशिया -FEMBoSA) याची स्थापना झाली.

⚛⚛कोणत्या ठिकाणी सेवेसाठी प्राण्यांना समर्पित केलेले देशातले पहिले युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे?
(1)जम्मू
(2)लखनऊ
(3)पटना
(4)मेरठ✅✅✅
⏩⏩उत्तरप्रदेशाच्या मेरठ या शहरात प्राण्यांसाठी युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे. युद्धात मदत करणार्‍या कुत्रे, घोडे आणि खेचर अश्या प्राण्यांना हे स्मारक समर्पित आहे.

(1)हेलिकॉप्टरच्या अपघातात कोबे ब्रायंट ह्यांचे निधन झाले. ते ___ या खेळाशी संबंधित होते ?
(1)क्रिकेट
(2)टेनिस
(3)कुस्ती
(4)बास्केटबॉल✅✅
⏩हेलिकॉप्टरच्या अपघातात बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट ह्यांचे निधन झाले. ते अमेरिकेच्या पेन्सिल्वेनियाचे रहिवासी होते.

(2) कोणत्या राज्यात ‘इनोव्हेशन फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाला सुरूवात झाली?
(1)मध्यप्रदेश
(2)गुजरात
(3(मेघालय
(4)अरुणाचल प्रदेश✅✅✅
⏩⏩26 जानेवारी 2020 रोजी अरुणाचल प्रदेशाच्या इटानगर या शहरातल्या विज्ञान केंद्रात ‘इनोव्हेशन फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाला सुरूवात झाली. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या सहकार्याने कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी या संस्थेच्यावतीने दोन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.

(3) कोणत्या व्यक्तीला ‘इंटरएक्टिव फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी’ (IFIE) यांच्यावतीने 2019 सालासाठी "चॅम्पियन्स ऑफ चेंज" पुरस्कार देण्यात आला?
(1)बीरेंदर सिंग योगी✅✅✅
(2)एम. वेंकय्या नायडू
(3)शिल्पा शेट्टी
(4)हेमंत सोरेन
⏩⏩आयुर्वेद आरोग्य सेवा क्षेत्रातल्या अनुकरणीय योगदानाबद्दल चंदीगडचे प्रख्यात लैंगिक तज्ज्ञ डॉ. बीरेंदर सिंग योगी ह्यांना ‘इंटरएक्टिव फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी’ (IFIE) यांच्यावतीने 2019 सालासाठी "चॅम्पियन्स ऑफ चेंज" पुरस्कार देण्यात आला आहे.
 

(4)कोणत्या राज्य सरकारने 'शिवभोजन' योजना लागू केली?
(1)तामिळनाडू
(2)महाराष्ट्र✅✅
(3)ओडिशा
(4)आंध्रप्रदेश
⏩⏩महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात 'शिवभोजन' योजना लागू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत केवळ दहा रुपयांमध्ये ‘शिवथाळी’ म्हणून जेवण दिले जाणार आहे.

(5) कोणता देश नागरिकांना ई-पारपत्र (पासपोर्ट) सुविधा प्रदान करणारा दक्षिण-आशिया प्रदेशातला पहिला देश ठरला?
(1)बांग्लादेश✅✅
(2)श्रीलंका
(3)भारत
(4)अफगाणिस्तान
⏩⏩बांग्लादेश देश नागरिकांना ई-पारपत्र (पासपोर्ट) सुविधा प्रदान करणारा दक्षिण-आशिया प्रदेशातला पहिला देश ठरला आहे. ही सुविधा देणारा बांग्लादेश जगातला 11 वा देश आहे.
 

(6) भारत सरकारने कोरोना विषाणूसाठी _____ शहरांमध्ये सर्वकाळासाठी मदत क्रमांक कार्यरत केलेला आहे ?
(1) 9
(2) 6
(3) 12
(4) 7✅✅✅
⏩⏩भारत सरकारने कोरोना विषाणूसाठी 7 शहरांमध्ये सर्वकाळासाठी मदत क्रमांक कार्यरत केले आहे. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोची या शहरांमधल्या विमानतळावर तज्ञ लोकांच्या चमू सेवेत आहेत.

(7) भारतीय रिझर्व्ह बँकेनी सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड यामध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी अल्प मुदतीच्या गुंतवणूकीची नवी मर्यादा 20 टक्क्यांवरून _______ एवढी केली आहे ?
(1)25 टक्के
(2)35 टक्के
(3)30 टक्के✅✅✅
(4)40 टक्के
⏩⏩सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड (ट्रेझरी बिले आणि कॉर्पोरेट रोख्यांसह केंद्र आणि राज्य सरकारची ऋणपत्रे) यामध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी अल्प मुदतीच्या गुंतवणूकीची नवी मर्यादा भारतीय रिझर्व्ह बँकेनी ठरविलेली आहे. ही मर्यादा 20 टक्क्यांवरून 30 टक्के एवढी करण्यात आली आहे.

(8) कोणत्या राज्यात भारतातल्या पहिल्या ‘सुपर फॅब लॅब’चे उद्घाटन झाले?

(1)तेलंगणा
(2)तामिळनाडू
(3)केरळ✅⏩✅✅
(4)आंध्रप्रदेश
⏩⏩कोची या शहरात केरल स्टार्टअप मिशन येथील इंटेग्रटेड स्टार्टअप कॉम्प्लेक्स येथे इलेक्ट्रॉनिक्स चीप बनविणारी देशातली पहिली ‘सुपर फॅब लॅब’ उभारण्यात आली आहे. ही अमेरिकेच्या बाहेर असणारी एकमेव अशी सुविधा आहे. ही प्रयोगशाळा अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात आली आहे.

(9) कोणत्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केन कांग ह्यांची नेमणूक करण्यात आली?
(1)सॅमसंग✅⏩✅✅
(2)ह्युंदाई
(3)किया मोटर्स
(4)LG
⏩⏩दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केन कांग ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 

(10) कोणत्या शहरात “भारत पर्व 2020” हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे?

(1)पुणे
(2)मुंबई
(3)नवी दिल्ली✅✅✅
(4)कोची
⏩⏩26 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीत लाल किल्ला येथे “भारत पर्व 2020” या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा कार्यक्रम 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे. हा कार्यक्रम 'एक भारत श्रेष्ठ भारत' आणि 'महात्मा गांधींची 150 वी जयंती’ या संकल्पनेखाली आयोजित केला आहे.

(11) "टर्ब्युलंस अँड ट्रायम्फ - द मोदी इयर्स" हे पुस्तक ________ ह्यांनी लिहिले आहे.

⏩⏩⏩राहुल अग्रवाल
⏩⏩⚛राहुल अग्रवाल आणि भारती एस. प्रधान हे "टर्ब्युलंस अँड ट्रायम्फ - द मोदी इयर्स" या पुस्तकाचे सह-लेखक आहेत

(12)सहाव्या ‘कतार आंतरराष्ट्रीय चषक’ येथे भारोत्तोलन स्पर्धेत कोणत्या खेळाडूने महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले?
⏩⏩मीराबाई चानू

⚛⚛ किरण मजुमदार-शॉ ह्यांना भारताशी देशाचे संबंध वृद्धींगत करण्यात योगदान दिल्याबद्दल कोणत्या देशाने सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला?
(A) न्युझीलँड
(B) कॅनडा
(C) ऑस्ट्रिया
(D) ऑस्ट्रेलिया✅✅✅

⚛⚛ 2025 सालापर्यंत कोणता देश भारताला हवाई संरक्षनार्थ ‘एस-400’ क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविणार?
(A) अमेरिका
(B) इस्त्राएल
(C) रशिया✅✅
(D) फ्रान्स

⚛⚛ ‘जनगणना 2021’ विषयक परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
(A) दिसपूर
(B) नवी दिल्ली⏩✅✅✅
(C) अहमदाबाद
(D) लखनऊ

⚛⚛29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?
(A) के. शिव रेड्डी
(B) ममता कालिया
(C) वासदेव मोही⏩✅✅✅✅
(D) यापैकी नाही

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...