Saturday 4 March 2023

AP मध्ये US$ 3.9 अब्ज गुंतवणुकीसह सरकारने 2,880 - MW Dibang MPP ला मंजूरी दिली


💸💵अरुणाचल प्रदेश (AP) मधील 2,880 मेगावॅट (MW) दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प (MPP), आतापर्यंतचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, वीज मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने ₹31,876.39 कोटी (US$3.9 अब्ज) च्या गुंतवणुकीसह कार्यान्वित केला आहे. कडून मान्यता मिळाली.


🔮🧿चीनच्या सीमेला लागून असलेला हा प्रकल्प नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) लिमिटेड विकसित करेल.


⏳⌛️प्रकल्पाच्या बांधकामाचा अंदाजे कालावधी 9 वर्षांचा होता.


💸🪙आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने प्रकल्पाच्या "गुंतवणूकपूर्व क्रियाकलापांसाठी" 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.


❎💠प्रकल्पातून दरवर्षी 11,223 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्माण होईल.


♣️🟦हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील दिबांग नदीवर आहे.


🔴🔘दिबांग नदीच्या खालच्या भागाचा विकास करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.


🚓🔵👁‍🗨या भागाचा मोठा भाग पुरापासून वाचवावा लागला.

उत्तराखंड भारतातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक स्थापन करणार आहे🌹❣️उत्तराखंड सरकार भारतातील पहिली सरकारी मातेची दूध बँक स्थापन करणार आहे, ही एक सुविधा आहे जी नवजात बालकांना आईच्या दुधातील पोषक तत्वे पुरवली जाईल याची खात्री करू शकते.


🌕🌺ही घोषणा उत्तराखंडचे आरोग्य मंत्री डॉ. धनसिंह रावत यांनी अमर उजालाच्या गढवालच्या उदयोन्मुख नेत्यांच्या कार्यक्रमादरम्यान केली.


🤱मदर मिल्क बँक:👉


💮🌀प्रसूतीनंतर ज्यांची आई मरण पावली अशा नवजात बालकांना या मिल्क बँकेद्वारे दूध उपलब्ध करून दिले जाईल.


🏮👍👨‍⚕उत्तराखंडचे आरोग्य मंत्री डॉ धनसिंग रावत यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत स्तनदा महिला या बँकेत दूध दान करू शकतील.

फील्ड मेडल 2022


◆ युक्रेनियन गणितज्ञ मेरीना वायझोव्स्का (Maryna Viazovska) यांना 5 जुलै 2022 रोजी प्रतिष्ठित फील्ड मेडल जाहीर झाला. 


◆ इराणी मरियम मिर्झाखानी (2014) नंतर फील्ड पदकप्राप्त वायाझोव्स्का या केवळ दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. 


➤ गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखला जाणारा हा सन्मान यावर्षी 4 जणांना जाहीर झाला.


◆ इतर विजेत्यांमध्ये जिनेव्हा विदयापीठाचे फ्रेंच गणितज्ञ ह्यूगो डुमिनिल कॉपिन, प्रिन्स्टन विद्यापीठाचे कोरियन अमेरिकन गणितज्ञ जून हुह आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ब्रिटिश गणितज्ञ जेम्स मेनार्ड यांचा समावेश आहे.


◆ विजेत्यांची घोषणा सामान्यतः गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये केली जाते, जी या वर्षी रशियामध्ये होणार होती परंतु त्याऐवजी ते हेलसिंकी येथे हलवण्यात आली.

30 एप्रिल Combine पूर्व साठी काही महत्वपूर्ण गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे...


_अभ्यासात सातत्य ठेवा .


_स्वतःच्या Note's असतील तर त्या व्यवस्थित Read करा.


_आयोगाचे मागील 2017 पासून ते 2022 पर्यंतचे पूर्व चे सर्व पेपर व्यवस्थित चाळा.(अतिशय महत्त्वपूर्ण 2020 ,2021 आणि 2022 चे Prelims चे पेपर व्यवस्थित चाळा)


_ 30 एप्रिल.. पेपर मध्ये चूका टाळण्यासाठी  'टेस्ट सिरीज' चा जास्तीत जास्त सराव करा.(वेळेचे महत्व तुम्हाला टेस्ट पेपर सोडवल्याशिवाय समजणार नाही)


_स्वतः प्रत्येक प्रश्नाचे Analysis करा. 


_ जास्तीत जास्त Revision करा.


_30 एप्रिल ला होणारा Combine चा पेपर आहे त्याच्यामुळे तुमचा अभ्यास एकदम जबरदस्त पाहिजे.. कारण इथे वेळेची मर्यादा असते...


_प्रश्न दिसत्या क्षणीच उत्तर मिळाले पाहिजे.. त्याच्यामुळे तुफान अभ्यास करा

समान नागरी संहिता म्हणजे काय?
UCC ची संकल्पना आहे की संपूर्ण देशासाठी एक कायदा असावा, की जो सर्व धार्मिक समुदायांना त्यांच्या वैयक्तिक बाबींना जसे की विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक इत्यादींना समान पद्धतीने सामावून घेईल.


राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये असे नमूद केले आहे की राज्य भारताच्या संपूर्ण प्रदेशातील नागरिकांसाठी UCC सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल.


कलम ४४ हे राज्य धोरणाच्या (DPSP) मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक आहे .


कलम 44 मागचा उद्देश संविधानाच्या प्रास्ताविकेत नमूद केल्याप्रमाणे "धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक" च्या उद्देशाला बळकट करणे हा आहे .

पंचायतराज संबंधित घटनादुरुत्या

७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )

           ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.


            ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.


– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.

– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे  १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.

– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.

– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.

– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.

– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.

– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.

– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.

– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.

– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.

– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.


 ७३ व्या घटनादुरुस्तीचे वैशिष्ट्य / परिणाम / भूमिका :


१) पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A ते O )

2) राज्यघटनेला अकरावे परिशिष्ट जोडण्यात आले. ( त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश आहे. )

३) जिल्हा ग्रामसभा व पंचायत व्याख्या कलम ( २४३ )

४) ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A )

५) त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची तरतूद कलम २४३ ( B )

६) पंचायत राज संस्थांची रचना निश्चित कलम २४३ ( C )

७) पंचायत राजमध्ये राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( D )

अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा

ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा

क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST )

यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.


८) पंचायतीत राज संस्थांचा कार्यकाल निश्चित कलम २४३ (E)

९) पंचायत राज सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( F )

१०) पंचायतराजसंस्था सत्ता अधिकार व जवाबदाऱ्या २४३ ( G )

११) पंचायत राज संस्थासंबधी वित्तीय तरतुदी कलम २४३ ( H )

१२) राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( I )

१३) पंचायत राज संस्थांचे हिशोब व ऑडिट कलम २४३ ( J )

१४) पंच्यात्तराजच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कलम २४३ ( K )

१५) केंद्रशासित प्रदेशाबाबत तरतुदी कलम २४३ ( L )

१६) काही प्रदेशाला ७३ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( M )

१७) सध्या अस्तित्वात असलेल्या पंचायती चालू ठेवणे कलम २४३ ( N )

१८) पंचायत संस्थांचा निवडणूक प्रक्रियेत न्यायालयाचा हस्तक्षेप नाही कलम २४३ ( O )राज्यघटना प्रश्नसंच

 1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०✅

ड) कलम ३६२

====================


२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता✅

ड) वरीलसर्व

===================


३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने✅

ड) सहा महिने

====================


४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली✅

ड) महाराष्ट्र

====================


५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय✅

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

====================


६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६✅

ड) यापैकी नाही

=================


७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग✅

ड) व्ही. के. सिंग

====================


८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०✅

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

====================


९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२✅

क) कलम २६३

ड) कलम २६४

====================


१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४✅

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

विविध समित्याविषयी थोडक्यात माहिती

1) रंजन गोगोई समिती 

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणासाठी नेमलेली समिती.


2) परमराजसिंग उमरानंगल समिती 

भारतीय हॉकी कर्णधार सरदारसिंगवर ब्रिटिश युवतीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.


3) एच.एस. बेदी समिती 

शिखावरील सोशल मीडिया व सार्वजनिकरित्या केले जाणारे विनोदी किस्से बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.


4) गोपाळ सुब्रमण्यम समिती 

दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.


5) दीपक मोहांती समिती 

वित्तीय समायोजनाचे धोरण या नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली समिती.


6) श्याम बेनेगल समिती 

सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती.


7) अरविंद पनगारिया समिती 

जपान बरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समस्या सोडविण्यासाठी


8) एम. वेंकच्या नायडू समिती 

जाट समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती


9) बी.के. प्रसाद समिती 

इशरत जहां प्रकरणातील गहाळ फायलींचा शोध घेण्यासाठी नेमलेली समिती.


10) डॉ. हर्षदीप कांबळे समिती 

ऑनलाइन औषध खरेदी गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.


11) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समिती 

राज्यातील डान्सबार बंदीसाठी नवा कायदा करण्यासाठी नेमलेली


12) प्रो. राकेश भटनागर समिती 

जेएनयू विद्यापीठ (दिल्ली) मधील चिथावणीजनक दिलेल्या घोषाणांच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती


13) विलास बर्डेकर समिती 

राज्याच्या शाश्वत विकासाबरोबरच जैववैविध्याचे सर्वेक्षण करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कृती आराखडा करण्याच्या सुचना सुचविण्यासाठी नेमलेली समिती.


14) भगवान सहाय्य समिती 

राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषधी खरेदी घोटाळा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती.

तुम्हाला हे पाठ आहे का :- मराठी व्याकरण - भाषेतील रसरसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

महाराष्‍ट्राचा-खनिज संपत्ती

👉 महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात खोरे व कोकणात खनिजे सापडतात.


👉 दशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा – ३.३%, महाराष्ट्रात ३८,००० चौ.कि.मी. (१३.३७%) क्षेत्रात खनिजे सापडतात.


👉 महाराष्ट्रात देशाच्या ५०% बॉक्साईट साठे, व २१% उत्पादन होते. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा इ. ठिकाणी बॉक्साईटच्या खाणी आहेत.


👉 दशातील मँगनिज (मंगल) च्या साठ्यांपैकी ४०% साठे महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात तुसर, बुझुरग व चिखलगाव (भंडारा), सावनेर व रामटेक (नागपूर), सावंतवाडी, व वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. 


👉 महाराष्ट्रात देउळगाव (गडचिरोली), चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी व रेडी (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. रेडी या बंदरातून लोह खनिज निर्यात केले जाते.


👉 दशाच्या ४% कोळसा महाराष्ट्रात सापडतो. हे साठे वर्धा वैनगंगेच्या खो-यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळशाचे साठे – बल्लारपूर (चंद्रपूर) येथे आहेत. 


👉 तसेच कामठी व उम्रेड (नागपूर), वणी (यवंतमाळ), गडचिरोली जिल्ह्यातही कोळसा सापडतो.


👉 कायनाईटचे १५% साठे महाराष्ट्रात आह्ते. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात देहगाव, पिंपळगांव, मोगरा, मीरगा इ. तसेच गार्काभोंगा तालुक्यात कयनाईट व सिलिमिनाईटचे साठे आहेत.

कायनाईटचे उपयोग हि-यांना पैलू पाडणे, काच, रसायन उद्योगात होते.

भारताच्या ९% चुनखडीचे साठे व २% उत्पादन महाराष्ट्रात होते. 


👉 यवतमाळ जिल्ह्यात मांजरी, वांजरी, शिंदोला, मुकवटन येथे चुनखडीचे सर्वाधिक साठे आहेत. तसेच चंद्रपुर, अहमदनगर व गड्चोरोली येथेही साठे सापडतात.


👉 महाराष्ट्रातील मँगनिज शुध्दीकरण प्रकल्प – तुसर (भंडारा) व कन्हान (नागपूर) येथे आहेत.

हिरव्या अभ्रकात सिलियम भंडारा जिल्ह्यात सापडते.


👉 दशातील क्रोमाईटच्या साठ्यांपैकी १०% साठा महाराष्ट्रात असुन प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यात साठे आहेत. टाका (नागपूर), मौली (भंडारा), कनकवली, जानोली (सिंधुदुर्ग), क्रोमाईटचा उपयोग धातू उद्योगात किंमती खड्यांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात होतो. 

महाराष्ट्रातील भूगर्भ रचना :

अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.


ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, 

डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, 

शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.


क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.


ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.


इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे

      

1) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?

उत्तर: कुलाबा


2) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?

उत्तर: 1897


3) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?

उत्तर: बराकपुर


4) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?

उत्तर: मिनामाटा


5) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर: ॲडम स्मिथ


6) कोणत्या जिल्ह्यात चुनखडी च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

उत्तर: यवतमाळ


7) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर: 11 जुलै


8) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

उत्तर: 1993


9) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

उत्तर: 1972


10) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

उत्तर: गडचिरोली

महत्वपूर्ण नारे (slogan)1. जय जवान जय किसान

►- लाल बहादुर शास्त्री


2. मारो फिरंगी को

►- मंगल पांडे


3. जय जगत

►- विनोबा भावे


4. कर मत दो

►- सरदार बल्लभभाई पटले


5. संपूर्ण क्रांति

►- जयप्रकाश नारायण


6. विजय विश्व तिरंगा प्यारा

►- श्यामलाल गुप्ता पार्षद


7. वंदे मातरम्

►- बंकिमचंद्र चटर्जी


8. जय गण मन

►- रवींद्रनाथ टैगोर


9. सम्राज्यवाद का नाश हो

►- भगत सिंह


10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है

►- बाल गंगाधर तिलक


11.इंकलाब जिंदाबाद

►- भगत सिंह


12. दिल्ली चलो

►- सुभाषचंद्र बोस


13. करो या मरो

►- महात्मा गांधी


14. जय हिंद

►- सुभाषचंद्र बोस


15. पूर्ण स्वराज

►- जवाहरलाल नेहरू


16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान

►- भारतेंदू हरिशचंद्र


17. वेदों की ओर लौटो

►- दयानंद सरस्वती


18. आराम हराम है

►- जवाहरलाल नेहरू


19. हे राम

►- महात्मा गांधी


20. भारत छोड़ो

►- महात्मा गांधी


21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है

►- रामप्रसाद बिस्मिल


22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा

►- इकबाल


23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा

►- सुभाषचंद्र बोस


24. साइमन कमीशन वापस जाओ

►- लाला लाजपत राय


25. हू लिव्स इफ इंडिया डाइज

►- जवाहरलाल नेहरू

अंकगणित प्रश्नमंजुषा ( Test Series )

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...