Thursday 9 March 2023

Headlines Of The Day From The Hindu


• BSE आणि UN Women India यांनी FinEMPOWER कार्यक्रम सुरू केला.


• अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मुंबईत होणार आहे.


• मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौगंजला मध्य प्रदेशातील 53 वा जिल्हा म्हणून घोषित केले.


• शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात 'लाडली बहना' योजना सुरू केली.


•अश्विनी वैष्णव यांनी सिक्कीमसाठी 'गो ग्रीन, गो ऑरगॅनिक' कव्हर रिलीज केले.


• एस. एस. दुबे यांनी नवीन महालेखा नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारला.


• रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रत्येक नागरिकाला डिजिटल पेमेंटचा वापरकर्ता बनवण्याचे मिशन सुरू केले आहे.


• सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत सुविधांसाठी जागतिक बँकेने भारताला $1 अब्ज देण्याचे वचन दिले आहे.


• क्लायंटसाठी क्वांटम कॉम्प्युटिंग आणण्यासाठी एचसीएल टेक्नॉलॉजीज मायक्रोसॉफ्टला भागीदार करते. 


• इलेक्टोरल डेमोक्रसी इंडेक्स 2023 मध्ये भारत 108 व्या स्थानावर आहे.


• दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ आशिया-पॅसिफिकमधील सर्वात स्वच्छ आहे.


• INS त्रिकंदने आंतरराष्ट्रीय सागरी सराव 2023 मध्ये भाग घेतला.


• 7 मार्च 2023 रोजी 5 वा जण औषध दिन साजरा केला जातो.


•मीराबाई चानू यांना बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे.


राज्यसेवा प्रश्नसंच ( Online Test Series )

प्रश्न मंजुषा


१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅

२. झरिया व खेत्री

३. ब्राम्हणी व देवगढ 

४. बोकारो व राजमहाल


२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन

२. ईथेन व आयसो ईथेन 

३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅

४. प्रोपेन व आयसो प्रोपेन



३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी

२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅



५.  जोड्या लावा :

अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध


१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅

२. अ-३, ब-२, क-४, ड-१

३. अ-१, ब-४, क-२, ड-३

४. अ-१, ब-२, क-४, ड-३



६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान 

२. हलके लढाऊ विमान ✅

३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 

४. जेट ट्रेनर




७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ 

२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे

३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून

४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून




८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ

२. हाँवर्ड एकेन✅

३. थिओडोर मँमन

४. के.आर. पोर्टर



९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३

२. १५ आँगस्ट १९९५✅

३. १५ आँगस्ट १९९७

४. १५ आँगस्ट १९९९



१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.

२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.

३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅

४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.




११.  जोड्या लावा :


अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा


१. अ-३, ब-२, क-३, ड-१

२. अ-२, ब-१, क-३, ड-४

३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅

४. अ-२, ब-३, क-४, ड-१



१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद

२. परम अनंत✅

३. परम सुलभ 

४. परम तेज



१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा

२. मुंबई - दिल्ली

३. कराची - लाहोर✅

४. मुंबई - ठाणे


१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?

अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब

२. ब आणि क

३. अ आणि क✅

४. अ, ब, आणि क



१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 

त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.

आजचे प्रश्नसंच

 गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके आहे. ?

⚪️ रमनिया 

⚪️ ओमान 

⚫️ सेनेगल ☑️

⚪️ य. के 



 भारतातील पहिले ई-कोर्ट सुरु करण्याचा मान ......या शहराला मिळाला आहे. ?

⚪️ पणे 

⚫️ नागपूर ☑️

⚪️ औरंगाबाद 

⚪️ नाशिक 



 कोणत्या नदीमुळे कोकणाचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे भाग पडले आहेत.  ?

⚪️ आबा नदी 

⚫️ कुंडलिक नदी ☑️

⚪️ यमुना नदी 

⚪️ पातळगंगा नदी 



 जम्मू काश्मीर ची राजधानी श्रीनगर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. ?

⚪️ चिनाब नदी 

⚪️ वयास नदी 

⚪️ रावी नदी 

⚫️ *झेलम नदी ☑️



 विडी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले तिरोडा व सालेकसा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

⚪️ चद्रपूर 

⚪️ नागपूर 

⚫️ गोंदिया ☑️

⚪️ भडारा 



 भारताच्या संचित निधीतून देयके देण्यासाठी ....द्वारे अधिकृत केले जाते .?

⚪️ वित्त विधेयक

⚫️ विनियोजना अधिनियम ☑️

⚪️ वित्तिय अधिनियम 

⚪️ सचित निधी अधिनियम 



 अनुसुचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यासाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबत ची तरतुद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेले आहे. ?

⚫️ कलम 335 ☑️

⚪️ कलम 17

⚪️ कलम 340

⚪️ कलम 338



 खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री एस. एस. खेरा यांनी म्हटले आहे. ?

⚪️ मत्रिमंडळ 

⚫️ मंत्रिमंडळ सचिवालय ☑️

⚪️ लोकसभा राज्यसभा 

⚪️ वरील सर्व 



 भारतीय राज्य घटनेमध्ये केंग हा सर्वात महत्वाचा अधिकारी आहे, असे कोणी म्हटले आहे. ?

⚪️ जवाहरलाल नेहरु 

⚪️ क. एम. मुंशी 

⚪️ क मेनन 

⚫️ डाँ. आंबेडकर ☑️



 भगतसिंह कोषारी हे हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री होते. ?

⚫️ चूक ☑️

⚪️ बरोबर 

⚪️ तटस्थ 

⚪️ यापैकी नाही

पहिली पंचवार्षिक योजना (First Panchwarshik Scheme)



कालावधी : 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956.

मुख्य भर : या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान : हेरोल्ड-डोमर चे प्रतिमान या योजनेत वापरण्यात आले.

योजनेचे उपनाव : पुंनरुस्थान योजना.

अपेक्षा वृद्धी दर : 2.1%.

प्रत्यक्षा वृद्धी दर : 3.6%.



प्रकल्प :


दामोदर खोरे विकास प्रकल्प (झारखंड-प.बंगाल, दामोदर नदीच्या खोर्यात)

भाक्रा-नानगल प्रकल्प (हिमाचल प्रदेश–पंजाब, सतलज नदी)

कोसी प्रकल्प (बिहार, कोसी नदीवर)

हिराकुड योजन(ओरिसा, महानदी)


कारखाने :


सिंद्री (झारखंड) खत कारखाना

चित्तरंजन (प.बंगाल) रेल्वे इंजिन कारखाना

पेरांबूर (तमिळनाडू) रेल्वे डब्यांचा कारखाना

HMT(बंगलोर)

हिंदुस्तान (पिंपरी,पुणे)


मूल्यमापन :


योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती.

अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढले.

मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात.

राष्ट्रीय उत्पन्न 18% नी तर दरडोई उत्पन्न 11% नी वाढले.



विशेष घटनाक्रम :


8 मे, 1952 पासून ओधोगिक विकास व नियमन अधिवेशन 1951 लागू करण्यात आला.

2 ओक्टोंबर, 1952 रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

हातमाग उधोगाचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतील हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली .

1955 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार (गोरवाल समिती) एम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.

जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन करण्यात आले, ज्याने मार्च 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले.


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

अग्रणी बँक योजना



14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. 


*शिफारस -*


डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली. 


*सुरुवात -*


1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. 


*योजना -*


देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली. 


*कार्ये -*


जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -


जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -

 जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.

 जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.

 अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.

 जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.

 भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला. 


*महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)*


स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना. 


*सध्यस्थिती -*


सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती. 


*उषा थोरात समिती -*


भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

अर्थसंकल्प

 🌸 समतोल अर्थसंकल्प – जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च दोन्ही सारखे असतात तेव्हा त्या अर्थसंकल्पास समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात.


🌹 शिलकीचा अर्थसंकल्प – जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या अर्थसंकल्पास शिलकी अर्थसंकल्प म्हणतात.


🌹तटीचा अर्थसंकल्प – जेव्हा सरकारच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त असतो, तेव्हा त्या अर्थसंकल्पास तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात.


🌹 महसुली अर्थसंकल्प – महसुली अर्थसंकल्पात महसुली/ चालू खात्यावरील जमाखर्चाचा समावेश होतो. 


🌹महसुली जमा व खर्चाचा समावेश होतो, ज्याअंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो- महसुली जमा, महसुली खर्च.

महसुली जमा याअंतर्गत 

अ) कर उत्पन्न, 

ब) करेतर उत्पन्न. करेतर उत्पन्नात 


🌹१) राजकोषीय सेवा म्हणजेच चलनी नोटा व नाण्यांमधून मिळणारा नफा


🌹 २) व्याज उत्पन्न- ज्यात घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज, रेल्वे व पोस्ट सेवांवरील व्याज तसेच सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज यांचा समावेश होतो. याशिवाय


🌹 ३) नफा व लाभांश, ज्यात महसुली जमा याअंतर्गत आर.बी.आय., सार्वजनिक बँक, एल.आय.सी., सार्वजनिक उद्योगांचा नफा यांचा समावेश होतो.


🌹महसुली खर्चात महसुली योजना खर्च म्हणजे सामाजिक मालमत्तेच्या देखभालीवरील खर्च तसेच महसुली बिगर योजना खर्च म्हणजे

 १) घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च 

२) संरक्षणाचा महसुली खर्च

३) अनुदाने 

४) नागरी प्रशासन खर्च उदा. पगार, कार्यालयीन खर्च इ. तसेच 

५) राज्य सरकारे व केंद्रीय प्रदेशांना दिलेली अनुदाने यांचा समावेश होतो.


राज्ये व राजधान्या


🔲 अरुणाचल प्रदेश - इटानगर


🔲 आध्रप्रदेश - अमरावती (नवीन), हैदराबाद (जुनी राजधानी)


🔲 आसाम - दिसपूर


🔲 उत्तर प्रदेश - लखनऊ


🔲 उत्तराखंड - देहराडून


🔲 ओरिसा - भुवनेश्वर


🔲 कर्नाटक - बंगलोर


🔲 करळ - तिरूवनंतपुरम


🔲 गजरात - गांधीनगर


🔲 गोवा - पणजी


🔲 छत्तीसगड - अटल नगर (नया रायपूर)


🔲 झारखंड - रांची


🔲 तामिळनाडू - चेन्नई


🔲 तलंगणा - हैदराबाद


🔲 तरिपुरा - अागरताळा


🔲 नागालॅंड - कोहिमा


🔲 पजाब - चंदीगड


🔲 पश्चिम बंगाल - कलकत्ता


🔲 बिहार - पटणा


🔲 मणिपूर - इंफाळ


🔲 मध्यप्रदेश - भोपाळ


🔲 महाराष्ट्र - मुंबई


🔲 मिझोराम - ऐझाॅल


🔲 मघालय - शिलॉंग


🔲 राजस्थान - जयपूर


🔲 सिक्कीम - गंगटोक


🔲 हरियाणा - चंडीगड


🔲 हिमाचल प्रदेश - सिमला


🛑 कद्रशासित प्रदेश आणि राजधानी 🛑

1. अंदमान-निकोबार - पोर्ट ब्लेअर

2. चंदीगड - चंदीगड

3. दमण आणि दीव - दमण दादरा व नगर हवेली - सिल्व्हासा

4. दिल्ली - नवी दिल्ली

5. पुदूचेरी - पुदूचेरी

6. लक्षद्वीप - कवारत्ती

7. जम्मू काश्मीर -श्रीनगर व जम्मू

8. लडाख - लेह


(दीव - दमण व दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. 26 जानेवारी 2020)

लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?



देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात... 


सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात. 


तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.


▪️कमाल मर्यादा 550


भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

विधानपरिषद



विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती:


घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सात घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश,जम्मू काश्मीर आणि कर्नाटक , तेलंगणा , आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.


विधानपरिषदेची रचना :

1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे.


विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :

1. 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.


2. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.


3. 1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


4. 1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


5. 1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.


सदस्यांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


सदस्यांचा कार्यकाल : 

सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.


विधानपरिषदेचा कार्यकाल :

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.


गणसंख्या : 1/10

अधिवेशन : 

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे



Ques. भारतातील निवडणूका लोकशाही पद्धतीने होतात, हे देर्शविणारे वाक्ये खाली दिली आहेत. त्यापैकी अयोग्य वाक्ये ओळखा.


A. जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहे✅📚

B. भारतात निर्वाचन आयोग खूप शक्तिशाली आहे

C. भारतात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाची प्रत्येक व्यक्ती मतदाता आहे.

D. भारतात निवडणूकीत पराभाव
 झालेली पार्टी जनादेश स्वीकार करणे

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. भारतीय दंड संहितेमधील कोणते कलम बलात्कार या गुन्ह्याबाबत वापरले जाते ?

A. कलम 180
B. कलम 376✅📚
C. कलम 476
D. कलम 576

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. कमाल जमीन धारणा कायद्याचे उद्दिष्ठ कोणते ?

अ. मोजक्या हातात जमीन संकलित होण्यास प्रतिबंध करणे.

ब. अतिरिक्त जमिनीवर भूमिहीन शेतमजुरांचे पुनर्वसन करणे.

क. सामाजिक न्याय प्रस्तापित करणे.


A. अ आणि ब
B. अ आणि क
C. ब आणि क
D. वरील सर्व✅📚

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. न्यायपालिकेच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे-

A. . संसदेद्वारे पारित प्रत्येक कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी लागते.✅📚
B. जर एखादा कायदा राज्यघटनेच्या विरूध्द असेल तर न्यायपालिका तो रद्द करू शकतो.
C. न्यायपालिका कार्यकारी मंडळापेक्षा स्वतंत्र असते.
D. जर एखाद्या नागरिकाच्या

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले जातात ?

A. कलम 139 ब
B. कलम 139 क
C. कलम 139 अ✅📚
D. कलम 138

📚💐📚💐📚💐📚💐📚

Ques. खालीलपैकी कोणत्या खटल्यांचा भारतीय संविधानात दिलेल्या मुलभूत हक्क प्रकरणाशी संबंधीत नाही ?

A. केशवानंद वि. केरळ राज्य
B. गोलकनाथ वि. पंजाब राज्य
C. मोहिरीबिबी वी. धरमदास घोष✅📚
D. शंकरीप्रसाद खटाला

📚💐📚💐📚💐📚💐📚

Ques. आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये लोकशाही व्यवस्थेची गरज आहे , कारण.................

A. विकसित राष्ट्रांच्या शब्दाला जास्त किमत प्राप्त होईल
B. विभिन्न राष्ट्रांच्या समस्यांचे निराकरण त्यांच्या सैन्य बळाकडे बघुन केले जावे
C. राष्ट्रांना त्यांच्या लोकसंख्येचा प्रमाणात सुविधा मिळाव्यात
D. जगातील सर्व राष्ट्रांशी समान व्यवहार व्हावे✅📚

📚💐📚💐📚💐📚💐📚

Ques. UPSC द्वारे घेतल्या जाणार्या स्पर्धा परीक्षांसंबंधी सुधारण्यासाठी डॉ. अरूण निगवेकर समितीने कोणत्या शिफारसी केल्या आहेत ?

 1.उमेदवारांकडे गतिमान प्रशासनासाठीचे कौशल्य असावे.

2.समाज व सरकार यामधील दुवा बनवण्याची क्षमता.

3. परीक्षांच्या (प्रक्रिया) कालावधी 6 महिन्यां पर्यंत कमी करावा.

4. विषय ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे.

A. फक्त अ, क आणि ड
B. फक्त ब, क आणि ड
C. फक्त अ, ब आणि ड✅📚
D. वरील सर्व

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. 11 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे झालेल्या घटनासमितीच्या बैठकीत खालीलपैकी कोणाची संविधान समितीच्या कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ?

A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. डॉ. बाबासाहेब आंबे़डकर
C. वल्लभभाई पटेल
D. ए.सी. मुखर्जी✅📚

📚💐📚💐📚💐📚💐📚

 Ques. घटना समितीच्या झेंडा समितीच्या अध्यक्ष कोण होते ?

A. पंडित नेहरू
B. जे.बी.क्रपलनी✅📚
C. डॉ.राजेंद्रप्रसाद
D. वल्लभभाई पटेल


📚💐📚💐📚💐📚💐📚💐

 रत्नागिरी जिल्ह्यातील मुम्बई गोवा महामार्गावरील चिपळूण हे शह र कोणत्या नदीकाठी वसलेले आहे

Ans:- वाशिष्ठी

लखनऊ ऐक्य व लखनऊ करार



🖍गोखलेंच्या भारत सेवक समाजास होमरुल लीगचे सदस्य होण्याची संमती नव्हती, परंतु त्यांनी देखील भाषण दौरे आयोजित करुन होमरुलला पाठबळ दिले.

🖍होमरूल कार्यपध्दती ही गांधीजींना मान्य नव्हती व होमरूलसाठीची ही योग्य वेळ नाही असे त्यांचे मत होते. 

🖍या अधिवेशनासाठी टिळकांच्या होमरूल लीगने ‘काँग्रेस स्पेशल’ व ‘होमरूल स्पेशल’ म्हणून लखनौसाठी या दोन स्पेशल आगगाडयांची व्यवस्था केली.
🖍या अधिवेशनात ॲनी बेझंट यांच्या प्रयत्नाने जहालांना पुन्हा काँग्रेसमध्ये औपचारिकरित्या सामील करून घेण्यात आले. यास ‘लखनौ ऐक्य’ असे म्हणतात.

🖍आता काँग्रेसची दारही जहाल गटाला खुली झाल्यानंतर ती पुन्हा प्रभावीत तसेच गतीशील बनली व राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करण्याची ताकद तिच्यात पुन्हा निर्माण झाली.

🖍याअधिवेशनात एक मुखाने स्वराज्याची मागणी करण्यात आली.

🖍काँग्रेस व मुस्लिम लीग दोघांच्या राजकीय मागण्या सारख्याच असाव्यात म्हणून काँग्रेस व मुस्लिम लीग यांमध्ये एक करार करण्यात आला. त्यास लखनौ करार असे म्हणतात.

🖍या कराराव्दारे काँग्रेसने मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केली, तर मुस्लिम लीगने काँग्रेसच्या साम्राज्यांतर्गत स्वराज्याच्या मागणीचे समर्थन केले.

🖍तसेच मुस्लिमांच्या अल्पसंख्य प्रांतातून मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधी 
पाठविण्यासंबंधीची मागणी मुस्लिम लीगने काहीशी सौम्य केली.

🖍आता काँग्रेस व लीग यांच्यात राजकीय मागण्याबाबत मतैक्य होवून भारताच्या राजकीय क्षेत्रात समान उद्दिष्ट पूर्तीसाठी या संघटना सहकार्यास सिध्द झाल्या. (वस्तुत: काँग्रेसने व्यवहारीक दृष्टीकोनातून राष्ट्रीय सामंजस्यासाठी मुस्लिमांचे स्वतंत्र मतदार संघ आनंदाने स्विकारुन नाईलाजाने केलेली एक तात्विक तडजोड होती.)

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना


•देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड


•देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा


•देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत


•देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश


•देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू


•देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर


•देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश


•देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)


•देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल


•देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश


•देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान


•देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)


•देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा


•देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)


•देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र


•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली


•देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)


•देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)


•देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली


•देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)


•देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड


•देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर


•देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश


•देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी


•देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)


•देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी


•देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र


•देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर


•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर


•देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई


•देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात


•देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)


•देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे


•देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश


•देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर


•देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र


•देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र


•देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई


•देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)


•देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली


•देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे


•देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक


•देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)


•देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश


•देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर


•देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे


•देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम


•देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र


•देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे


•देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...