Saturday 12 March 2022

महत्वाचे सराव प्रश्न ( गणित )

1) 300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

1) 45 से.         2) 15 से.       3)  25 से.       4)  35 से.

उत्तर : 15 से.

*  स्पष्टीकरण :-   एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद
____________________________

२) ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

१) 1मि. 12से.     २) 1मि. 25से.    ३) 36से.  ४) 1मि. 10से.

उत्तर : 1 मि. 12से.

* स्पष्टीकरण :-  एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.
पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5
___________________________

३) ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?

१) 540मी.  २) 162मी.  ३) 270मी.   ४) 280मी.

उत्तर : 270 मी.

*  स्पष्टीकरण :-  सूत्र - गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.

४)  800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?

१) 54 कि.मी.
२) 40 कि.मी.
३) 50 कि.मी.
४) 60 कि.मी.

उत्तर : 40 कि.मी.  

*  स्पष्टीकरण :-  वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40 (वेग काढताना 18/5 ने गुणणे)

५)  मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?

दु.12 वा.
12.30 वा.
1.30 वा.
11.30 वा.

उत्तर : 12.30 वा.

*  स्पष्टीकरण :-  भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास
 नमूना सहावा –

६)  मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

दु.12.30 वा.
दु.12वा.
दु.1.30 वा.
दु.1वा.
उत्तर : दु.12.30वा.

*  स्पष्टीकरण :- लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

७) ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?

300 कि.मी.
240 कि.मी.
210 कि.मी.
270 कि.मी.

उत्तर : 240 कि.मी.

स्पष्टीकरण :- 60 व 75 चा लसावी = 300
300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.
300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

अंकगणित 20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

 13/27

 19/39

 11/23

 17/35

उत्तर :13/27

2. 85053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

 5050

 540

 4950

 4550

उत्तर :4950

3. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती?

 79

 71

 87

 65

उत्तर :79

4. हरीकडे जेवढया मेंढया आहेत त्याच्या दुप्पट कोंबडया आहेत. त्या सर्वाचे एकूण पाय 96 आहेत. तर हरी जवळील एकूण कोंबडया किती?

 48

 24

 12

 16

उत्तर :24

5. एका संख्येचा 2/5 भाग = 24 तर ती संख्या कोणती?

 120

 60

 180

 80

उत्तर :60

6. 9 लीटर दुध 45 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलास किती दूध मिळेल?

 200 मीली

 2000 मीली

 20 मीली

 2 मीली

उत्तर :200 मीली

7. 3 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?

 2543

 4574

 7641

 9170

उत्तर :7641

8.1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील?

 3

 5  

 15

 6

उत्तर :3

9. तीन शाळा सकाळी 10.00 वा. सुरू होतता पहिल्या शाळेची घंटा दर 20 मिनिटांनी वाजते. दुसर्‍या शाळेची घंटा दर 30 मिनिटांनी वाजते आणि तिसर्‍या शाळेची घंटा दर 40 मिनिटांनी वाजते तर तिन्ही शाळेची घंटा एकाच वेळी किती वाजता वाजेल?

 11:30

 12:00

 12:30

 13:00

उत्तर :12:00

10. 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणार्‍या गाडीचा तश वेग किती कि.मी. आहे?

 50 कि.मी.

 72 कि.मी.

 60 कि.मी.

 45 कि.मी.

उत्तर :60 कि.मी.

11. ‘अ’ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात?

 12

 8

 12

 10

उत्तर :8

12. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसर्‍या नळाने 4 तासात रिकामी होते. नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

 4

 8

 16

 19

उत्तर :8

13. 36 सेकंदाचे 3 तासांशी गुणोत्तर किती?

 1:200

 1:300

 1:5

 1:400

उत्तर :1:300

14. सुमनचे वय स्वातीच्या वयाच्या निमपट आहे. दोघीच्या वयातील फरक 15 वर्षे असल्यास त्यांच्या वयांची बेरीज किती?

 60 वर्षे

 30 वर्षे

 20 वर्षे

 45 वर्षे

उत्तर :45 वर्षे

15. वसुंधरेला जशी पृथ्वी म्हणतात तसे नारी या शब्दाला काय?

 जननी

 दुहिता  

 महिला

 जाया

उत्तर :दुहिता 

16. गटात बसणारे पद ओळखा?

49,16,81

 120

 65

 8

 यापैकी नाही

उत्तर :यापैकी नाही

17. विजोड पद ओळखा?

पेरु, डाळींब, बटाटा, फणस?

 पेरु

 डाळींब

 बटाटा

 फणस

उत्तर :बटाटा

18. विजोड पद ओळखा?

 SRQ

 KJI

 FGH

 ZYX

उत्तर :FGH

19. मेणबत्तीला जसा प्रकाश तसे कोळशाला काय?

 शेगडी

 उष्णता

 काळा

 उष्ण

उत्तर :उष्णता

20. 4 ला जसे 16 तसे कोणता 36?

 6

 9

 24

 यापैकी नाही

उत्तर : 6

--------------------------------------------------------

Economics Special.

🅾रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाची सध्याच्या काळातील भूमिका आणि निर्णय हे IMP list मध्ये समाविष्ट करायचे मुद्दे आहेत. मागील लेखामध्ये RBI च्या पारंपरिक मुद्द्यांबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये RBI शी संबंधित चालू घडामोडी व संबंधित मुद्दे याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

🧩बँकांशी संबंधित विविध दर

🅾  रेपो रेट - ४.४० टक्कय़ांवरून कमी करून ४ टक्के इतका करण्यात आला आहे.

🅾 रिव्हर्स रेपो रेट - ३.७५ टक्क्यांवरून कमी करून ३.३५ टक्के इतका करण्यात आला आहे.

🅾बँक रेट - (ज्या दराने व्यापारी बँकांना RBI वित्त पुरवठा करते व व्यापारी बँका ग्राहकांना कर्जपुरवठा करतात तो व्याजदर) - ४.६५ टक्कय़ांवरून ४.२५ टक्के इतका करण्यात आला आहे.

🅾राखीव रोख प्रमाण (Cash Reserve Ratio) CRR  - ३ टक्के

🅾वैधानिक रोखता / तरलता प्रमाण: (Statutory Liquidity Ratio—SLR ) - १८ टक्के

🅾 बेस रेट - (या दरापेक्षा कमी दराने बँका आपल्या ग्राहकांना कर्जपुरवठा करू शकत नाहीत.) - ८.१५ टक्के ते ९.४० टक्के.

🧩 देयक सुविधा विकास निधी (Payments Infrastructure Development Fund (PIDF)) -

🅾 मे २०२० मध्ये रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने हा निधी स्थापन केला आहे.

🅾 देशामध्ये इ-बँकिंग , मोबाइल बँकिंग, यूपीआय, डेबिट व क्रेडिट कार्डस, पॉइंट ऑफ सेल (ढर ) इत्यादी विविध पद्धतींनी देयकांचे प्रदान केले जात आहे.

🅾 देयकांच्या आदानप्रदानामध्ये डिजीटल पद्धतींचा वापर वाढावा यासाठी आणि या देयक प्रकारांना उत्तेजन देण्यासाठी हा निधी स्थापन करण्यात आला आहे.

🅾 डिजिटल देयक प्रणालींचा ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि श्रेणी ३ ते ६ च्या प्रदेशांमध्ये प्रसार व्हावा यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने हा निधी स्थापन केलेला आहे.

🅾 एकूण ५०० कोटी रुपये इतक्या निधीपैकी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून २५० कोटी रुपये देण्यात येतील तर कार्ड देणाऱ्या बँका व नेटवर्क कंपन्या यांच्याकडून उर्वरित निधी जमा करण्यात येईल. 

🅾 या निधीचे व्यवस्थापन रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या समितीकडून करण्यात येईल. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

🅾 रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे कोव्हिड १९ संदर्भातील अर्थव्यवस्थेस प्रोत्साहन देणारे उपाय

🅾 सिड्बी व एक्झिम बँकेस प्रोत्साहन,
लघु उद्योग विकास बँकेस रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून देण्यात येणाऱ्या पुनर्वित्तपुरवठय़ाची मुदत ९० दिवस वाढवून देण्यात आली आहे. ही विशेष पुनर्वित्तपुरवठय़ाची रक्कम रु. १५,००० कोटी इतकी असेल.

🅾 एक्झिम बँकेसही रु. १५,००० कोटी इतका वित्तपुरवठा करण्यात आला आहे.

🅾 ऋणकोंना सहा महिन्यांची मुदत
रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून ऋणकोंना त्यांच्या मासिक हफ्त्यांमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.

🅾 म्हणजेच एप्रिल ते जून महिन्यांचे हफ्ते पुढे ढकलता आले. या मुदतीमध्ये आण्खीन तीन महिन्यांची वाढ देण्यात आली आहे. आता ऋणकोंना ऑगस्ट २०२०पर्यंत त्यांच्या कर्जाचे मासिक हफ्ते भरण्यातून सूट देण्यात येईल.

🧩 शासनाची बँक म्हणून कार्य करतानाचे विविध दर -

🅾 रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ही केंद्र शासनाची बँक म्हणूनही कार्य करते. अन्य कुठल्याही ग्राहक-बँक संबंधांप्रमाणे यांचेही संबंध असतात.

🅾 ज्याप्रमाणे एखाद्या बँकेतील खात्यामध्ये काही किमान रक्कम जमा असणे ग्राहकासाठी बंधनकारक असते, त्याप्रमाणेच केंद्र शासनाने रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडे काही किमान रक्कम जमा ठेवणे आवश्यक असते.

🅾 सध्या ही किमान रक्कम रोजचे रु. १० कोटी तसेच दर आठवडय़ाच्या शेवटी म्हणजेच दर शुक्रवारी रुपये १०० कोटी इतकी निश्चित करण्यात आली आहे.
रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ही राज्य शासनाची बँक म्हणूनही कार्य करते.

🅾 सर्वच राज्य शासनांनी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडे काही किमान रक्कम जमा ठेवणे आवश्यक असते. मात्र ही रक्कम त्या त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान आणि अर्थसंकल्प यांवर अवलंबून असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

रुपयाची परिवर्तंनियता :-

1 मार्च 1992 – LERMS/दुहेरी विनिमय पद्धती लागू

1993-94 – रुपया व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

मार्च 1994 – रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

या समितीने रुपया भांडवली खात्यावर एका टप्यात परिवर्तनीय करण्याऐवजी 1999-2000 या वर्षाअखेर तीन टप्यांमध्ये करावा अशी शिफारस केली.

मात्र, जुलै 1997 च्या पूर्व आशियाई संकटामुळे हा प्रयत्न सोडून देण्यात आला. या संकटाचे मूळ कारण होते, त्या देशांची चचने त्यांच्या भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय होती.

6) मात्र सध्या परकीय चलन साठा मोठया प्रमाणावर वाढल्याने सरकारने भांडवली खात्यावरील काही व्यवहारासंबंधी परकीय चलनाच्या विनिमयावरील नियंत्रणे शिथिल केली आहे.

7) भांडवली खात्यावर रूपयाच्या पूर्ण परिवर्तनीयतेबद्दल शिफारसी करण्यासाठी RBI ने 2006 मध्ये एस.एस.तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एका दुसर्‍या समितीची स्थापना केली. या समितीने 31 जुलै 2006 रोजी आपला अहवाल RBI ला सादर केला, जो तिने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केला.

रुपयाचा विनिमय दर (Exchange Rate of Rupee) :

अर्थ : विविध देशांच्या चलनांचा परस्परांमध्ये विनिमय किंवा अदलाबदल करता येते.

उदा. रुपयांच्या बदल्यात डॉलर्स घेता येतात, डॉलर्सच्या बदल्यात इंग्लंडचे पाउंड घेता येतात, पाउंडच्या बदल्यात जर्मनीचे मार्कस घेता येतात.

याप्रमाणे दोन चलनांचा विनिमय ज्या दराने केला जातो त्या दरास त्यांचा विनिमय दर असे म्हणतात.

उदा. एका डॉलरसाठी 45 रुपये लागत असतील तर 1 डॉलर = 45 रुपये हा त्यांचा विनिमय दर झाला.

विनिमय दराचे प्रकार : विनिमय दराचे पुढील प्रकार असतात.

निश्चित किंवा स्थिर विनिमय दर (Fixed or Stable or Pegged)

तरता किंवा बदलता विनिमय दर (Flexible or Fluctuating or Floating)

दोन चलनांमधील विनिमय दर जर सरकारने ठरविला असेल तर त्याला निश्चित किंवा स्थिर असे म्हणतात.

सरकार हा दर कायद्याव्दारे (by Legislation) किंवा परकीय विनियम बाजारात प्रत्यक्ष हस्तक्षेप करून (आवश्यकतेनुसार परकीय चलनाची खरेदी किंवा विक्री करून) ठरवित असते.

जर विनिमय दर चलनांच्या मागणी व पुरवठ्याच्या परस्पर संयोगाने ठरत असेल तर त्याला तरता किंवा बदलता असे म्हणतात. त्याची मागणी व पुरवठा सतत बदलत असल्याने विनिमय दर सुद्धा सतत बदलत असतो. उदा. भारतीय जनतेची अमेरिकेच्या वस्तु व सेवांची मागणी रुपयांच्या पुरवठा व डॉलर्सची मागणी निर्माण करते. तर अमेरिकन जनतेची भारतीय वस्तूंची मागणी डॉलर्सचा पुरवठा व रुपयांची मागणी निर्माण करते.

रूपया व डॉलर यांचा विनिमय दर बदलत असताना रुपया डॉलरच्या संदर्भात स्वस्त किंवा महाग होत असतो.

भारतीय रूपयांचा पुरवठा अमेरिकन जनतेकडून होणार्याय त्याच्या मागणीपेक्षा जास्त असल्यास परस्परांच्या संदर्भात रुपया स्वस्त तर डॉलर महाग होतो. याला रुपया घसरत आहे (Depreciation) असे म्हंटले जाते.

याउलट, अमेरिकन डॉलर्सचा पुरवठा भारतीय जनतेकडून होणार्‍या त्याच्या मागणीपेक्षा जास्त असल्यास परस्परांच्या संदर्भात रुपया महाग तर डॉलर स्वस्त होतो. याला रुपया वधारत आहे (Appreciation) असे म्हणतात.

साक्षरता


                        साक्षरता म्हणजे साक्षर असणे, म्हणजेच, वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता असणे. वेगवेगळ्या देशांमध्ये साक्षरतेचे भिन्न मानक आहेत.                    नॅशनल    मिशन ऑन एज्युकेशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार , एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव लिहिण्याची आणि वाचण्याची क्षमता असल्यास ती साक्षर मानली .
स्वातंत्र्याच्या वेळी भारताचा साक्षरता दर फक्त बारा (१२%) टक्के होता, तो वाढून सुमारे सव्वाष्ट (%%) टक्के झाला आहे. पण आताही जगातील सामान्य दरापेक्षा (पंचेचाळीस टक्के) भारत खूपच मागे आहे. जगातील सर्वाधिक निरक्षर लोकसंख्या भारतात आहे.

🌺भारताची सद्य स्थिती खालीलप्रमाणे :-

पुरुष साक्षरता: ऐंशी टक्के (%२%)
महिला साक्षरता: पंच्याऐंशी टक्के (45%)
सर्वोच्च साक्षरता दर (राज्य): केरळ (टक्केवारी ९ ४%)
किमान साक्षरता दर (राज्य): बिहार (चौसष्ट टक्के%%)
सर्वाधिक साक्षरता दर (केंद्र शासित): लक्षद्वीप (नव्वद टक्के 92%)
जेव्हापासून भारताने शिक्षणाच्या अधिकाराची अंमलबजावणी केली, तेव्हापासून भारताचा साक्षरता दर खूपच वाढला आहे. केरळ हिमाचल, मिझोरम, तामिळनाडू आणि राजस्थानमधील मोठ्या बदलांमुळे या राज्यांचे कामकाज उलट झाले आहे आणि जवळजवळ सर्व मुले आता तिथेच शिक्षण घेत आहेत. शिक्षण ही बिहारमधील सर्वात मोठी समस्या आहे. तेथे दारिद्र्याचे प्रमाण इतके जास्त आहे की लोकांना रोटी कपड्यांसारखे घर आणि मूलभूत गरजा मिळणे अशक्य आहे.
🌺साक्षर कोण आहेत? 🌺
भारतीय कायद्यानुसार या सूत्रानुसार ज्यांना सुशिक्षित म्हणून गणले जाते ते स्वत: वर स्वाक्षरी देखील करू शकतात, आणि पैसे कसे बुक करावे किंवा ते कसे समजून घ्यावेत किंवा हे दोन्हीही माहित असू शकतात.

प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था


(Primary Agricultural Credit Co-Operatives)

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🧩प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात.

🎯स्थापना -

🧩गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते.

🎯कार्ये -

🧩ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते.

🎯भांडवल उभारणी -

🧩स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली.

🎯विस्तार -

🧩भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या.

🎯महाराष्ट्रातील विस्तार -

🧩31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :

सुरुवात - 22 जानेवारी 2015

दूत - साक्षी मलिक  

बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
 'बेटा बेटी एकसमान' हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.
 हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.
 यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.
 भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' टपाल तिकिटेही काढण्यात आली.
 सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू.

महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)

   जिल्हा - 2001 - 2011

1) बीड - 894 - 807 
2) जळगाव - 880 - 842 
3) अहमदनगर - 884 - 452 
4) बुलढाणा - 908 -  855
5) औरंगाबाद - 890 - 858 
6) वाशिम - 918 - 863 
7) कोल्हापूर - 839 - 863 
8) उस्मानाबाद - 894 - 867 
9) सांगली - 867 - 851 
10) जालना - 903 -870

General grammar exercise | Prepositions


Complete the following sentences using an appropriate preposition.

☘️🍄☘️🍄☘️🍄☘️🍄☘️🍄☘️🍄☘️

1. Most of the damage was caused ……………… you.

a) by
b) with
c) from

2. She was frightened ……………… a cockroach and rushed into the room.

a) by
b) with

3. The boy killed the spider ……………… a stone.

a) by
b) with

4. The spider was killed …………………. the boy.

a) by
b) with

5. He is excited …………………. the possibility of getting a promotion.

a) about
b) with
c) by

6. I’m annoyed ………………. her.

a) with
b) by

7. I was annoyed ………………… the way she behaved.

a) by
b) with

8. I was surprised …………………… his attitude.

a) at
b) with
c) by

9. The room was filled ……………………. thick smoke.

a) with
b) in
c) by

10. His whereabouts are not known ………………….. the police.

a) for
b) to

Answers
▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬

1. Most of the damage was caused by you.

2. She was frightened by a cockroach and rushed into the room.

3. The boy killed the spider with a stone.

4. The spider was killed by the boy.

5. He is excited about the possibility of getting a promotion.

6. I’m annoyed with her.

7. I was annoyed by the way she behaved.

8. I was surprised by / at his attitude.

9. The room was filled with thick smoke.

10. His whereabouts are not known to the police.

भारतातील सर्वात लांब

◾️भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

◾️भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

◾️.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

◾️भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

◾️भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

◾️भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

◾️भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

◾️भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

◾️भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

◾️.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
-सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
___________________________________

भारताचा भूगोल

📌भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.

📌भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. 

📌भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो.  गंगेच्या खोर्‍याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. 

📌पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो.  दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.

📌भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.

📌बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. 

📌गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडकी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात्. मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.

📌पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्‍यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्विप व बंगालच्या उपसागरातील बर्मा व इंडोनेशियाजवळील अंदमान आणि निकोबार.

📌भारतीय हवामान हे हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात.

📌जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैरुत्य मोसमी वार्‍यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान जास्तच असते.

📌ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आद्र हवामान, विषवृत्तीय शुष्क हवामान, समविषववृतीय आद्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?  उत्तर – आलि...