Friday 22 November 2019

नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवराला ‘रामसर’चा दर्जा मिळणार..

💥 नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर व बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लवकरच ‘रामसर’चा दर्जा मिळणार असल्याचे संकेत येथे सुरू असलेल्या पाणथळ आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मिळाले.

💥 बॉम्बे नॅचरल सोसायटी (बीएनएचएस)ने ही परिषद आयोजित केली आहे.

💥 नवेगाव बांध, माहुल (शिवडी खाडी), हतनूर धरण, ठाणे खाडी, नांदूर मधमेश्वर, लोणारसह जायकवाडी धरण परिसराला ‘रामसर’चा दर्जा मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता.

💥 त्यातील नांदूर मधमेश्वर आणि लोणारला लवकरच संमती मिळेल, असे सूतोवाच मँग्रोव्ह फाऊंडेशनचे अप्पर प्रधान वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी केले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त दिले होते.

💥 ‘रामसर’च्या यादीत भारतातील 26 पाणथळ जागांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. या दोन जागांच्या समावेशामुळे महाराष्ट्रही या यादीत झळकेल.

💥 नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या 265 प्रजातींची नोंद झाली आहे.

💥 रामसरमध्ये आढळणाऱ्या 148 स्थलांतरित पक्ष्यांपैकी 88 प्रजाती नांदूर मधमेश्वरमध्ये आढळतात. या अभयारण्यात एकूण 5 हजार 687 पक्षी आढळले आहेत.

💥 तर हे सर्वात छोटे पक्षी अभयारण्य आहे. विविध प्रजातींच्या पक्षांचे अस्तित्व इथे आहे. सरोवरातीलपाण्याचा सामू (पीएच) 10.5 असून यातील स्पुरूलिना शैवालामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहेत.

लेह मध्ये सोवा रिग्पा राष्ट्रीय संस्था स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

💥 लेह इथं आयुष मंत्रालयांतर्गत  स्वायत्त संस्था म्हणून सोवा रिग्पा राष्ट्रीय संस्था  स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.

💥 या संस्थेच्या उभारणीसाठी सुमारे 47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

💥 या संस्थेच्या उभारणीच्या टप्प्यापासूनच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी संचालकाच्या पदाची निर्मिती करायलाही मंजुरी देण्यात आली.

💥 लडाखची केंद्रशासित प्रदेश म्हणू निर्मिती झाल्यावर लडाखच्या स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सोवा- रिग्पा औषध प्रणालीचा प्रसार करण्यासाठी सोवा रिग्पा राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय  सरकारनं घेतला घेतला होता.

💥 या संस्थेच्या उभारणीमुळे  भारतीय उपखंडात सोवा रिग्पाचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल. 

💥 केवळ भारतातल्याच नव्हे तर इतर देशातल्या विद्यार्थ्यांनाही या औषध प्रणालीचं शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल.

💥 सोवा रिग्पा ही देशात हिमालयाच्या पट्ट्यातली पारंपरिक वैद्यकीय प्रणाली असून, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग, हिमाचल प्रदेश, लडाखचा केंद्रशासित प्रदेश या भागात आणि आता संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे.

महत्त्वाची शहरे

पुणे:-राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित विद्यापीठ

सिंधुदुर्ग:- महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा

नागपूर:-महाराष्ट्रातील पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा सुरु

ठाणे:- महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद

सांगली:- महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना

रायगड:-  महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य

बोल्डावाडी (हिंगोली):-  महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग

अंधेरी:- महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र

सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा

सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली

चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र

चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर

 गडचिरोली:- महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा

इस्लामपूर (सांगली) :- महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका

पाचगाव (नागपूर) :- महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव

परसोडी (यवतमाळ):- महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत

लेखामेंडा (गडचिरोली):- महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव

चंद्रपूर एस.टी. आगार:- महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष

चंद्रपूर जिल्हापरिषद:- महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद

पुणे:- महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र

सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी

प्रिय मित्रांनो

आता सरकार कोणाचं याचा विचार करू नका.... जे आहे ते आहे.कारण राजकारण हे असच गलिच्छ अस्त.... आधी एकमेकांशी भांडण करतात व शेवटी सर्व विसरून मांडीला मांडी लावून बसायचं......

     माझ्या मते बेरोजगारी आणखी वाढेल व सर्व काही प्रायव्हेट झालच तर सामान्य माणूस संपेन...

  आता पुढे काय होत.....त्याचा विचार सोडून द्या व मन लाऊन फक्त आणि फक्त स्टडी वर सर्व मन केंद्रित करा.....

हेच काही वर्ष आहेत.. नंतर संधीचा सूर्य कधीच उगवणार नाही.. कारण अनेकांची वय निघून जातील.....म्हणून जियो या मरो इस साल बस एक पोस्ट यार... एवढे तयारीला लगा की स्वतःची भूकही आठवण देण्याचं विसरून जाईल☺️
येणाऱ्या...

MPSC,MPSC ग्रुप B,group C, megabharti. तसेच रेल्वे NTPC,रेल्वे ग्रुप D, यासर्व exam मध्ये आपल्या मराठी मुलांचा टक्का हा सर्वात जास्त असायला हवा....💐💐💐💐☺️

लक्ष्यात असुद्यात की जेव्हा खूप संकट येतात तेव्हा तुमचे ध्येय हे जवळ आलेले असते .....फक्त गरजेचं असते ते आपला स्पीड आणखी वाढवण्याची.......
   प्रयत्न असे घ्या की कुणी आपल्याला वेड्यात काढलं तरी चालेल पण आता..ध्येय गाठल्याशिवय मागे बघायचं नाही...

खरं तर maths आणि रिझनिंग हे विषय जवळपास सर्वच exam मध्ये असतातच..
सर्व आपल्या जमेच्या बाजू लक्षात घेऊन खूप अभ्यास करा.... वेळेलाही तुमच्यासाठी आणखी थांबावस वाटायला हव एवढं मन लाऊन स्टडी करा.......
हीच सुवर्ण संधी आहे... व वेळ कमी.
दिवस असो वा रात्र... आपल्यासाठी एकच.........
छान स्टडी करा.... छान स्टडी करा व आपल ध्येय गाठ.... यश तुमचेच आहे.

या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही...
फक्त गरज आहे अफाट मेहनतीची...

न्यूजपेपर वाचत चला... पण न्यूज चॅनल शक्यतोवर बघून नका. कारण त्यामुळं माहिती कमी पण मन दुखावले जाण्याची व मन भरकटण्याची शक्यता जास्त......
हे सर्वांच्या बाबत नाही पण काहींसाठी आहे... विचार करणे सोडा व ध्येयाकडे जास्त लक्ष द्या.....
सर्वच सहमत असतील असे नाही. तसेच जर काहींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा असावी..💐💐🙏
धन्यवाद💐💐🙏

स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त महत्वपूर्ण विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.१) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?

अ) डेव्हिड लिप्टन ✅    
ब) गीता गोपीनाथ
क) रॉड्रिगो रॅटो    
ड) डॉमिनिक स्ट्रॉउस-कान

स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून डेव्हिड लिप्टन यांची नियुक्त करण्यात आले आहे.

प्र.२) भारत आणि ......... गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.

अ) इटली ✅
ब) फ्रान्स      
क) जर्मन
ड) अमेरिका

स्पष्टीकरण : भारत आणि इटली गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.

प्र.३) फिजी या देशाची राजधानी कोणती आहे?

अ) ओस्लो    
ब) हवाना    
क) हेलसिंकी    
ड) सुवा ✅

स्पष्टीकरण : फिजी या देशाची राजधानी सुवा हि आहे.

प्र.४) कोणती व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे?

अ) कर्णम मल्लेश्‍वरी    
ब) पी. टी. उषा ✅
क) अंजली भागवत    
ड) मेरी कोम

स्पष्टीकरण : पी.टी.उषा हि व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे.

प्र.५) ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही परिषद कुठे भरणार आहे?

अ) श्रीनगर    ✅
ब) जयपूर      
क) विजयवाडा    
ड) मुंबई

स्पष्टीकरण : ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही. परिषद श्रीनगर या ठिकाणी भरणार आहे.

प्र.६) फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली?

अ) न्या. चंद्रचूड    
ब) न्या. लोकूर ✅
क) न्या. कमल कुमार    
ड) न्या. ए. के. मिश्रा

स्पष्टीकरण : फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर न्या.लोकूर यांची नेमणूक झाली.

प्र.७) ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती कोण?

अ) सँड्रा टॉरेस    
ब) जिमी मोरालेस
क) अलेजान्ड्रो मालडोनाडो    
ड) अलेजान्ड्रो गियामॅटी ✅

स्पष्टीकरण : ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती अलेजान्ड्रो गियामॅटी हे आहेत.

प्र.८) इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?

अ) चंद्रिमा शहा  ✅
ब) देविका लाल
क) सुब्रत बॅनर्जी    
ड) कविता देसाई

स्पष्टीकरण : इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून चंद्रिमा शहा यांची निवड झाली.

प्र.९) मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्‍वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?

अ) अरमान इब्राहिम    
ब) आदित्य पटेल
क) ऐश्‍वर्या पिसे    ✅
ड) समीरा सिंग 

स्पष्टीकरण : मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्‍वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती ऐश्वर्या पिसे आहे.

प्र.१०) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन ____ येथे झाले.

अ) भोपाळ
ब) नवी दिल्ली
क) भुवनेश्वर ✅
ड) आग्रा

स्पष्टीकरण : 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन भुवनेश्वर येथे झाले.

प्र.०१) दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?

अ) कटारिना जॉनसन थॉम्पसन✅✅✅
ब) व्हेरेना प्रीनर
क) नाफिसातौ थियाम
ड) लॉरा मुइर

स्पष्टीकरण : प्र.०१) दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कटारिना जॉनसन थॉम्पसन यांनी जिंकले.

प्र.०२) भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव _ येथे आयोजित करण्यात आला आहे.

अ) राजस्थान
ब) उत्तराखंड✅✅✅
क) हिमाचल प्रदेश
ड) केरळ

स्पष्टीकरण : भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्र.०३) चीनच्या “DF-41” संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अ) “DF-41” म्हणजे डॉन्कफेन्क-41 होय.

ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.

अ) केवळ अ ✅✅✅
ब) केवळ ब
क) केवळ अ आणि ब
ड) सर्व बरोबर आहेत

स्पष्टीकरण : केवळ अ हे चुकीचे आहे. ब हे बरोबर आहे. ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.

प्र.०४) भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला?

अ) मंगोलिया✅✅✅
ब) कंबोडिया
क) लाओस
ड) व्हिएतनाम

स्पष्टीकरण : भारताच्या मदतीने मंगोलिया या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला

प्र.०५) उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले?

अ) IIT कानपूर
ब) CSIR✅✅✅
क) IISc बेंगळुरू
ड) IIT खडगपूर

स्पष्टीकरण : उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी CSIR संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले.

प्र.०६) भारताने कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे?

अ) श्रीलंका
ब) बांग्लादेश✅✅✅
क) मालदीव
ड) पाकिस्तान

स्पष्टीकरण : भारताने शेजारच्या बांग्लादेश या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

प्र.०७) संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी _ अंतर्गत देण्यात येणार.

अ) आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज
वेलफेयर फंड✅✅✅
ब) राष्ट्रीय संरक्षण कोष
क) लष्कर केंद्रीय कल्याण कोष
ड) यापैकी नाही

स्पष्टीकरण : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज वेलफेयर फंड अंतर्गत देण्यात येणार.

प्र.०८) 21 ऑक्टोबर 2019 रोजी _ सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

अ) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
ब) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA)
क) NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन)✅✅✅
ड) ISA (इस्त्राएल स्पेस एजन्सी)

स्पष्टीकरण : ) 21 ऑक्टोबर 2019 रोजी NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन) सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

प्र.०९) UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून  यांची नेमणूक केली.

अ) कॅमेरून डायझ
ब) युना किम
क) मिली बॉबी ब्राउन
ड) यलिट्झा एपारीसिओ✅✅✅

स्पष्टीकरण : UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून  यांची नेमणूक केली. - यलिट्झा एपारीसिओ

प्र.११) जागतिक अधिवास दिन _ या दिवशी साजरा केला जातो.

अ) 7 ऑक्टोबर✅✅✅
ब) 9 ऑक्टोबर
क) 6 ऑक्टोबर
ड) 8 ऑक्टोबर

स्पष्टीकरण : जागतिक अधिवास दिन 7 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो.

सरकारी योजना - प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

⚡ मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे. ही योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असून, या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असतो.

⭐️ योजनेच्या प्रमुख अटी :

• पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे.
• लाभासाठी महिलेचे व तिच्या पतीचे सहमती पत्रे, महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते क्रमांक, कुटुंबातील सदस्याचा मोबाईल नंबर आवश्यक.
• कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर सर्व पात्र गर्भवती महिला व स्तनदा माता या योजनेसाठी पात्र.
• ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित आहे.
• योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना लाभ घेता येणार नाही.

📄 आवश्यक कागदपत्रे :

• नोंदणीसाठी प्रपत्र 1 अ माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र व आधार संलग्न बँक / पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक.
• ए.एन.सी ची नोंद करणे अनिवार्य आहे.
• प्रपत्र 1 क जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत व बाळाला लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद असलेले माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र आवश्यक.
• बँक पासबुक झेरॉक्स.
• आधार कार्ड झेरॉक्स.

💰 लाभाचे स्वरूप असे :

▪ लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफीसमधील खात्यात एकूण 5 हजार रुपयांची रक्कम तीन हप्त्यात जमा केली जाते.
• पहिला हप्ता 1 हजार रुपये : 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जातो.
• दुसरा हप्ता 2 हजार रुपये : गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो.
• तिसरा हप्ता 2 हजार रुपये : प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जातो.
• लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 700 रुपये (ग्रामीण भागात) व 600 रुपये (शहरी भागात ) लाभ दिला जातो.

🏢 या ठिकाणी संपर्क साधावा :

▪ प्राथमिक आरोग्य केंद्र.
▪ महापालिकेने निर्धारित केलेली रुग्णालये.
▪ जिल्हा शासकीय रुग्णालय.

सामान्य ज्ञान विषयी 10 सराव  प्रश्न 

1. खालीलपैकी कोण वित्त आयोगाची नियुक्ती करतो?

 1 ) राष्ट्रपती    2 ) वित्तमंत्री    3 ) पंतप्रधान    4) गृहमंत्री

उत्तर : राष्ट्रपती

2. फळपिकांमध्ये —– या खालील क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

 1) आंबा    2) केळी   3) चिकू   4) संत्री

उत्तर : आंबा

3. 1 मार्च 1995 रोजी बुधवार असेल, तर 1 मार्च 1996 रोजी कोणता वार असेल?

1)  गुरुवार   2) शुक्रवार    3) सोमवार   4) बुधवार

उत्तर : शुक्रवार

4. महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह कोणी केला?

 1) महात्मा गांधी     2) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
 3) विठ्ठल रामजी शिंदे    4) र.धों. कर्वे

उत्तर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

5. जर 2.1=4.14 तर 3.1=?

1)  9.62    2) 9.10    3) 9.61    4) 9.91

उत्तर : 9.61

6. भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र —– पिकाखाली येते.

 1) ज्वारी    2) मका    3) भात    4) कापूस

उत्तर : भात

7. कोणत्या देशात शास्त्रज्ञाने पटकी या रोगावर मुखावाटे देता येणारी लस विकसित केली?

1)  भारत    2) ग्रेट ब्रिटन    3) रशिया    4) जपान

उत्तर : भारत

8. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

 1) कळसूबाई    2) गुरुशिखर    3) दोडा बेट्टा   4) के २

उत्तर : दोडा बेट्टा

9. रातांधळेपणा हा —– या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.

 1) जीवनसत्व-ड     2) जीवनसत्व-ब     3) जीवनसत्व-अ    4) जीवनसत्व-क

उत्तर : जीवनसत्व-अ

10. खालील ठिकाणी आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीचे (IMF) कार्यालय आहे.

1)  मुंबई    2) लंडन    3) वॉशिंग्टन    4) न्यूयॉर्क

उत्तर : वॉशिंग्टन

केरळमध्ये भारतातील पहिल्या हत्ती पुनर्वसन केंद्राची स्थापना

📌केरळ सरकारने तिरुवनंतपुरम येथे देशातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कप्पूकडू येथे हे केंद्र असणार आहे.

📕 काय असेल त्या ठिकाणी

📌हत्ती पुनर्वसन केंद्रामध्ये हत्ती संग्रहालय, प्रशिक्षण केंद्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सेवानिवृत्तीचे घर, प्राण्यांसाठी स्मशानभूमी असणार आहे. त्याचसोबत याठिकाणी अनाथ, जखमी आणि वृध्द हत्तीना घर मिळणार आहे.

📌केरळमध्ये निसर्गाच्या सानिध्यात जवळपास 65 हेक्टर जमिनीवर हे केंद्र तयार करण्यात येत आहे.

📌पहिल्या टप्प्यासाठी 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

📌हे केंद्र श्रीलंकेतील पिन्नवाला हत्ती अनाथाश्रमासारखेच असणार आहे.

📌या केंद्रामध्ये आतापर्यंत फक्त 15 हत्ती आहेत.

📌या केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर हत्तींची संख्या वाढवण्यात येणार आहे. 

महत्त्वाचे प्रश्नसंच 22/11/2019

📍 कोणता देश भारतात पर्यावरणपूरक शहरी वाहतूक तयार करण्यासाठी आगामी 5 वर्षांमध्ये 1 अब्ज युरो एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार आहे?

(A) इस्त्राएल
(B) फ्रान्स
(C) जर्मनी✅✅
(D) स्वीडन

📍 कोणता देश 2020 साली नियोजित शांघाय सहकार्य संघटना याच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची परिषद (CHG) याच्या बैठकीचे आयोजन करणार आहे?

(A) चीन
(B) भारत✅✅
(C) उझबेकिस्तान
(D) कझाकस्तान

📍 कोणत्या सरकारी रुग्णालयात भारतात प्रथमच ‘रोबोटिक सर्जरी’ची सुविधा सुरू करण्यात आली?

(A) सफदरजंग सरकारी रुग्णालय, नवी दिल्ली ✅✅

(B) डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, नवी दिल्ली

(C) सर जे. जे. हॉस्पिटल, मुंबई

(D) IPGME&R अँड SSKM हॉस्पिटल, कोलकाता

📍 सप्टेंबर महिन्यात रशियामध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे?

(A) सेंटर 2019 ✅✅
(B) SCO मिशन 2019
(C) फॅन्टम फ्युरी
(D) कोबरा गोल्ड

1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?

१. ४४✅
२. ४८
३. ४६
४. ५०

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.

१. घटनेचा मसुदा
२. मूलभूत अधिकार
३. घटनेचा सरनामा ✅
४. मार्गदर्शक तत्त्वे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?

१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
३. लोकपाल
४. लोकायुक्त

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?

१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅
२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो
३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते
४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?

१. गृहमंत्री
२. पंतप्रधान✅
३. राष्ट्रपती
४. उपराष्ट्रपती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?

१. महाराष्ट्र विधानसभा - 278
२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88
३. लोकसभा - 543
४.राज्यसभा - 250✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.

१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
२. हुंडा पद्धती बंद करणे
३. निरक्षरता दूर करणे
४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

7. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?

१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब
२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार
३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार

8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?

१. कलम 21
२. कलम 23
३. कलम 24 ✅
४. कलम 28

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?

१. कलम 350
२. कलम 368✅
३. कलम 370
४. कलम 360

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?

१. महाराष्ट्र
२. राजस्थान
३. जम्मू कश्मीर
४. आंध्र प्रदेश✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या संस्थेनी भारतात प्रथमच नॅनो तंत्रज्ञानावर आधारित असलेली खते सादर केली आहेत?

(A) कजरी
(B) IFFCO ✅✅
(C) राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था
(D) नवदान्य

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘राष्ट्रीय आरोग्य स्थिती 2019’ या अहवालानुसार कोणत्या शहरात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे?

(A) मुंबई
(B) दिल्ली✅✅
(C) जोधपूर
(D) अहमदाबाद

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 2019 सालासाठीचा जेसीबी साहित्य पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आले आहे?

(A) माधुरी विजय✅✅
(B) उमेश भंडारी
(C) अक्षया कटियार
(D) हिहारिका चंद

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी कोणत्या राज्याला महाराष्ट्रासह भागीदारीत ठेवण्यात आले आहे?

(A) ओडिशा✅✅
(B) पंजाब
(C) हरयाणा
(D) तेलंगणा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशात द्वैवार्षिक ‘राष्ट्रकूल कायदा मंत्री परिषद 2019’ आयोजित करण्यात आली?

(A) श्रीलंका✅✅
(B) चीन
(C) भारत
(D) पाकिस्तान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 लष्करी औषधे व लष्करी शिक्षण या क्षेत्रात भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला?

(A) बांग्लादेश
(B) संयुक्त अरब अमिराती
(C) उझबेकिस्तान✅✅
(D) नेपाळ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या दिवशी जागतिक त्सुनामी जागृती दिन पाळतात?

(A) 4 नोव्हेंबर
(B) 3 नोव्हेंबर
(C) 5 नोव्हेंबर✅✅
(D) 6 नोव्हेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणते शहर ‘विज्ञान व तंत्रज्ञान माध्यम परिषद 2019 या कार्यक्रमाचे आयोजन करणार?

(A) मुंबई
(B) कोलकाता✅✅
(C) नवी दिल्ली
(D) बेंगळुरू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[11/22, 5:16 PM] K38: 📍 कोणत्या मंत्रालयाच्या वतीने दुसऱ्या दक्षिण आशियाई सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले?

(A) वित्त मंत्रालय
(B) पर्यटन मंत्रालय
(C) महिला आणि बाल विकास मंत्रालय✅✅
(D) गृह मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या ठिकाणी ‘ISA-पोलाद परिषद 2019’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?

(A) नवी दिल्ली✅✅
(B) मुंबई
(C) पुणे
(D) अलाहाबाद

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 IFFI 2019 या कार्यक्रमात “आयकॉन ऑफ द गोल्डन ज्युबिली अवॉर्ड” हा सन्मान कोणत्या व्यक्तीला जाहीर झाला?

(A) रजनीकांत✅✅
(B) अमिताभ बच्चन
(C) चिरंजीवी
(D) इजाबेला ह्युपर्ट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या ठिकाणी ‘शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 साध्य करण्यासाठी वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता’ विषयक जागतिक परिषद 2019 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले?

(A) नवी दिल्ली✅✅
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) दिसपूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या अकादमीला सन्माननीय ‘राष्ट्रपती रंग’ प्रदान करण्यात आला?

(A) भारतीय नौदल अकादमी✅✅
(B) राष्ट्रीय संरक्षण अकादमी
(C) भारतीय लष्करी अकादमी
(D) आर्मी कॅडेट कॉलेज
[11/22, 5:18 PM] K38: 📍 कोणता देश सहावी ‘ASEAN डिफेंस मिनिस्टर्स मिटिंग-प्लस’ या बैठकीचे आयोजन करणार आहे?

(A) थायलँड✅✅
(B) इंडोनेशिया
(C) मलेशिया
(D) भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशाच्या नागरिकांना भारत सरकारने व्हिसा-ऑन-अराईव्हल सुविधा प्रदान केली आहे?

(A) कॅनडा
(B) ऑस्ट्रेलिया
(C) संयुक्त अरब अमिराती✅✅
(D) कुवैत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या न्यायमूर्तींनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली?

(A) न्या. अपरेश कुमार सिंग
(B) न्या. एस. चंद्रशेखर
(C) न्या. सुजित नारायण प्रसाद
(D) न्या. डॉ. रवी रंजन✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या तेल कंपनीने हिमाच्छादित प्रदेशात सुद्धा वापरले जाऊ शकणारे विशेष हिवाळी डिझेल तयार केले?

(A) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड✅✅
(B) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(C) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(D) गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या संस्थेनी ‘हेल्थ सिस्टीम्स फॉर ए न्यू इंडिया: बिल्डिंग ब्लॉक्स –पोटेंशल पाथवेज टू रीफॉर्म्स’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?

(A) अर्थ मंत्रालय
(B) NITI आयोग✅✅
(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
(D) कौशल्य विकास मंत्रालय

📍 कोणत्या मंत्रालयाने “भारतीय पोषण कृषी कोष (BPKK)” जाहीर केले आहे?

(A) केंद्रीय महिला व बालविकास व वस्त्रोद्योग मंत्री✅✅
(B) केंद्रीय अर्थमंत्री
(C) पंतप्रधान
(D) उपराष्ट्रपती

📍 कोणता पुरस्कार भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी योगदान देण्यासाठी दिला जाणारा नवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे?

(A) भारतरत्न
(B) पद्म विभूषण
(C) सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार✅✅
(D) पद्मश्री

📍 _____ याच्या सोबत भारत सरकारने विजयनगर वाहिनी सिंचन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली.

(A) आशियाई विकास बँक✅✅
(B) जागतिक बँक
(C) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
(D) नवीन विकास बँक

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...