Friday 22 November 2019

महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

◾️धाकट्या भावाकडून घेतली पदाची शपथ

◾️महिंदा राजपक्षे यांनी गुरुवारी श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

◾️लहान भाऊ गोताबाय राजपक्षे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दोनच दिवसांत ही घडामोड झाल्यानंतर आता एकाच परिवाराकडे सत्ता एकवटली आहे.

◾️देशात ऑगस्ट २०२०मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून, तोपर्यंत महिंदा काळजीवाहू सरकार चालवतील.

◾️महिंदा यांना अध्यक्षीय कार्यालयात त्यांच्याच भावाने शपथ दिली.

◾️तत्पूर्वी विक्रमसिंघे यांनी त्यांचा राजीनामा अध्यक्षांकडे सोपविला.

◾️शपथविधी सोहळ्यास माजी पंतप्रधान रानील विक्रमसिंघे, माजी अध्यक्ष मैत्रिपला सिरिसेना आणि इतर अनेक राजकीय नेते उपस्थित होते.

◾️महिंदा यांची ही दुसरी वेळ आहे.

◾️यापूर्वी देशात राजकीय अस्थिरता होती तेव्हा,
📌२०१८मध्ये ते काही काळ पंतप्रधान होते. त्यांनी
📌 २००५ ते २०१५ या काळात अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
📌वयाच्या २४व्या वर्षी ते प्रथम संसद सदस्य झाले होते.

◾️लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम अर्थात 'एलटीटीई'ला संपविण्यात राजपक्षे बंधूंची भूमिका होती.

◾️दरम्यान, नव्या पंतप्रधानांसाठी मावळते पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी त्वरित निवासस्थान मोकळे केले आहे.

◾️अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीच्या (यूएनपी) उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजीनामा दिला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...