स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
30 June 2025
Static GK + Current Affairs Combo MCQs
महत्त्वाच्या आयोग🇮🇳
🎯 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)
👉कलम: 315
👉स्थापना: 1926
👉रचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
👉कार्यकाल: 6/ 65वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉 अध्यक्ष: अजय कुमार
🎯 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
👉कलम: 315
👉रचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य
👉कार्यकाल: 6/ 62 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
👉काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)
👉 अध्यक्ष:रजनीश सेठ
🎯CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)
👉कलम: 324
👉स्थापना: 26 जानेवारी 1950
👉रचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
👉कार्यकाल: 6 / 65 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉ज्ञानेश कुमार
🎯SEC (राज्य निवडणूक आयुक्त)
👉कलम: 243K/ZK
👉रचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
👉कार्यकाल: 5 / 65 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
👉 दिनेश T वाघमारे
🎯CAG (महालेखा परीक्षक)
👉कलम: 148
👉स्थापना: 1858
👉रचना: 1 महालेखा परीक्षक
👉कार्यकाल: 6 / 65 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉 संजय मूर्ती
🎯 Lokpal (लोकपाल)
👉कायदा: 2013
👉स्थापना: 2019
👉रचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
👉कार्यकाल: 5/ 70 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉 अजय खानविलकर
🎯NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)
👉कायदा:1993
👉स्थापना: 1993
👉रचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
👉कार्यकाल: 3/70 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
🎯SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)
👉कायदा: 1993
👉स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
👉रचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
👉कार्यकाल: 3/ 70 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
👉काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल
👉 अध्यक्ष : A M बदार
🎯 CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)
👉कायदा:2003
👉स्थापना: 1964
👉रचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
👉कार्यकाल: 4/65 वर्षे
👉नियुक्ती: राष्ट्रपती
👉 अध्यक्ष: प्रवीण कुमार श्रीवास्तव
🎯CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)
👉स्थापना: 1985
👉रचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
👉कार्यकाल: 5 /65वर्षे
👉नियुक्ती : राष्ट्रपती
👉 अध्यक्ष :रणजीत मोरे
🎯MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)
👉कायदा:1985
👉स्थापना: 1991
👉रचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य
👉कार्यकाल: 5 / 65 वर्षे
👉नियुक्ती: राष्ट्रपती
👉 अध्यक्ष:M भाटकर
🎯PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)
👉 कायदा: 1978
👉स्थापना: 1966
👉संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
👉कार्यकाल: 3 वर्षे
👉 अध्यक्ष:रंजना देसाई
चालू घडामोडी प्रश्नोत्तरे – २९ जून २०२५
प्रश्न १. नुकताच कोणता दिवस ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला?
✅ उत्तर: २९ जून (प्रो. पी.सी. महालनोबिस यांच्या जन्मदिवसानिमित्त)
प्रश्न २. केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या क्षेत्रासाठी ‘राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान धोरण २०२५’ जाहीर केले?
✅ उत्तर: जैवतंत्रज्ञान क्षेत्र (Biotechnology Policy 2025)
प्रश्न ३. BRICS चा पुढील शिखर परिषद २०२५ मध्ये कोणत्या देशात होणार आहे?
✅ उत्तर: रशिया
प्रश्न ४. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स २०२५ मध्ये सर्वात राहण्यायोग्य शहर कोणते ठरले?
✅ उत्तर: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
प्रश्न ५. ‘Solar Energy Corporation of India (SECI)’ ने नुकतीच कोणत्या देशाशी हरित ऊर्जा करार केला?
✅ उत्तर: जर्मनी
प्रश्न ६. २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या G-20 शिखर परिषदेसाठी भारताचा शेरपा कोण असेल?
✅ उत्तर: अमिताभ कांत
प्रश्न ७. पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये सर्वाधिक पदके मिळवणारा देश कोणता ठरला?
✅ उत्तर: अमेरिका
प्रश्न ८. ‘World Food Prize 2025’ कोणी जिंकले?
✅ उत्तर: डॉ. संगीता कुलकर्णी भारतीय कृषी संशोधक
प्रश्न ९. नुकतेच कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पर्यटन योजना’ सुरू केली?
✅ उत्तर: मध्यप्रदेश
प्रश्न १०. ‘अंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५’ ची थीम काय होती?
✅ उत्तर: ‘Yoga for Self and Society’ (स्वतः व समाजासाठी योग)
28 June 2025
28 जून - चालू घडामोडी 2025
1) 'द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोअर' हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने लिहिले आहे ?
✅ शिखर धवन
2) The New World २१ century Globel order and India Book कोणी लिहिले आहे ?
✅ राम माधव
3) ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीजचा जागतिक तंबाखू नियंत्रण पुरस्कार २०२५ भारतासह किती देशाला मिळाला आहे ?
✅ ६ देश
4) JCB पुरस्कार बंद करण्यात आला आहे. तो कोणत्या क्षेत्राशी सबंधित दिला जात होता ?
✅ साहित्य
5) 2025 ची नाटो शिखर परिषद कोठे पार पडली ?
✅ हेग, नेदरलँड
6) इंटरनॅशनल Society of blood transfusion द्वारा मान्यता प्राप्त नवीन रक्त समूहाचं नाव काय आहे ?
✅ EMM negetive
7) जागतिक शांतता निर्देशांक २०२५ मध्ये १६३ देशांच्या यादीत भारताची रँक कितवी आहे ?
✅ ११५ वी
8) जागतिक शांतता निर्देशांक २०२५ मध्ये १६३ देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे ?
✅ आइसलँड
9) महाराष्ट्रात २६ जून रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो ?
✅ सामाजिक न्याय दिन
10) जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ?
✅ २६ जून
चालू घडामोडी :- 27 जून 2025
◆ व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल (BRSR) SEBI या संस्थेने सुरू केला.
◆ जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत अलीकडेच समाविष्ट झालेले सालखान जीवाश्म उद्यान उत्तर प्रदेश राज्यात आहे.
◆ केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिले सागरी एनबीएफसी, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (SMFCL) सुरू केले.
◆ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष "केर्सी कोव्हेंट्री" बनल्या आहेत.
◆ दरवर्षी 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय नाविक दिन साजरा केला जातो.
◆ आंतरराष्ट्रीय नाविक दिन 2025 ची थीम "आमचा समुद्र, आमची जबाबदारी, आमची संधी" (Our Ocean, Our Responsibility, Our Opportunity) अशी आहे.
◆ आंतरराष्ट्रीय नाविक दिनाची 2024 ची थीम "भविष्यात नेव्हिगेट करणे: सुरक्षितता प्रथम!" आहे.
◆ भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली आंध्र प्रदेश राज्यात स्थापन होत आहे.
◆ भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ राज्यात स्थापन करण्यात आले आहे.
◆ पासपोर्ट सेवा पोर्टल परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केले आहे.
◆ 2025 च्या अमरनाथ यात्रापूर्वी भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांवर सुरू केलेल्या कारवाईचे नाव "ऑपरेशन बिहाली" आहे.
◆ कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी उष्णता आणि जिवाणू संसर्गापासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी एक सुधारित CRISPR साधन विकसित केले आहे.
◆ बनकाचेरला जलाशय प्रकल्पावरून "तेलंगणा आणि आंध्र प्रदेश" या दोन राज्यांमध्ये आंतरराज्यीय पाणी वाद सुरू आहे.
◆ द्वारका एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला मार्ग बनला आहे ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित ॲडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) बसवले आहे.
बंगालचे गव्हर्नर-जनरल (1773–1833)
1.वॉरेन हेस्टिंग्ज (1773–1785)
✅️ ➤ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 अंतर्गत पहिले गव्हर्नर-जनरल
✅️ ➤ रोहिला युद्ध, पहिले मराठा युद्ध
✅️ ➤ दीवान पदाचा वापर आणि महसूल सुधारणा
✅️ ➤ नंदकुमार प्रकरण व इलाहाबाद करार
2.लॉर्ड कॉर्नवॉलिस (1786–1793)
✅️ ➤ कायमस्वरूपी जमीन महसूल व्यवस्था (Permanent Settlement)
✅️ ➤ दुसरे म्हैसूर युद्ध
✅️ ➤ न्याय व्यवस्थेत सुधारणा व सिव्हिल सेवा सुरू
3.लॉर्ड वेलस्ली (1798–1805)
✅️ ➤ सहकार प्रणाली (Subsidiary Alliance)
✅️ ➤ चौथे म्हैसूर युद्ध – टीपू सुलतानचा पराभव
✅️ ➤ मराठ्यांवर लष्करी दबाव
4.लॉर्ड मिंटो I (1807–1813)
✅️ ➤ मिंटो-अमर सिंग करार (नेपाळ संबंध)
✅️ ➤ किल्ल्यांवर वर्चस्व वाढवले
✅️ ➤ व्यापारी ठाण्यांचे संरक्षण
5.लॉर्ड हेस्टिंग्ज (1813–1823)
✅️ ➤ पहिला आंग्ल-नेपाळ युद्ध
✅️ ➤ पहिला आंग्ल-मराठा युद्ध (1817–1818)
✅️ ➤ पिंडाऱ्यांचा नाश
✅️ ➤ 1813 चा चार्टर ॲक्ट
6.लॉर्ड अमहर्स्ट (1823–1828)
✅️ ➤ पहिले बर्मी युद्ध (1824–26)
✅️ ➤ सिंधवरील नियंत्रण वाढवले
🔆 भारताचे गव्हर्नर-जनरल (1833–1858)
7.लॉर्ड विल्यम बेंटिक (1828–1835)
✅️ ➤ सती प्रथेवर बंदी (1829)
✅️ ➤ थग प्रथा नष्ट करणे
✅️ ➤ इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य
✅️ ➤ 1833 चा चार्टर ॲक्ट
8.लॉर्ड ऑकलंड (1836–1842)
✅️ ➤ पहिले अफगाण युद्ध (1838–42)
✅️ ➤ सैधव धोरणाचा प्रारंभ
9.लॉर्ड हार्डिंग I (1844–1848)
✅️ ➤ पहिला सिख युद्ध
✅️ ➤ सतलज प्रदेशावर ताबा
10.लॉर्ड डलहौसी (1848–1856)
✅️ ➤ “Doctrine of Lapse” नीती
✅️ ➤ दुसरा सिख युद्ध
✅️ ➤ टेलीग्राफ व रेल्वे यंत्रणा सुरू
✅️ ➤ सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना
✅️ ➤ पोस्टल युनिफिकेशन
🔆 व्हाइसरॉय (1858–1947)
11.लॉर्ड कॅनिंग (1856–1862)
✅️ ➤ 1857 चा उठाव आणि कंपनीचा शेवट
✅️ ➤ भारत शासन ॲक्ट 1858
✅️ ➤ इंडियन पेनल कोड व इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861
✅️ ➤ पहिला व्हाइसरॉय
12.लॉर्ड लॉरेन्स (1864–1869)
✅️ ➤ दुसरा अफगाण धोरण
✅️ ➤ भूकंपग्रस्त मदत कार्य
13.लॉर्ड लिटन (1876–1880)
✅️ ➤ 1877 मध्ये दिल्लीत समारंभ – व्हिक्टोरिया सम्राज्ञी घोषित
✅️ ➤ मुद्रण स्वातंत्र्य दमन (Vernacular Press Act)
✅️ ➤ दुसरे अफगाण युद्ध
✅️ ➤ कडव्या दुष्काळाकडे दुर्लक्ष
14.लॉर्ड रिपन (1880–1884)
✅️ ➤ स्थानिक स्वराज्याला प्रोत्साहन (Local Self Government)
✅️ ➤ इल्बर्ट बिल (1883) – वादग्रस्त ठरले
✅️ ➤ प्रेस स्वातंत्र्याचे समर्थन
15.लॉर्ड डफरिन (1884–1888)
✅️ ➤ काँग्रेसची स्थापना (1885)
✅️ ➤ सुधारक धोरणांचे समर्थन
16.लॉर्ड लॅन्सडोन (1888–1894)
✅️ ➤ दुसरा इंडियन कौन्सिल ॲक्ट (1892)
✅️ ➤ दुहेरी धोरण – राजकीय संवाद व नियंत्रण
17.लॉर्ड कर्झन (1899–1905)
✅️ ➤ बंगाल फाळणी (1905)
✅️ ➤ शैक्षणिक सुधारणांसाठी इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट (1904)
✅️ ➤ पुरातत्व विभागाची स्थापना
18.लॉर्ड मिंटो II (1905–1910)
✅️ ➤ मिंटो-मॉर्ले सुधारणा (1909)
✅️ ➤ मुस्लीम पृथग्नता राजकारणाचा प्रारंभ
19.लॉर्ड हार्डिंग II (1910–1916)
✅️ ➤ राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे स्थलांतर
✅️ ➤ दिल्ली दरबार (1911)
✅️ ➤ बंगाल फाळणी रद्द
20.लॉर्ड चेल्म्सफर्ड (1916–1921)
✅️ ➤ मोंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा (1919)
✅️ ➤ रॉलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड
✅️ ➤ भारत सरकार ॲक्ट 1919
21.लॉर्ड रीडिंग (1921–1926)
✅️ ➤ स्वराज पक्षाची स्थापना
✅️ ➤ चोऱी-चरखा आंदोलन
22.लॉर्ड इरविन (1926–1931)
✅️ ➤ सायमन कमिशन विरुद्ध आंदोलन
✅️ ➤ गांधी-इरविन करार (1931)
✅️ ➤ पहिले गोलमेज परिषद
23.लॉर्ड विलिंग्डन (1931–1936)
✅️ ➤ दुसरे व तिसरे गोलमेज परिषद
✅️ ➤ भारतीय कायदे मंडळ सुधारणा
24.लॉर्ड लिनलिथगो (1936–1944)
✅️ ➤ दुसरे भारत शासन ॲक्ट (1935) अंमलात
✅️ ➤ दुसरे महायुद्धात भारताचा सहभाग
✅️ ➤ 'अगस्त ऑफर' (1940)
25.लॉर्ड वेव्हल (1944–1947)
✅️ ➤ शिमला परिषद (1945)
✅️ ➤ अंतर्गत मंत्रिमंडळ योजना
26.लॉर्ड माउंटबॅटन (1947)
✅️ ➤ स्वतंत्र भारताचे शेवटचे व्हाइसरॉय
✅️ ➤ भारत-विभाजन योजना (3 जून योजना)
✅️ ➤ स्वतंत्र भारताचा पहिले गव्हर्नर-जनरल
27.चक्रवर्ती राजगोपालाचारी (1948–1950)
✅️ ➤ भारताचे पहिले व शेवटचे मूळ भारतीय गव्हर्नर-जनरल
✅️ ➤ 1950 मध्ये गव्हर्नर-जनरल पद समाप्त – राष्ट्रपतीपद सुरू
सिंधू/हडप्पा खोरे संस्कृती
1. 📍 भौगोलिक विस्तार (Area Coverage)
✅️ ➤ पश्चिम : सुत्कागेंडोर (बलुचिस्तान, पाकिस्तान) – दश्क नदी
✅️ ➤ दक्षिण : दाईमाबाद (महाराष्ट्र) – गोदावरी नदी
✅️ ➤ पूर्व : आलमगीरपूर (उत्तर प्रदेश) – हिंडन नदी
✅️ ➤ उत्तर : मांडा (जम्मू) – चिनाब नदी
✅️ ➤ त्रिकोणी भौगोलिक प्रदेश, साधारणतः 1600 किमी x 1400 किमी क्षेत्र
✅️ ➤ 1500 हून अधिक स्थळे; यापैकी ~1100 भारतात
2. 📅 कालखंड व स्वरूप (Chronology & Nature)
✅️ ➤ कालावधी : इ.स.पू. 3300 ते इ.स.पू. 1300 (मुख्य कालावधी : 2600–1900 BCE)
✅️ ➤ प्रारंभिक हडप्पा, प्रौढ हडप्पा, उत्तर हडप्पा – तीन टप्पे
✅️ ➤ प्रोटो-इतिहास व कांस्ययुगीन नागर संस्कृती
✅️ ➤ लिपी सापडली, पण अद्याप अपठित
3. 🔍 शोधकर्ते व उत्खनन (Discovery and Excavations)
✅️ ➤ 1921 – दयाराम सहानी (हडप्पा)
✅️ ➤ 1922 – आर. डी. बॅनर्जी (मोहनजोदडो)
✅️ ➤ मुख्य योगदान – सर जॉन मार्शल
✅️ ➤ इतर महत्त्वाचे उत्खननकर्ते – बी.बी. लाल, वसंत शिंदे, एम.एस. वैद्य
4. 🏙️ प्रमुख 6 शहरे (Major Cities)
✅️ ➤ हडप्पा (पाकिस्तान)
✅️ ➤ मोहनजोदडो (पाकिस्तान)
✅️ ➤ गन्वारीवाला (पाकिस्तान)
✅️ ➤ धोलावीरा (गुजरात)
✅️ ➤ राखीगढी (हरियाणा)
✅️ ➤ कालीबंगन (राजस्थान)
5. 📏 आकारानुसार महत्त्वाची स्थळे (Important Sites by Size)
✅️ ➤ सर्वात मोठे स्थळ – मोहनजोदडो (~250 हेक्टर)
✅️ ➤ भारतातील सर्वात मोठे स्थळ – राखीगढी (~350 हेक्टर)
➤ शोधकर्ता – डॉ. सुरजबान
➤ नदी – घग्गर
✅️ ➤ धोलावीरा – त्रिस्तरीय नगर, जलसंधारणाचे उत्तम उदाहरण
6. ⚓️ बंदरनगरे (Port Cities)
✅️ ➤ लोथल – गोदी, जलमार्ग व्यापार
✅️ ➤ सुत्कोटदा – घोड्याचे व बंदराचे पुरावे
✅️ ➤ इतर : बालथळ, केसरी, कांढला (संभाव्य स्थळे)
7. 🏛️ भांडाराच्या राजधानी स्वरूपाच्या शहरे (Dual Capitals - Piggott)
✅️ ➤ हडप्पा – उत्तरेकडील राजकीय केंद्र
✅️ ➤ मोहनजोदडो – दक्षिणेकडील सांस्कृतिक केंद्र
8. 👥 लोकांचा वंश व उगम (People & Origin)
✅️ ➤ द्रविडियन, भूमध्य वंशीय व प्रोटो-ऑस्ट्रलॉइड मिश्र वंश
✅️ ➤ आर्यपूर्व नागर संस्कृतीचे प्रतिनिधित्व
✅️ ➤ राखीगढी DNA पुरावे – आनुवंशिक माहिती मिळवलेली
9. 🛤️ वाहतूक व संपर्क (Transport & Connectivity)
✅️ ➤ बैलगाड्या, जलमार्ग, रथांची शक्यता
✅️ ➤ सरळ व समांतर रस्ते
✅️ ➤ लोथल – गोदी, जलमार्ग व्याप्ती
10. 🗿 सांस्कृतिक एकात्मता (Cultural Uniformity)
✅️ ➤ विटांची एकसारखी रचना (1:2:4 प्रमाण)
✅️ ➤ एकसारखी लिपी, शिक्के, वजनमापन
✅️ ➤ धर्म, स्थापत्यशास्त्र व नागरी योजनांमध्ये सातत्य
🔎 निष्कर्ष
✅️ ➤ सिंधू खोरे संस्कृती ही स्थापत्य, नागरी व्यवस्था, स्वच्छता, व्यापार व धार्मिक दृष्टिकोनातून प्रगत संस्कृती होती
✅️ ➤ तिच्या अनेक वैशिष्ट्यांचा ठसा भारतीय उपखंडातील पुढील संस्कृतींवर स्पष्टपणे आढळतो.
सिंधू संस्कृतीतील प्रमुख शोध (Indus Valley Civilization - प्रमुख स्थळे व वैशिष्ट्ये)
1. मोहनजोदडो (Mohenjodaro – सिंधू नदी, पाकिस्तान)
✅️ ➤ महास्नानगृह – (11.88 मी x 7.01 मी x 2.43 मी), सार्वजनिक स्नानगृह
✅️ ➤ पशुपती मूर्ती – ध्यानमग्न योगमुद्रेतील देव, सभोवताली हत्ती, गेंडा, वाघ, म्हैस
✅️ ➤ नृत्य करणारी मुलगी – कांस्यातील कलात्मक मूर्ती
✅️ ➤ अन्न साठवण कोठारे व जलनाल व्यवस्था
✅️ ➤ स्नानगृहे, विहिरी – स्वच्छतेवर भर
✅️ ➤ बहुमजली घरे व ग्रिड पद्धतीतील रस्ते
✅️ ➤ शिक्कांवर लिपी व प्राणीचित्र
✅️ ➤ मृतदेह ठेवण्यासाठी लाकडी पेट्यांचा वापर (secondary burial clue)
2. हडप्पा (Harappa – रावी नदी, पाकिस्तान)
✅️ ➤ धान्य साठवण कोठारे
✅️ ➤ वजनमाप प्रणाली व मृत्तिका शिक्के
✅️ ➤ शहराची नागरी व प्रशासकीय विभागणी
✅️ ➤ दफन संस्कृतीचे पुरावे
✅️ ➤ ग्रिड पद्धतीने रस्त्यांचे नियोजन
✅️ ➤ धातुकाम व मण्यांचे उद्योग
✅️ ➤ टेराकोटा खेळणी व प्राणीप्रतीके
3. कालीबंगन (Kalibangan – घग्गर नदी, राजस्थान)
✅️ ➤ वैशिष्ट्यपूर्ण विटा
✅️ ➤ नांगराच्या खुणा असलेले शेतीचे अवशेष
✅️ ➤ अग्निकुंड व भिंती – धार्मिक विधींसाठी
✅️ ➤ घोड्याचे पुरावे
✅️ ➤ शहराची तीन भागांत विभागणी
✅️ ➤ नियोजनबद्ध जलनाल व्यवस्था
✅️ ➤ नादी व पाणवठ्यांचे उपयोग
4. लोथल (Lothal – भोगवा नदी, गुजरात)
✅️ ➤ बंदर शहर – जलवाणिज्याचे केंद्र
✅️ ➤ अग्निकुंड – धार्मिक उपयोग
✅️ ➤ मौल्यवान दगड, मोती उद्योग
✅️ ➤ दरवाजे थेट मुख्य रस्त्याला उघडणारे – विशेष वैशिष्ट्य
✅️ ➤ भाताचे पहिले पुरावे
✅️ ➤ घोड्याचे पुरावे
✅️ ➤ जलाशय व जलव्यवस्थापन
✅️ ➤ मृत्तिकाशिक्के – व्यापारासाठी वापर
5. चन्हूदारो (Chanhudaro – सिंधू नदी, पाकिस्तान)
✅️ ➤ मोत्यांचे उत्पादन
✅️ ➤ सौंदर्यप्रसाधनांचे पुरावे – काजळदाणी, सुगंधी तेल
✅️ ➤ चामड्याचे काम
✅️ ➤ वस्त्रनिर्मिती व धातुकाम
✅️ ➤ खेळणी व फुलदाण्यांच्या आकृती
✅️ ➤ लघु घरांचे नागरी नमुने
6. सुतकागेंडोर / सुतकोटदा (Sutkagendor / Sutkotda – बलुचिस्तान, पाकिस्तान)
✅️ ➤ घोड्याचे पुरावे
✅️ ➤ बंदराचे पुरावे
✅️ ➤ ओमान व पश्चिम व्यापाराचे संकेत
✅️ ➤ अरबी समुद्रावरील महत्त्वाचे बंदर
7. बनवाली (Banawali – हरियाणा)
✅️ ➤ मातीचे नांगर
✅️ ➤ शेतीचे अवशेष – गहू, बार्ली
✅️ ➤ वेगळ्या शैलीतील विटा
✅️ ➤ नागरी नियोजन व टाकी व्यवस्था
✅️ ➤ वस्तीचे नकाशानुसार नियोजन
8. रंगपूर (Rangpur – गुजरात)
✅️ ➤ भाताचे पुरावे
✅️ ➤ मातीची भांडी व शेती अवशेष
✅️ ➤ नैऋत्य भारतातील सिंधू प्रभाव
✅️ ➤ जलवाहन व्यवस्थेचे अवशेष
✅️ ➤ दगडी व लाकडी घरांची उदाहरणे
🔎 सामान्य वैशिष्ट्ये:
✅️ ➤ ग्रिड पद्धतीने रचलेली शहरे
✅️ ➤ विहिरी, जलनाल, जलनिकासी यंत्रणा
✅️ ➤ वजनमापासाठी प्रमाणित मापे
✅️ ➤ शिक्के – व्यापार, धार्मिक उपयोग
✅️ ➤ धार्मिक श्रद्धा – मातृदेवता, योगमुद्रेतील प्रतीके
✅️ ➤ अत्यंत शांतताप्रिय समाज – शस्त्रप्रयोगाचे अभाव
✅️ ➤ विकसित शहरी जीवन – धातुकाम, वस्त्रनिर्मिती, मण्ये
✅️ ➤ कृषी – गहू, बार्ली, भात, कापूस उत्पादन
✅️ ➤ स्थलनियोजन, वीज-जलवहन यांचे तत्त्वज्ञान पुढील संस्कृतींना प्रेरणा
सिंधू खोरे संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये (Main Characteristics of Indus Valley Civilization)
1. स्वच्छ व नियोजित समाजरचना (Highly Hygienic and Well-Organized Society)
✅️ ➤ सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेला अग्रक्रम
✅️ ➤ प्रत्येक घरात स्वतंत्र स्नानगृह व पाण्याचा निचरा
✅️ ➤ विहिरी, टाकी, व निचऱ्याच्या गटारींचे उत्कृष्ट नियोजन
✅️ ➤ सार्वजनिक शौचालयांचे अवशेष
✅️ ➤ कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन
2. नियोजित नगररचना (Grid Pattern Town Planning)
✅️ ➤ रस्ते काटकोनात एकमेकांना छेदणारे
✅️ ➤ शहरांचे विभाग – गढी (Citadel), मध्यवर्ती क्षेत्र, रहिवासी भाग
✅️ ➤ विटा – 1:2:4 प्रमाणात भाजलेल्या (Standardized bricks)
✅️ ➤ ठराविक जागी सार्वजनिक इमारती, धान्यकोठारे
✅️ ➤ बहुमजली घरे, दरवाजे मुख्य रस्त्यावर न उघडणारे (Security-conscious design)
3. स्त्रीप्रधान व मातृदेवीपूजक समाज (Matriarchal & Goddess Worship)
✅️ ➤ मातृदेवींच्या मृत्तिकामूर्ती – उर्वरतेचे प्रतीक
✅️ ➤ शक्यत: स्त्री नेतृत्व व सामाजिक महत्त्व
✅️ ➤ स्त्री व योगमुद्रांतील मूर्ती – धार्मिक व सामाजिक भूमिका
✅️ ➤ मातृदेवी व निसर्गाची देवता म्हणून पूजन
✅️ ➤ स्त्री शक्तीचा प्रतीकात्मक सन्मान
4. नैसर्गिक व प्रतीकात्मक देवतेची उपासना (Worship of Natural and Symbolic Deities)
✅️ ➤ वृक्ष (पीपळ), नद्या, जनावरांचे पूजन
✅️ ➤ पशुपती महादेव मूर्ती – ध्यानमुद्रेतील, सभोवती प्राणी
✅️ ➤ योनिलिंग, वृषभ (नंदी) यांचे पूजन
✅️ ➤ अग्नी, जल, भूमीचे प्रतीक पूजाविधी
✅️ ➤ कोणतीही भव्य मंदिरे किंवा मूर्तिपूजेचे स्थळ आढळले नाही – सूक्ष्म पूजाविधी संकेत
5. कांस्य युगातील संस्कृती (Bronze Age Culture)
✅️ ➤ तांब्या व कास्य मिश्र धातू वापरून हत्यारे, भांडी, मूर्ती तयार
✅️ ➤ "नृत्य करणारी मुलगी" मूर्ती – कांस्याचा उत्कृष्ट नमुना
✅️ ➤ धातुकाम – तांब्याचे छिन्नी, भाले, आरसे
✅️ ➤ लोहाचा वापर नव्हता – त्यामुळे युगात लोहयुगापूर्व काल समजला जातो
✅️ ➤ हत्ती दातापासून वस्त्रनिर्मिती व दागिने तयार
6. व्यापारकेंद्रित समाज (Trade-Based Society)
✅️ ➤ देशांतर्गत व्यापार – कच्छ, महाराष्ट्र, पंजाब यांच्याशी
✅️ ➤ परदेशी व्यापार – मेसोपोटेमिया, ओमान, अफगाणिस्तानशी संबंध
✅️ ➤ लोथल व सुतकोटदा ही बंदर शहरे
✅️ ➤ वजनमाप पद्धती – घन मापे, तराजू
✅️ ➤ शिक्के – ओळख, मालवाहतूक व व्यापारासाठी
✅️ ➤ व्यापारासाठी बैलगाड्या, बोटींव्दारे वाहतूक संकेत
✅️ ➤ व्यापारी वस्तू – मोती, मण्ये, तांबे, कापूस, लाजवर्त (Lapis lazuli), सोनं, चांदी
7. लेखन प्रणाली व लिपी (Undeciphered Script and Communication)
✅️ ➤ सिंधू लिपी – अद्याप न उलगडलेली
✅️ ➤ चित्रलिपी व चिन्हांचा वापर
✅️ ➤ शिक्कांवर लिपी – धार्मिक, व्यापार संदर्भ
✅️ ➤ लेखन केवळ व्यापारापुरता मर्यादित असावा अशी शक्यता
8. कृषिप्रधान अर्थव्यवस्था (Agrarian Economy)
✅️ ➤ शेती – गहू, बार्ली, भात, कापूस
✅️ ➤ मातीचे नांगर – बनवाली येथे सापडले
✅️ ➤ कृत्रिम सिंचन यंत्रणा, विहिरी
✅️ ➤ जनावरांचे पालन – बैल, मेंढ्या, बकऱ्या
✅️ ➤ उष्टावलेली शेतजमीन वापरण्याची कलपणा
9. हस्तकला व उद्योग (Artisan Craftsmanship & Industries)
✅️ ➤ मण्ये तयार करणं, वस्त्रनिर्मिती
✅️ ➤ चामड्याचे काम, दगडावरील कोरीव काम
✅️ ➤ लोणच्याच्या बाटल्यांसारखी मृत्तिकापात्रे
✅️ ➤ सौंदर्यप्रसाधने – सुगंधी तेल, काजळदाणी
✅️ ➤ दगडी शिल्पकला व टेराकोटा मूर्ती
🔎 महत्त्वाचा निष्कर्ष
✅️ ➤ सिंधू खोरे संस्कृती ही एक परिपूर्ण शहरी नागरी जीवनाची उन्नत नमुना होती.
✅️ ➤ तिचे स्थापत्यशास्त्र, व्यापार, धार्मिक श्रद्धा, स्वच्छता आणि सामाजिक रचना भारतीय उपखंडातील पुढील संस्कृतींवर खोलवर प्रभाव टाकणारे होते.
✅️ ➤ आधुनिक नागरी व्यवस्थेसाठीही तिचे तत्त्वज्ञान आजही प्रेरणादायी ठरते.
सिंधू खोरे संस्कृती – मुख्य आयात सामग्री (Major Imports in IVC)
1. तांबे (Copper)
✅️ ➤ राजस्थान (खेतडी) – भारतातील प्रमुख खाण
✅️ ➤ बलुचिस्तान – द्रव्य बनवण्यासाठी वापर
✅️ ➤ ओमान – पुरातत्व उत्खननांतून पुरावे उपलब्ध (Magan म्हणून उल्लेख)
2. चांदी (Silver)
✅️ ➤ अफगाणिस्तान – सीमोल्लंघन व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र
✅️ ➤ इराण – वस्तु विनिमय स्वरूपातील व्यापार संबंध
3. सोनं (Gold)
✅️ ➤ कर्नाटक – प्राचीन सोन्याच्या खाणी (Kolar Gold Fields)
✅️ ➤ अफगाणिस्तान – मध्य आशियातील सांस्कृतिक व व्यापारी संपर्क
✅️ ➤ इराण – मौल्यवान धातूंचे आयात केंद्र
4. टिन (Tin)
✅️ ➤ अफगाणिस्तान – कांस्य तयार करण्यासाठी तांब्याबरोबर मिश्रण
✅️ ➤ इराण – धातुकाम व भांडी बनविण्याच्या उपयोगासाठी
5. लॅपिस लेझुली (Lapis Lazuli)
✅️ ➤ मेसोपोटेमिया – निळसर रंगाचा मौल्यवान दगड
➤ दागिने, शिक्के व सौंदर्यप्रसाधने यामध्ये वापर
➤ बदलापुरते व्यापार (transit trade) अफगाणिस्तानमार्गे होत असे
6. शिसं (Lead)
✅️ ➤ इराण – मृदू धातू, सीलबंद वस्तूंमध्ये वापर
📦 इतर आयात वस्तू (Other Probable Imports)
✅️ ➤ नील (Indigo) – रंगासाठी, शक्यता द्रविड भाषिक प्रदेशातून
✅️ ➤ साजसामान व दागिने – मेसोपोटेमियातून
✅️ ➤ समुद्रमार्गाने लोखंडाची शक्य आयात (पुष्टी नसलेली)
✅️ ➤ नैसर्गिक खडे व खनिजे – पश्चिम व मध्य आशियातून
🌐 व्यापारी संबंध व वैशिष्ट्ये
✅️ ➤ सिंधू संस्कृतीचे व्यापारी संबंध मेसोपोटेमिया, फारस (इराण), ओमान व अफगाणिस्तान या प्रदेशांशी होते
✅️ ➤ मेसोपोटेमियन मजकुरांमध्ये ‘Meluhha’ या नावाने उल्लेख – संशोधक IVCशी संबंधित मानतात
✅️ ➤ समृद्ध बंदरव्यवस्था (लोथल, सुत्कोटदा) हे आयात-निर्यात व्यापाराचे प्रमुख केंद्र
✅️ ➤ आयात वस्तूंचा उपयोग मुख्यतः धातुकाम, दागदागिने, व्यापार चिन्हे, व सामाजिक प्रतिष्ठेसाठी
🔎 निष्कर्ष
✅️ ➤ सिंधू संस्कृती ही एक जागतिक दृष्टीकोन असलेली नागरी संस्कृती होती
✅️ ➤ विविध देशांतील नैसर्गिक संसाधने आयात करून स्थानिक उद्योग व व्यापाराची भरभराट साधण्यात ती यशस्वी ठरली
✅️ ➤ आयातीत वस्तूंच्या उपयोगामध्ये तांत्रिक प्राविण्य व सौंदर्यशास्त्र यांचा सुंदर संगम दिसून येतो
सिंधू खोरे संस्कृतीचा ऱ्हास – कारणे, सिद्धांत व शास्त्रज्ञांची मते
1.📉 ऱ्हासाची सुरुवात व स्वरूप
✅️ ➤ अंदाजे इ.स.पू. 1900 पासून टप्प्याटप्प्याने ऱ्हास
✅️ ➤ नागरी व्यवस्थेचा ऱ्हास, शहरांची gradual abandonment
✅️ ➤ ही समजूत बहुतेक पुरातत्त्ववेत्ते व इतिहासकारांमध्ये स्वीकारली गेली आहे (Marshall, Wheeler यांचे प्रारंभिक निरीक्षण)
2.🌊 नैसर्गिक आपत्ती सिद्धांत
प्रमुख शास्त्रज्ञ : R.E.M. Wheeler
✅️ ➤ पूर व भूकंपांमुळे नागरी केंद्रांचे विनाश
➤ घरं व रस्ते गाळाने झाकले गेले (30 फूटपर्यंत साचलेला गाळ)
➤ भूगर्भीय हालचालींमुळे नदीच्या प्रवाहात अडथळा
✅️ ➤ टीका : सर्व भागांचा ऱ्हास स्पष्ट होत नाही; tectonic effect सर्व नदीमार्ग रोखू शकत नाही
3.🌊 सिंधू नदीचा मार्ग बदल सिद्धांत
प्रमुख शास्त्रज्ञ : Raikes व G.F. Dales
✅️ ➤ सिंधू नदी नागरी भागांपासून दूर गेली
✅️ ➤ पाण्याची टंचाई, कृषी व जलसंवर्धन व्यवस्था ढासळली
✅️ ➤ हडप्पामधील साचलेला गाळ वाऱ्यांमुळे, पूरामुळे नव्हे
✅️ ➤ टीका : मोहनजोदडोचे abandonment स्पष्ट होते, पण संपूर्ण ऱ्हासाचे स्पष्टीकरण अपूर्ण
4.🌦️ हवामान बदल सिद्धांत (Climate Change)
प्रमुख शास्त्रज्ञ : B.B. Lal, R.S. Bisht
✅️ ➤ कोरडे हवामान वाढले; अर्ध-कोरड्या क्षेत्रांत (Harappa) कृषी ऱ्हास
✅️ ➤ घग्गर-हकरा नदी (सरस्वती) आटली
✅️ ➤ tectonic हालचालींमुळे नदी मार्ग बदलले
✅️ ➤ टीका : घग्गर नदी आटण्याचे अचूक कालमापन उपलब्ध नाही
5.⚔️ आर्य आक्रमण सिद्धांत (Aryan Invasion Theory)
प्रमुख शास्त्रज्ञ : Mortimer Wheeler
✅️ ➤ आर्य आक्रमणामुळे संस्कृतीचा ऱ्हास
➤ मोहनजोदडो व हडप्पामधील सांगाडे – युद्धजन्य हत्येचा पुरावा
➤ ऋग्वेदातील ‘दास’ किल्ले व ‘पूरंदर’ देवाचा उल्लेख
✅️ ➤ टीका : आर्यांचे आगमन इ.स.पू. 1500 नंतरचे; हडप्पा ऱ्हास इ.स.पू. 1800 मध्ये
➤ सांस्कृतिक संघर्ष होण्याची शक्यता कमी
6.🌱 पर्यावरणीय असंतुलन सिद्धांत (Ecological Imbalance Theory)
प्रमुख शास्त्रज्ञ : D.P. Agrawal, S.P. Gupta
✅️ ➤ अति जंगलतोड, अन्नसंपत्तीचा अति वापर
✅️ ➤ हवामानात कोरडेपणा, सरस्वती नदीचे आटणे
✅️ ➤ कृषी आधारशिला ढासळली
✅️ ➤ लोकांचे गंगा खोऱ्यात स्थलांतर
7.🔄 परंपरेचे सातत्य (Continuity Theory)
प्रमुख शास्त्रज्ञ : Jim Shaffer, B.B. Lal, R.S. Bisht
✅️ ➤ ‘ऱ्हास’ ऐवजी ‘सातत्य आणि रूपांतरण’
✅️ ➤ काही स्थळे टिकून राहिली
✅️ ➤ धार्मिक चिन्हे (स्त्रीमूर्ती, योगमुद्रा) हिंदू परंपरेवर प्रभाव
✅️ ➤ मण्ये, धातुकाम, कापूस शेतीसारख्या तंत्रांचा उत्तरभारतीय संस्कृतींमध्ये वापर
🔎 निष्कर्ष
सिंधू संस्कृतीचा ऱ्हास हा एका घटकामुळे नव्हे, तर पर्यावरणीय, भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक घटकांच्या संयुक्त प्रभावामुळे झाला. मात्र, तिच्या स्थापत्य, कृषी व धार्मिक परंपरांचा ठसा पुढील भारतीय संस्कृतींवर स्पष्टपणे आढळतो.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 सामान्य विज्ञान -General Science
1. भौतिकशास्त्र (PHYSICS)
➤ मोजमापन – Measurement
➤ गुरुत्वाकर्षण – Gravitation
➤ दाब – Pressure
➤ ऊर्जा, कार्य आणि शक्ती – Energy, Work and Power
➤ ध्वनी – Sound
➤ प्रकाश – Light
➤ विद्युतधारा – Electric Current
➤ चुंबकत्व आणि विद्युत चुंबकीय पट्टा – Magnetism and Electromagnetic Field
➤ सूर्यमाला – Solar System
➤ समीकरणे – Equations
➤ शोध आणि पुरस्कार – Discoveries and Awards
2. रसायनशास्त्र (CHEMISTRY)
➤ द्रव्य आणि वर्गीकरण – Matter and its Classification
➤ अणू व त्याची संरचना – Atoms and their Structure
➤ मूलद्रव्य आणि आवर्तसारणी – Elements and Periodic Table
➤ खनिजे व धातुके – Minerals and Metallurgy
➤ कार्बनचे जग – The World of Carbon
➤ आम्ल, आम्लारी व क्षार – Acids, Bases and Salts
➤ रासायनिक अभिक्रिया – Chemical Reactions
➤ किरणोत्सारिता – Radioactivity
➤ दैनंदिन वापर – Daily Uses
3. जीवशास्त्र (BIOLOGY)
➤ पेशी, उती आणि प्रकार – Cells, Tissues and their Types
➤ रक्ताभिसरण – Circulatory System
➤ श्वसनसंस्था – Respiratory System
➤ उत्सर्जन संस्था – Excretory System
➤ पचनसंस्था – Digestive System
➤ प्रजनन संस्था – Reproductive System
➤ अस्थिसंस्था – Skeletal System
➤ मानवातील ग्रंथी, संप्रेरके व विकरे – Human Glands, Hormones and Disorders
➤ जैवतंत्रज्ञान – Biotechnology
➤ मानवी उत्क्रांती – Human Evolution
➤ प्राणी वर्गीकरण – Animal Classification
➤ वनस्पतीशास्त्र – Botany
4. आरोग्यशास्त्र (HEALTH SCIENCE)
➤ पोषण – Nutrition
➤ मानवी आजार – Human Diseases
5. विज्ञान व तंत्रज्ञान (SCIENCE & TECHNOLOGY)
➤ आण्विक ऊर्जा – Nuclear Energy
➤ अवकाश तंत्रज्ञान – Space Technology
➤ संगणक – Computer (चालू घडामोडी संदर्भात)
📌 सूचना (Important Note)
Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या.
📚 स्रोत (Sources):
1.९ वी व १० वी राज्य मंडळाची विज्ञानाची पुस्तके आणि 11 वी 12 विज्ञानाची पुस्तके
2. भस्के सरांचा updated Science book
3. PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक
👉🏻 तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या गरजेनुसार एकच सर्वसमावेशक पुस्तक निवडावं.
👉🏻 तुमच्याकडे चांगले Class Notes असतील, तर त्यांचा व्यवस्थित उपयोग करावा.
👉🏻 जेव्हा आपण PYQs (मागील प्रश्नपत्रिका) चा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा मिळते.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 अर्थव्यवस्था - Economy
1.राष्ट्रीय उत्पन्न - National Income, GDP, GNP, NDP, NNP, GDP Per Capita income, Green GDP, Gross Happiness Index.
2.आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास व मानव विकास - Economic Growth, Economic Development and Human Development
3.शाश्वत विकास - Sustainable Development, SDGs, MDGs, Paris Agreement etc
4.दारिद्र्य आणि बेरोजगारी - Poverty and Unemployment, Pverty Alleviation Programms
५. कृषी आणि जमीनसुधारणा - Agriculture and Land Reforms
६. बँकिंग - Banking
७. सार्वजनिक वित्त - Public Finance, Gender Budget
८. चलन आणि भाववाढ - Currency and Inflation
९. नियोजन/पंचवार्षिक योजना - Planning/Five-Year Plans
१०. जनसांख्यिकी - Demography
११. आर्थिक समावेशन : आरोग्य, शिक्षण, रोजगार, ग्रामीण आणि शहरी विकास - Economic Inclusion: Health, Education, Employment, Rural and Urban Development
१२. सामाजिक समावेशन : बालक, महिला, अपंग आणि सामाजिक सुरक्षा - Social Inclusion: Children, Women, Disabled and Social Security
१३. आर्थिक सुधारणा आणि LPG धोरण - Economic Reforms and LPG Policy
१४. आंतरराष्ट्रीय संस्था - International Institutions
१५. इतर -Others
📌 सूचना (Important Note)
Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या.
📚 स्रोत (Sources):
1.राज्य मंडळाची पुस्तके (State Board Sources)
2. देसले सरांचं इकॉनॉमिक्स बुक Part 1 & Part 2 ( Selected Topics )
3. कोळंबे सरांचा इकॉनॉमिक्स बुक
4.PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक
👉🏻 सध्या मार्केटमध्ये अनेक उत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एकच परिपूर्ण पुस्तक निवडा.
👉🏻 चांगले Class Notes असतील तर त्याचा पुरेपूर उपयोग करा. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि मानव मानवी विकास या टॉपिक साठी
👉🏻 जेव्हा आपण PYQs चा ट्रेंड पाहू, तेव्हा अभ्यासाला अधिक स्पष्ट दिशा मिळेल.
👉🏻 भारताचा इकॉनॉमिक सर्वे आणि महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे चालू वर्षाचा
सामान्य विज्ञान टॉपिक निहाय नोट्स
✅ ज्ञानेंद्रिये (Sensory Organs):-
🔰 प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.
✅ डोळे (Eyes) 👀 :-
🔰 ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.
🔰 पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.
🔰 अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.
========================
💘 बुबुळ (Cornea):-
🔰 नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.
🔰 बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.
========================
💘 दृष्टिपटल (Retina):
🔰 हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.
========================
💘 दृष्टीसातत्य :
🔰 वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.
========================
💘 दृष्टिदोष (Defects Of Vision):
🔰 दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.
💘) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Near-sightedness):
🔰 जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
🔰 डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते.
🔰 प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.
⭐️ उपाय: अंतर्गोल (Concave) भिंगाचा चष्मा
========================
💘) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):
◆ दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.
⭐️ उपाय: बहिर्गोल (Convex) भिंगाचा चष्मा.
========================
💘) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):
◆ बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.
◆ त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.
⭐️ उपाय: दंडगोलाकार (Cylindrical) भिंगाचा चष्मा.
========================
💘) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):
🔰 वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.
⭐️ उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.
पोलीसभरती प्रश्नसंच
०१) महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र कोठे आहे ?
- वेगुर्ला.(सिंधुदुर्ग )
०२) सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रचलित नाव काय आहे ?
- भारताचे बिस्मार्क.
०३) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
- अकोला.
०४)) भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहे ?
- डॉ.व्हर्गीस कुरियन.
०५) भारतातील किती राज्यांस समुद्रकिनारा लागला आहे ?
- नऊ.
०१) महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे ?
- डिग्रज.(सांगली)
०२) कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते आहे ?
- बा.
०३) डॉ.बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
- दापोली.(रत्नागिरी)
०४) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहे ?
- सँम पित्रोदा.
०५) भारतातील सर्वांत मोठी आदिवासी जमात कोणती आहे ?
- गोंड.
०१) महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे ?
- डिग्रज.(सांगली)
०२) कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते आहे ?
- बा.
०३) डॉ.बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
- दापोली.(रत्नागिरी)
०४) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहे ?
- सँम पित्रोदा.
०५) भारतातील सर्वांत मोठी आदिवासी जमात कोणती आहे ?
- गोंड.
०१) महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे ?
- भाट्ये.(रत्नागिरी)
०२) ब्रिजलाल बियाणी यांचे प्रचलित नाव काय आहे ?
- विदर्भ केसरी.
०३) आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहे ?
- जवाहरलाल नेहरू.
०४) भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ?
- वुलर.
०५) राजीव भाटीया हे चित्रपटात कोणत्या नावाने कार्यरत आहे ?
- अक्षय कुमार.
०१) महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ?
- श्रीवर्धन.(रायगड)
०२) रशियामधून प्रक्षेपित केलेला भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे ?
- आर्यभट्ट.
०३) भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण ?
- सुरेंद्रनाथ चँटर्जी.
०४) जगप्रसिध्द पुष्कर सरोवर कोठे आहे ?
- अजमेर.(राजस्थान)
०५) देवदत्त पिरोशीमल यांना कोणत्या नावाने ओळखतात ?
- देव आनंद.
०१) महाराष्ट्रात राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र आहे ?
- राजगुरूनगर.(पुणे)
०२) औद्यागिक क्षेत्रामध्ये शक्तीच्या मापनासाठी कोणते एकक वापरतात ?
- अश्वशक्ती.
०३) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोण आहे ?
- सरदार वल्लभभाई पटेल.
०४) अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव कोणते आहे ?
- श्रीवास्तव.
०५) जुदो हा कुस्ती सारखा खेळला जाणारा खेळ कोणत्या देशातील आहे ?
- जपान.
०१) महाराष्ट्रात मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोठे आहे ?
- नागपूर.
०२) कोणत्या प्रक्रियेने पृथ्वीचे अंदाजे वय काढणे शक्य आहे ?
- कार्बन डेटिंग.
०३) मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण आहे ?
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
०४) युसुफ खान चित्रपटसृष्टीत कोणत्या नावाने परिचित आहे ?
- दिलीप कुमार.
०५) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?
- मिश्र.
०१) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
- १ मे १९६०.
०२) कृष्णा नदी कोठे उगम पावते ?
- महाबळेश्वर.
०३) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहे ?
- दादासाहेब फाळके.
०४) सुनील दत्त यांचे खरे नाव काय आहे ?
- बलराज.
०५) भारतात राष्ट्रपती,उपराष्ट्रपती निवडण्याचे काम कोण करते ?
- विधीमंडळ.
चालू घडामोडी प्रश्नोत्तरे
1. प्रश्न: नुकतेच ‘G7 शिखर परिषद 2025’ कुठे आयोजित होणार असल्याची घोषणा झाली?
उत्तर: कॅनडा
2. प्रश्न: 2025 मध्ये जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरू करणारा देश कोण ठरला?
उत्तर: भारत (राजस्थान – खेतेरी)
3. प्रश्न: ‘BRICS नवीन विकास बँक’च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: दिल्मा रुसॅफ (ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्ष)
4. प्रश्न: 2025 मध्ये ‘ऑलिम्पिक डे’ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर: 23 जून
5. प्रश्न: नुकतेच प्रसिद्ध लेखक ‘अमिताव घोष’ यांना कोणता साहित्य पुरस्कार जाहीर झाला?
उत्तर: O. Henry पुरस्कार
6. प्रश्न: WHO ने जाहीर केलेल्या ‘Global Tobacco Epidemic Report 2025’ मध्ये भारताची स्थिती कशी आहे?
उत्तर: तंबाखू नियंत्रणात प्रगती करणारा देश म्हणून उल्लेख
7. प्रश्न: ‘आंतरराष्ट्रीय MSME दिवस’ कधी साजरा केला जातो?
उत्तर: 27 जून
8. प्रश्न: नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या शहरात ‘ई-बस डिपो’चे उद्घाटन झाले?
उत्तर: पुणे
9. प्रश्न: ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’च्या पुढील हप्त्याचे वितरण कधी झाले?
उत्तर: 27 जून 2025
10. प्रश्न: भारतीय नौदलाचे नवीन चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: वाइस ॲडमिरल धनंजय सिंग
ठळक बातम्या. २८ जुन २०२५.
१.दिल्ली-मुंबई एक्सप्रेस
- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्गावर देशातील पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधला आहे.
- प्रकल्पात पाच ओव्हरपास आणि भारतातील सर्वात लांब वन्यजीव अंडरपास समाविष्ट आहेत, जे सर्व नैसर्गिक अधिवासांना त्रास न देता प्राण्यांची सुरक्षित हालचाल सक्षम असेल.
२.शांघाय सहकार्य संघटना.
- २०२५ ची एससीओ परिषद चीनमधील किंगदाओ येथे झाली.
- स्थापना: २००१ (शांघाय फाइव्ह, १९९६ पासून विकसित)
- सदस्य (२०२५): भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, बेलारूस
- मुख्यालय: सचिवालय - बीजिंग, RATS (प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचना) - ताश्कंद.
३.ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद.
- ताश्कंद येथे उझचेस कप मास्टर्स २०२५ जिंकून वर्षातील त्यांचे तिसरे मोठे बुद्धिबळ विजेतेपद मिळवले.
- डी. गुकेश (२७७६.६) – आता जागतिक क्रमवारीत ५ वा.
४.सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड.
- देशातील पहिली सागरी क्षेत्र -केंद्रित नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) - सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (SMFCL)
- कंपनी कायदा २०१३ अंतर्गत ऑगस्ट २०१६ मध्ये एसएमएफसीएलची स्थापना सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून करण्यात आली.
५.हॉकी इंडिया मास्टर्स कप २०२५
- हॉकी इंडिया मास्टर्स कप २०२५ च्या पहिल्या आवृत्तीत , हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा आणि हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाचे विजेतेपद जिंकले .
- मास्टर कप ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुष खेळाडूंसाठी होता आणि महिलांसाठी ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा निकष होता.
- मास्टर्स कप २०२५ मध्ये बारा पुरुष आणि आठ महिला संघांनी भाग घेतला.
27 June 2025
27 जून 2025 चालु घडामोडी 👇
1) नीरज चोप्रा ने ओस्ट्रावा गोल्डन ॲथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत विजेतेपद पटकावले आहे ?
✅ ८५.२९ मीटर
2) सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे. तिला नुकताच पूर आल्यामुळे चर्चेत होती ?
✅ झारखंड
3) आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत ?
✅ २७ पदके
4) ललित उपाध्यय या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे ?
✅ हॉकी
5) जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धा २०२५ कोठे होणार आहे ?
✅ अमेरिका
6) SDG निर्देशांक २०२५ मध्ये भारताने १६७ देशामध्ये कितवा क्रमांक पटकावला आहे ?
✅ ९९ वा
7) SDG निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?
✅ फिनलंड
8) पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDA च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
✅ शिवसूब्रमणियन रमण
9) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो ?
✅ २३ जून
1) अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याला कोणते नाव देण्यात आले ?
✅ "ऑपरेशन मिडनाईट हॅमर"
2) भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली आहे ?
✅ लेह लडाख
3) आशियाई वैयक्तिक स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताच्या वेलावन सेंथिलकुमार ने कोणते पदक जिंकले आहे ?
✅ कांस्य
4) अरालम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, जे देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले आहे ?
✅ केरळ
5) यूपीएससी परीक्षेत अपयशी ठरलेल्यांसाठी नुकतेच कोणती योजना सुरू झाली आहे ?
✅ 'प्रतिभा सेतू'
6) १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत कोणत्या राज्यात ‘माझी वसुंधरा अभियान ६.0’ राबविण्यात येणार आहे ?
✅ महाराष्ट्र
7) WINGS TO OUR HOPES हे पुस्तकं कोणाचे आहे ?
✅ द्रोपती मूर्मु
8) भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे ?
✅ त्रिपुरा
9) भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे ?
✅ मिझोरम
10) भारत कोणत्या देशातून सर्वाधिक उत्पादन आयात करतो ?
✅ रशिया
26 जून चालु घडामोडी "मिशन "ॲक्सिऑम-४"
41 वर्षानंतर भारतीय व्यक्ती अंतराळात जात आहे त्यामुळे भारतासाठी हे मिशन अत्यंत महत्त्वाचे
1) राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय कोण ठरले आहेत ?
✅ शुभांशू शुक्ला
2) शुभांशू शुक्ला हे कोणत्या मोहीमेअंतर्गत अंतराळात गेले आहेत ?
✅ ‘ॲक्सिऑम-४’
3) ॲक्सिऑम-४’ ही अंतराळ मोहीम किती दिवसाची आहे ?
✅ १४ दिवस
4) ‘ॲक्सिऑम-४ हे कोणाकोणत्या देशाचे सामूहिक मिशन आहे ?
✅ भारत, पोलंड, हंगेरी, अमेरीका
5) ॲक्सिऑम-४ या मिशनसाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचे नाव काय ?
✅ ‘फाल्कन-९'
6) ॲक्सिऑम-४ हे मिशन अंतराळात कधी प्रक्षेपित करण्यात आले ?
✅ 25 जून 2025
7) ॲक्सिऑम-४ हे मिशन कोणत्या संस्थेद्वारे प्रक्षेपित करण्यात आले ?
✅ नासा
8) ॲक्सिऑम-४ हे मिशन कोणत्या ठिकाणावरून प्रक्षेपित करण्यात आले ?
✅ केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा
9) ॲक्सिऑम-४ या मोहिमेचे नेतृत्व कोण करत आहेत ?
✅ पेगी व्हाइट्सन
10) ॲक्सिऑम-४ या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे ?
✅ अंतराळात संशोधन करणे आणि अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग करणे
26 June 2025
सत्तेच्या हस्तांतरणाकडे
ऑगस्ट घोषणा - 1940
क्रिप्स योजना - 1942
राजाजी योजना - जुलै 1944
गांधी-जिना बोलणी 9 ते 27 सप्टेंबर 1944
देसाई-लियाकत अली योजना - 1945
वेव्हेल योजना - 14 जून 1945
सिमला परिषद - 25 जून ते 14 जुलै 1945
कॅबिनेट (त्रिमंत्री) मिशन - 16 मे 1946
अॅटली घोषणा - 20 फेब्रुवारी 1947
माउंटबॅटन योजना - 3 जून 1947
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा - 18 जुलै 1947
होर्मुझ खाडीवर स्पर्धा परीक्षांमध्ये (MPSC, UPSC, PSI, Talathi इ.) खालीलप्रमाणे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात:
✅ 1. वस्तुनिष्ठ (MCQ) प्रकारातील संभाव्य प्रश्न:
1️⃣ होर्मुझ खाडी कोणत्या देशांदरम्यान आहे?
A) इराण आणि ओमान
B) सौदी अरेबिया आणि यमन
C) इराक आणि कुवेत
D) ओमान आणि बहरीन
उत्तर: A) इराण आणि ओमान
2️⃣ जगातील सुमारे किती टक्के खनिज तेलाची वाहतूक होर्मुझ खाडीद्वारे होते?
A) 10%
B) 20%
C) 30%
D) 5%
उत्तर: B) 20%
3️⃣ खाडीतील कोणता भाग “तेल वाहतुकीचा जीवघेणा मार्ग” म्हणून ओळखला जातो?
A) बाब अल-मनदेब
B) होर्मुझ खाडी
C) मलक्का सामुद्रधुनी
D) पर्शियन आखात
उत्तर: B) होर्मुझ खाडी
4️⃣ खाडीतील तणाव कोणत्या दोन देशांमध्ये अधिक जाणवतो?
A) इराण - अमेरिका
B) इराण - भारत
C) ओमान - कुवेत
D) यमन - इराक
उत्तर: A) इराण - अमेरिका
✅ 2. वर्णनात्मक (Short Notes/Explain) प्रकारातील संभाव्य प्रश्न:
✍️ 1. होर्मुझ खाडीचे भौगोलिक आणि सामारिक महत्त्व स्पष्ट करा
✍️ 2. होर्मुझ खाडीतील तणावाचा जागतिक तेलबाजारावर होणारा परिणाम लिहा.
✍️ 3. होर्मुझ खाडीला ‘रणनीतिक जलमार्ग’ का म्हटले जाते?
✍️ 4. पर्शियन आखातातील राजकारण व होर्मुझ खाडी यांचा संबंध स्पष्ट करा.
✅ 3. नकाशा ओळख (Map-based Questions):
📍प्रश्न:
खालील नकाशात होर्मुझ खाडी दर्शवा.
(अशा प्रकारचे प्रश्न UPSC/MPSCच्या भूगोलाच्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात.)
✨ उपयुक्त टिप:
होर्मुझ खाडीवर चालू घडामोडी, संघर्ष, तेलटँकर हल्ले, नौदल हालचाली यासारख्या घटनांमुळे यावर नेहमीच चालू घडामोडी + भूगोल + आंतरराष्ट्रीय संबंध या विभागात प्रश्न विचारले जाऊ शकतात.
आशा रेडिओ पुरस्कार 2025
🗓️ तारीख: 21 जून 2025
📍 ठिकाण: यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई
🎶 उपक्रम: विश्व संगीत दिनानिमित्त
🎤 आयोजक: सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन
➡️ पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे
🏆 प्रमुख पुरस्कार व विजेते:
1️⃣ जीवन गौरव : ज्येष्ठ गीतकार विश्वनाथ ओक
2️⃣ बेस्ट मेल आरजे ऑफ द इयर
🎙️ RJ Jeeturaaj (Mirchi)
→ कविता, कथा व सामाजिक संवादातून प्रभावी प्रस्तुती.
3️⃣ बेस्ट स्टोरीटेलिंग रेडिओ शो
📻 आवाज की दुनिया
→ उत्कृष्ट कथाकथन व आवाजातील विविधता.
4⃣ बेस्ट सोशल इम्पॅक्ट शो
🌍 रेडिओ समजून घ्या
→ समाजप्रबोधन, आरोग्य व शिक्षणविषयक कार्यक्रम
5⃣ सर्वोत्कृष्ट महिला निवेदक : रेडएफएम मलिशा
6⃣ सर्वोत्कृष्ट रेडिओकेंद्र : रेडिओ सिटी
7⃣ सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओकेंद्र : विकास भारती रेडिओकेंद्र, नंदूरबार
👑 विशेष उपस्थिती:
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
- संगीतसम्राज्ञी आशा भोसले
🎯 उद्दिष्ट:
रेडिओ माध्यमातील नावीन्य, सामाजिक प्रभाव व मराठी सांस्कृतिक योगदानाला प्रोत्साहन देणे.
#award
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
☑️ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
☑️ वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🔖 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
💵 Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025 (11:00 PM)
✉️ परीक्षा : 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025
➡️ Apply Link :- https://ssc.gov.in/
चालू घडामोडी :- 25 जून 2025
◆ SCO ची 2025 ची संरक्षण मंत्र्याची बैठक चीन देशात आयोजित करण्यात येणार आहे.
◆ चीन मध्ये आयोजित SCO ची 2025 ची संरक्षण मंत्र्याची बैठक मध्ये भारतातर्फे राजनाथ सिंह हजर राहणार आहेत.
◆ आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन थायलंड मध्ये करण्यात आले होते.
◆ आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने 27 पदके जिंकली आहेत. [4 सुवर्ण पदके]
◆ ललित उपाध्यय ने हॉकी खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. [ते उत्तर प्रदेश राज्याशी सबंधित आहे.]
◆ जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती "सोने" बनली आहे.
◆ डेहराडून ठिकाणच्या BSS मटेरियल कंपनीने AI आधारित ऑटोनॉमस लेथल वेपन सिस्टीम नेगेव एलएमजी ची यशस्वी चाचणी घेतली आहे.
◆ जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धा 2025 अमेरिका देशात होणार आहे.
◆ अमेरिकेत होणाऱ्या जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र साळवे पॉवरलिफ्टिंग खेळाचे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
◆ महाराष्ट्रात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी 802 किलोमीटर आहे.
◆ SDG निर्देशांक 2025 मध्ये फिनलंड देश प्रथम क्रमांकावर आहे.
◆ SDG निर्देशांक 2025 मध्ये भारताने 167 देशामध्ये 99वा क्रमांक पटकावला आहे. [यामध्ये भारताचा स्कोअर 67 आहे.]
◆ पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDA च्या अध्यक्ष पदी शिवसूब्रमणियन रमण यांची नियुक्ती झाली आहे.
प्राचीन भारताचा इतिहास
🪨 1. अश्मयुग: संकल्पना आणि कालखंड
➤ "अश्म" म्हणजे दगड; अश्मयुग म्हणजे दगडी अवजारांचा काळ
➤ यामध्ये मानवाने हत्यारे, अवजारे इत्यादी दगडापासून तयार केली
➤ याचे तीन प्रमुख टप्पे आहेत:
➤ पुरापाषाण (Paleolithic) – खूप जुन्या दगडी अवजारांचा काळ
➤ मध्यपाषाण (Mesolithic) – संक्रमण काळ
➤ नवाश्म (Neolithic) – नवीन दगडी अवजारांचा काळ
🌍 2. पृथ्वी व मानवाचा उगम
➤ पृथ्वीचा उगम सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाला
➤ चतुर्थक (Quaternary) कालखंडात मानवाचा विकास झाला
➤ मानवाचा उगम सुमारे २६ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाला
➤ भारतात मानवाचे अवशेष नाहीत, पण हत्यारे (उदा. बोरी, महाराष्ट्र) सापडले आहेत
🗿 3. पुरापाषाण युग (इ.स.पू. २५०,००० - १०,०००)
➤ शिकारी आणि अन्न संकलक जीवनशैली
➤ तासलेले व टवके फोडलेले दगडी हत्यारे
➤ निवास – नैसर्गिक गुहा, जंगलातील निवारे
➤ प्रमुख स्थळे – भीमबेटका, बेलन खोरे, नर्मदा खोरे, कर्नूल, छोटा नागपूर पठार
➤ हवामान – हिमयुग, थंड व पावसाळी
📜 4. पुरापाषाण युगाचे तीन टप्पे
4.1 निम्न पुरापाषाण (२५०,००० - १००,००० BCE)
➤ मोठ्या हस्तकुऱ्हाडी, चॉपर, क्लीवर
➤ स्थळे – सोहन खोरे, भीमबेटका, बेलन खोरे
4.2 मध्य पुरापाषाण (१००,००० - ४०,००० BCE)
➤ फ्लेक्स, टोकदार अवजारे
➤ स्थळे – नर्मदा, तुंगभद्रा खोरे
4.3 उच्च पुरापाषाण (४०,००० - १०,००० BCE)
➤ ब्लेड्स, स्क्रॅपर्स, ब्युरिन्स
➤ होमो सेपियन्सचा उदय
➤ स्थळे – महाराष्ट्र, आंध्र, गुजरात
🪶 5. मध्यपाषाण युग (Mesolithic) (९००० - ५००० BCE)
➤ मायक्रोलिथ (लहान धारदार दगड) अवजारे
➤ शिकार, मासेमारी, अन्न संकलन
➤ पशुपालनास प्रारंभ
➤ महत्त्वाची स्थळे – बागोर, आझमगड, कृष्णा खोरे
➤ सांबार सरोवर – वनस्पती लागवडीचे पुरावे
🎨 6. प्रागैतिहासिक चित्रकला
➤ भीमबेटका – भारतातील प्रसिद्ध चित्रमय गुहा
➤ ५०० हून अधिक गुहा – शिकारी, मानवाकृती, प्राणी
➤ चित्रकला लोहयुगापर्यंत सुरू होती
🌾 7. नवाश्म युग (Neolithic Age)
➤ भारतात सुरुवात – इ.स.पू. ७०००
➤ स्थायिक जीवनशैली, शेती, पशुपालन
➤ गुळगुळीत दगडी अवजारे व कुऱ्हाड
➤ मृदभांडी – हाताने व चाकावर बनवलेली
➤ स्थळे – मेहरगढ, बुर्झहोम, चिरंद, पिकलिहळ, मिर्झापूर
📍 8. भारतातील नवाश्म युगाची स्थळे
➤ मेहरगढ – गहू, कापूस, विटांची घरे
➤ बुर्झहोम – खड्ड्यातील घरे, हाडांची अवजारे
➤ चिरंद – हाडे, शिंगांचा वापर
➤ पिकलिहळ – गोठे, राखेचे ढिगारे
➤ मिर्झापूर – तांदूळ शेती
➤ गारो टेकड्या (आसाम-मेघालय) – अवशेष
🏡 9. नवाश्म युगातील जीवनशैली व मर्यादा
➤ घरे – बांबू, माती, विटांची
➤ शेती – रागी, कुळीथ, तांदूळ
➤ पशुपालन – गुरे, मेंढ्या, बकऱ्या
➤ मृदभांडी – काळी, करडी, चटई डिझाइन
➤ मर्यादा – अन्न उत्पादन कमी, कठोर परिश्रम
🧱 10. महाराष्ट्रातील नवाश्म व मध्यपाषाण स्थळे
➤ इनामगाव, पाटण, हतकलंगणा – नवाश्म व मध्यपाषाण संशोधन
➤ पाषाण (रायगड), हातखंबा (रत्नागिरी), नेवासा (अहमदनगर)

G7 शिखर परिषद व भारताचा सहभाग
🔷 G7 म्हणजे काय?
✔️ G7 = Group of Seven (सात प्रगत औद्योगिक देशांचा गट)
✔️ हा एक अनौपचारिक आंतरराष्ट्रीय मंच आहे
✔️ उद्देश:
➤ जागतिक अर्थव्यवस्था
➤ आंतरराष्ट्रीय व्यापार
➤ हवामान बदल
➤ तंत्रज्ञान
➤ जागतिक सुरक्षा या विषयांवर चर्चा करून धोरणनिर्मिती
🌐 G7 चे सदस्य देश:
🇺🇸 अमेरिका
🇬🇧 युनायटेड किंगडम
🇫🇷 फ्रान्स
🇩🇪 जर्मनी
🇮🇹 इटली
🇯🇵 जपान
🇨🇦 कॅनडा
📜 G7 चा इतिहास:
✔️ स्थापना: 1975
✔️ 1997 ला रशिया सामील झाला → G8 झाला
✔️ 2014: रशियाने क्रिमियावर आक्रमण केल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले → पुन्हा G7
🗓️ G7 शिखर परिषदा:
✔️ 2024 → इटली
✔️ 2025 → कॅनडा (कनानस्किस, अल्बर्टा)
🇮🇳 भारत आणि G7:
✔️ भारत हा G7 चा सदस्य नाही
✔️ परंतु, भारताला अनेकदा विशेष आमंत्रित देश म्हणून निमंत्रण दिले जाते
✔️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2025 मध्ये सलग सहावा सहभाग होता
📌 2025 G7 शिखर परिषद:
➤ कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय नियम
➤ जागतिक आर्थिक असमानता
➤ युक्रेन युद्ध व जागतिक शांतता
➤ हिंद-प्रशांत भागातील सुरक्षाव्यवस्था
➤ हवामान बदल व हरित ऊर्जा
ताम्रपाषाण युग (Chalcolithic Age)
➤ नवाश्म युगाच्या शेवटी तांबे वापरण्यास सुरुवात झाली
➤ दगड व तांब्याची उपकरणे वापरून नव्या संस्कृती उदयास आल्या
➤ हडप्पा संस्कृतीपूर्व किंवा समकालीन अशा अनेक संस्कृती विकसित झाल्या
➤ लोक दगड, तांबे व क्वचित कांस्याची साधने वापरत होते
➤ वसाहती नद्यांच्या काठी, डोंगरकडील व अर्धशुष्क भागात होत्या
📌 2. ताम्रपाषाण युगातील वसाहतींची ठिकाणे
१) राजस्थान
➤ अहर, गिलुंड (बनास नदी काठी – स्मेल्टिंग व तांब्याचे धातुकाम विकसित)
२) मध्यप्रदेश
➤ माळवा – रंगीत भांडी, कुंभारकाम, कृषिप्रधान जीवन
➤ कायथा – पॉलिश भांडी, श्रेणीभेद, धातू व हाडांचा वापर
➤ एरण – गढीसमान रचना, संरक्षित वसाहती
➤ नवदातोली – नर्मदा तीरावर, अन्नधान्यांची विविधता
३) महाराष्ट्र
➤ जोर्वे (प्रवरा नदीकाठी) – नावानुसार संस्कृतीचे नामकरण
➤ नेवासा – उत्तम शेती, भांड्यांचा पुरावा
➤ दायमाबाद – २० हेक्टर क्षेत्र, गढीसारखी बांधणी
➤ चांदोली – दगडी भांडी व भिंती
➤ इनामगाव – १००+ घरे व कबरी, घरे व गोडाऊन, धान्याचे कोठार
➤ प्रकाश – भांड्यांचे पुरावे, रंगकाम
➤ नाशिक – अर्धशुष्क भागात, भांड्यांची विविधता
➤ सावळदा – काळसर भांडी, कृषिप्रधान जीवन
४) गुजरात
➤ रंगपूर – विटांची घरे, लोहयुगात संक्रमण
➤ प्रभास – पूजास्थळे, लोखंडी साधने
५) बिहार/उत्तरप्रदेश/बंगाल
➤ चिरांद – गंगा खोऱ्यातील वसाहत
➤ पांडू राजर ढिबी, महिषदल – बंगाल
➤ सेनुवार, सोनपूर – बिहार
➤ खैरादीह, नरहन – पूर्व उत्तरप्रदेश
🔧 3. उपकरणे आणि तंत्रज्ञान
➤ दगडी पात्या, फलक, कुऱ्हाडी
➤ दक्षिण भारतात दगडी उपकरणांचा भरपूर वापर
➤ अहर, गिलुंड – तांब्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणात
➤ अहर – स्मेल्टिंग, धातुकाम विकसित
➤ महाराष्ट्र – सपाट आयताकृती तांब्याच्या कुऱ्हाडी, छिन्न्या
🌾 4. कृषी आणि आहार
➤ गहू, तांदूळ, बाजरी, मसूर, मूग, वाटाणा, उडीद
➤ नवदातोली – सर्वप्रकारची अन्नधान्ये
➤ कापूस, जवस, रागी, भरड धान्ये
➤ मासे, गोमांस, हरणाचे मांस
➤ उंटाचे अवशेष सापडले, घोड्यांचे नाही
➤ पश्चिम भारत – गहू, बार्ली, अधिक मांसाहार
➤ पूर्व भारत – तांदूळ, मासे
🏡 5. घरे आणि वसाहती
➤ अहर-गिलुंड – ४ हेक्टर क्षेत्र
➤ भाजलेल्या विटांचा क्वचित वापर
➤ सामान्यतः माती व तट्ट्यांची घरे
➤ अहर – दगडी घरे
➤ दायमाबाद – २० हेक्टर, गढीसमान दगडी संरचना
➤ इनामगाव – १००+ गोल व आयताकृती घरे, कबरी
➤ ५ खोल्यांचे प्रमुखाचे घर, धान्याचे कोठार
➤ वसाहतीभोवती खंदक
➤ महाराष्ट्रातील वसाहती – पर्जन्यकमीमुळे ओस
🎨 6. कला आणि हस्तकला
➤ मणी – तांबे, रक्ताश्म, स्टेटाइट, क्वार्ट्ज
➤ माळवा, महाराष्ट्र – सूत कातणे, कापड विणणे
➤ कुंभारकाम, धातुकाम, हाडकाम, मातीच्या मूर्ती
➤ लाल-काळ्या रंगाची चाकावरील भांडी
➤ स्टँडवरील ताटल्या, वाट्या, पाण्याची भांडी
➤ पूर्व भारतात रंगकाम कमी
➤ भांडी – शिजवणे, खाणे, साठवणूक
⚰️ 7. दहन-दफन पद्धती आणि धार्मिक आचरण
➤ मृतांना घराखाली कलशात पुरणे
➤ स्मशान नव्हते (हडप्पासारखे नव्हते)
➤ मृतासोबत तांब्याच्या वस्तू, भांडी ठेवली जात
➤ स्त्री मूर्ती – मातृदेवतेची पूजा
➤ बैलाच्या मूर्ती – धार्मिक प्रतीक
➤ पूर्व भारत – अंशतः शवपिंड; महाराष्ट्र – पूर्ण दफन
🏘️ 8. सामाजिक संरचना
➤ वसाहतींचा आकार व दफनप्रथांमधून सामाजिक विषमता
➤ मोठ्या वस्त्यांचे लहान वस्त्यांवर वर्चस्व
➤ वस्तिप्रमुख – मध्यभागी; शिल्पकार – बाहेर
➤ काही मुलांचे दफन – तांब्याच्या माळा; काही – फक्त भांडी
➤ कायथा – श्रीमंत घरात मौल्यवान वस्तू सापडल्या
🏺 9. गणेश्वर संस्कृती (राजस्थान)
➤ झुनझुनू जिल्ह्यातील खाणीजवळ
➤ बाण, गदे, मासे हुक, बांगड्या, घोड्याच्या मूर्ती
➤ भाजक्या मातीचे गोळे, हडप्पाशी साम्य दर्शवणारी उपकरणे
➤ गेरू रंगाची मातीची भांडी
➤ कालखंड – इ.स.पू. २८००-२२००
➤ उपजीविका – शेती व शिकारी
➤ हडप्पा संस्कृतीच्या विकासात मोलाचा हातभार
🌟 10. ताम्रपाषाण संस्कृतीचे महत्त्व व मर्यादा
➤ कालक्रम – हडप्पा पूर्व, समकालीन, हडप्पोत्तर
➤ हडप्पा पेक्षा स्वतंत्र वसाहती – माळवा, जोर्वे, कायथा
➤ जोर्वे – मोठी खेडी निर्माण
➤ विविध पीकवर्ग, अन्नधान्य वापर
➤ इनामगाव, एरण – गढीसमान संरचना
➤ पूर्व भारत – बांधकाम मर्यादित
11.मर्यादा
➤ दुग्धजन्य उत्पादनांचा अभाव
➤ खोल व यंत्रयुक्त शेतीसाठी साधनांची कमतरता
➤ कांस्य निर्माणाचे अपुरे कौशल्य
➤ लिखित भाषेचे ज्ञान नव्हते
➤ बालमृत्यू दर जास्त
ही रचना परीक्षेसाठी अधिक सुसंगत आणि स्वच्छ स्वरूपात वापरता येईल.
चर्चेतील मुद्दा : सिंधू जल करार (Indus Water Treaty)
◾️चर्चेचे कारण - 21 जानेवारी 2025 जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तज्ञाने ( Neutral Expert) भारताच्या बाजूनं निर्णय दिला आहे
◾️वाद : भारताचे प्रकल्प - 330MW किशनगंगा जलविद्युत प्रकल्प (झेलम) आणि 850MW चा रातले जलविद्युत प्रकल्प (चेनाब) यावर पाकिस्तान ने आक्षेप घेतला आहे
🔹करार : 19 सप्टेंबर 1960 ला झाला
◾️करारावर सह्या : पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्या
◾️मध्यस्थी : जागतिक बँक
◾️सिंधू नदी आणि तिच्या 5 उपनद्या अश्या एकूण 6 नद्या आहेत यांच्यात करार
🇮🇳 भारताला 3 पूर्वेकडील नद्या
⭐️रावी नदी
⭐️बियास नदी
⭐️सतलज नदी
🇵🇰 पाकिस्तान 3 पश्चिमेकडे नद्या
⭐️सिंधू नदी
⭐️चिनाब नदी
⭐️झेलम नदी
👉 यानुसार 80% पाणी पाकिस्तान वापरते आणि 20%पाणी भारत वापरतो
◾️सतलज नदीवर : भाक्रा धरण
◾️बियास नदीवर : पोंग आणि पांडोह धरण
◾️रावी नदीवर : रणजित सागर धरण बांधले आहेत.
पद्म पुरस्कार 2025
1️⃣पद्मविभूषण पुरस्कार - 7 जणांना
2️⃣पद्मभूषण पुरस्कार - 19 पुरस्कार
3️⃣पद्मश्री पुरस्कार - 113 पुरस्कार
एकूण 139 पद्म पुरस्कार
महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार
🚩महाराष्ट्रात पद्मविभूषण कोणालाच मिळाला नाही.
🚩महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार विजेते
1)मनोहर जोशी (मरणोत्तर ) - पब्लिक अफेर
2)पंकज उदास (मरणोत्तर) - कला
3)शेखर कपूर - कला
🚩 महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते
1)अच्युत रामचंद्र पालव - कला
2)अरुंधती भट्टाचार्य - (वाणिज्य आणि उद्योग)
3)अशोक सराफ - कला
4)अश्विनी भिडे देशपांडे - कला
5)चित्राम पवार - सामाजिक सेवा
6)जसपिंदर नरुला - कला
7)मारुती चितमपल्ली - साहित्य आणि शिक्षण
8)राणेंद्र भाऊ मजुमदार - कला
9)सुभाष शर्मा - कृषी
10)वासुदेव कामत - कला
11डॉ विलास डांगरे - औषध
🚩महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार मिळाले
👉 पद्मविभूषण - एकही नाही
👉 पद्मभूषण - 3 पुरस्कार
👉 पद्मश्री - 11 पुरस्कार
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Trick : १ ते १०० संख्यांच्या बेरजा
(१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
१+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५
(२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
११+१२+१३+१४+१५+१६+१७+
१८+१९+२० = १५५
(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
२१+२२+२३+२४+२५+२६+२७+
२८+२९+३० = २५५
(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
३८+३९+४० = ३५५
(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
४८+४९+५० = ४५५
(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
५८+५९+६० = ५५५
(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
६८+६९+७० = ६५५
(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
७८+७९+८० = ७५५
(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
८८+८९+९० = ८५५
(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
९८+९९+१०० = ९५५
*
१ ते १० संख्यांची बेरीज = ५५
११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
२१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
१ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०
Remote Sensing (दूरसंवेदन) – संपूर्ण माहिती
1. Remote Sensing म्हणजे काय? 🛰️
Remote Sensing म्हणजे पृथ्वीवरील किंवा इतर कोणत्याही वस्तूंची त्यांच्याशी थेट संपर्क न साधता माहिती गोळा करण्याची प्रक्रिया. हे मुख्यतः उपग्रह (satellites), विमाने (aircrafts), ड्रोन (UAVs) आणि इतर सेन्सर उपकरणांवर आधारित असते.
2. Remote Sensing चे प्रकार
🟢 (A) सक्रिय (Active) Remote Sensing
✅ स्वतःचा ऊर्जा स्रोत असतो.
✅ ऊर्जा किरण (microwave, radar waves) सोडून त्याचा परावर्तित सिग्नल मोजला जातो.
🔹 उदाहरणे: RADAR (📡), LiDAR (🔦).
🔵 (B) निष्क्रिय (Passive) Remote Sensing
✅ सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक ऊर्जा स्रोतावर अवलंबून असतो.
✅ उष्णता, प्रकाश किंवा इतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांचे निरीक्षण केले जाते.
🔹 उदाहरणे: Optical sensors, Thermal sensors, Infrared imaging.
3. Remote Sensing मधील प्रमुख घटक
🛰️ सेंसर (Sensors): डेटा गोळा करणारी उपकरणे (Active/Passive).
🚀 प्लॅटफॉर्म्स (Platforms): जिथे हे सेंसर बसवले जातात (Satellite, Drone, Aircraft).
💻 डेटा प्रक्रिया (Data Processing): संकलित माहितीचे विश्लेषण करण्यासाठी सॉफ्टवेअर.
📊 डेटा इंटरप्रिटेशन (Data Interpretation): प्रतिमा व माहितीचे विश्लेषण व उपयोग.
4. Remote Sensing चा स्पेक्ट्रम (Spectrum) आणि बँड्स (Bands)
🌈 Visible (दृश्य प्रकाश): लाल, निळा, हिरवा रंग (RGB).
🔴 Infrared (IR): वनस्पती आरोग्य मापन, उष्णता निरीक्षण.
📡 Microwave: ढगांच्या पलीकडील निरीक्षण (Radar Imagery).
🔥 Thermal Imaging: उष्णता मापन (उदा. जंगलातील आगी, भूपृष्ठाचे तापमान).
5. Remote Sensing चे उपयोग (Applications)
🌱 (A) पर्यावरण व हवामानशास्त्र (Environment & Meteorology)
🌍 हवामान बदल निरीक्षण
🌊 समुद्रपातळी वाढ व ग्लेशियर वितळणे निरीक्षण
⛈️ दुष्काळ, पूर, चक्रीवादळ यांचा अंदाज
🌾 (B) शेती व अन्नसुरक्षा (Agriculture & Food Security)
🌱 पीक निरीक्षण
🌍 मृदा आर्द्रता व सुपीकता परीक्षण
📉 अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज
🏙️ (C) शहरे व नागरी विकास (Urban Planning & Infrastructure)
🚦 वाहतूक व्यवस्थापन व नियोजन
🏭 प्रदूषण निरीक्षण व नियंत्रण
📐 बांधकामे आणि भूमापन
⚠️ (D) आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)
🌋 ज्वालामुखी स्फोट निरीक्षण
🌊 पूर, भूकंप व्यवस्थापन
🔥 वने व जंगल आगी नियंत्रण
🛡️ (E) संरक्षण व गुप्तचर माहिती (Defense & Intelligence)
🛰️ सीमावर्ती हालचाली निरीक्षण
🔍 शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणे
📡 सॅटेलाइट आधारित संचार यंत्रणा (https://t.me/scienceprecall)
6. Remote Sensing मध्ये वापरले जाणारे प्रमुख उपग्रह
🇮🇳 भारतीय उपग्रह (ISRO)
🛰 Cartosat Series: उच्च रिझोल्यूशन इमेजिंग.
📡 RISAT (Radar Imaging Satellite): रडार आधारित इमेजिंग.
🌊 Oceansat: समुद्र निरीक्षण.
🌾 Resourcesat: नैसर्गिक संसाधने व पर्यावरण निरीक्षण.
🌦️ INSAT: हवामान अंदाज आणि दळणवळण.
🌍 जागतिक उपग्रह (International)
🛰 Landsat (NASA/USGS, USA): पृथ्वी निरीक्षणाचा सर्वात जुना उपग्रह.
🌍 Sentinel (ESA, Europe): वातावरण व पर्यावरण निरीक्षण.
📷 SPOT (France): उच्च रिझोल्यूशन इमेजिंग.
🔥 Terra & Aqua (NASA): हवामानशास्त्र व पर्यावरण मॉनिटरिंग.
7. Remote Sensing आणि GIS (Geographic Information System)
📍 GIS म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली, जी Remote Sensing मधून मिळालेल्या डेटाचे साठवण व विश्लेषण करते.
✅ उपयोग:
🗺️ नकाशे तयार करणे
🏞️ जमिनीचा वापर विश्लेषण
🚗 वाहतूक मार्ग नियोजन
8. भविष्यातील ट्रेंड आणि संशोधन
🤖 AI आणि मशीन लर्निंग: डेटा प्रोसेसिंग आणि विश्लेषण सुधारण्यासाठी.
📡 हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग: अधिक अचूक डेटा मिळवण्यासाठी विस्तृत स्पेक्ट्रममध्ये निरीक्षण.
🛰 CubeSats: लहान उपग्रह तंत्रज्ञान स्वस्त व कार्यक्षम बनत आहे.
☁️ Cloud Computing: डेटा प्रक्रिया व संग्रहण जलद व व्यापक होणार. (https://t.me/scienceprecall)
🌍 Remote Sensing चे प्रकार (Types of Remote Sensing) 🛰️
1️⃣ सक्रिय (Active) Remote Sensing 🚀
🔹 Active Remote Sensing म्हणजे काय?
✅ स्वतःचा ऊर्जा स्रोत (Light, Microwave, Laser) वापरतो.
✅ ऊर्जा टार्गेटवर सोडली जाते आणि परावर्तित किंवा पसरलेला सिग्नल सेन्सरद्वारे टिपला जातो.
✅ रात्री आणि ढगाळ हवामानात देखील कार्यक्षम असतो. (https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku)
🔍 प्रमुख उदाहरणे:
📡 1. RADAR (Radio Detection and Ranging)
➡️ रेडिओ तरंगलहरींचा वापर करून पृथ्वीचे निरीक्षण केले जाते.
✔️ वापर: हवामान अंदाज ⛈️, सैन्य 🪖, भूगर्भीय सर्वेक्षण 🌎.
🔦 2. LiDAR (Light Detection and Ranging)
➡️ लेसर बीम वापरून पृथ्वीच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करतो. (https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku)
✔️ वापर: जंगलांचे घनत्व मोजणे 🌳, भू-संपत्ती मापन 📏, 3D नकाशे तयार करणे 🗺️.
🌊 3. SONAR (Sound Navigation and Ranging)
➡️ ध्वनी लहरी वापरून समुद्राच्या तळाचा अभ्यास केला जातो. (https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku)
✔️ वापर: पाण्याखालील वस्तू 🔍, समुद्र तळ मापन 🌊, पाण्याखालील भूभाग निरीक्षण 🐠.
2️⃣ निष्क्रिय (Passive) Remote Sensing 🌞
🔹 Passive Remote Sensing म्हणजे काय?
✅ स्वतःचा ऊर्जा स्रोत नसतो, परंतु सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक ऊर्जा वापरतो.
✅ परावर्तित किंवा उत्सर्जित झालेल्या किरणांचे निरीक्षण केले जाते.
(https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku)
🔍 प्रमुख उदाहरणे:
📸 1. Optical Remote Sensing (दृश्य प्रकाश आधारित)
➡️ सूर्यप्रकाशातून परावर्तित झालेली दृश्य किरणे वापरून निरीक्षण केले जाते.
✔️ वापर: शेती निरीक्षण 🌾, पर्यावरण अभ्यास 🌍, जमिनीचा प्रकार मापन 🏜️. (https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku)
🔥 2. Thermal Remote Sensing (उष्णता आधारित निरीक्षण)
➡️ वस्तू किंवा पृष्ठभागाकडून उत्सर्जित उष्णतेच्या किरणांचे निरीक्षण.
✔️ वापर: ज्वालामुखी निरीक्षण 🌋, जंगलातील आगी शोधणे 🔥, पाणी तापमान निरीक्षण 🌡️.
🌿 3. Infrared Remote Sensing (इन्फ्रारेड किरणे आधारित)
➡️ अवरक्त (Infrared) किरणांचे निरीक्षण करून वनस्पती आरोग्य आणि ओलावा मोजला जातो.
✔️ वापर: कृषी संशोधन 🌾, पर्यावरण मॉनिटरिंग 🌍, हवामान अंदाज ⛅️.
📶 4. Microwave Remote Sensing (सूक्ष्मतरंगलहरी आधारित निरीक्षण)
➡️ पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परावर्तित झालेल्या Microwave लहरी सेन्सरद्वारे टिपल्या जातात.
✔️ वापर: वातावरण निरीक्षण 🌪️, समुद्र पातळी निरीक्षण 🌊, वादळे शोधणे 🌀. (https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku)
3️⃣ इतर Remote Sensing प्रकार (Secondary Classifications) 🛰️
A. Spatial Remote Sensing (अंतरिक्ष आधारित निरीक्षण) 🚀
🛰️ 1. Satellite Remote Sensing (उपग्रह आधारित)
➡️ पृथ्वीच्या निरीक्षणासाठी उपग्रह वापरले जातात.
✔️ उदाहरणे:
ISRO चे Cartosat 🌏
NASA चे Landsat 🛰️
ESA चे Sentinel 🌍
✈️ 2. Aerial Remote Sensing (विमान आधारित)
➡️ विमानांवरील कॅमेरे आणि सेन्सर वापरून निरीक्षण केले जाते. (https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku)
🚁 3. Drone Remote Sensing (UAV-based)
➡️ ड्रोनच्या मदतीने प्रत्यक्ष निरीक्षण.
✔️ वापर: जमिनीचा सर्वेक्षण 📏, शेती निरीक्षण 🌾, नागरी नियोजन 🏙️.
B. Multi-Spectral & Hyper-Spectral Remote Sensing 🎨
🌈 1. Multispectral Imaging (बहुवर्णीय प्रतिमा)
➡️ 3-10 बँडमध्ये डेटा संकलन.
✔️ वापर: वनस्पती आरोग्य निरीक्षण 🌿, भूगर्भीय संशोधन ⛏️. (https://t.me/scienceprecall)
🎭 2. Hyperspectral Imaging (अत्याधुनिक वर्णीय प्रतिमा)
➡️ 100+ बँडमध्ये डेटा संकलन.
✔️ वापर: खनिज शोध ⛏️, प्रदूषण निरीक्षण 🌫️, हवामान अभ्यास ⛅️.
C. Geophysical Remote Sensing (भू-भौतिकीय निरीक्षण)
⚖️ 1. Gravimetric Remote Sensing
➡️ गुरुत्वाकर्षण बदल मोजणे.
✔️ वापर: भूगर्भीय संशोधन 🌍.
🧭 2. Magnetic Remote Sensing
➡️ भूचुंबकीय क्षेत्र निरीक्षण.
✔️ वापर: खनिज संशोधन ⛏️, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास 🌎.
🌍 Remote Sensing मधील प्रमुख घटक (Key Components of Remote Sensing) 🛰️
1️⃣ सेंसर (Sensors) 📡
🔹 सेंसर म्हणजे काय?
✅ सेंसर म्हणजे ती उपकरणे जी पृथ्वीवरील विविध घटकांबद्दल माहिती गोळा करतात.
✅ सेंसर Active किंवा Passive प्रकारचे असू शकतात.
✅ त्यांचा उपयोग भिन्न प्रकारच्या ऊर्जा लहरी टिपण्यासाठी केला जातो.
🔍 सेंसरचे प्रकार:
📷 1. Optical Sensors
➡️ दृश्य प्रकाश (Visible light) व इन्फ्रारेड (Infrared) वापरून माहिती गोळा करतात.
✔️ वापर: भूगोल मापन 🏔️, पर्यावरण निरीक्षण 🌿, शेती अभ्यास 🌾.
📡 2. Radar Sensors
➡️ सूक्ष्मतरंग (Microwave) वापरून माहिती गोळा करतात.
✔️ वापर: ढगाळ हवामानात निरीक्षण ☁️, वनीकरण नियंत्रण 🌳, भूगर्भीय सर्वेक्षण 🌎.
🔦 3. LiDAR Sensors
➡️ लेसर किरणांचा वापर करून माहिती संकलन करतात.
✔️ वापर: 3D मॅपिंग 🗺️, जंगल घनता निरीक्षण 🌲, शहरे नियोजन 🏙️.
2️⃣ प्लेटफॉर्म्स (Platforms) 🚀
🔹 प्लेटफॉर्म म्हणजे काय?
✅ सेन्सरला पृथ्वीवरून माहिती गोळा करण्यासाठी स्थानांतरित करणारी यंत्रणा.
✅ वेगवेगळ्या उंचीवर आणि माध्यमांवर अवलंबून विविध प्रकारचे प्लॅटफॉर्म वापरले जातात.
🔍 प्लेटफॉर्म्सचे प्रकार:
🛰 1. उपग्रह (Satellites)
➡️ पृथ्वीच्या कक्षेत फिरणारे उपग्रह.
✔️ उदाहरणे: NASA चे Landsat 🌏, ISRO चे Cartosat 🛰️.
✈️ 2. विमान (Aircrafts) आणि ड्रोन (UAVs)
➡️ लो-एल्टीट्यूड निरीक्षणासाठी वापरले जातात.
✔️ उदाहरणे: Aerial Surveying, Drone Mapping.
3️⃣ डेटा संकलन (Data Acquisition) 🎥
🔹 डेटा संकलन म्हणजे काय?
✅ पृथ्वीवरील विशिष्ट क्षेत्राची किंवा वातावरणाची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया.
✅ डेटा भिन्न प्रकारच्या प्रतिमांमध्ये मिळतो.
🔍 डेटा संकलनाचे प्रकार:
⚫️ 1. पॅनक्रोमॅटिक (Panchromatic)
➡️ फक्त काळ्या-पांढऱ्या (Black & White) प्रतिमा, पण अधिक तपशीलयुक्त.
🌈 2. Multispectral Imaging
➡️ विविध रंगांमध्ये (Red, Green, Blue, Infrared) डेटा गोळा करतो.
🎭 3. Hyperspectral Imaging
➡️ 100+ बँड्समध्ये विस्तृत डेटा संकलन.
✔️ वापर: खनिज शोध ⛏️, प्रदूषण निरीक्षण 🌫️, कृषी संशोधन 🌾.
4️⃣ डेटा प्रक्रिया (Data Processing) 💻
🔹 डेटा प्रक्रिया म्हणजे काय?
✅ संकलित डेटा विश्लेषणासाठी योग्य बनवण्यासाठी केलेली प्रक्रिया.
✅ यात त्रुटी दुरुस्ती, प्रतिमा सुधारणे, आणि डेटा फिल्टर करणे समाविष्ट आहे.
🔍 प्रमुख सॉफ्टवेअर:
🖥 1. ENVI, ERDAS Imagine
➡️ Remote Sensing प्रतिमा आणि डेटा प्रोसेसिंगसाठी वापरले जाते.
🗺 2. ArcGIS
➡️ Remote Sensing डेटा मॅपिंगसाठी वापरले जाणारे प्रमुख GIS सॉफ्टवेअर.
5️⃣ डेटा इंटरप्रिटेशन (Data Interpretation) 🔍
🔹 डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय?
✅ संकलित प्रतिमा आणि डेटाचे विश्लेषण करून त्याचा उपयोग करण्याची प्रक्रिया.
✅ विविध विश्लेषण पद्धती वापरून माहिती वर्गीकृत केली जाते.
🔍 उदाहरणे:
🌿 1. पिकांची आरोग्यता (Crop Health Analysis)
➡️ Multispectral आणि Infrared प्रतिमांमधून वनस्पतींच्या स्थितीचे मूल्यांकन.
🏔 2. भूगर्भीय मॅपिंग (Geological Mapping)
➡️ उपग्रह प्रतिमांद्वारे जमिनीची रचना आणि खनिज शोध ⛏️.
6️⃣ स्पेक्ट्रल सिग्नेचर्स (Spectral Signatures) 🎨
🔹 स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणजे काय?
✅ प्रत्येक वस्तू किंवा पृष्ठभाग विशिष्ट प्रकारच्या Electromagnetic Radiation ला परावर्तित किंवा शोषून घेते.
✅ या सिग्नेचरच्या आधारे वेगवेगळ्या वस्तूंचे वर्गीकरण केले जाते.
🔍 उदाहरणे:
📘 पाणी (Water) – उच्च निळ्या रंगातील स्पेक्ट्रम.
🌳 वनस्पती (Vegetation) – गडद हिरव्या रंगातील स्पेक्ट्रम.
🏜 माती आणि वाळू (Soil & Sand) – ब्राउन आणि रेड स्पेक्ट्रम.
7️⃣ नकाशे व चित्रे (Maps and Images) 🗺️
🔹 नकाशे आणि चित्रे म्हणजे काय?
✅ Remote Sensing च्या अंतिम उत्पादनांपैकी एक म्हणजे विविध स्वरूपातील नकाशे.
✅ हे नकाशे GIS वापरून तयार केले जातात.
🔍 उदाहरणे:
🏙 1. शहरी नियोजन (Urban Planning Maps)
शहरे विस्तार, वाहतूक मार्ग आणि बांधकामे नियोजन.
🌲 2. पर्यावरण नकाशे (Environmental Monitoring Maps)
➡️ प्रदूषण निरीक्षण, जंगलक्षेत्र आढावा.
🔥 ✅मुख्य मुद्दे थोडक्यात: 🔥
📡 Remote Sensing प्रणालीमध्ये 7 प्रमुख घटक असतात:
✅ 1. सेंसर – डेटा संकलनासाठी.
✅ 2. प्लेटफॉर्म्स – उपग्रह, ड्रोन, विमान.
✅ 3. डेटा संकलन – Multispectral, Hyperspectral.
✅ 4. डेटा प्रक्रिया – सॉफ्टवेअरद्वारे डेटाचे विश्लेषण.
✅ 5. डेटा इंटरप्रिटेशन – प्रतिमांचे विश्लेषण.
✅ 6. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स – वस्तूंचे वर्गीकरण.
✅ 7. नकाशे व चित्रे – अंतिम परिणाम.
🌍 या घटकांच्या मदतीने पृथ्वीवरील विविध घटकांचे निरीक्षण, विश्लेषण आणि व्यवस्थापन करता येते. 🚀
देशातील पहिले
📖देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)
📖देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली
📖देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश
📖देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)
📖देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)
📖देशातील पहिली फूड बँक - दिल्ली
📖देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
📖देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्वर
📖देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
📖देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
📖देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
📖देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
📖देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
📖देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
📖देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
📖देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
📖देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
📖देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
📖देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे
📖देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश
📖देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
📖देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
📖देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
📖देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
📖देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
📖देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
📖देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
📖देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
📖देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
📖देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश
📖देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
📖देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
📖देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे
📖देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
📖देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र
📖देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
📖देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)
📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड
📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र
📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू
📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश
📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)
📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान
📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
📖देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
📖देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)
खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
🔖 प्रश्न.1) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
उत्तर -शिवेंद्रराजे भोसले
🔖 प्रश्न.2) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
उत्तर - सातारा
प्रश्न.3) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात केले आहे ?
उत्तर - सायप्रस
🔖 प्रश्न.4) कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेस कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (CBE) सन्मान देण्यात आला आहे ?
उत्तर -लीना नायर
🔖 प्रश्न.5) ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?
उत्तर - सौदी अरेबिया
🔖 प्रश्न.6) महिला एकदिवसीय (वनडे) क्रिकेट विश्वचषक २०२५ कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जाईल ?
उत्तर - भारत आणि श्रीलंका
🔖 प्रश्न.7) भारतीय सेना ने कोणत्या राज्यात रुद्रास्त या UAV ड्रोन ची यशस्वी चाचणी घेतली आहे ?
उत्तर - राजस्थान
🔖 प्रश्न.8) ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच कोणत्या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर - ब्लेझ मेट्रेवेली
🔖 प्रश्न.9) ५१ वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजीत करण्यात आली आहे ?
उत्तर -कॅनडा
🔖 प्रश्न.10) जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर -१७ जून
सह्याद्रि
पश्र्चिम घाट, सह्य पर्वत.
भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.
उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.
▪️भवैज्ञानिक इतिहास
सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.
ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.
अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे. पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे. भूकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.
▪️भविशेष
सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.
पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे. पूर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.
सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी गिरिस्थाने वसली आहेत. कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत.
सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.
म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.
तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.
पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम् (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.
चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.
पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.
▪️नदया
भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.
सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा,मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.
कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात.
तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत.
पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे.
सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.
▪️हवामान
समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते.
बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो.
▪️वने
पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात.
सस.पासून सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात. केरळमधील सदाहरित वने व राष्ट्रीय उद्याने, केरळ व तमिळनाडूमधील वायनाड व मदुमलाई राष्ट्रीय उद्याने, हे पश्र्चिम घाटातील संरक्षित जंगलमय प्रदेश आहेत. पश्चिम घाटाचा संरक्षित ‘ वर्ल्ड हेरिटेज साइट ’मध्ये समावेश करावा अशी मागणी भारत सरकारने २००६ मध्ये ‘युनेस्को मॅब ’कडे केली आहे. अशा स्थळांमध्ये पुढीलप्रमाणे सात प्रमुख विभागांचा व त्यांतील वेगवेगळ्या उपविभागांचा समावेश असेल :
(१) अगस्त्यमलई विभाग : यात पुढील पाच उपविभागांचा समावेश असेल : तमिळनाडूमधील अगस्त्यमलई जीवावरणीय राखीव प्रदेश ( क्षेत्र ९०० चौ. किमी.); कालकाड मुदननुराई व्याघ राखीव प्रदेश (८०६ चौ. किमी.); केरळमधील नेय्यर, पेप्परा व शेंदूर्णे वन्यजीव अभयारण्य; त्यालगतचे आचेनकोइल, थेनमाला, कोन्नी, पुनालूर, तिरूअनंतपुरम् विभाग आणि अगस्त्य वनम् विशेष विभाग.
(२) पेरियार विभाग : यामध्ये सहा उपविभागांचा समावेश असेल : केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान व निसर्ग राखीव प्रदेश (७७७ चौ. किमी.), रन्नी, कोन्नी व आचनकोइल अरण्य विभाग. पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील प्रामुख्याने शुष्क अरण्यमय प्रदेशातील श्रीविल्लिपुत्तूर वन्यजीव अभयारण्य आणि तिरूनेलवेली अरण्य विभागातील राखीव जंगलांचा प्रदेश.
(३) अन्नमलई विभाग : यात सात उपविभागांचा अंतर्भाव असेल : तमिळनाडूमधील चिन्नर वन्यजीव अभयारण्य, एर्नाकुलम् राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), विस्तीर्ण अशा इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य प्रदेशात (९५८ चौ. किमी.) समाविष्ट असणारी इंदिरा गांधी गास हिल्स व करिअन शोला राष्ट्रीय उद्याने, पलनी हिल्स राष्ट्रीय उद्यान (७३७ चौ. किमी.), केरळमधील पेरांबीकुलम् वन्यजीव अभयारण्य (२८५ चौ. किमी.).
(४) निलगिरी विभाग : हा विभाग सु. ६,००० चौ. किमी.पेक्षाही अधिक क्षेत्रात विस्तारला आहे. यात सहा उपविभाग समाविष्ट असतील : केरळमधील निलगिरी जीवावरणीय राखीव प्रदेश आणि करिम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० चौ. किमी.), सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), वायनाड वन्यजीव अभयारण्य (३४४ चौ. किमी.), तमिळनाडूमधील बंदीपूर (८७४ चौ. किमी.), माकूर्ती (७८ चौ. किमी.) व मदुमलाई (३२१ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने व न्यू अमरम्बलम् राखीव जंगल. हा विभाग अतिशय जटिल, सुरक्षित व जगातील एक वैशिष्टयपूर्ण अरण्यमय प्रदेश आहे. आशियाई हत्ती, वाघ, गवा व इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांचे हे आश्रयस्थान आहे.
(५) तळकावेरी विभाग : यात सहा उपविभाग आहेत. कर्नाटकातील बह्मगिरी (१८१ चौ. किमी.), पुष्पगिरी (९३ चौ. किमी.) व तळकावेरी (१०५ चौ. किमी.) ही वन्यजीव अभयारण्ये, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान ( नागरहोळे ३२१ चौ. किमी.) आणि केरळमधील अलाराम राखीव जंगल.
(६) कुद्रेमुख विभाग : यामध्ये कर्नाटकातील पाच उपविभाग येतात. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान(६०० चौ. किमी.), सोमेश्र्वर वन्यजीव अभयारण्य व सभोवतालची सोमेश्वर, अगुंबे व बाळहळ्ळी राखीव जंगले.
(७) सह्याद्री विभाग : यात महाराष्ट्रातील चार उपविभाग येतात. आन्शीप (३४० चौ. किमी.) व चांदोली (३१८ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने. कोयना व राधानगरी ही वन्यजीव अभयारण्ये.
सह्याद्री हा जैवविविधतेचा एक खजिना आहे. तेथील सु. २,००० जातींच्या वनस्पतींचा औषधांसाठी वापर केला जातो. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ’ने केलेल्या एका अभ्यासानुसार महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री प्रदेशात देवदेवतांच्या नावाने श्रद्धेने संरक्षित केलेल्या वनविभागांत १,६०० पेक्षा जास्त ‘देवराया ’ आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी, अभयारण्ये, राखीव व संरक्षित वने निर्माण करणे शक्य झाले आहे. येथील पर्यटनाची अनेक ठिकाणे आर्थिक क्षेत्रे असल्याने पश्र्चिम घाट विकसित होत आहे.
सह्याद्रीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे नदयांच्या खोऱ्यांत जलविद्युत्निर्मिती प्रकल्पांची निर्मिती सुलभ झाली आहे. येथील जंगलांतून लाकूड व इतर अनेक वनोत्पादने तसेच दक्षिण सह्याद्रीतून चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ इ. उत्पादने मिळतात. वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने पश्र्चिम घाटातील खिंडी व घाट महत्त्वाचे ठरले आहेत. अनेक कवींनी व लेखकांनी सह्याद्रीचे सौंदर्य वर्णिले आहे.
वायनाड अरण्याचा प्रदेश म्हणजे उत्तरेकडील व दक्षिणेकडील घाट प्रदेशाचा संक्रमण भाग आहे. दक्षिणेकडील भाग आर्द्र असल्याने तेथे वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात. केरळमध्ये या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे दाट अरण्ये आहेत. ‘ सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान ’ हा भारतातील अतिशय महत्त्वाचा, विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांचा प्रदेश आहे. वृक्षतोडीमुळे उघडया पडलेल्या प्रदेशात गवताळ प्रदेशांची निर्मिती झालेली दिसते. मुख्यत: कर्नाटकातील पश्र्चिम घाट प्रदेश व निलगिरी पर्वतीय प्रदेशात असे विस्तृत गवताळ प्रदेश आहेत.
पूर्वी पश्र्चिम घाट प्रदेशात घनदाट अरण्ये होती. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींना उदरनिर्वाहासाठी पुरेशा प्रमाणात फळे, कंदमुळे इ. सहज उपलब्ध होत असत. प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे सखल भागातील लोकांना अशा अरण्यमय भागात येऊन शेती करणे किंवा वसाहती स्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे जंगले सुरक्षित होती. परंतु ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर प्रामुख्याने मळ्यांच्या लागवडीसाठी व त्यानंतर इतर कारणांसाठी मोठया प्रमाणावर जंगलतोड केली गेली.
▪️जवविविधता
पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.
भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.
पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल - स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात.
निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे.
कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत.
ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे.
Latest post
महाजनपद आणि त्यांची माहिती:
1. अंग 🟢 - स्थान: गंगेच्या दक्षिणेला, बिहार - राजधानी: चंपा 🏰 - राजा: दशरथ 👑 - पाडाव: मगधच्या बिंबिसारने याचा पाडाव केला ⚔️ 2...

-
वाक्प्रचार मराठी व्याकरण |vakyaprachar वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करणे. (१) हात दाखवून अवलक्षण करणे. अर्थ - आपणहून संक...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
१) डोळा लागणे - झोप लागणे २) डोळा मारणे - इशारा करणे ३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे ४) डोळे येणे - नेत्रविकार होणे ५) डोळे जाणे - दृष्टी गमावण...