Friday 7 August 2020

Online Test Series

Daily Questions and answers



१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही

२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०

३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते

४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही

५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही

६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही

७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय

८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं

९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही

१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६

महत्त्वाचे प्रश्नसंच

०१] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४] कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५]  हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६] फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७] मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८] भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९] नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०] महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११] महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२]  परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३] ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४] दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५] बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६] Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७] हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८] पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९] पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०] गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१] घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२] ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३] या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४]  कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५]   भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६] जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७] भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८]  इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९] पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०] वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्‍ट्र

३१]  लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२] फिग्रीन ऑफ गोरा देव’ (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३] पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४] कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५] झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६] भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७] महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८] कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९] महाराष्ट्रातील कोणता प्रदेश ‘तलावाचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०]  राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१] महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२] ‘श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३] महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४] महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला

४५] महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी

४६]  कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा

४७] महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.

४८] महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

४९] यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत?

>>> वणी

५०] मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> अमरावती

विभक्ती

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे

असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार

१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

विभक्तीची आठ नावे

१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी 
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी 
८)  संबोधन

विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा

विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही      
२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते   
३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही    
४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    
५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून    
६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची  
७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ  
८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो

विभक्तीतील रूपे

विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा -  फूल  -  फुले
२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना
३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना
५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत
८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी

कलम 370 काय आहे ?


.
जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहे, हे खाली विस्तृतपणे देण्यात आले आहे.
कलम 370 मधील प्रमुख मुद्दे
.
1) कलम 370 लागू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य आहे.
.
2) कलम 370 मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे.
.
3) इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.
.
4) या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.
5) कलम 370 मुळेच जम्मू-काश्मीरवर 1976 चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. याचाच अर्थ जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जमीन खरेदी करूशकत नाही.
.
6) एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तर तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.
.
7) याशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते भारतीय घटनेचे कलम 360 देखील जम्मू-काश्मीरवरलागू होत नाही.
.
8) भारतातील सर्व राज्यांमध्येलागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत.
.
9) जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. तसेच, इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम 370 द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे.
.
10) पाकिस्तानने 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम370 अस्तित्वात आले.
.
11) 50 दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम 370 च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे. जम्मू-काश्मीर पूर्णपणे एकीकृत व्हावे, असे त्यांना वाटते.समर्थनात केले जाणारे तर्क
कलम 370 कायम ठेवण्याच्या बाजूने बोलायचे झाल्यास या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चितकरण्याचा अधिकार मिळतो. केंद्रसरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात.
.
* भारत आणि जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या करारांनुसार या राज्याला भारताशी जोडणारा हा कायदा आहे. याचाच उल्लेख करत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले होते की, कलम 370 ची कायम चुकीचीव्याख्या होत आलेली आहे.
.
* या कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.
.
* जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. या कलमाअंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू-काश्मीरच्या महिलेशी लग्न करून काश्मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो. अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्मीरचे नागरिकत्व सहज मिळते.
.
* जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत. कलम 370 मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो.
.
* जम्मू-काश्मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठीभारत सरकार कलम 370 अंतर्गत काहीच करू शकत नाही. तथापि, अल्पसंख्याकांच्
या हितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीर सरकारवर लावला जात आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?

(A) उत्तराखंड
(B) जम्मू व काश्मीर✅✅
(C) लडाख
(D) मणीपूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेत “विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) कोहोर्ट” उपक्रमाचा प्रारंभ केला गेला?

(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली✅✅
(B) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
(C) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या बँकेनी ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ केला?

(A) फेडरल बँक
(B) HDFC बँक
(C) कोटक महिंद्रा बँक✅✅
(D) ICICI बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

“स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?

(A) जयदीप गोविंद
(B) समीर कुमार
(C) व्ही. राधा
(D) परमेश्वरन अय्यर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेच्यावतीने “सहकार कूपट्यूब NCDC चॅनेल” कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

(A) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र
(B) राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ✅✅
(C) राष्ट्रीय दुग्ध संस्कृती संग्रह
(D) राष्ट्रीय हवामान माहिती संस्कृती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेच्यावतीने भारत आणि रशिया यांच्यामधील संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रमासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग✅✅
(B) जैवतंत्रज्ञान विभाग
(C) गृह मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ‘नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम (NTPS)’ याचे अनावरण केले?

(A) गृह मंत्रालय
(B) पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालय✅✅
(C) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात नवी अत्याधुनिक ‘मध परीक्षण प्रयोगशाळा’ आहे?

(A) गुजरात✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणते आठव्या कलमान्वये उद्योगपतींच्या नेतृत्वात एक कंपनी तयार करणारे पहिले राज्य ठरले?

(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’चे बोधवाक्य काय आहे?

(A) सेम्पर फोर्टिस
(B) डी ओप्रेसो लिबर
(C) सेम्पर सुप्रा ✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणती अंतराळ संस्था ‘ASTHROS’ मोहीम प्रक्षेपित करणार आहे?

(A) स्पेसएक्स
(B) इस्रो
(C) ईएसए
(D) नासा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘मल्टि-इंटरऑपरेबल क्यूआर कोड’ची शिफारस करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समितीचे प्रमुख कोण आहेत?

(A) डी. बी. पाठक✅✅
(B) कुश तनेजा
(C) अशोक कुमार गुप्ता
(D) संजीव चड्ढा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणती संस्था GAIL मर्यादित कंपनीच्या सहयोगाने ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ प्रकल्प उभारणार आहे?

(A) BHEL
(B) NTPC
(C) CCSL✅✅
(D) HPCL

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी या पदावर नेमणूक झाली?

(A) संभव जैन
(B) अनसूया उइके
(C) गणेशी लाल
(D) पार्थ प्रतिम सेनगुप्ता✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची टाटा AIA लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक झाली?

(A) नवीन तहिलयानी✅✅
(B) ऋषी श्रीवास्तव
(C) विभा पडळकर
(D) आशिष वोहरा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .

A) लॉर्ड  विलियम बेंटिक ✅✅
B) लॉर्ड  हेस्टिंग्स
C) लॉर्ड  वेलस्ली
D) लॉर्ड मेयो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली.

A) 1852
B) 1853✅✅
C) 1854
D) 1855
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली.

A) लॉर्ड  रिपन
B) लॉर्ड  विलियम  बेंटिक
C) लॉर्ड कॉर्नवालिस
D) लॉर्ड  डलहौसी ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली.

A) लॉर्ड  मेकॅले
B) लॉर्ड  बेंटिक
C) लॉर्ड  वेलस्ली ✅✅
D) लॉर्ड  डलहौसी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली.

A) लॉर्ड  कर्झन
B) लॉर्ड  डफरीन ✅✅
C) लॉर्ड रिपन
D) ए.  ओ.  ह्यूम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो.?

19 जुलै
29 जुलै ✅✅
30 जून
30 जुलै

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कारगिल विजय दिवस भारतीय भुदलाच्या कोणत्या विजयी मोहीमेच्या स्मृतीत पाळला जातो?

(A) ऑपरेशन कॅक्टस
(B) ऑपरेशन पवन
(C) ऑपरेशन विजय ✅✅
(D) ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेनी ‘उन्नत भारत अभियान’साठी TRIFED सोबत सामंजस्य करार केला?

(A) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
(B) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात चौथ्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार?

(A) हरयाणा✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची वेस्टर्न एअर कमांडच्या प्रमुखपदी नेमणूक झाली?

(A) एअर मार्शल विवेक राम चौधरी✅✅
(B) एअर मार्शल व्ही. आर. चौधरी
(C) एअर मार्शल बी. सुरेश
(D) एअर मार्शल आय. पी. विपिन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?

(A) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ✅✅
(B) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
(C) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(D) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या संस्थेनी स्टार्टअप उद्योग आणि नवसंशोधकांसाठी ‘डेअर टू ड्रीम 2.0’ ही स्पर्धा आयोजित केली?

(A) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
(B) संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO)✅ ✅
(C) NTPC मर्यादित
(D) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या मंत्रालयाने ‘नॉलेज रिसोर्स सेंटर नेटवर्क (KRCNet)’ याचे उद्घाटन केले?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(B) जलवाहतूक मंत्रालय
(C) भूशास्त्र मंत्रालय ✅✅
(D) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 राजस्थानमध्ये तयार झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालाच्या अधिकारांविषयी खालील विधाने विचारात घ्या:

1. कलम 174 अन्वये राज्यपाल योग्य वाटेल त्यावेळी आणि कोणत्याही ठिकाणी सभा बोलवू शकतात.


2. कलम 163 मध्ये असे नमूद आहे की राज्यपाल आपली कार्ये केवळ मंत्रिमंडळाच्या मदतीने आणि त्यांच्या सल्ल्यानुसार करावी आणि ते स्वतःची विवेकबुद्धी वापरू शकत नाही.

📌 दिलेले कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ 1 ✅✅
(B) केवळ 2
(C) 1 आणि 2
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 निधन झालेले आमला शंकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) बालकांच्या शिक्षणाचे प्रवर्तक
(B) मानवी हक्क कार्यकर्ता
(C) पत्रकार
(D) नृत्यदिग्दर्शक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या देशाने सामाजिक न्याय आणि संघ-स्थापना बैठकीसाठी पहिल्यांदाच क्रिकेट सामना आयोजित केला?

(A) न्युझीलँड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) दक्षिण आफ्रिका ✅✅
(D) इंग्लंड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या सार्वजनिक संस्थेनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी IIT कानपूर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

(A) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
(B) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन
(C) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन✅✅✅
(D) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठी भारतासोबत सामंजस्य करार केला?

(A) केनिया
(B) झिम्बाब्वे✅✅
(C) मोझांबिक
(D) मलावी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स विषयक संशोधनासाठी भारतासोबत करार केला?

(A) ब्रिटन✅✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) स्पेन
(D) कॅनडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाला भूशास्त्र मंत्रालयाकडून ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अशोक साहनी✅✅
(B) डॉ. एस. एस. बाबू
(C) जे. के. भट्टाचार्य
(D) टी. चक्रवर्ती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात पवन हंस या कंपनीने उडान योजनेच्या अंतर्गत प्रथम हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला?

(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू व काश्मीर
(C) सिक्किम
(D) उत्तराखंड✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय हवाई दलाच्या कोणत्या पथकाला ‘गोल्डन अॅरोज’ म्हणून संबोधले जाते?

(A) स्क्वॉड्रॉन 12
(B) स्क्वॉड्रॉन 102
(C) स्क्वॉड्रॉन 17✅✅
(D) स्क्वॉड्रॉन 8

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेनी 400 दशलक्ष डॉलरच्या चलनाची अदलाबदल करण्यासाठी करार केला?

(A) इथिओपिया
(B) सेनेगल
(C) सेशेल्स
(D) श्रीलंका ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

काश्मीर खोऱ्यातल्या कोणत्या मसाल्याला केंद्र सरकारकडून GI टॅग प्राप्त झाला?

(A) कोशूर माऱ्त्सिवागुन
(B) कोशूर झुर
(C) काश्मीर कहवा
(D) केसर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातल्या भारतीय लेखा मानदंडांमध्ये दुरुस्ती केली?

(A) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(B) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय ✅✅
(C) कायदा व न्याय मंत्रालय
(D) अर्थमंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2020 साली जागतिक हेपॅटायटीस दिनाची संकल्पना काय आहे?

(A) इन्व्हेस्ट इन एलिमीनेटिंग हेपॅटायटीस
(B) हेपॅटायटीस फ्री फ्युचर✅✅
(C) फाइंड द मिसिंग मिलियन्स
(D) मेकिंग हेपॅटायटीस एलिमीनेशन ए रीयालिटी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशात भारत निर्यातीला चालना देण्यासाठी कापूस साठविण्यासाठी गोदाम उभारणार आहे?

(A) व्हिएतनाम✅✅
(B) म्यानमार
(C) अफगाणिस्तान
(D) फिलीपिन्स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ग्रामीण विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी “वित्तीय व्यवस्थापन निर्देशांक” जाहीर केला?

(A) सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(C) कामगार व रोजगार मंत्रालय
(D) ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तयार केलेल्या भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

(A) ऋतू
(B) जलवायू
(C) मौसम ✅✅
(D) अवधी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?

(A) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ✅✅
(B) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
(C) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(D) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.

(A) 14 जुलै
(B) 15 जुलै✅✅
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...